महासागर वाचवा, जगाला अन्न पुरवा!
-
0:01 - 0:02तुम्हाला नवल वाटत असेल
-
0:02 - 0:04तुमच्याशी जगातल्या भुकेबद्दल बोलायला
-
0:04 - 0:06ओशियानियातली एक समुद्रजीवशास्त्रज्ञ
-
0:06 - 0:07इथे का आली म्हणून.
-
0:07 - 0:09मी आज इथे आले आहे, कारण
-
0:09 - 0:13महासागरांचे रक्षण करण्याची गरज
पर्यावरणाच्या गरजेहून मोठी आहे. -
0:13 - 0:15आपण मच्छीमार उद्योग निर्माण करण्यासाठी
-
0:15 - 0:16किंवा ते टिकवण्यासाठी जे करतो
-
0:16 - 0:19त्यापेक्षा मोठी.
-
0:19 - 0:22केवळ आर्थिक मागोवा घेण्याहून मोठी.
-
0:22 - 0:25महासागरांचे रक्षण करून
जगाचे पोषण करता येईल. -
0:25 - 0:26कसं, ते दाखवायची मला संधी द्या.
-
0:26 - 0:28आपल्या ग्रहावर एक अब्जवर भुकेलेले लोक आहे.
-
0:28 - 0:31हे तुम्हाला ठाऊक आहेच.
-
0:31 - 0:33ही समस्या आणखी मोठी होईल
अशी अपेक्षा आहे. -
0:33 - 0:36या शतकाच्या मध्यावर जेव्हा
-
0:36 - 0:37जगाची लोकसंख्या नऊ ते दहा अब्ज होईल,
-
0:37 - 0:40तेव्हा आपल्या अन्नसाठ्यांवर
-
0:40 - 0:42अधिक मोठा ताण पडेल.
-
0:42 - 0:43ही एक मोठी चिंता आहे.
-
0:43 - 0:46विशेषतः आजची आपली स्थिती लक्षात घेतली तर.
-
0:46 - 0:49आता आपल्याला ठाऊक आहे की
आपलं दरडोई पिकाऊ जमिनीचं प्रमाण -
0:49 - 0:50घसरू लागलेलं आहे.
-
0:50 - 0:53प्रगत आणि प्रगतीशील,
दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये. -
0:53 - 0:55आपलं वातावरण बदलत जाणार
हे आपल्याला ठाऊक आहे. -
0:55 - 0:58त्यानुसार, पावसाचं स्वरूप बदलत जाईल.
-
0:58 - 1:01या भगव्या रंगात दिसताहेत
त्या जागा कोरड्या पडतील. -
1:01 - 1:03निळ्या जागा जास्त ओल्या होतील.
-
1:03 - 1:05त्यामुळे आपली अन्नकोठारं असणाऱ्या
-
1:05 - 1:07मध्य पश्चिम आणि युरोपात
दुष्काळ पडेल. -
1:07 - 1:08आणि इतर जागी पूर येतील.
-
1:08 - 1:10त्यामुळे आपला भुकेचा प्रश्न
-
1:10 - 1:13केवळ जमिनीच्या मदतीने सोडवणे
कठीण होत जाणार आहे. -
1:13 - 1:15म्हणूनच महासागर अधिक समृध्द व्हायला हवेत,
-
1:15 - 1:17तरच ते आपल्याला
-
1:17 - 1:19जास्तीत जास्त अन्न पुरवू शकतील.
-
1:19 - 1:21महासागर आपल्यासाठी तेच करताहेत.
-
1:21 - 1:24फार पूर्वीपासून.
-
1:24 - 1:26भूतकाळापासून,
-
1:26 - 1:28आपण महासागरांतून मिळवलेलं अन्न
-
1:28 - 1:30वाढत गेल्याचं दिसतं.
-
1:30 - 1:32ते तसंच वाढत जाणार असं वाटत होतं.
-
1:32 - 1:34साधारण १९८० पर्यंत.
-
1:34 - 1:37पण त्याचवेळी त्यात घसरण दिसू लागली.
-
1:37 - 1:38तेलाची परिसीमा तुम्ही ऐकली आहे.
-
1:38 - 1:40ही माशांची परिसीमा असावी.
-
1:40 - 1:42नसावी, त्याविषयी नंतर बोलेन.
-
1:42 - 1:44जगभरात आपण पकडलेल्या माशांच्या प्रमाणात
-
1:44 - 1:47१८ टक्के घसरण झाली आहे.
