शांततेत तुमचं नैराश्य सहन करू नका
-
0:01 - 0:05तू... या रंगमंचावर काय... करतेय
-
0:05 - 0:09या सर्व... प्रेक्षकांसमोर?
-
0:09 - 0:10(हशा)
-
0:10 - 0:11पळ काढ इथून!!
-
0:11 - 0:12(हशा)
-
0:12 - 0:13आताच पळ.
-
0:15 - 0:18हा माझ्यातल्या अस्वस्थतेचा आवाज येतोय.
-
0:19 - 0:21पण अजिबात वावगं घडलेलं नसताना सुद्धा,
-
0:21 - 0:25मला कधीकधी प्रचंड प्रमाणात
असं उध्वस्त झाल्यासारखं वाटतं, -
0:25 - 0:28संकट जसं सभोवती माझ्यावरच पाळत ठेवून आहे.
-
0:29 - 0:31बघा, काही वर्षं अगोदर,
-
0:31 - 0:34मला साधारण अस्वस्थतेने
ग्रासल्याचं निदान झालं -
0:34 - 0:35आणि तसंच नैराश्यानेही...
-
0:35 - 0:38दोन्ही प्रतिकूलता सहसा सोबतच ओढवतात.
-
0:38 - 0:42आता, ती वेळ आली होती
हे मी कोणालाही सांगायला नकोय, -
0:42 - 0:45खासकरून, बहुसंख्य प्रेक्षकांसमोर नकोच.
-
0:45 - 0:46एक कृष्णवर्णीय स्त्री म्हणून,
-
0:46 - 0:50यशस्वी होण्यासाठी मला विलक्षण चिवटपणा
विकसित करावा लागलाय -
0:50 - 0:52आणि माझ्या समुदायातील बऱ्याच लोकांसारखं,
-
0:52 - 0:56माझाही गैरसमज होता की
नैराश्य हे दुर्बलतेचं प्रतीक आहे, -
0:56 - 0:57स्वभावातील एक दोष,
-
0:57 - 0:59परंतु मी काही कमकुवत नव्हते;
-
0:59 - 1:01एक उत्तुंग विजेती होते
-
1:01 - 1:03मी माध्यमशास्त्रात
पदव्युत्तर पदवी प्राप्त केली -
1:03 - 1:07आणि चित्रपट व टीव्ही उद्योगात
एकामागोमाग उत्कृष्ट दर्जाची नोकरी केली. -
1:08 - 1:11मेहनतीचं चीज म्हणून मला
२ एमी अवॉर्ड्सही मिळाले. -
1:11 - 1:14खरंच मी खूप व्यस्त होते,
-
1:14 - 1:17एकेकाळी आनंद देणाऱ्या गोष्टीतही
रस वाटत नव्हता, -
1:17 - 1:18थोडंफार जेवायचे,
-
1:18 - 1:20मी निद्रानाशाचा सामना करत होते
-
1:20 - 1:23आणि फारच एकाकी व कमीपणा वाटत होता.
-
1:24 - 1:25परंतु निराश?
-
1:25 - 1:26नाही, मी नाही.
-
1:28 - 1:30मी हे कबूल करण्यास मात्र २ आठवडे लागले.
-
1:30 - 1:32पण डॉक्टरांचं बरोबर होतं:
-
1:32 - 1:33मी नैराश्यात होते.
-
1:33 - 1:37अद्याप, मी माझ्या रोगनिदानाविषयी
कोणाकडेही वाच्यता केलेली नव्हती. -
1:38 - 1:39मला खूपच लज्जास्पद वाटत होतं.
-
1:39 - 1:42नैराश्यात जाण्याचा अधिकार आहे
असा विचार केला नव्हता. -
1:42 - 1:44मला समृद्ध जीवन लाभलं होतं
-
1:44 - 1:47जीवाभावाचं कुटुंब आणि यशस्वी करिअर यासोबतच
-
1:48 - 1:50आणि मी जेव्हा अकथनीय दहशतीबद्दल विचार केला
-
1:50 - 1:53की माझे पूर्वज या देशात
तिला सामोरे गेले होते -
1:53 - 1:55जेणेकरून मला हायसं वाटू शकेल,
-
1:55 - 1:57पण माझा संकोच आणखी गहिरा झाला.
-
1:57 - 1:59माझ्या जगण्याला त्यांचेच अधिष्ठान होते.
-
1:59 - 2:01मी त्यांचा अपेक्षाभंग कसा करू?
-
2:01 - 2:03मी आत्मविश्वासाने व ताठ मानेने जगेन,
-
2:03 - 2:06माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवीन
-
2:06 - 2:08आणि कोणालाही जाणवू देणार नाही.
