1 00:00:00,956 --> 00:00:05,366 तू... या रंगमंचावर काय... करतेय 2 00:00:05,390 --> 00:00:08,508 या सर्व... प्रेक्षकांसमोर? 3 00:00:08,532 --> 00:00:09,906 (हशा) 4 00:00:09,930 --> 00:00:11,081 पळ काढ इथून!! 5 00:00:11,105 --> 00:00:12,108 (हशा) 6 00:00:12,132 --> 00:00:13,310 आताच पळ. 7 00:00:14,734 --> 00:00:17,701 हा माझ्यातल्या अस्वस्थतेचा आवाज येतोय. 8 00:00:18,539 --> 00:00:21,475 पण अजिबात वावगं घडलेलं नसताना सुद्धा, 9 00:00:21,499 --> 00:00:25,458 मला कधीकधी प्रचंड प्रमाणात असं उध्वस्त झाल्यासारखं वाटतं, 10 00:00:25,482 --> 00:00:28,444 संकट जसं सभोवती माझ्यावरच पाळत ठेवून आहे. 11 00:00:29,057 --> 00:00:31,173 बघा, काही वर्षं अगोदर, 12 00:00:31,197 --> 00:00:33,694 मला साधारण अस्वस्थतेने ग्रासल्याचं निदान झालं 13 00:00:33,718 --> 00:00:34,868 आणि तसंच नैराश्यानेही... 14 00:00:35,289 --> 00:00:37,709 दोन्ही प्रतिकूलता सहसा सोबतच ओढवतात. 15 00:00:38,073 --> 00:00:42,338 आता, ती वेळ आली होती हे मी कोणालाही सांगायला नकोय, 16 00:00:42,362 --> 00:00:44,822 खासकरून, बहुसंख्य प्रेक्षकांसमोर नकोच. 17 00:00:44,846 --> 00:00:46,373 एक कृष्णवर्णीय स्त्री म्हणून, 18 00:00:46,397 --> 00:00:50,037 यशस्वी होण्यासाठी मला विलक्षण चिवटपणा विकसित करावा लागलाय 19 00:00:50,061 --> 00:00:52,040 आणि माझ्या समुदायातील बऱ्याच लोकांसारखं, 20 00:00:52,064 --> 00:00:55,872 माझाही गैरसमज होता की नैराश्य हे दुर्बलतेचं प्रतीक आहे, 21 00:00:55,896 --> 00:00:57,432 स्वभावातील एक दोष, 22 00:00:57,456 --> 00:00:59,030 परंतु मी काही कमकुवत नव्हते; 23 00:00:59,054 --> 00:01:00,524 एक उत्तुंग विजेती होते 24 00:01:00,925 --> 00:01:03,128 मी माध्यमशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली 25 00:01:03,152 --> 00:01:07,261 आणि चित्रपट व टीव्ही उद्योगात एकामागोमाग उत्कृष्ट दर्जाची नोकरी केली. 26 00:01:07,734 --> 00:01:10,784 मेहनतीचं चीज म्हणून मला २ एमी अवॉर्ड्सही मिळाले. 27 00:01:11,436 --> 00:01:14,452 खरंच मी खूप व्यस्त होते, 28 00:01:14,476 --> 00:01:17,146 एकेकाळी आनंद देणाऱ्या गोष्टीतही रस वाटत नव्हता, 29 00:01:17,170 --> 00:01:18,468 थोडंफार जेवायचे, 30 00:01:18,492 --> 00:01:20,395 मी निद्रानाशाचा सामना करत होते 31 00:01:20,419 --> 00:01:23,043 आणि फारच एकाकी व कमीपणा वाटत होता. 32 00:01:23,562 --> 00:01:24,914 परंतु निराश? 33 00:01:24,938 --> 00:01:26,462 नाही, मी नाही. 34 00:01:27,921 --> 00:01:30,127 मी हे कबूल करण्यास मात्र २ आठवडे लागले. 35 00:01:30,151 --> 00:01:31,580 पण डॉक्टरांचं बरोबर होतं: 36 00:01:31,604 --> 00:01:32,882 मी नैराश्यात होते. 