-
1:47 - 1:49ती १९८० नंतर.
-
1:49 - 1:51आणि ती तशीच चालू आहे.
हा एक मोठा प्रश्न आहे. -
1:51 - 1:53ही लाल रेघ सतत खाली चालली आहे.
-
1:53 - 1:55पण ती आपण परत वर चढवू शकतो.
-
1:55 - 1:57आणि आज मी त्याविषयीच बोलणार आहे.
-
1:57 - 2:00हा आलेख परत वर कसा चढवायचा
ते आपल्याला ठाऊक आहे. -
2:00 - 2:02माशांची परिसीमा इतकीच असायला हवी,
असं काही नाही. -
2:02 - 2:05आपण जर ठराविक ठिकाणी
काही साध्या गोष्टी केल्या, -
2:05 - 2:08तर आपण आपली मासेमारी सुधारू शकू.
-
2:08 - 2:10आणि त्यातून लोकांना अन्न पुरवू शकू.
-
2:10 - 2:12आधी मासे कुठे आहेत ते माहीत हवं.
-
2:12 - 2:13तर, मासे कुठे आहेत ते आधी पाहू.
-
2:13 - 2:15असं दिसतं, की मासे, सोयिस्करपणे,
-
2:15 - 2:18बऱ्याच प्रमाणात आपल्या देशांच्या
-
2:18 - 2:20किनारपट्ट्यांजवळ राहतात.
-
2:20 - 2:21किनारी क्षेत्रात.
-
2:21 - 2:23आणि या भागावर
-
2:23 - 2:25तिथल्या देशांचा अंमल असतो.
-
2:25 - 2:27आणि ते देश आपल्या किनाऱ्यावरची
-
2:27 - 2:28आपली मच्छीमारकेंद्रं चालवू शकतात.
-
2:28 - 2:30किनारी देशांची अधिकारक्षेत्रे
-
2:30 - 2:33साधारण २०० सागरी मैल पर्यंत असतात.
-
2:33 - 2:36त्यांच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्रात.
-
2:36 - 2:38तिथे त्यांचा अंमल असतो
-
2:38 - 2:40ही एक चांगली गोष्ट आहे.
-
2:40 - 2:41कारण, खुले सागर,
-
2:41 - 2:43या नकाशावर गडद रंगात दाखवले आहेत ते,
-
2:43 - 2:46त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण असत.
-
2:46 - 2:48कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते.
-
2:48 - 2:50आंतरराष्ट्रीय करारांशी संबंध येतो.
-
2:50 - 2:52हवामान बदल करार पाहिलात, तर
तुम्हाला ठाऊक असेल, -
2:52 - 2:54ही एक अत्यंत मंद
-
2:54 - 2:56निराशाजनक आणि रटाळ प्रक्रिया आहे.
-
2:56 - 2:57त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण
-
2:57 - 3:00ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे.
-
3:00 - 3:02खुल्या सागराच्या तुलनेत
-
3:02 - 3:04किनाऱ्याजवळ किती मासे आहेत?
-
3:04 - 3:05इथे पहा, खुल्या सागरापेक्षा
-
3:05 - 3:08सातपटीने जास्त मासे
-
3:08 - 3:10किनारी भागात आहेत.
-
3:10 - 3:12त्यामुळे तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं.
-
3:12 - 3:14कारण तिथे आपण खूप काही करू शकू.
-
3:14 - 3:17आपली पुष्कळ मच्छीमारकेंद्रं सुधारू शकू.
-
3:17 - 3:19या किनारी भागावर लक्ष केंद्रित करून.
-
3:19 - 3:22पण किती देशांत काम करावं लागेल?
-
3:22 - 3:24जगात साधारण ८० किनारी देश आहेत.
-
3:24 - 3:26या सगळ्या देशांतली मासेमारी
-
3:26 - 3:27सुधारावी लागणार आहे का?
-
3:27 - 3:29अशा किती देशांवर
-
3:29 - 3:30लक्ष केंद्रित करायला हवं?
-
3:30 - 3:32हे लक्षात घ्यायला हवं, की
युरोपियन संघ -
3:32 - 3:34मासेमारी व्यवस्थित सांभाळतो.
-
3:34 - 3:36त्यासाठी त्यांचं एक समान धोरण आहे.
-
3:36 - 3:39तर आपल्याला चांगलं व्यवस्थापन आढळलं,
-
3:39 - 3:42युरोपियन संघात आणि नऊ इतर देशांत
-
3:42 - 3:44तर, यात एकूण मासेमारीचा किती भाग आला?
