1 00:00:01,010 --> 00:00:02,230 तुम्हाला नवल वाटत असेल 2 00:00:02,230 --> 00:00:04,064 तुमच्याशी जगातल्या भुकेबद्दल बोलायला 3 00:00:04,064 --> 00:00:05,904 ओशियानियातली एक समुद्रजीवशास्त्रज्ञ 4 00:00:05,904 --> 00:00:07,140 इथे का आली म्हणून. 5 00:00:07,140 --> 00:00:09,291 मी आज इथे आले आहे, कारण 6 00:00:09,291 --> 00:00:12,526 महासागरांचे रक्षण करण्याची गरज पर्यावरणाच्या गरजेहून मोठी आहे. 7 00:00:12,526 --> 00:00:14,670 आपण मच्छीमार उद्योग निर्माण करण्यासाठी 8 00:00:14,670 --> 00:00:16,468 किंवा ते टिकवण्यासाठी जे करतो 9 00:00:16,468 --> 00:00:18,552 त्यापेक्षा मोठी. 10 00:00:18,552 --> 00:00:21,900 केवळ आर्थिक मागोवा घेण्याहून मोठी. 11 00:00:21,900 --> 00:00:24,512 महासागरांचे रक्षण करून जगाचे पोषण करता येईल. 12 00:00:24,512 --> 00:00:26,338 कसं, ते दाखवायची मला संधी द्या. 13 00:00:26,338 --> 00:00:28,500 आपल्या ग्रहावर एक अब्जवर भुकेलेले लोक आहे. 14 00:00:28,500 --> 00:00:30,766 हे तुम्हाला ठाऊक आहेच. 15 00:00:30,766 --> 00:00:33,116 ही समस्या आणखी मोठी होईल अशी अपेक्षा आहे. 16 00:00:33,116 --> 00:00:35,546 या शतकाच्या मध्यावर जेव्हा 17 00:00:35,546 --> 00:00:37,410 जगाची लोकसंख्या नऊ ते दहा अब्ज होईल, 18 00:00:37,410 --> 00:00:40,388 तेव्हा आपल्या अन्नसाठ्यांवर 19 00:00:40,388 --> 00:00:42,246 अधिक मोठा ताण पडेल. 20 00:00:42,246 --> 00:00:43,290 ही एक मोठी चिंता आहे. 21 00:00:43,290 --> 00:00:45,956 विशेषतः आजची आपली स्थिती लक्षात घेतली तर. 22 00:00:45,956 --> 00:00:48,668 आता आपल्याला ठाऊक आहे की आपलं दरडोई पिकाऊ जमिनीचं प्रमाण 23 00:00:48,668 --> 00:00:50,096 घसरू लागलेलं आहे. 24 00:00:50,096 --> 00:00:52,805 प्रगत आणि प्रगतीशील, दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये. 25 00:00:52,805 --> 00:00:55,460 आपलं वातावरण बदलत जाणार हे आपल्याला ठाऊक आहे. 26 00:00:55,460 --> 00:00:57,876 त्यानुसार, पावसाचं स्वरूप बदलत जाईल. 27 00:00:57,876 --> 00:01:01,186 या भगव्या रंगात दिसताहेत त्या जागा कोरड्या पडतील. 28 00:01:01,186 --> 00:01:03,497 निळ्या जागा जास्त ओल्या होतील. 29 00:01:03,497 --> 00:01:05,240 त्यामुळे आपली अन्नकोठारं असणाऱ्या 30 00:01:05,240 --> 00:01:07,090 मध्य पश्चिम आणि युरोपात दुष्काळ पडेल. 31 00:01:07,090 --> 00:01:08,372 आणि इतर जागी पूर येतील. 32 00:01:08,372 --> 00:01:10,134 त्यामुळे आपला भुकेचा प्रश्न 33 00:01:10,134 --> 00:01:12,690 केवळ जमिनीच्या मदतीने सोडवणे कठीण होत जाणार आहे. 34 00:01:12,690 --> 00:01:15,154 म्हणूनच महासागर अधिक समृध्द व्हायला हवेत, 35 00:01:15,154 --> 00:01:16,728 तरच ते आपल्याला 36 00:01:16,728 --> 00:01:19,321 जास्तीत जास्त अन्न पुरवू शकतील. 37 00:01:19,321 --> 00:01:20,968 महासागर आपल्यासाठी तेच करताहेत. 38 00:01:20,968 --> 00:01:23,610 फार पूर्वीपासून. 39 00:01:23,610 --> 00:01:26,290 भूतकाळापासून, 40 00:01:26,290 --> 00:01:28,233 आपण महासागरांतून मिळवलेलं अन्न 41 00:01:28,233 --> 00:01:29,897 वाढत गेल्याचं दिसतं. 