शाओलान ह्स्युः शिका चीनी वाचन ... सहजतेने!
-
0:01 - 0:03तैवान मध्ये एका सुलेखकाची मुलगी म्हणून
-
0:03 - 0:04लहानाची मोठी होत असताना
-
0:04 - 0:07माझी एका किमती आठवणीतील एक आठवण होती
-
0:07 - 0:10ती म्हणजे माझ्या आईने मला चीनी अक्षरांचे दाखवलेले
-
0:10 - 0:13सौंदर्य, आकार आणि स्वरूप.
-
0:13 - 0:15तेव्हापासून च, मला या अद्भूत भाषेने
-
0:15 - 0:18संमोहित करून टाकले!
-
0:18 - 0:20पण बाहेरील व्यक्तीसाठी मात्र हि (अक्षरे)
-
0:20 - 0:24महान चीनी भिंतीप्रमाणे च अभेद्य (अडथळा ) वाटतात.
-
0:24 - 0:26मागील काही वर्षांमध्ये मी विचार करत आहे की,
-
0:26 - 0:28जर मी या अडथळ्याला दूर केले,
-
0:28 - 0:31तर ज्या व्यक्तीला या परिष्कृत भाषेचे सौंदर्य समजून रसग्रहण
-
0:31 - 0:35करायचे असेल, त्या व्यक्तीस ते करता येईल.
-
0:35 - 0:39मी विचार करायला सुरुवात केली की कशा प्रकारे एक नवी आणि जलद पद्धत
-
0:39 - 0:42चीनी भाषा शिकायला उपयुक्त ठरेल.
-
0:42 - 0:46वयाच्या पाचव्या वर्षापासून मी प्रत्येक अक्षराची
-
0:46 - 0:49सर्व रेखाटने योग्य क्रमाने शिकायला
-
0:49 - 0:52सुरुवात केली.
-
0:52 - 0:54पुढील १५ वर्षांमध्ये मी दररोज
-
0:54 - 0:56एक नवीन अक्षर शिकले.
-
0:56 - 0:58आत्ता आपल्याकडे केवळ ५ मिनिटे आहेत,
-
0:58 - 1:02त्यामुळे सोपा आणि जलद मार्ग उपयुक्त आहे.
-
1:02 - 1:06एका चीनी विद्वानाला सर्व साधारणपणे २०,००० अक्षरे कळतात.
-
1:06 - 1:11मुलभूत साहित्य समजायला केवळ १००० अक्षरे पुरी पडतात.
-
1:11 - 1:15सर्वाधिक वापरली जाणारी २०० अक्षरे तुम्हाला
-
1:15 - 1:18४०% मुलभूत साहित्य समजायला तसेच
-
1:18 - 1:21रस्त्यांवरील चिन्हे, खाणावळी मधील पदार्थांची यादी
-
1:21 - 1:24संकेतस्थळाचे आकलन आणि वर्तमान पत्र वाचण्यास
-
1:24 - 1:25पुरे असतात.
-
1:25 - 1:28आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखविण्याकरिता
-
1:28 - 1:30८ अक्षरांनी सुरुवात करणार आहे.
-
1:30 - 1:31मग, आहात का तयार?
-
1:31 - 1:34जमेल तेवढे तोंड उघडा
-
1:34 - 1:36जोपर्यंत एक चौकोन नाही बनत.
-
1:36 - 1:39हे झाले 'मुख'.
-
1:39 - 1:42हि एक चालत जाणारी व्यक्ती आहे
-
1:42 - 1:45'व्यक्ती'
-
1:45 - 1:48जर आगीचा आकार दोन्ही बाजूला
-
1:48 - 1:50हात असलेल्या व्यक्तीप्रमाणे असेल,
-
1:50 - 1:52जणू काही ती व्यक्ती जोराने ओरडत असेल,
-
1:52 - 1:56"वाचवा! मला आग लागली आहे!" --
-
1:56 - 2:00हे चिन्ह मुळात ज्वालेच्या आकारापासून बनले आहे,
-
2:00 - 2:04पण मला अशा प्रकारे विचार करायला आवडते. तुमच्यासाठी जे काम करेल, ते.
