तू... या रंगमंचावर काय... करतेय या सर्व... प्रेक्षकांसमोर? (हशा) पळ काढ इथून!! (हशा) आताच पळ. हा माझ्यातल्या अस्वस्थतेचा आवाज येतोय. पण अजिबात वावगं घडलेलं नसताना सुद्धा, मला कधीकधी प्रचंड प्रमाणात असं उध्वस्त झाल्यासारखं वाटतं, संकट जसं सभोवती माझ्यावरच पाळत ठेवून आहे. बघा, काही वर्षं अगोदर, मला साधारण अस्वस्थतेने ग्रासल्याचं निदान झालं आणि तसंच नैराश्यानेही... दोन्ही प्रतिकूलता सहसा सोबतच ओढवतात. आता, ती वेळ आली होती हे मी कोणालाही सांगायला नकोय, खासकरून, बहुसंख्य प्रेक्षकांसमोर नकोच. एक कृष्णवर्णीय स्त्री म्हणून, यशस्वी होण्यासाठी मला विलक्षण चिवटपणा विकसित करावा लागलाय आणि माझ्या समुदायातील बऱ्याच लोकांसारखं, माझाही गैरसमज होता की नैराश्य हे दुर्बलतेचं प्रतीक आहे, स्वभावातील एक दोष, परंतु मी काही कमकुवत नव्हते; एक उत्तुंग विजेती होते मी माध्यमशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि चित्रपट व टीव्ही उद्योगात एकामागोमाग उत्कृष्ट दर्जाची नोकरी केली. मेहनतीचं चीज म्हणून मला २ एमी अवॉर्ड्सही मिळाले. खरंच मी खूप व्यस्त होते, एकेकाळी आनंद देणाऱ्या गोष्टीतही रस वाटत नव्हता, थोडंफार जेवायचे, मी निद्रानाशाचा सामना करत होते आणि फारच एकाकी व कमीपणा वाटत होता. परंतु निराश? नाही, मी नाही. मी हे कबूल करण्यास मात्र २ आठवडे लागले. पण डॉक्टरांचं बरोबर होतं: मी नैराश्यात होते. अद्याप, मी माझ्या रोगनिदानाविषयी कोणाकडेही वाच्यता केलेली नव्हती. मला खूपच लज्जास्पद वाटत होतं. नैराश्यात जाण्याचा अधिकार आहे असा विचार केला नव्हता. मला समृद्ध जीवन लाभलं होतं जीवाभावाचं कुटुंब आणि यशस्वी करिअर यासोबतच आणि मी जेव्हा अकथनीय दहशतीबद्दल विचार केला की माझे पूर्वज या देशात तिला सामोरे गेले होते जेणेकरून मला हायसं वाटू शकेल, पण माझा संकोच आणखी गहिरा झाला. माझ्या जगण्याला त्यांचेच अधिष्ठान होते. मी त्यांचा अपेक्षाभंग कसा करू? मी आत्मविश्वासाने व ताठ मानेने जगेन, माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवीन आणि कोणालाही जाणवू देणार नाही. ४ जुलै २०१३ या दिवशी, माझ्या अस्तित्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. हा तोच दिवस होता जेव्हा मला आईचा फोन आला ती बोलली की माझा २२-वर्षीय पुतण्या, पॉलने आत्महत्या केली होती, चिंता आणि नैराश्याचा खूप वर्षं सामना करून. माझं पुरतं कोलमडणं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. पॉल आणि मी खूप निकट होतो, पण तो इतका दुःखी असेल याची मला कल्पना नव्हती आम्ही कोणीही आपल्या संघर्षाबद्दल एकमेकांशी कधीही चर्चा केलेली नव्हती. लज्जा आणि कलंक यांनी आम्हा दोघांना गप्प ठेवलं. आता, माझ्याकडे मार्ग शिल्लक होता प्रतिकूलतेशी दोन हात करण्याचा, म्हणून मी पुढील २ वर्षे चिंता व नैराश्यावर संशोधन करण्यात घालवली. आणि मला जे सापडलं ते मनोवेधक होतं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की नैराश्य हे आजारपण आणि दुबळेपणा यामागचं प्रमुख कारण आहे जगभरात. तथापि नैराश्याचं खरं कारण अजून अस्पष्ट