42 00:01:29,897 --> 00:01:32,385 ते तसंच वाढत जाणार असं वाटत होतं. 43 00:01:32,385 --> 00:01:33,789 साधारण १९८० पर्यंत. 44 00:01:33,789 --> 00:01:36,585 पण त्याचवेळी त्यात घसरण दिसू लागली. 45 00:01:36,585 --> 00:01:38,181 तेलाची परिसीमा तुम्ही ऐकली आहे. 46 00:01:38,181 --> 00:01:40,173 ही माशांची परिसीमा असावी. 47 00:01:40,173 --> 00:01:41,966 नसावी, त्याविषयी नंतर बोलेन. 48 00:01:41,966 --> 00:01:44,465 जगभरात आपण पकडलेल्या माशांच्या प्रमाणात 49 00:01:44,465 --> 00:01:47,430 १८ टक्के घसरण झाली आहे. 50 00:01:47,430 --> 00:01:48,780 ती १९८० नंतर. 51 00:01:48,780 --> 00:01:51,037 आणि ती तशीच चालू आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. 52 00:01:51,037 --> 00:01:53,413 ही लाल रेघ सतत खाली चालली आहे. 53 00:01:53,413 --> 00:01:55,493 पण ती आपण परत वर चढवू शकतो. 54 00:01:55,493 --> 00:01:57,173 आणि आज मी त्याविषयीच बोलणार आहे. 55 00:01:57,173 --> 00:01:59,590 हा आलेख परत वर कसा चढवायचा ते आपल्याला ठाऊक आहे. 56 00:01:59,590 --> 00:02:02,019 माशांची परिसीमा इतकीच असायला हवी, असं काही नाही. 57 00:02:02,019 --> 00:02:05,232 आपण जर ठराविक ठिकाणी काही साध्या गोष्टी केल्या, 58 00:02:05,232 --> 00:02:07,696 तर आपण आपली मासेमारी सुधारू शकू. 59 00:02:07,696 --> 00:02:09,976 आणि त्यातून लोकांना अन्न पुरवू शकू. 60 00:02:09,976 --> 00:02:11,887 आधी मासे कुठे आहेत ते माहीत हवं. 61 00:02:11,887 --> 00:02:13,471 तर, मासे कुठे आहेत ते आधी पाहू. 62 00:02:13,471 --> 00:02:15,357 असं दिसतं, की मासे, सोयिस्करपणे, 63 00:02:15,357 --> 00:02:17,570 बऱ्याच प्रमाणात आपल्या देशांच्या 64 00:02:17,570 --> 00:02:19,635 किनारपट्ट्यांजवळ राहतात. 65 00:02:19,635 --> 00:02:20,939 किनारी क्षेत्रात. 66 00:02:20,939 --> 00:02:23,341 आणि या भागावर 67 00:02:23,341 --> 00:02:24,715 तिथल्या देशांचा अंमल असतो. 68 00:02:24,715 --> 00:02:26,554 आणि ते देश आपल्या किनाऱ्यावरची 69 00:02:26,554 --> 00:02:28,202 आपली मच्छीमारकेंद्रं चालवू शकतात. 70 00:02:28,202 --> 00:02:30,460 किनारी देशांची अधिकारक्षेत्रे 71 00:02:30,460 --> 00:02:33,071 साधारण २०० सागरी मैल पर्यंत असतात. 72 00:02:33,071 --> 00:02:36,444 त्यांच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्रात. 73 00:02:36,444 --> 00:02:38,425 तिथे त्यांचा अंमल असतो 74 00:02:38,425 --> 00:02:39,601 ही एक चांगली गोष्ट आहे. 