-
2:10 - 2:14४ जुलै २०१३ या दिवशी,
-
2:14 - 2:17माझ्या अस्तित्वावर दुःखाचा डोंगर कोसळला.
-
2:17 - 2:20हा तोच दिवस होता जेव्हा मला आईचा फोन आला
-
2:20 - 2:25ती बोलली की माझा २२-वर्षीय पुतण्या, पॉलने
आत्महत्या केली होती, -
2:25 - 2:27चिंता आणि नैराश्याचा खूप वर्षं सामना करून.
-
2:29 - 2:32माझं पुरतं कोलमडणं वर्णन करायला
माझ्याकडे शब्दच नाहीत. -
2:33 - 2:34पॉल आणि मी खूप निकट होतो,
-
2:34 - 2:36पण तो इतका दुःखी असेल
याची मला कल्पना नव्हती -
2:37 - 2:40आम्ही कोणीही आपल्या संघर्षाबद्दल
एकमेकांशी कधीही चर्चा केलेली नव्हती. -
2:40 - 2:42लज्जा आणि कलंक यांनी
आम्हा दोघांना गप्प ठेवलं. -
2:44 - 2:48आता, माझ्याकडे मार्ग शिल्लक होता
प्रतिकूलतेशी दोन हात करण्याचा, -
2:48 - 2:51म्हणून मी पुढील २ वर्षे चिंता व नैराश्यावर
संशोधन करण्यात घालवली. -
2:51 - 2:54आणि मला जे सापडलं ते मनोवेधक होतं.
-
2:55 - 2:57जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते
-
2:57 - 3:02की नैराश्य हे आजारपण आणि दुबळेपणा
यामागचं प्रमुख कारण आहे -
3:02 - 3:03जगभरात.
-
3:04 - 3:07तथापि नैराश्याचं खरं कारण अजून अस्पष्ट आहे
-
3:07 - 3:10संशोधन हे सुचवतं की
बऱ्याच मानसिक व्याधी अशा बळावतात -
3:10 - 3:12किमान अंशतः,
-
3:12 - 3:15मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे,
-
3:15 - 3:17आणि/ किंवा अंतर्निहित जनुकीय कल असल्याने.
-
3:19 - 3:22म्हणून तुम्ही लगेच बरे होऊ शकत नाहीत.
-
3:23 - 3:25कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना
-
3:25 - 3:29वंशद्वेष आणि सामाजिक-आर्थिक
विषमतेसारख्या घटकांनी -
3:29 - 3:34त्यांना मानसिक व्याधी बळावण्याच्या
२०% अधिक धोक्याकडे ढकललंय, -
3:34 - 3:36अद्यापही ते मानसिक आरोग्य सेवांपासून
वंचित आहेत -
3:36 - 3:39गौरवर्णीय अमेरिकनांच्या
जवळपास अर्ध्या दराने. -
3:40 - 3:42काळिमा हे एक कारण आहे,
-
3:42 - 3:49त्यासह, ६३% कृष्णवर्णीय अमेरिकन लोक
नैराश्याला कमकुवतपणा समजतात. -
3:50 - 3:54हे दुःखद आहे की,
कृष्णवर्णीय मुलांमधील आत्महत्या दर -
3:54 - 3:57गेल्या २० वर्षांत दुप्पट झालेला आहे.
-
3:58 - 4:00आता, एक चांगली बातमी अशी:
-
4:01 - 4:05नैराश्याला तोंड देणाऱ्या
७०% लोकांमध्ये सुधारणा होईल -
4:05 - 4:08रोगनिवारण, उपचार आणि औषधोपचार यामुळे.
-
4:09 - 4:11या माहितीने सज्ज असतांना,
-
4:11 - 4:13मी एक निश्चय केला:
-
4:13 - 4:16मी आता अजिबात शांत बसणार नव्हते.
-
4:17 - 4:19माझ्या परिवाराच्या आशीर्वादाने,
-
4:19 - 4:20माझी कहाणी आपल्यासमोर मांडणार आहे
-
4:20 - 4:23अपेक्षा आहे की
यातून राष्ट्रस्तरीय संवादाची ठिणगी पडेल. -
4:24 - 4:27माझी मैत्रीण, केली पियरे-लुईस, म्हटली,
-
4:27 - 4:29"आपलं खंबीर असणंच आपल्याला कमजोर बनवतंय."
-
4:31 - 4:32तिचं बरोबर होतं.
-
4:32 - 4:36आपल्याला ती कंटाळवाणी, जुनीपुराणी आख्यानं
टाकून द्यायची आहेत -
4:36 - 4:38भक्कम कृष्णवर्णीय स्त्रीची
-
4:38 - 4:40आणि कृष्णवर्णीय, सरस मर्द पुरुषाची,
-
4:40 - 4:43जे, कितीही वेळा कोलमडून पडले तरीही,
-
4:43 - 4:45सर्व विसरतात आणि पुन्हा लढायला सज्ज होतात.