आहे संशोधन हे सुचवतं की बऱ्याच मानसिक व्याधी अशा बळावतात किमान अंशतः, मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे, आणि/ किंवा अंतर्निहित जनुकीय कल असल्याने. म्हणून तुम्ही लगेच बरे होऊ शकत नाहीत. कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना वंशद्वेष आणि सामाजिक-आर्थिक विषमतेसारख्या घटकांनी त्यांना मानसिक व्याधी बळावण्याच्या २०% अधिक धोक्याकडे ढकललंय, अद्यापही ते मानसिक आरोग्य सेवांपासून वंचित आहेत गौरवर्णीय अमेरिकनांच्या जवळपास अर्ध्या दराने. काळिमा हे एक कारण आहे, त्यासह, ६३% कृष्णवर्णीय अमेरिकन लोक नैराश्याला कमकुवतपणा समजतात. हे दुःखद आहे की, कृष्णवर्णीय मुलांमधील आत्महत्या दर गेल्या २० वर्षांत दुप्पट झालेला आहे. आता, एक चांगली बातमी अशी: नैराश्याला तोंड देणाऱ्या ७०% लोकांमध्ये सुधारणा होईल रोगनिवारण, उपचार आणि औषधोपचार यामुळे. या माहितीने सज्ज असतांना, मी एक निश्चय केला: मी आता अजिबात शांत बसणार नव्हते. माझ्या परिवाराच्या आशीर्वादाने, माझी कहाणी आपल्यासमोर मांडणार आहे अपेक्षा आहे की यातून राष्ट्रस्तरीय संवादाची ठिणगी पडेल. माझी मैत्रीण, केली पियरे-लुईस, म्हटली, "आपलं खंबीर असणंच आपल्याला कमजोर बनवतंय." तिचं बरोबर होतं. आपल्याला ती कंटाळवाणी, जुनीपुराणी आख्यानं टाकून द्यायची आहेत भक्कम कृष्णवर्णीय स्त्रीची आणि कृष्णवर्णीय, सरस मर्द पुरुषाची, जे, कितीही वेळा कोलमडून पडले तरीही, सर्व विसरतात आणि पुन्हा लढायला सज्ज होतात. भावनाशील असणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे. भावना दर्शवतात आपण माणसं आहोत. आणि आपण जेव्हा मानवता नाकारतो, आपल्याला अंतःकरणातून पोकळ झाल्यासारखं वाटतं, ही रिक्तता भरून काढण्यासाठी स्वतःच्या औषधोपचाराचे मार्ग शोधतो. माझं औषध म्हणजे मोठं यश होतं. आजकाल, मी माझी कहाणी मोकळेपणाने व्यक्त करते, आणि इतरांनाही त्यांच्या कहाण्या सांगायला लावते. मला वाटतं हे तेच आहे जे त्या लोकांना आधार देतं जे एकटेपणात सारं सहन करत असावेत यासाठी की ते एकटे नाहीत हे त्यांना कळावं आणि हेही समजावं की या आधारामुळे, ते बरे होऊ शकतात. तर, मी अद्यापही झगडतेय, विशेषतः अस्वस्थतेशी, परंतु मी त्यावर मात करायला शिकलेय नियमित ध्यानधारणा, योगा आणि तुलनेने पोषक आहार घेऊन. (हशा) जर मला वाटलं परिस्थिती हाताबाहेर जातेय, मी माझ्या उपचारतज्ज्ञाला भेटायची वेळ ठरवते डॉन आर्मस्ट्राँग नावाची एक उत्साही महिला, जिच्या ठायी उच्च विनोदबुद्धीसह आपलेपणा आहे जो माझं सांत्वन करतो. मला कायम पश्चात्ताप वाटत राहील की मी माझ्या पुतण्याला आधार देऊ शकले नाही. पण माझी सर्वांत प्रामाणिक उमेद ही आहे की जो धडा मी घेतलाय त्याद्वारे इतरांना प्रेरणा देईन. जीवन खूप सुंदर आहे. कधीकधी ते अस्ताव्यस्त असतं, आणि नेहमीच अनाकलनीय असतं. पण हे सर्व ठीक होईल यातून सहीसलामत वाचण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे आधार असतो. मला अपेक्षा आहे की जेव्हा तुमचं ओझं खूप असह्य होईल, तुम्ही मदतीचा हातसुद्धा मागाल. आपले आभार. (टाळ्यांचा कडकडाट)