-
3:44 - 3:47तर, युरोपियन संघ अधिक नऊ देश मिळून
-
3:47 - 3:50जवळपास जगातल्या मासेमारीचा
दोन तृतीयांश भाग होतो. -
3:50 - 3:53युरोपियन संघ अधिक चोवीस देश धरले
-
3:53 - 3:55तर हे प्रमाण वाढून नव्वद टक्के होतं.
-
3:55 - 3:58म्हणजे जवळजवळ जगातली सगळीच मासेमारी.
-
3:58 - 4:01तर, काही मोजक्याच ठिकाणी काम करून
-
4:01 - 4:03आपण आपली मासेमारी सुधारू शकतो.
-
4:03 - 4:06पण तिथे आपल्याला काय करावं लागेल?
-
4:06 - 4:07अमेरिकेत आणि इतरत्र केल्या गेलेल्या
-
4:07 - 4:09कामावरून असं आढळलं आहे, की
-
4:09 - 4:11तीन महत्वाच्या गोष्टी
करायला हव्यात. -
4:11 - 4:13मासेमारी सुधारतील त्या तीन गोष्टी अशा:
-
4:13 - 4:15आपण किती मासे पकडतो त्यावर
-
4:15 - 4:17मर्यादा घालायला हवी.
-
4:17 - 4:20निरुपयोगी मासेमारी घटवायला हवी.
-
4:20 - 4:23निरुपयोगी म्हणजे चुकून पकडल्यामुळे
-
4:23 - 4:24फुकटच मेलेले मासे.
-
4:24 - 4:27तीन, माशांच्या वसाहतींचं रक्षण करायला हवं.
-
4:27 - 4:29नर्सरीज आणि अंडी घालण्याच्या जागांचं.
-
4:29 - 4:32वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी.
-
4:32 - 4:34म्हणजे त्यांची संख्या परत वाढेल.
-
4:34 - 4:37या तीन गोष्टी मासेमारी सुधारतील हे नक्की.
-
4:37 - 4:39हे कसं समजलं?
-
4:39 - 4:41हे समजलं कारण आपण हे
-
4:41 - 4:42खूप ठिकाणी घडताना पाहिलं आहे.
-
4:42 - 4:44या स्लाईडवर दिसते आहे
-
4:44 - 4:46नॉर्वे देशातल्या हेरिंग माशांची संख्या.
-
4:46 - 4:48१९५० पासून ती कोसळत चालली होती.
-
4:48 - 4:50ती घसरत चालली होती.
-
4:50 - 4:53मग नॉर्वेने मासेमारीवर मर्यादा घातली
तेव्हा काय घडलं? -
4:53 - 4:55मासेमारी सुधारली.
-
4:55 - 4:58हे आणखी एक उदाहरण आहे.
हेही नॉर्वेतलंच. -
4:58 - 5:00नॉर्वेतल्या आर्क्टिक कॉड या माशाचं.
-
5:00 - 5:03तोच प्रकार. मासेमारी कोसळते आहे.
-
5:03 - 5:04त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली.
-
5:04 - 5:07कचरा म्हणजे चुकून पकडल्यामुळे
-
5:07 - 5:09वाया जाऊन,
बोटीतून टाकून दिलेले मासे. -
5:09 - 5:11जेव्हा कचऱ्यावर मर्यादा घातली,
-
5:11 - 5:13तेव्हा मासेमारी सुधारली.
-
5:13 - 5:14हे फक्त नॉर्वेतच नव्हे.
-
5:14 - 5:16हे जगभरच्या देशांत
-
5:16 - 5:19वेळोवेळी घडताना दिसतं.
-
5:19 - 5:21जेव्हा हे देश पावलं उचलतात
-
5:21 - 5:24आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची धोरणं
अंमलात आणतात, -
5:24 - 5:27तेव्हा कोसळलेली मासेमारी
-
5:27 - 5:29सुधारू लागते.
-
5:29 - 5:30म्हणजे हे बरंच आशादायक आहे.
-
5:30 - 5:32याचा जागतिक मासेमारीशी काय संबंध?
-
5:32 - 5:34याचा अर्थ,
आपण जर घसरणारी मासेमारी घेऊन -
5:34 - 5:35ती सुधारू शकलो, तर
-
5:35 - 5:38आपण ती
वार्षिक १०० दशलक्ष मेट्रिक टन करू शकू. -
5:38 - 5:41मासेमारीची परिसीमा
-
5:41 - 5:43अजून गाठली गेली नव्हती तर.