75 00:02:39,601 --> 00:02:41,114 कारण, खुले सागर, 76 00:02:41,114 --> 00:02:43,404 या नकाशावर गडद रंगात दाखवले आहेत ते, 77 00:02:43,404 --> 00:02:45,604 त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण असत. 78 00:02:45,604 --> 00:02:47,686 कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते. 79 00:02:47,686 --> 00:02:49,553 आंतरराष्ट्रीय करारांशी संबंध येतो. 80 00:02:49,553 --> 00:02:51,809 हवामान बदल करार पाहिलात, तर तुम्हाला ठाऊक असेल, 81 00:02:51,809 --> 00:02:53,521 ही एक अत्यंत मंद 82 00:02:53,521 --> 00:02:55,503 निराशाजनक आणि रटाळ प्रक्रिया आहे. 83 00:02:55,503 --> 00:02:57,217 त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण 84 00:02:57,217 --> 00:03:00,004 ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. 85 00:03:00,004 --> 00:03:02,191 खुल्या सागराच्या तुलनेत 86 00:03:02,191 --> 00:03:03,771 किनाऱ्याजवळ किती मासे आहेत? 87 00:03:03,771 --> 00:03:05,284 इथे पहा, खुल्या सागरापेक्षा 88 00:03:05,284 --> 00:03:08,361 सातपटीने जास्त मासे 89 00:03:08,361 --> 00:03:09,947 किनारी भागात आहेत. 90 00:03:09,947 --> 00:03:12,171 त्यामुळे तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं. 91 00:03:12,171 --> 00:03:14,311 कारण तिथे आपण खूप काही करू शकू. 92 00:03:14,311 --> 00:03:16,695 आपली पुष्कळ मच्छीमारकेंद्रं सुधारू शकू. 93 00:03:16,695 --> 00:03:18,899 या किनारी भागावर लक्ष केंद्रित करून. 94 00:03:18,899 --> 00:03:21,921 पण किती देशांत काम करावं लागेल? 95 00:03:21,921 --> 00:03:23,517 जगात साधारण ८० किनारी देश आहेत. 96 00:03:23,517 --> 00:03:25,510 या सगळ्या देशांतली मासेमारी 97 00:03:25,510 --> 00:03:26,912 सुधारावी लागणार आहे का? 98 00:03:26,912 --> 00:03:29,029 अशा किती देशांवर 99 00:03:29,029 --> 00:03:30,441 लक्ष केंद्रित करायला हवं? 100 00:03:30,441 --> 00:03:32,300 हे लक्षात घ्यायला हवं, की युरोपियन संघ 101 00:03:32,300 --> 00:03:33,867 मासेमारी व्यवस्थित सांभाळतो. 102 00:03:33,867 --> 00:03:36,239 त्यासाठी त्यांचं एक समान धोरण आहे. 103 00:03:36,239 --> 00:03:38,534 तर आपल्याला चांगलं व्यवस्थापन आढळलं, 104 00:03:38,534 --> 00:03:41,793 युरोपियन संघात आणि नऊ इतर देशांत 105 00:03:41,793 --> 00:03:43,880 तर, यात एकूण मासेमारीचा किती भाग आला? 106 00:03:43,880 --> 00:03:46,944 तर, युरोपियन संघ अधिक नऊ देश मिळून 107 00:03:46,944 --> 00:03:50,053 जवळपास जगातल्या मासेमारीचा दोन तृतीयांश भाग होतो. 108 00:03:50,053 --> 00:03:53,335 युरोपियन संघ अधिक चोवीस देश धरले 109 00:03:53,335 --> 00:03:55,055 तर हे प्रमाण वाढून नव्वद टक्के होतं. 110 00:03:55,055 --> 00:03:58,273 म्हणजे जवळजवळ जगातली सगळीच मासेमारी. 111 00:03:58,273 --> 00:04:01,185 तर, काही मोजक्याच ठिकाणी काम करून 112 00:04:01,185 --> 00:04:02,887 आपण आपली मासेमारी सुधारू शकतो. 