37 00:01:33,411 --> 00:01:36,959 अद्याप, मी माझ्या रोगनिदानाविषयी कोणाकडेही वाच्यता केलेली नव्हती. 38 00:01:37,522 --> 00:01:39,135 मला खूपच लज्जास्पद वाटत होतं. 39 00:01:39,159 --> 00:01:41,676 नैराश्यात जाण्याचा अधिकार आहे असा विचार केला नव्हता. 40 00:01:42,418 --> 00:01:44,048 मला समृद्ध जीवन लाभलं होतं 41 00:01:44,072 --> 00:01:47,172 जीवाभावाचं कुटुंब आणि यशस्वी करिअर यासोबतच 42 00:01:47,708 --> 00:01:50,300 आणि मी जेव्हा अकथनीय दहशतीबद्दल विचार केला 43 00:01:50,324 --> 00:01:52,812 की माझे पूर्वज या देशात तिला सामोरे गेले होते 44 00:01:52,836 --> 00:01:54,804 जेणेकरून मला हायसं वाटू शकेल, 45 00:01:54,828 --> 00:01:56,506 पण माझा संकोच आणखी गहिरा झाला. 46 00:01:56,980 --> 00:01:59,073 माझ्या जगण्याला त्यांचेच अधिष्ठान होते. 47 00:01:59,097 --> 00:02:00,699 मी त्यांचा अपेक्षाभंग कसा करू? 48 00:02:01,382 --> 00:02:03,435 मी आत्मविश्वासाने व ताठ मानेने जगेन, 49 00:02:03,459 --> 00:02:05,819 माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवीन 50 00:02:05,843 --> 00:02:07,551 आणि कोणालाही जाणवू देणार नाही. 51 00:02:10,466 --> 00:02:13,743 ४ जुलै २०१३ या दिवशी, 52 00:02:14,479 --> 00:02:16,667 माझ्या अस्तित्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. 53 00:02:17,399 --> 00:02:20,300 हा तोच दिवस होता जेव्हा मला आईचा फोन आला 54 00:02:20,324 --> 00:02:24,514 ती बोलली की माझा २२-वर्षीय पुतण्या, पॉलने आत्महत्या केली होती, 55 00:02:24,538 --> 00:02:27,179 चिंता आणि नैराश्याचा खूप वर्षं सामना करून. 56 00:02:28,668 --> 00:02:31,823 माझं पुरतं कोलमडणं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. 57 00:02:32,667 --> 00:02:33,961 पॉल आणि मी खूप निकट होतो, 58 00:02:33,985 --> 00:02:36,039 पण तो इतका दुःखी असेल याची मला कल्पना नव्हती 59 00:02:36,696 --> 00:02:40,254 आम्ही कोणीही आपल्या संघर्षाबद्दल एकमेकांशी कधीही चर्चा केलेली नव्हती. 60 00:02:40,278 --> 00:02:42,442 लज्जा आणि कलंक यांनी आम्हा दोघांना गप्प ठेवलं. 61 00:02:44,161 --> 00:02:48,164 आता, माझ्याकडे मार्ग शिल्लक होता प्रतिकूलतेशी दोन हात करण्याचा, 62 00:02:48,188 --> 00:02:51,346 म्हणून मी पुढील २ वर्षे चिंता व नैराश्यावर संशोधन करण्यात घालवली. 63 00:02:51,370 --> 00:02:54,137 आणि मला जे सापडलं ते मनोवेधक होतं. 64 00:02:54,764 --> 00:02:56,738 जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते 65 00:02:56,762 --> 00:03:01,986 की नैराश्य हे आजारपण आणि दुबळेपणा यामागचं प्रमुख कारण आहे 66 00:03:02,010 --> 00:03:03,349 जगभरात. 67 00:03:04,039 --> 00:03:07,030 तथापि नैराश्याचं खरं कारण अजून अस्पष्ट आहे 68 00:03:07,054 --> 00:03:10,152 संशोधन हे सुचवतं की बऱ्याच मानसिक व्याधी अशा बळावतात 69 00:03:10,176 --> 00:03:11,903 किमान अंशतः, 70 00:03:11,927 --> 00:03:14,582 मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे, 71 00:03:14,606 --> 00:03:17,162 आणि/ किंवा अंतर्निहित जनुकीय कल असल्याने. 