WEBVTT 00:00:00.754 --> 00:00:02.810 तैवान मध्ये एका सुलेखकाची मुलगी म्हणून 00:00:02.810 --> 00:00:04.422 लहानाची मोठी होत असताना 00:00:04.422 --> 00:00:06.790 माझी एका किमती आठवणीतील एक आठवण होती 00:00:06.790 --> 00:00:09.883 ती म्हणजे माझ्या आईने मला चीनी अक्षरांचे दाखवलेले 00:00:09.883 --> 00:00:12.516 सौंदर्य, आकार आणि स्वरूप. 00:00:12.516 --> 00:00:15.023 तेव्हापासून च, मला या अद्भूत भाषेने 00:00:15.023 --> 00:00:17.685 संमोहित करून टाकले! NOTE Paragraph 00:00:17.685 --> 00:00:20.420 पण बाहेरील व्यक्तीसाठी मात्र हि (अक्षरे) 00:00:20.420 --> 00:00:23.929 महान चीनी भिंतीप्रमाणे च अभेद्य (अडथळा ) वाटतात. 00:00:23.929 --> 00:00:26.304 मागील काही वर्षांमध्ये मी विचार करत आहे की, 00:00:26.304 --> 00:00:28.356 जर मी या अडथळ्याला दूर केले, 00:00:28.356 --> 00:00:30.950 तर ज्या व्यक्तीला या परिष्कृत भाषेचे सौंदर्य समजून रसग्रहण 00:00:30.950 --> 00:00:34.858 करायचे असेल, त्या व्यक्तीस ते करता येईल. 00:00:34.858 --> 00:00:39.170 मी विचार करायला सुरुवात केली की कशा प्रकारे एक नवी आणि जलद पद्धत 00:00:39.170 --> 00:00:42.018 चीनी भाषा शिकायला उपयुक्त ठरेल. NOTE Paragraph 00:00:42.018 --> 00:00:46.004 वयाच्या पाचव्या वर्षापासून मी प्रत्येक अक्षराची 00:00:46.004 --> 00:00:49.009 सर्व रेखाटने योग्य क्रमाने शिकायला 00:00:49.009 --> 00:00:51.553 सुरुवात केली. 00:00:51.553 --> 00:00:53.610 पुढील १५ वर्षांमध्ये मी दररोज 00:00:53.610 --> 00:00:56.337 एक नवीन अक्षर शिकले. 00:00:56.337 --> 00:00:58.457 आत्ता आपल्याकडे केवळ ५ मिनिटे आहेत, 00:00:58.457 --> 00:01:02.092 त्यामुळे सोपा आणि जलद मार्ग उपयुक्त आहे. 00:01:02.092 --> 00:01:05.617 एका चीनी विद्वानाला सर्व साधारणपणे २०,००० अक्षरे कळतात. 00:01:05.617 --> 00:01:10.729 मुलभूत साहित्य समजायला केवळ १००० अक्षरे पुरी पडतात. 00:01:10.729 --> 00:01:14.745 सर्वाधिक वापरली जाणारी २०० अक्षरे तुम्हाला 00:01:14.745 --> 00:01:17.641 ४०% मुलभूत साहित्य समजायला तसेच 00:01:17.641 --> 00:01:20.517 रस्त्यांवरील चिन्हे, खाणावळी मधील पदार्थांची यादी 00:01:20.517 --> 00:01:23.521 संकेतस्थळाचे आकलन आणि वर्तमान पत्र वाचण्यास 00:01:23.521 --> 00:01:25.460 पुरे असतात. 00:01:25.460 --> 00:01:27.659 आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखविण्याकरिता 00:01:27.659 --> 00:01:29.551 ८ अक्षरांनी सुरुवात करणार आहे. 00:01:29.551 --> 00:01:31.472 मग, आहात का तयार? NOTE Paragraph 00:01:31.472 --> 00:01:34.155 जमेल तेवढे तोंड उघडा 00:01:34.155 --> 00:01:36.201 जोपर्यंत एक चौकोन नाही बनत. 00:01:36.201 --> 00:01:38.883 हे झाले 'मुख'. 