113 00:04:02,887 --> 00:04:05,502 पण तिथे आपल्याला काय करावं लागेल? 114 00:04:05,502 --> 00:04:07,290 अमेरिकेत आणि इतरत्र केल्या गेलेल्या 115 00:04:07,290 --> 00:04:08,881 कामावरून असं आढळलं आहे, की 116 00:04:08,881 --> 00:04:10,717 तीन महत्वाच्या गोष्टी करायला हव्यात. 117 00:04:10,717 --> 00:04:13,433 मासेमारी सुधारतील त्या तीन गोष्टी अशा: 118 00:04:13,433 --> 00:04:15,370 आपण किती मासे पकडतो त्यावर 119 00:04:15,370 --> 00:04:17,493 मर्यादा घालायला हवी. 120 00:04:17,493 --> 00:04:20,269 निरुपयोगी मासेमारी घटवायला हवी. 121 00:04:20,269 --> 00:04:22,613 निरुपयोगी म्हणजे चुकून पकडल्यामुळे 122 00:04:22,613 --> 00:04:24,463 फुकटच मेलेले मासे. 123 00:04:24,463 --> 00:04:27,120 तीन, माशांच्या वसाहतींचं रक्षण करायला हवं. 124 00:04:27,120 --> 00:04:29,240 नर्सरीज आणि अंडी घालण्याच्या जागांचं. 125 00:04:29,240 --> 00:04:31,810 वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी. 126 00:04:31,810 --> 00:04:33,662 म्हणजे त्यांची संख्या परत वाढेल. 127 00:04:33,662 --> 00:04:37,420 या तीन गोष्टी मासेमारी सुधारतील हे नक्की. 128 00:04:37,420 --> 00:04:38,775 हे कसं समजलं? 129 00:04:38,775 --> 00:04:40,793 हे समजलं कारण आपण हे 130 00:04:40,793 --> 00:04:42,214 खूप ठिकाणी घडताना पाहिलं आहे. 131 00:04:42,214 --> 00:04:43,652 या स्लाईडवर दिसते आहे 132 00:04:43,652 --> 00:04:45,845 नॉर्वे देशातल्या हेरिंग माशांची संख्या. 133 00:04:45,845 --> 00:04:48,176 १९५० पासून ती कोसळत चालली होती. 134 00:04:48,176 --> 00:04:50,334 ती घसरत चालली होती. 135 00:04:50,334 --> 00:04:53,240 मग नॉर्वेने मासेमारीवर मर्यादा घातली तेव्हा काय घडलं? 136 00:04:53,240 --> 00:04:55,110 मासेमारी सुधारली. 137 00:04:55,110 --> 00:04:58,008 हे आणखी एक उदाहरण आहे. हेही नॉर्वेतलंच. 138 00:04:58,008 --> 00:05:00,474 नॉर्वेतल्या आर्क्टिक कॉड या माशाचं. 139 00:05:00,474 --> 00:05:02,524 तोच प्रकार. मासेमारी कोसळते आहे. 140 00:05:02,524 --> 00:05:04,478 त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली. 141 00:05:04,478 --> 00:05:06,600 कचरा म्हणजे चुकून पकडल्यामुळे 142 00:05:06,600 --> 00:05:09,202 वाया जाऊन, बोटीतून टाकून दिलेले मासे. 143 00:05:09,202 --> 00:05:10,808 जेव्हा कचऱ्यावर मर्यादा घातली, 144 00:05:10,808 --> 00:05:12,865 तेव्हा मासेमारी सुधारली. 145 00:05:12,865 --> 00:05:14,144 हे फक्त नॉर्वेतच नव्हे. 146 00:05:14,144 --> 00:05:16,193 हे जगभरच्या देशांत 147 00:05:16,193 --> 00:05:19,146 वेळोवेळी घडताना दिसतं. 148 00:05:19,146 --> 00:05:20,690 जेव्हा हे देश पावलं उचलतात 149 00:05:20,690 --> 00:05:23,816 आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची धोरणं अंमलात आणतात, 150 00:05:23,816 --> 00:05:26,644 तेव्हा कोसळलेली मासेमारी 151 00:05:26,644 --> 00:05:28,572 सुधारू लागते. 