-
4:46 - 4:49भावनाशील असणं म्हणजे
कमकुवतपणाचं लक्षण नव्हे. -
4:51 - 4:52भावना दर्शवतात आपण माणसं आहोत.
-
4:53 - 4:55आणि आपण जेव्हा मानवता नाकारतो,
-
4:55 - 4:57आपल्याला अंतःकरणातून
पोकळ झाल्यासारखं वाटतं, -
4:57 - 5:00ही रिक्तता भरून काढण्यासाठी स्वतःच्या
औषधोपचाराचे मार्ग शोधतो. -
5:01 - 5:03माझं औषध म्हणजे मोठं यश होतं.
-
5:04 - 5:08आजकाल, मी माझी कहाणी
मोकळेपणाने व्यक्त करते, -
5:08 - 5:10आणि इतरांनाही त्यांच्या कहाण्या
सांगायला लावते. -
5:10 - 5:12मला वाटतं हे तेच आहे जे
-
5:12 - 5:14त्या लोकांना आधार देतं जे एकटेपणात
सारं सहन करत असावेत -
5:14 - 5:17यासाठी की ते एकटे नाहीत हे त्यांना कळावं
-
5:17 - 5:18आणि हेही समजावं की या आधारामुळे,
-
5:18 - 5:20ते बरे होऊ शकतात.
-
5:20 - 5:22तर, मी अद्यापही झगडतेय,
-
5:22 - 5:24विशेषतः अस्वस्थतेशी,
-
5:24 - 5:26परंतु मी त्यावर मात करायला शिकलेय
-
5:26 - 5:31नियमित ध्यानधारणा, योगा
आणि तुलनेने पोषक आहार घेऊन. -
5:31 - 5:32(हशा)
-
5:32 - 5:34जर मला वाटलं परिस्थिती हाताबाहेर जातेय,
-
5:34 - 5:36मी माझ्या उपचारतज्ज्ञाला भेटायची वेळ ठरवते
-
5:36 - 5:39डॉन आर्मस्ट्राँग नावाची एक उत्साही महिला,
-
5:39 - 5:41जिच्या ठायी उच्च विनोदबुद्धीसह
-
5:41 - 5:44आपलेपणा आहे जो माझं सांत्वन करतो.
-
5:45 - 5:47मला कायम पश्चात्ताप वाटत राहील
-
5:47 - 5:49की मी माझ्या पुतण्याला आधार देऊ शकले नाही.
-
5:50 - 5:52पण माझी सर्वांत प्रामाणिक उमेद
-
5:53 - 5:56ही आहे की जो धडा मी घेतलाय
त्याद्वारे इतरांना प्रेरणा देईन. -
5:59 - 6:02जीवन खूप सुंदर आहे.
-
6:03 - 6:04कधीकधी ते अस्ताव्यस्त असतं,
-
6:04 - 6:06आणि नेहमीच अनाकलनीय असतं.
-
6:07 - 6:08पण हे सर्व ठीक होईल
-
6:08 - 6:11यातून सहीसलामत वाचण्यासाठी
जेव्हा तुमच्याकडे आधार असतो. -
6:12 - 6:14मला अपेक्षा आहे की
जेव्हा तुमचं ओझं खूप असह्य होईल, -
6:14 - 6:16तुम्ही मदतीचा हातसुद्धा मागाल.
-
6:16 - 6:17आपले आभार.
-
6:17 - 6:20(टाळ्यांचा कडकडाट)
- Title:
- शांततेत तुमचं नैराश्य सहन करू नका
- Speaker:
- निकी वेबर एलन
- Description:
-
भावनाशील असणं हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही -- त्यांचा अर्थ होतो की आपण माणूस आहोत, इति निर्माती आणि कार्यकर्ती, निकी वेबर एलन. अस्वस्थता आणि नैराश्याचं निदान झालेलं असतांनाही, वेबर एलनला हे सांगण्यास संकोच वाटला. आपल्या जवळच्या व्यक्तीने नैराश्यग्रस्ततेतून मृत्यू कवटाळेपर्यंत वेबरने आपली मनस्थिती गुप्त ठेवली. मानसिक स्वास्थ्याविषयीच्या या महत्वपूर्ण व्याख्यानात, ती आपल्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलते --
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 06:35
Abhinav Garule approved Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Shrikant Bhimrao Patil edited Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Shrikant Bhimrao Patil edited Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Shrikant Bhimrao Patil edited Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Shrikant Bhimrao Patil edited Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence | ||
Shrikant Bhimrao Patil edited Marathi subtitles for Don't suffer from your depression in silence |