-
2:04 - 2:06हे एक झाड आहे.
-
2:06 - 2:08'झाड'.
-
2:08 - 2:13हा एक पर्वत आहे
-
2:13 - 2:15सूर्य
-
2:17 - 2:22चंद्र
-
2:22 - 2:24हे दरवाज्याचे चिन्ह आहे
-
2:24 - 2:30(अमेरिकेतल्या) पश्चिमेकडील सलून चे दरवाजे च जणू.
-
2:30 - 2:34मी या ८ अक्षरांना मुलभूत असे संबोधते.
-
2:34 - 2:35ही (अक्षरे) नवीन अक्षरांच्या रचनेसाठी
-
2:35 - 2:39मुलभूत घटक च आहेत.
-
2:39 - 2:41एक व्यक्ती.
-
2:41 - 2:45जर कोणी (व्यक्ती)मागून चालत असेल, तर ते - 'अनुगमन करणे'.
-
2:45 - 2:48एका जुन्या म्हणी प्रमाणे,
-
2:48 - 2:51दोघांची म्हणजे संगत, तिघांची म्हणजे गर्दी.
-
2:51 - 2:54जर एका व्यक्तीने आपले हात लांब पसरविले,
-
2:54 - 2:59तर ती व्यक्ती म्हणत आहे "ती (गोष्ट) मोठी होती" - 'मोठी'
-
2:59 - 3:03एका मुखाच्या आत असलेली व्यक्ती, म्हणजे अडकलेली व्यक्ती - 'अडकलेले'
-
3:03 - 3:09ती व्यक्ती एक बांधक आहे, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जोना एका व्हेल माशामध्ये.
-
3:09 - 3:12हे एक झाड आहे. दोन झाडे एकत्र आणि आपल्याला मिळते - 'वन'
-
3:12 - 3:16३ झाडे एकत्र आणि बनले 'जंगल'.
-
3:16 - 3:20झाडाखाली एक फळी ठेवा, आणि बनला 'पाया'
-
3:20 - 3:24झाडाच्या वरती एक मुख ठेवा, आणि बनला - 'बावळट '
-
3:24 - 3:26लक्षात ठेवायला सोपे आहे,
-
3:26 - 3:31कारण बोलू शकणारे झाड म्हणजे बावळट च ना.
-
3:31 - 3:33लक्षात आहे, आग ?
-
3:33 - 3:36दोन आगी एकत्र आणि बनले - 'ऊष्ण'
-
3:36 - 3:38३ आगी एकत्र आणि झाल्या भरपूर 'ज्वाळा'
-
3:38 - 3:43२ झाडांखाली आग, आणि हे आहे 'ज्वलन'
-
3:43 - 3:46आपल्यासाठी सूर्य म्हणजे उत्कर्षाचे उगमस्थान.
-
3:46 - 3:48म्हणून, २ सूर्य एकत्र आणि - 'उत्कर्ष'
-
3:48 - 3:51३ (सूर्य) एकत्र आणि बनले - 'निखर'/ 'ठिणगी'
-
3:51 - 3:53एकत्र चमकणारी सूर्य आणि चंद्र आणा,
-
3:53 - 3:54हे बनले - 'चमक' (शुभ्रता)
-
3:54 - 3:58त्याचा 'उद्या' असाही अर्थ होतो - एक दिवस आणि एका रात्रीनंतर असे
-
3:58 - 4:03सूर्य क्षितिजावर येत आहे - 'सूर्योदय'
-
4:03 - 4:06एक दरवाजा. त्याच्या आत एक फळी ठेवा,
-
4:06 - 4:08आणि बनली - दरवाज्याची कडी .
-
4:08 - 4:11दरवाज्याच्या आत एक मुख ठेवा, प्रश्न विचारणारे
-
4:11 - 4:14'ठक ठक'.. कोणी आहे का घरी ?
-
4:14 - 4:17हि व्यक्ती दरवाज्यातून बाहेर निसटत आहे,
-
4:17 - 4:20'निसटणे', 'सुटका करून घेणे'
-
4:20 - 4:22डावीकडे, आपल्याकडे आहे एक 'स्त्री'
-
4:22 - 4:24२ स्त्रिया एकत्र आणि त्यांच्यात होतो 'वाद'
-
4:24 - 4:26(प्रेक्षकांचे हास्य)
-
4:26 - 4:33३ स्त्रिया एकत्र, आणि सावधान, हा होतो 'व्यभिचार'.