00:01:38.883 --> 00:01:41.971 हि एक चालत जाणारी व्यक्ती आहे 00:01:41.971 --> 00:01:45.102 'व्यक्ती' 00:01:45.102 --> 00:01:47.811 जर आगीचा आकार दोन्ही बाजूला 00:01:47.811 --> 00:01:50.081 हात असलेल्या व्यक्तीप्रमाणे असेल, 00:01:50.081 --> 00:01:52.251 जणू काही ती व्यक्ती जोराने ओरडत असेल, 00:01:52.251 --> 00:01:55.804 "वाचवा! मला आग लागली आहे!" -- 00:01:55.804 --> 00:01:59.971 हे चिन्ह मुळात ज्वालेच्या आकारापासून बनले आहे, 00:01:59.971 --> 00:02:03.784 पण मला अशा प्रकारे विचार करायला आवडते. तुमच्यासाठी जे काम करेल, ते. 00:02:03.784 --> 00:02:06.043 हे एक झाड आहे. 00:02:06.043 --> 00:02:08.141 'झाड'. 00:02:08.141 --> 00:02:12.566 हा एक पर्वत आहे 00:02:12.566 --> 00:02:15.167 सूर्य 00:02:17.458 --> 00:02:22.112 चंद्र 00:02:22.112 --> 00:02:24.087 हे दरवाज्याचे चिन्ह आहे 00:02:24.087 --> 00:02:29.793 (अमेरिकेतल्या) पश्चिमेकडील सलून चे दरवाजे च जणू. NOTE Paragraph 00:02:29.793 --> 00:02:33.531 मी या ८ अक्षरांना मुलभूत असे संबोधते. 00:02:33.531 --> 00:02:35.297 ही (अक्षरे) नवीन अक्षरांच्या रचनेसाठी 00:02:35.297 --> 00:02:39.427 मुलभूत घटक च आहेत. 00:02:39.427 --> 00:02:41.165 एक व्यक्ती. 00:02:41.165 --> 00:02:45.433 जर कोणी (व्यक्ती)मागून चालत असेल, तर ते - 'अनुगमन करणे'. 00:02:45.433 --> 00:02:47.561 एका जुन्या म्हणी प्रमाणे, 00:02:47.561 --> 00:02:51.287 दोघांची म्हणजे संगत, तिघांची म्हणजे गर्दी. 00:02:51.287 --> 00:02:54.202 जर एका व्यक्तीने आपले हात लांब पसरविले, 00:02:54.202 --> 00:02:58.849 तर ती व्यक्ती म्हणत आहे "ती (गोष्ट) मोठी होती" - 'मोठी' 00:02:58.849 --> 00:03:02.697 एका मुखाच्या आत असलेली व्यक्ती, म्हणजे अडकलेली व्यक्ती - 'अडकलेले' 00:03:02.697 --> 00:03:08.543 ती व्यक्ती एक बांधक आहे, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जोना एका व्हेल माशामध्ये. 00:03:08.543 --> 00:03:12.037 हे एक झाड आहे. दोन झाडे एकत्र आणि आपल्याला मिळते - 'वन' 00:03:12.037 --> 00:03:15.593 ३ झाडे एकत्र आणि बनले 'जंगल'. 00:03:15.593 --> 00:03:19.665 झाडाखाली एक फळी ठेवा, आणि बनला 'पाया' 00:03:19.665 --> 00:03:23.800 झाडाच्या वरती एक मुख ठेवा, आणि बनला - 'बावळट ' 00:03:23.800 --> 00:03:25.881 लक्षात ठेवायला सोपे आहे, 00:03:25.881 --> 00:03:30.823 कारण बोलू शकणारे झाड म्हणजे बावळट च ना. 00:03:30.823 --> 00:03:32.865 लक्षात आहे, आग ? 00:03:32.865 --> 00:03:35.526 दोन आगी एकत्र आणि बनले - 'ऊष्ण' 00:03:35.526 --> 00:03:38.385 ३ आगी एकत्र आणि झाल्या भरपूर 'ज्वाळा' 00:03:38.385 --> 00:03:42.986 २ झाडांखाली आग, आणि हे आहे 'ज्वलन' 00:03:42.986 --> 00:03:46.078 आपल्यासाठी सूर्य म्हणजे उत्कर्षाचे उगमस्थान. 00:03:46.078 --> 00:03:48.257 म्हणून, २ सूर्य एकत्र आणि - 'उत्कर्ष' 00:03:48.257 --> 00:03:50.615 ३ (सूर्य) एकत्र आणि बनले - 'निखर'/ 'ठिणगी' 00:03:50.615 --> 00:03:52.636 एकत्र चमकणारी सूर्य आणि चंद्र आणा, 00:03:52.636 --> 00:03:53.944 हे बनले - 'चमक' (शुभ्रता) 00:03:53.944 --> 00:03:58.169 त्याचा 'उद्या' असाही अर्थ होतो - एक दिवस आणि एका रात्रीनंतर असे 00:03:58.169 --> 00:04:02.652 सूर्य क्षितिजावर येत आहे - 'सूर्योदय' 00:04:02.652 --> 00:04:05.755 एक दरवाजा. त्याच्या आत एक फळी ठेवा, 00:04:05.755 --> 00:04:07.812 आणि बनली - दरवाज्याची कडी . 