152 00:05:28,572 --> 00:05:30,434 म्हणजे हे बरंच आशादायक आहे. 153 00:05:30,434 --> 00:05:32,120 याचा जागतिक मासेमारीशी काय संबंध? 154 00:05:32,120 --> 00:05:34,460 याचा अर्थ, आपण जर घसरणारी मासेमारी घेऊन 155 00:05:34,460 --> 00:05:35,488 ती सुधारू शकलो, तर 156 00:05:35,488 --> 00:05:37,876 आपण ती वार्षिक १०० दशलक्ष मेट्रिक टन करू शकू. 157 00:05:37,876 --> 00:05:41,419 मासेमारीची परिसीमा 158 00:05:41,419 --> 00:05:43,386 अजून गाठली गेली नव्हती तर. 159 00:05:43,386 --> 00:05:44,917 अजून आपल्याला संधी आहे, 160 00:05:44,917 --> 00:05:46,220 केवळ सुधारण्याचीच नव्हे, 161 00:05:46,220 --> 00:05:47,921 तर जास्त मासे पकडण्याची. 162 00:05:47,921 --> 00:05:49,373 आणि आताच्यापेक्षा 163 00:05:49,373 --> 00:05:50,879 जास्त लोकांना अन्न पुरवण्याची. 164 00:05:50,879 --> 00:05:52,970 म्हणजे नेमके किती जास्त लोक? 165 00:05:52,970 --> 00:05:55,864 सध्या आपण ४५० दशलक्ष लोकांना दिवसातून एकवेळ 166 00:05:55,864 --> 00:05:56,834 मासे देऊ शकतो. 167 00:05:56,834 --> 00:05:59,078 हे सध्याच्या जागतिक मासेमारीवर आधारित आहे. 168 00:05:59,078 --> 00:06:01,543 आणि अर्थातच, ती घसरते आहे 169 00:06:01,543 --> 00:06:03,196 ती आपण सुधारली नाही तर, 170 00:06:03,196 --> 00:06:04,806 हे प्रमाणही घसरणार. 171 00:06:04,806 --> 00:06:07,220 पण मी सांगितलेल्या धोरणांसारखी 172 00:06:07,220 --> 00:06:09,775 मासेमारी व्यवस्थापन धोरणं जर 173 00:06:09,775 --> 00:06:11,894 १० ते २५ देशांत राबवली, 174 00:06:11,894 --> 00:06:13,368 तर आपण हे प्रमाण सुधारू शकू 175 00:06:13,368 --> 00:06:16,916 आणि ७०० दशलक्ष लोकांना वर्षभर 176 00:06:16,916 --> 00:06:18,468 रोज मासे देऊ शकू. 177 00:06:18,468 --> 00:06:20,010 साहजिकच, हे आपण करायला हवं, 178 00:06:20,010 --> 00:06:23,007 कारण जगातला भुकेचा प्रश्न सोडवणं ही गोष्ट चांगलीच आहे. 179 00:06:23,007 --> 00:06:24,184 शिवाय ते किफायतशीर आहे. 180 00:06:24,184 --> 00:06:28,520 मासे हे जगातलं सर्वात स्वस्त प्रथिन आहे. 181 00:06:28,520 --> 00:06:29,900 असं आढळून आलं आहे. 182 00:06:29,900 --> 00:06:32,030 गुंतवलेल्या दर डॉलरमागे मिळणारं 183 00:06:32,030 --> 00:06:33,032 माशांचं प्रथिन पहा. 184 00:06:33,032 --> 00:06:35,762 त्याची तुलना इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनाशी करा 185 00:06:35,762 --> 00:06:38,692 नक्कीच, मासेमारी फायदेशीर आहे. 186 00:06:38,692 --> 00:06:40,288 तिला फारशी जमीन लागत नाही. 187 00:06:40,288 --> 00:06:41,756 इतर प्राणी पाळण्याइतकी. 188 00:06:41,756 --> 00:06:45,277 जमीन तर आधीच अपुरी पडते आहे. 189 00:06:45,277 --> 00:06:47,909 आणि त्यासाठी फारसं गोडं पाणी लागत नाही. 