-
4:33 - 4:36तर मग आपण जवळजवळ ३० अक्षरे शिकलो.
-
4:36 - 4:40ह्या पद्धतीने, ८ मुळाक्षरे
-
4:40 - 4:42तुम्हाला ३२ अक्षरे बनवायला मदत करतात.
-
4:42 - 4:43पुढची ८ मुळाक्षरे आणि
-
4:43 - 4:46तुम्ही अजून ३२ बनवाल.
-
4:46 - 4:48अशा प्रकारे, अतिशय कमी श्रमात,
-
4:48 - 4:50तुम्ही साधारण दोनशे अक्षरे तर सहज शिकाल.
-
4:50 - 4:53जे ८ वर्षाच्या चीनी मुलाच्या (ज्ञानाच्या) बरोबरीचे च.
-
4:53 - 4:56आणि मग अक्षरे समजून घेतल्यावर, आपण बनवू लागतो वाक्यांश.
-
4:56 - 4:59उदाहरणार्थ, पर्वत आणि आग एकत्र,
-
4:59 - 5:02आणि बनले पर्वतावरची आग - 'ज्वालामुखी'
-
5:02 - 5:05आपल्याला माहित आहे, जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे.
-
5:05 - 5:09हा आहे सूर्य 'पाया'सोबत,
-
5:09 - 5:12कारण जपान आहे चीन च्या पूर्वेला.
-
5:12 - 5:16म्हणून, सूर्य आणि पाया एकत्र आणि बनला - 'जपान'.
-
5:16 - 5:19जपान च्या मागे एक व्यक्ती आणि काय मिळाले आपल्याला?
-
5:19 - 5:22'एक जपानी व्यक्ती'.
-
5:22 - 5:25डावीकडचे अक्षर आहे - २ पर्वत
-
5:25 - 5:27एकमेकांवर रचून ठेवलेले.
-
5:27 - 5:30जुन्या काळी चीन मध्ये त्याचा अर्थ असे - 'हद्दपारी',
-
5:30 - 5:32कारण, चीनी सम्राट त्यांच्या राजकीय शत्रूंना
-
5:32 - 5:35पर्वतांच्या मागे हद्दपार करायचे.
-
5:35 - 5:40आजच्या घडीला, हद्दपारी चे रुपांतर बाहेर निघून जाण्यात झाले आहे.
-
5:40 - 5:42थोडक्यात, एक मुख जे बाहेर निघायला सांगते,
-
5:42 - 5:44तेच म्हणजे 'निकास'.
-
5:44 - 5:48ही स्लाईड मला आठवण द्यायला आहे, कि मी आता माझे बोलणे आवरते घ्यावे
-
5:48 - 5:50आणि ह्या मंचाचा निरोप घ्यावा. धन्यवाद.
-
5:50 - 5:54(टाळ्यांचा गजर)
- Title:
- शाओलान ह्स्युः शिका चीनी वाचन ... सहजतेने!
- Speaker:
- ShaoLan
- Description:
-
परदेशातील लोकांसाठी, चिने भाषा बोलायला शिकणे अवघड असते. परंतु, चीनी लिखित भाषेतील सुंदर, पण क्लिष्ट अशी अक्षरे वाचायला शिकणे तितके अवघड नव्हे. शाओलान आपल्याला एका सोप्या पाठाद्वारे ही अक्षरे आणि त्यांच्या मागची कल्पना समजून घेण्यास मदत करते - काही सोप्या रचनांपासून क्लिष्ट संकल्पनांपर्यंत. म्हणा याला - चायनीजी (सोपे चीनी)
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 06:10
Dimitra Papageorgiou approved Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Dimitra Papageorgiou edited Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Dimitra Papageorgiou edited Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Dimitra Papageorgiou edited Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Rahul Date accepted Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Pratik palnitkar edited Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Pratik palnitkar edited Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! | ||
Pratik palnitkar edited Marathi subtitles for Learn to read Chinese ... with ease! |