00:04:07.812 --> 00:04:10.776 दरवाज्याच्या आत एक मुख ठेवा, प्रश्न विचारणारे 00:04:10.776 --> 00:04:14.107 'ठक ठक'.. कोणी आहे का घरी ? 00:04:14.107 --> 00:04:16.995 हि व्यक्ती दरवाज्यातून बाहेर निसटत आहे, 00:04:16.995 --> 00:04:19.827 'निसटणे', 'सुटका करून घेणे' 00:04:19.827 --> 00:04:21.980 डावीकडे, आपल्याकडे आहे एक 'स्त्री' 00:04:21.980 --> 00:04:24.142 २ स्त्रिया एकत्र आणि त्यांच्यात होतो 'वाद' 00:04:24.142 --> 00:04:26.275 (प्रेक्षकांचे हास्य) 00:04:26.275 --> 00:04:32.793 ३ स्त्रिया एकत्र, आणि सावधान, हा होतो 'व्यभिचार'. NOTE Paragraph 00:04:32.793 --> 00:04:36.302 तर मग आपण जवळजवळ ३० अक्षरे शिकलो. 00:04:36.302 --> 00:04:39.639 ह्या पद्धतीने, ८ मुळाक्षरे 00:04:39.639 --> 00:04:41.640 तुम्हाला ३२ अक्षरे बनवायला मदत करतात. 00:04:41.640 --> 00:04:43.403 पुढची ८ मुळाक्षरे आणि 00:04:43.403 --> 00:04:45.595 तुम्ही अजून ३२ बनवाल. 00:04:45.595 --> 00:04:47.897 अशा प्रकारे, अतिशय कमी श्रमात, 00:04:47.897 --> 00:04:50.163 तुम्ही साधारण दोनशे अक्षरे तर सहज शिकाल. 00:04:50.163 --> 00:04:52.715 जे ८ वर्षाच्या चीनी मुलाच्या (ज्ञानाच्या) बरोबरीचे च. 00:04:52.715 --> 00:04:56.262 आणि मग अक्षरे समजून घेतल्यावर, आपण बनवू लागतो वाक्यांश. 00:04:56.262 --> 00:04:58.959 उदाहरणार्थ, पर्वत आणि आग एकत्र, 00:04:58.959 --> 00:05:01.887 आणि बनले पर्वतावरची आग - 'ज्वालामुखी' 00:05:01.887 --> 00:05:05.207 आपल्याला माहित आहे, जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. 00:05:05.207 --> 00:05:08.625 हा आहे सूर्य 'पाया'सोबत, 00:05:08.625 --> 00:05:11.752 कारण जपान आहे चीन च्या पूर्वेला. 00:05:11.752 --> 00:05:15.642 म्हणून, सूर्य आणि पाया एकत्र आणि बनला - 'जपान'. 00:05:15.642 --> 00:05:18.600 जपान च्या मागे एक व्यक्ती आणि काय मिळाले आपल्याला? 00:05:18.600 --> 00:05:21.702 'एक जपानी व्यक्ती'. NOTE Paragraph 00:05:21.702 --> 00:05:24.503 डावीकडचे अक्षर आहे - २ पर्वत 00:05:24.503 --> 00:05:26.610 एकमेकांवर रचून ठेवलेले. 00:05:26.610 --> 00:05:29.827 जुन्या काळी चीन मध्ये त्याचा अर्थ असे - 'हद्दपारी', 00:05:29.827 --> 00:05:32.265 कारण, चीनी सम्राट त्यांच्या राजकीय शत्रूंना 00:05:32.265 --> 00:05:34.636 पर्वतांच्या मागे हद्दपार करायचे. 00:05:34.636 --> 00:05:39.647 आजच्या घडीला, हद्दपारी चे रुपांतर बाहेर निघून जाण्यात झाले आहे. 00:05:39.647 --> 00:05:42.218 थोडक्यात, एक मुख जे बाहेर निघायला सांगते, 00:05:42.218 --> 00:05:44.146 तेच म्हणजे 'निकास'. NOTE Paragraph 00:05:44.146 --> 00:05:47.787 ही स्लाईड मला आठवण द्यायला आहे, कि मी आता माझे बोलणे आवरते घ्यावे 00:05:47.787 --> 00:05:49.670 आणि ह्या मंचाचा निरोप घ्यावा. धन्यवाद. NOTE Paragraph 00:05:49.670 --> 00:05:53.639 (टाळ्यांचा गजर)