तैवान मध्ये एका सुलेखकाची मुलगी म्हणून
लहानाची मोठी होत असताना
माझी एका किमती आठवणीतील एक आठवण होती
ती म्हणजे माझ्या आईने मला चीनी अक्षरांचे दाखवलेले
सौंदर्य, आकार आणि स्वरूप.
तेव्हापासून च, मला या अद्भूत भाषेने
संमोहित करून टाकले!
पण बाहेरील व्यक्तीसाठी मात्र हि (अक्षरे)
महान चीनी भिंतीप्रमाणे च अभेद्य (अडथळा ) वाटतात.
मागील काही वर्षांमध्ये मी विचार करत आहे की,
जर मी या अडथळ्याला दूर केले,
तर ज्या व्यक्तीला या परिष्कृत भाषेचे सौंदर्य समजून रसग्रहण
करायचे असेल, त्या व्यक्तीस ते करता येईल.
मी विचार करायला सुरुवात केली की कशा प्रकारे एक नवी आणि जलद पद्धत
चीनी भाषा शिकायला उपयुक्त ठरेल.
वयाच्या पाचव्या वर्षापासून मी प्रत्येक अक्षराची
सर्व रेखाटने योग्य क्रमाने शिकायला
सुरुवात केली.
पुढील १५ वर्षांमध्ये मी दररोज
एक नवीन अक्षर शिकले.
आत्ता आपल्याकडे केवळ ५ मिनिटे आहेत,
त्यामुळे सोपा आणि जलद मार्ग उपयुक्त आहे.
एका चीनी विद्वानाला सर्व साधारणपणे २०,००० अक्षरे कळतात.
मुलभूत साहित्य समजायला केवळ १००० अक्षरे पुरी पडतात.
सर्वाधिक वापरली जाणारी २०० अक्षरे तुम्हाला
४०% मुलभूत साहित्य समजायला तसेच
रस्त्यांवरील चिन्हे, खाणावळी मधील पदार्थांची यादी
संकेतस्थळाचे आकलन आणि वर्तमान पत्र वाचण्यास
पुरे असतात.
आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखविण्याकरिता
८ अक्षरांनी सुरुवात करणार आहे.
मग, आहात का तयार?
जमेल तेवढे तोंड उघडा
जोपर्यंत एक चौकोन नाही बनत.
हे झाले 'मुख'.
हि एक चालत जाणारी व्यक्ती आहे
'व्यक्ती'
जर आगीचा आकार दोन्ही बाजूला
हात असलेल्या व्यक्तीप्रमाणे असेल,
जणू काही ती व्यक्ती जोराने ओरडत असेल,
"वाचवा! मला आग लागली आहे!" --
हे चिन्ह मुळात ज्वालेच्या आकारापासून बनले आहे,
पण मला अशा प्रकारे विचार करायला आवडते. तुमच्यासाठी जे काम करेल, ते.
हे एक झाड आहे.
'झाड'.
हा एक पर्वत आहे
सूर्य
चंद्र
हे दरवाज्याचे चिन्ह आहे
(अमेरिकेतल्या) पश्चिमेकडील सलून चे दरवाजे च जणू.
मी या ८ अक्षरांना मुलभूत असे संबोधते.
ही (अक्षरे) नवीन अक्षरांच्या रचनेसाठी
मुलभूत घटक च आहेत.
एक व्यक्ती.
जर कोणी (व्यक्ती)मागून चालत असेल, तर ते - 'अनुगमन करणे'.
एका जुन्या म्हणी प्रमाणे,
दोघांची म्हणजे संगत, तिघांची म्हणजे गर्दी.
जर एका व्यक्तीने आपले हात लांब पसरविले,
तर ती व्यक्ती म्हणत आहे "ती (गोष्ट) मोठी होती" - 'मोठी'
एका मुखाच्या आत असलेली व्यक्ती, म्हणजे अडकलेली व्यक्ती - 'अडकलेले'
ती व्यक्ती एक बांधक आहे, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जोना एका व्हेल माशामध्ये.