190 00:06:47,909 --> 00:06:49,980 इतर प्राण्यांपेक्षा 191 00:06:49,980 --> 00:06:51,024 खूपच कमी गोडं पाणी. 192 00:06:51,024 --> 00:06:53,167 कारण, या प्राण्यांना अन्न पुरवणाऱ्या कुरणांना 193 00:06:53,167 --> 00:06:56,316 गोडं पाणी लागतं. 194 00:06:56,316 --> 00:06:58,436 मासेमारीची कार्बन पाऊलखूण फार कमी आहे. 195 00:06:58,436 --> 00:07:00,315 थोडी कार्बन पाऊलखूण आहे. कारण 196 00:07:00,315 --> 00:07:02,320 मासे पकडायला तिथे जावं लागतं. 197 00:07:02,320 --> 00:07:03,812 त्यासाठी थोडं इंधन लागतं. 198 00:07:03,812 --> 00:07:06,026 शेतीलाही कार्बन पाउलखूण असते. 199 00:07:06,026 --> 00:07:07,590 मासेमारीची त्याहून खूप कमी 200 00:07:07,590 --> 00:07:09,361 आणि कमी प्रदूषण करणारी असते. 201 00:07:09,361 --> 00:07:11,740 मासे हा आपल्या आहाराचा भाग तर आहेच, 202 00:07:11,740 --> 00:07:13,831 पण तो आणखी मोठा भाग होऊ शकतो. 203 00:07:13,831 --> 00:07:15,556 ही गोष्ट चांगलीच आहे, 204 00:07:15,556 --> 00:07:17,191 कारण ते पौष्टिक आहेत. 205 00:07:17,191 --> 00:07:19,510 ते कर्करोग, हृदयविकार 206 00:07:19,510 --> 00:07:21,401 आणि अतिस्थूलतेचा धोका कमी करतात. 207 00:07:21,401 --> 00:07:23,370 खरं तर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 208 00:07:23,370 --> 00:07:25,960 एंडी शार्पलेस, या कल्पनेचे जनक, 209 00:07:25,960 --> 00:07:29,880 म्हणतात, मासे हे परिपूर्ण प्रथिन आहे. 210 00:07:29,880 --> 00:07:32,126 ते असंही म्हणतात, की 211 00:07:32,126 --> 00:07:34,638 आपली महासागर बचाव मोहीम ही जमीन बचाव मोहिमेपेक्षा 212 00:07:34,638 --> 00:07:36,870 मोठी झाली आहे. 213 00:07:36,870 --> 00:07:38,364 आणि जमीन वाचवतानाही, 214 00:07:38,364 --> 00:07:41,424 जैविक विविधता आणि अन्ननिर्मिती 215 00:07:41,424 --> 00:07:44,415 एकमेकांच्या विरोधात जाण्याचा प्रश्न उद्भवतोच. 216 00:07:44,415 --> 00:07:47,218 जैविक विविधतेने विपुल अशी जंगलं पाडूनच 217 00:07:47,218 --> 00:07:49,098 शेतजमीन मिळवावी लागते. 218 00:07:49,098 --> 00:07:51,340 मगच त्यावर मका पिकवून लोकांना अन्न देता येतं. 219 00:07:51,340 --> 00:07:53,178 तिथे कायमच ही चढाओढ असते. 220 00:07:53,178 --> 00:07:54,727 तिथे नेहमीच 221 00:07:54,727 --> 00:07:56,568 एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. 222 00:07:56,568 --> 00:07:58,591 दोन फार महत्त्वाच्या गोष्टीमधल्या निवडीचा. 223 00:07:58,591 --> 00:08:01,681 जैविक विविधता टिकवणे किंवा लोकांना अन्न पुरवणे. 224 00:08:01,681 --> 00:08:03,978 पण महासागरात हा झगडा नसतो. 225 00:08:03,978 --> 00:08:06,540 तिथे जैविक विविधता आणि अन्नाची मुबलकता 226 00:08:06,540 --> 00:08:07,695 हे विरोधी नसतात. 227 00:08:07,695 --> 00:08:09,808 ते एकाच ओळीत उभे असतात. 228 00:08:09,808 --> 00:08:12,980 तिथे जेव्हा आपण जैविक विविधता वाढवतो, 229 00:08:12,980 --> 00:08:15,026 तेव्हा आपल्याला जास्त अन्न मिळतं. 