-
5:43 - 5:45अजून आपल्याला संधी आहे,
-
5:45 - 5:46केवळ सुधारण्याचीच नव्हे,
-
5:46 - 5:48तर जास्त मासे पकडण्याची.
-
5:48 - 5:49आणि आताच्यापेक्षा
-
5:49 - 5:51जास्त लोकांना अन्न पुरवण्याची.
-
5:51 - 5:53म्हणजे नेमके किती जास्त लोक?
-
5:53 - 5:56सध्या आपण ४५० दशलक्ष लोकांना
दिवसातून एकवेळ -
5:56 - 5:57मासे देऊ शकतो.
-
5:57 - 5:59हे सध्याच्या जागतिक मासेमारीवर आधारित आहे.
-
5:59 - 6:02आणि अर्थातच, ती घसरते आहे
-
6:02 - 6:03ती आपण सुधारली नाही तर,
-
6:03 - 6:05हे प्रमाणही घसरणार.
-
6:05 - 6:07पण मी सांगितलेल्या धोरणांसारखी
-
6:07 - 6:10मासेमारी व्यवस्थापन धोरणं जर
-
6:10 - 6:12१० ते २५ देशांत राबवली,
-
6:12 - 6:13तर आपण हे प्रमाण सुधारू शकू
-
6:13 - 6:17आणि ७०० दशलक्ष लोकांना वर्षभर
-
6:17 - 6:18रोज मासे देऊ शकू.
-
6:18 - 6:20साहजिकच, हे आपण करायला हवं,
-
6:20 - 6:23कारण जगातला भुकेचा प्रश्न सोडवणं
ही गोष्ट चांगलीच आहे. -
6:23 - 6:24शिवाय ते किफायतशीर आहे.
-
6:24 - 6:29मासे हे जगातलं सर्वात स्वस्त प्रथिन आहे.
-
6:29 - 6:30असं आढळून आलं आहे.
-
6:30 - 6:32गुंतवलेल्या दर डॉलरमागे मिळणारं
-
6:32 - 6:33माशांचं प्रथिन पहा.
-
6:33 - 6:36त्याची तुलना इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या
प्रथिनाशी करा -
6:36 - 6:39नक्कीच, मासेमारी फायदेशीर आहे.
-
6:39 - 6:40तिला फारशी जमीन लागत नाही.
-
6:40 - 6:42इतर प्राणी पाळण्याइतकी.
-
6:42 - 6:45जमीन तर आधीच अपुरी पडते आहे.
-
6:45 - 6:48आणि त्यासाठी फारसं गोडं पाणी लागत नाही.
-
6:48 - 6:50इतर प्राण्यांपेक्षा
-
6:50 - 6:51खूपच कमी गोडं पाणी.
-
6:51 - 6:53कारण, या प्राण्यांना
अन्न पुरवणाऱ्या कुरणांना -
6:53 - 6:56गोडं पाणी लागतं.
-
6:56 - 6:58मासेमारीची कार्बन पाऊलखूण फार कमी आहे.
-
6:58 - 7:00थोडी कार्बन पाऊलखूण आहे. कारण
-
7:00 - 7:02मासे पकडायला तिथे जावं लागतं.
-
7:02 - 7:04त्यासाठी थोडं इंधन लागतं.
-
7:04 - 7:06शेतीलाही कार्बन पाउलखूण असते.
-
7:06 - 7:08मासेमारीची त्याहून खूप कमी
-
7:08 - 7:09आणि कमी प्रदूषण करणारी असते.
-
7:09 - 7:12मासे हा आपल्या आहाराचा भाग तर आहेच,
-
7:12 - 7:14पण तो आणखी मोठा भाग होऊ शकतो.
-
7:14 - 7:16ही गोष्ट चांगलीच आहे,
-
7:16 - 7:17कारण ते पौष्टिक आहेत.
-
7:17 - 7:20ते कर्करोग, हृदयविकार
-
7:20 - 7:21आणि अतिस्थूलतेचा धोका कमी करतात.