72 00:03:19,042 --> 00:03:21,662 म्हणून तुम्ही लगेच बरे होऊ शकत नाहीत. 73 00:03:22,912 --> 00:03:24,632 कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना 74 00:03:24,672 --> 00:03:28,718 वंशद्वेष आणि सामाजिक-आर्थिक विषमतेसारख्या घटकांनी 75 00:03:28,742 --> 00:03:33,782 त्यांना मानसिक व्याधी बळावण्याच्या २०% अधिक धोक्याकडे ढकललंय, 76 00:03:33,806 --> 00:03:36,218 अद्यापही ते मानसिक आरोग्य सेवांपासून वंचित आहेत 77 00:03:36,242 --> 00:03:38,981 गौरवर्णीय अमेरिकनांच्या जवळपास अर्ध्या दराने. 78 00:03:39,544 --> 00:03:42,394 काळिमा हे एक कारण आहे, 79 00:03:42,418 --> 00:03:48,635 त्यासह, ६३% कृष्णवर्णीय अमेरिकन लोक नैराश्याला कमकुवतपणा समजतात. 80 00:03:49,603 --> 00:03:53,861 हे दुःखद आहे की, कृष्णवर्णीय मुलांमधील आत्महत्या दर 81 00:03:53,885 --> 00:03:56,572 गेल्या २० वर्षांत दुप्पट झालेला आहे. 82 00:03:57,843 --> 00:04:00,048 आता, एक चांगली बातमी अशी: 83 00:04:00,603 --> 00:04:04,885 नैराश्याला तोंड देणाऱ्या ७०% लोकांमध्ये सुधारणा होईल 84 00:04:04,909 --> 00:04:08,266 रोगनिवारण, उपचार आणि औषधोपचार यामुळे. 85 00:04:09,458 --> 00:04:11,120 या माहितीने सज्ज असतांना, 86 00:04:11,144 --> 00:04:12,851 मी एक निश्चय केला: 87 00:04:12,875 --> 00:04:15,843 मी आता अजिबात शांत बसणार नव्हते. 88 00:04:16,740 --> 00:04:18,543 माझ्या परिवाराच्या आशीर्वादाने, 89 00:04:18,567 --> 00:04:20,460 माझी कहाणी आपल्यासमोर मांडणार आहे 90 00:04:20,484 --> 00:04:23,298 अपेक्षा आहे की यातून राष्ट्रस्तरीय संवादाची ठिणगी पडेल. 91 00:04:24,140 --> 00:04:26,911 माझी मैत्रीण, केली पियरे-लुईस, म्हटली, 92 00:04:26,935 --> 00:04:29,426 "आपलं खंबीर असणंच आपल्याला कमजोर बनवतंय." 93 00:04:30,743 --> 00:04:32,162 तिचं बरोबर होतं. 94 00:04:32,186 --> 00:04:36,208 आपल्याला ती कंटाळवाणी, जुनीपुराणी आख्यानं टाकून द्यायची आहेत 95 00:04:36,232 --> 00:04:37,787 भक्कम कृष्णवर्णीय स्त्रीची 96 00:04:37,811 --> 00:04:40,021 आणि कृष्णवर्णीय, सरस मर्द पुरुषाची, 97 00:04:40,045 --> 00:04:42,965 जे, कितीही वेळा कोलमडून पडले तरीही, 98 00:04:42,989 --> 00:04:45,224 सर्व विसरतात आणि पुन्हा लढायला सज्ज होतात. 99 00:04:45,770 --> 00:04:49,485 भावनाशील असणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे. 