हे एक झाड आहे. दोन झाडे एकत्र आणि आपल्याला मिळते - 'वन'
३ झाडे एकत्र आणि बनले 'जंगल'.
झाडाखाली एक फळी ठेवा, आणि बनला 'पाया'
झाडाच्या वरती एक मुख ठेवा, आणि बनला - 'बावळट '
लक्षात ठेवायला सोपे आहे,
कारण बोलू शकणारे झाड म्हणजे बावळट च ना.
लक्षात आहे, आग ?
दोन आगी एकत्र आणि बनले - 'ऊष्ण'
३ आगी एकत्र आणि झाल्या भरपूर 'ज्वाळा'
२ झाडांखाली आग, आणि हे आहे 'ज्वलन'
आपल्यासाठी सूर्य म्हणजे उत्कर्षाचे उगमस्थान.
म्हणून, २ सूर्य एकत्र आणि - 'उत्कर्ष'
३ (सूर्य) एकत्र आणि बनले - 'निखर'/ 'ठिणगी'
एकत्र चमकणारी सूर्य आणि चंद्र आणा,
हे बनले - 'चमक' (शुभ्रता)
त्याचा 'उद्या' असाही अर्थ होतो - एक दिवस आणि एका रात्रीनंतर असे
सूर्य क्षितिजावर येत आहे - 'सूर्योदय'
एक दरवाजा. त्याच्या आत एक फळी ठेवा,
आणि बनली - दरवाज्याची कडी .
दरवाज्याच्या आत एक मुख ठेवा, प्रश्न विचारणारे
'ठक ठक'.. कोणी आहे का घरी ?
हि व्यक्ती दरवाज्यातून बाहेर निसटत आहे,
'निसटणे', 'सुटका करून घेणे'
डावीकडे, आपल्याकडे आहे एक 'स्त्री'
२ स्त्रिया एकत्र आणि त्यांच्यात होतो 'वाद'
(प्रेक्षकांचे हास्य)
३ स्त्रिया एकत्र, आणि सावधान, हा होतो 'व्यभिचार'.
तर मग आपण जवळजवळ ३० अक्षरे शिकलो.
ह्या पद्धतीने, ८ मुळाक्षरे
तुम्हाला ३२ अक्षरे बनवायला मदत करतात.
पुढची ८ मुळाक्षरे आणि
तुम्ही अजून ३२ बनवाल.
अशा प्रकारे, अतिशय कमी श्रमात,
तुम्ही साधारण दोनशे अक्षरे तर सहज शिकाल.
जे ८ वर्षाच्या चीनी मुलाच्या (ज्ञानाच्या) बरोबरीचे च.
आणि मग अक्षरे समजून घेतल्यावर, आपण बनवू लागतो वाक्यांश.
उदाहरणार्थ, पर्वत आणि आग एकत्र,
आणि बनले पर्वतावरची आग - 'ज्वालामुखी'
आपल्याला माहित आहे, जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे.
हा आहे सूर्य 'पाया'सोबत,
कारण जपान आहे चीन च्या पूर्वेला.
म्हणून, सूर्य आणि पाया एकत्र आणि बनला - 'जपान'.
जपान च्या मागे एक व्यक्ती आणि काय मिळाले आपल्याला?
'एक जपानी व्यक्ती'.
डावीकडचे अक्षर आहे - २ पर्वत
एकमेकांवर रचून ठेवलेले.
जुन्या काळी चीन मध्ये त्याचा अर्थ असे - 'हद्दपारी',
कारण, चीनी सम्राट त्यांच्या राजकीय शत्रूंना
पर्वतांच्या मागे हद्दपार करायचे.
आजच्या घडीला, हद्दपारी चे रुपांतर बाहेर निघून जाण्यात झाले आहे.
थोडक्यात, एक मुख जे बाहेर निघायला सांगते,
तेच म्हणजे 'निकास'.
ही स्लाईड मला आठवण द्यायला आहे, कि मी आता माझे बोलणे आवरते घ्यावे
आणि ह्या मंचाचा निरोप घ्यावा. धन्यवाद.
(टाळ्यांचा गजर)