-
7:21 - 7:23खरं तर,
आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, -
7:23 - 7:26एंडी शार्पलेस,
या कल्पनेचे जनक, -
7:26 - 7:30म्हणतात,
मासे हे परिपूर्ण प्रथिन आहे. -
7:30 - 7:32ते असंही म्हणतात, की
-
7:32 - 7:35आपली महासागर बचाव मोहीम
ही जमीन बचाव मोहिमेपेक्षा -
7:35 - 7:37मोठी झाली आहे.
-
7:37 - 7:38आणि जमीन वाचवतानाही,
-
7:38 - 7:41जैविक विविधता आणि अन्ननिर्मिती
-
7:41 - 7:44एकमेकांच्या विरोधात जाण्याचा
प्रश्न उद्भवतोच. -
7:44 - 7:47जैविक विविधतेने विपुल अशी जंगलं पाडूनच
-
7:47 - 7:49शेतजमीन मिळवावी लागते.
-
7:49 - 7:51मगच त्यावर मका पिकवून
लोकांना अन्न देता येतं. -
7:51 - 7:53तिथे कायमच ही चढाओढ असते.
-
7:53 - 7:55तिथे नेहमीच
-
7:55 - 7:57एक कठीण निर्णय घ्यावा लागतो.
-
7:57 - 7:59दोन फार महत्त्वाच्या
गोष्टीमधल्या निवडीचा. -
7:59 - 8:02जैविक विविधता टिकवणे किंवा
लोकांना अन्न पुरवणे. -
8:02 - 8:04पण महासागरात हा झगडा नसतो.
-
8:04 - 8:07तिथे जैविक विविधता
आणि अन्नाची मुबलकता -
8:07 - 8:08हे विरोधी नसतात.
-
8:08 - 8:10ते एकाच ओळीत उभे असतात.
-
8:10 - 8:13तिथे जेव्हा आपण जैविक विविधता वाढवतो,
-
8:13 - 8:15तेव्हा आपल्याला जास्त अन्न मिळतं.
-
8:15 - 8:19लोकांना अन्न पुरवण्यासाठी
ते महत्त्वाचं आहे. -
8:19 - 8:22आता, यात एक "घोळ" आहे.
-
8:22 - 8:23"घोळ" कळलं का?
-
8:23 - 8:25(हास्य)
-
8:25 - 8:26बेकायदा मासेमारी.
-
8:26 - 8:28बेकायदा मासेमारीमुळे
-
8:28 - 8:30मी म्हणत होते ते
दीर्घकालीन व्यवस्थापन गडबडतं. -
8:30 - 8:32बेकायदा मासेमारी म्हणजे
-
8:32 - 8:33बंदी असलेली यंत्रं वापरणे
-
8:33 - 8:36किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मासे पकडणे.
-
8:36 - 8:39किंवा चुकीचा आकार
वा प्रकाराचे मासे पकडणे. -
8:39 - 8:41बेकायदा मासेमारी फसवणूक करते,
-
8:41 - 8:44ग्राहकांची आणि प्रामाणिक मच्छीमारांचीही.
-
8:44 - 8:45ती थांबलीच पाहिजे.
-
8:45 - 8:48बेकायदा मासे बाजारात
फसवेविरीने विकले जातात. -
8:48 - 8:49हे तुम्ही ऐकलं असेल.
-
8:49 - 8:52खऱ्या नावापेक्षा वेगळ्याच नावाने.
-
8:52 - 8:54गेल्या वेळी कोणते मासे खाल्लेत?
-
8:54 - 8:55आठवतंय?
-
8:55 - 8:57तोच तो मासा होता
याची खात्री आहे का? -
8:57 - 8:59आम्ही १३०० नमुने तपासले.
आणि साधारणपणे, -
8:59 - 9:00त्यातले एक तृतीयांश मासे
-
9:00 - 9:02त्यांना दिलेल्या नावांचे नव्हतेच.
-
9:02 - 9:05दहा स्नैपर माशांपैकी
नऊ हे स्नैपर नव्हतेच. -
9:05 - 9:07आमच्या चाचणीपैकी ५९ टक्के ट्युना माशांना
-
9:07 - 9:09ते नाव देणं चुकीचं होतं.
-
9:09 - 9:12रेड स्नैपर माशांचे १२० नमुने तपासले.
-
9:12 - 9:14त्यातले फक्त ७ खरोखरचे रेड स्नैपर होते.
-
9:14 - 9:17तुम्ही जर रेड स्नैपर शोधत असाल तर..
तुम्हाला शुभेच्छा! -
9:17 - 9:19मासे वितरण व्यवस्था ही खरोखर किचकट असते.