230 00:08:15,026 --> 00:08:18,846 लोकांना अन्न पुरवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. 231 00:08:18,846 --> 00:08:21,581 आता, यात एक "घोळ" आहे. 232 00:08:21,581 --> 00:08:23,106 "घोळ" कळलं का? 233 00:08:23,106 --> 00:08:24,631 (हास्य) 234 00:08:24,631 --> 00:08:26,156 बेकायदा मासेमारी. 235 00:08:26,156 --> 00:08:27,730 बेकायदा मासेमारीमुळे 236 00:08:27,730 --> 00:08:30,020 मी म्हणत होते ते दीर्घकालीन व्यवस्थापन गडबडतं. 237 00:08:30,020 --> 00:08:32,259 बेकायदा मासेमारी म्हणजे 238 00:08:32,259 --> 00:08:33,490 बंदी असलेली यंत्रं वापरणे 239 00:08:33,490 --> 00:08:36,138 किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मासे पकडणे. 240 00:08:36,138 --> 00:08:39,383 किंवा चुकीचा आकार वा प्रकाराचे मासे पकडणे. 241 00:08:39,383 --> 00:08:41,340 बेकायदा मासेमारी फसवणूक करते, 242 00:08:41,340 --> 00:08:43,550 ग्राहकांची आणि प्रामाणिक मच्छीमारांचीही. 243 00:08:43,550 --> 00:08:44,707 ती थांबलीच पाहिजे. 244 00:08:44,707 --> 00:08:47,786 बेकायदा मासे बाजारात फसवेविरीने विकले जातात. 245 00:08:47,786 --> 00:08:49,240 हे तुम्ही ऐकलं असेल. 246 00:08:49,240 --> 00:08:52,415 खऱ्या नावापेक्षा वेगळ्याच नावाने. 247 00:08:52,415 --> 00:08:53,955 गेल्या वेळी कोणते मासे खाल्लेत? 248 00:08:53,955 --> 00:08:54,756 आठवतंय? 249 00:08:54,756 --> 00:08:56,520 तोच तो मासा होता याची खात्री आहे का? 250 00:08:56,520 --> 00:08:59,252 आम्ही १३०० नमुने तपासले. आणि साधारणपणे, 251 00:08:59,252 --> 00:09:00,480 त्यातले एक तृतीयांश मासे 252 00:09:00,480 --> 00:09:02,220 त्यांना दिलेल्या नावांचे नव्हतेच. 253 00:09:02,220 --> 00:09:04,960 दहा स्नैपर माशांपैकी नऊ हे स्नैपर नव्हतेच. 254 00:09:04,960 --> 00:09:07,180 आमच्या चाचणीपैकी ५९ टक्के ट्युना माशांना 255 00:09:07,180 --> 00:09:09,048 ते नाव देणं चुकीचं होतं. 256 00:09:09,048 --> 00:09:11,784 रेड स्नैपर माशांचे १२० नमुने तपासले. 257 00:09:11,784 --> 00:09:13,688 त्यातले फक्त ७ खरोखरचे रेड स्नैपर होते. 258 00:09:13,688 --> 00:09:17,236 तुम्ही जर रेड स्नैपर शोधत असाल तर.. तुम्हाला शुभेच्छा! 259 00:09:17,236 --> 00:09:19,472 मासे वितरण व्यवस्था ही खरोखर किचकट असते. 260 00:09:19,472 --> 00:09:21,762 आणि तिच्या प्रत्येक पायरीवर 261 00:09:21,762 --> 00:09:23,960 फसगत होण्याची शक्यता असते. 262 00:09:23,960 --> 00:09:26,079 आपण तिचा पाठपुरावा करू शकलो नाही तर. 263 00:09:26,079 --> 00:09:28,796 पाठपुरावा करणे म्हणजे मासेमारी उद्योगाने 264 00:09:28,796 --> 00:09:31,097 बोटीतून प्लेटीत जाईपर्यंत माशांचा माग ठेवणे. 