100 00:04:50,521 --> 00:04:52,404 भावना दर्शवतात आपण माणसं आहोत. 101 00:04:52,850 --> 00:04:54,869 आणि आपण जेव्हा मानवता नाकारतो, 102 00:04:54,893 --> 00:04:57,009 आपल्याला अंतःकरणातून पोकळ झाल्यासारखं वाटतं, 103 00:04:57,033 --> 00:05:00,037 ही रिक्तता भरून काढण्यासाठी स्वतःच्या औषधोपचाराचे मार्ग शोधतो. 104 00:05:00,585 --> 00:05:03,330 माझं औषध म्हणजे मोठं यश होतं. 105 00:05:04,371 --> 00:05:07,672 आजकाल, मी माझी कहाणी मोकळेपणाने व्यक्त करते, 106 00:05:07,696 --> 00:05:09,906 आणि इतरांनाही त्यांच्या कहाण्या सांगायला लावते. 107 00:05:10,406 --> 00:05:11,854 मला वाटतं हे तेच आहे जे 108 00:05:11,878 --> 00:05:14,473 त्या लोकांना आधार देतं जे एकटेपणात सारं सहन करत असावेत 109 00:05:14,497 --> 00:05:16,706 यासाठी की ते एकटे नाहीत हे त्यांना कळावं 110 00:05:16,730 --> 00:05:18,415 आणि हेही समजावं की या आधारामुळे, 111 00:05:18,439 --> 00:05:19,780 ते बरे होऊ शकतात. 112 00:05:19,804 --> 00:05:21,969 तर, मी अद्यापही झगडतेय, 113 00:05:21,993 --> 00:05:24,281 विशेषतः अस्वस्थतेशी, 114 00:05:24,305 --> 00:05:25,908 परंतु मी त्यावर मात करायला शिकलेय 115 00:05:25,932 --> 00:05:30,806 नियमित ध्यानधारणा, योगा आणि तुलनेने पोषक आहार घेऊन. 116 00:05:30,830 --> 00:05:31,898 (हशा) 117 00:05:31,922 --> 00:05:34,144 जर मला वाटलं परिस्थिती हाताबाहेर जातेय, 118 00:05:34,168 --> 00:05:36,212 मी माझ्या उपचारतज्ज्ञाला भेटायची वेळ ठरवते 119 00:05:36,236 --> 00:05:39,299 डॉन आर्मस्ट्राँग नावाची एक उत्साही महिला, 120 00:05:39,323 --> 00:05:41,296 जिच्या ठायी उच्च विनोदबुद्धीसह 121 00:05:41,320 --> 00:05:43,557 आपलेपणा आहे जो माझं सांत्वन करतो. 122 00:05:45,126 --> 00:05:46,764 मला कायम पश्चात्ताप वाटत राहील 123 00:05:47,390 --> 00:05:49,456 की मी माझ्या पुतण्याला आधार देऊ शकले नाही. 124 00:05:50,226 --> 00:05:52,013 पण माझी सर्वांत प्रामाणिक उमेद 125 00:05:52,695 --> 00:05:55,766 ही आहे की जो धडा मी घेतलाय त्याद्वारे इतरांना प्रेरणा देईन. 126 00:05:59,182 --> 00:06:01,652 जीवन खूप सुंदर आहे. 127 00:06:02,646 --> 00:06:04,208 कधीकधी ते अस्ताव्यस्त असतं, 128 00:06:04,232 --> 00:06:06,166 आणि नेहमीच अनाकलनीय असतं. 129 00:06:07,034 --> 00:06:08,237 पण हे सर्व ठीक होईल 130 00:06:08,261 --> 00:06:11,046 यातून सहीसलामत वाचण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे आधार असतो. 131 00:06:11,513 --> 00:06:13,934 मला अपेक्षा आहे की जेव्हा तुमचं ओझं खूप असह्य होईल, 132 00:06:13,958 --> 00:06:15,664 तुम्ही मदतीचा हातसुद्धा मागाल. 133 00:06:15,688 --> 00:06:16,855 आपले आभार. 134 00:06:16,879 --> 00:06:19,761 (टाळ्यांचा कडकडाट)