-
9:19 - 9:22आणि तिच्या प्रत्येक पायरीवर
-
9:22 - 9:24फसगत होण्याची शक्यता असते.
-
9:24 - 9:26आपण तिचा पाठपुरावा करू शकलो नाही तर.
-
9:26 - 9:29पाठपुरावा करणे म्हणजे
मासेमारी उद्योगाने -
9:29 - 9:31बोटीतून प्लेटीत जाईपर्यंत
माशांचा माग ठेवणे. -
9:31 - 9:34ग्राहकांना त्यांचे मासे कुठून आले
-
9:34 - 9:35हे समजू शकेल याची खात्री देणे.
-
9:35 - 9:37ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
-
9:37 - 9:40हे घडतंय
पण ते अपुरं आहे. -
9:40 - 9:41म्हणून आम्ही सरकारकडे मागतोय
-
9:41 - 9:42सुरक्षित सागरी अन्न कायदा
-
9:42 - 9:45आज एका विनंती अर्जाची घोषणा करताना मला
आनंद होत आहे. -
9:45 - 9:48४५० व्यावसायिक आचाऱ्यानी
यावर सह्या केल्या आहेत. -
9:48 - 9:50हा अर्ज सरकारला विनंती करतो,
-
9:50 - 9:53सुरक्षित सागरी अन्न कायद्याची
-
9:53 - 9:54यात अनेक नामांकित आचारी आहेत.
-
9:54 - 9:58ऐंथनी बोर्डेन, मारिओ बटाली,
-
9:58 - 9:59बार्टन सीवर आणि इतर.
-
9:59 - 10:01त्यांनी सह्या केल्या, कारण
-
10:01 - 10:02त्यांना असं वाटतंय, की
-
10:02 - 10:05लोकांना आपण काय खातोय
हे जाणून घेण्याचा हक्क आहे. -
10:05 - 10:10(टाळ्या)
-
10:10 - 10:12मच्छीमारांनाही हे आवडतंय. तर
-
10:12 - 10:14ह्या कायद्यासाठी
-
10:14 - 10:15पाठिंबा मिळू शकेल.
-
10:15 - 10:16आणि हे अगदी योग्य वेळी घडतंय.
-
10:16 - 10:19कारण या मार्गाने आपण
फसवेगिरी थांबवू शकतो. -
10:19 - 10:21बेकायदा मासेमारीला आळा घालू शकतो.
-
10:21 - 10:23यामुळे खबरदारी घेता येईल, की
-
10:23 - 10:24मासेमारीच्या मर्यादा,
-
10:24 - 10:26वसाहतींचं रक्षण, निरूपयोगी मासेमारीत घट
-
10:26 - 10:27यांचा नीट उपयोग होतोय.
-
10:27 - 10:30आपण आपली मासेमारी नीट चालवू शकतो
-
10:30 - 10:32आपण कोट्यवधी लोकांसाठी
-
10:32 - 10:36असं पौष्टिक अन्न निर्माण करू शकतो,
की ज्यासाठी -
10:36 - 10:38जमीन किंवा फारसं पाणी लागणार नाही.
-
10:38 - 10:39ज्याची कार्बन पाऊलखूण कमी असेल,
-
10:39 - 10:41आणि जे फायदेशीर असेल.
-
10:41 - 10:43महासागरांचं रक्षण केल्याने
-
10:43 - 10:45आपण जगाला अन्न पुरवू शकतो,
-
10:45 - 10:47आणि आपल्याला आत्ताच सुरुवात केली पाहिजे.
-
10:47 - 10:50(टाळ्या)
-
10:50 - 10:52धन्यवाद. (टाळ्या)
- Title:
- महासागर वाचवा, जगाला अन्न पुरवा!
- Speaker:
- जैकी सवित्झ
- Description:
-
एक समुद्रजीवशास्त्रज्ञ जगातल्या भुकेबद्दल का बोलतेय? जैकी सवित्झ म्हणतात, जगातल्या महासागरांची काळजी घेतली, तर या ग्रहावरच्या अब्जावधी भुकेल्या लोकांचं पोषण होण्यात मदत होऊ शकेल. सवित्झ यांचं हे भाषण जगभरातल्या मच्छीमारकेंद्रांत खरोखर काय चालतं - चांगलं नाही – ते सांगेल. आणि ते सुधारून, सर्वांसाठी अधिक अन्न कसं निर्माण करायचं याविषयी नेमके सल्ले देईल.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:10
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Save the oceans, feed the world! |