265 00:09:31,097 --> 00:09:33,634 ग्राहकांना त्यांचे मासे कुठून आले 266 00:09:33,634 --> 00:09:35,270 हे समजू शकेल याची खात्री देणे. 267 00:09:35,270 --> 00:09:37,028 ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 268 00:09:37,028 --> 00:09:39,595 हे घडतंय पण ते अपुरं आहे. 269 00:09:39,595 --> 00:09:40,951 म्हणून आम्ही सरकारकडे मागतोय 270 00:09:40,951 --> 00:09:42,350 सुरक्षित सागरी अन्न कायदा 271 00:09:42,350 --> 00:09:44,994 आज एका विनंती अर्जाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. 272 00:09:44,994 --> 00:09:47,626 ४५० व्यावसायिक आचाऱ्यानी यावर सह्या केल्या आहेत. 273 00:09:47,626 --> 00:09:50,308 हा अर्ज सरकारला विनंती करतो, 274 00:09:50,308 --> 00:09:52,506 सुरक्षित सागरी अन्न कायद्याची 275 00:09:52,506 --> 00:09:54,340 यात अनेक नामांकित आचारी आहेत. 276 00:09:54,340 --> 00:09:57,536 ऐंथनी बोर्डेन, मारिओ बटाली, 277 00:09:57,536 --> 00:09:59,220 बार्टन सीवर आणि इतर. 278 00:09:59,220 --> 00:10:00,968 त्यांनी सह्या केल्या, कारण 279 00:10:00,968 --> 00:10:02,303 त्यांना असं वाटतंय, की 280 00:10:02,303 --> 00:10:04,674 लोकांना आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा हक्क आहे. 281 00:10:04,674 --> 00:10:10,460 (टाळ्या) 282 00:10:10,460 --> 00:10:12,420 मच्छीमारांनाही हे आवडतंय. तर 283 00:10:12,420 --> 00:10:14,024 ह्या कायद्यासाठी 284 00:10:14,024 --> 00:10:14,948 पाठिंबा मिळू शकेल. 285 00:10:14,948 --> 00:10:16,484 आणि हे अगदी योग्य वेळी घडतंय. 286 00:10:16,484 --> 00:10:18,580 कारण या मार्गाने आपण फसवेगिरी थांबवू शकतो. 287 00:10:18,580 --> 00:10:20,652 बेकायदा मासेमारीला आळा घालू शकतो. 288 00:10:20,652 --> 00:10:22,516 यामुळे खबरदारी घेता येईल, की 289 00:10:22,516 --> 00:10:24,226 मासेमारीच्या मर्यादा, 290 00:10:24,226 --> 00:10:26,113 वसाहतींचं रक्षण, निरूपयोगी मासेमारीत घट 291 00:10:26,113 --> 00:10:27,279 यांचा नीट उपयोग होतोय. 292 00:10:27,279 --> 00:10:30,461 आपण आपली मासेमारी नीट चालवू शकतो 293 00:10:30,461 --> 00:10:32,100 आपण कोट्यवधी लोकांसाठी 294 00:10:32,100 --> 00:10:35,865 असं पौष्टिक अन्न निर्माण करू शकतो, की ज्यासाठी 295 00:10:35,865 --> 00:10:37,940 जमीन किंवा फारसं पाणी लागणार नाही. 296 00:10:37,940 --> 00:10:39,462 ज्याची कार्बन पाऊलखूण कमी असेल, 297 00:10:39,462 --> 00:10:41,100 आणि जे फायदेशीर असेल. 298 00:10:41,100 --> 00:10:43,093 महासागरांचं रक्षण केल्याने 299 00:10:43,093 --> 00:10:44,670 आपण जगाला अन्न पुरवू शकतो, 300 00:10:44,670 --> 00:10:47,057 आणि आपल्याला आत्ताच सुरुवात केली पाहिजे. 301 00:10:47,057 --> 00:10:49,816 (टाळ्या) 302 00:10:49,816 --> 00:10:52,066 धन्यवाद. (टाळ्या)