0:00:00.956,0:00:05.366 तू... या रंगमंचावर काय... करतेय 0:00:05.390,0:00:08.508 या सर्व... प्रेक्षकांसमोर? 0:00:08.532,0:00:09.906 (हशा) 0:00:09.930,0:00:11.081 पळ काढ इथून!! 0:00:11.105,0:00:12.108 (हशा) 0:00:12.132,0:00:13.310 आताच पळ. 0:00:14.734,0:00:17.701 हा माझ्यातल्या अस्वस्थतेचा आवाज येतोय. 0:00:18.539,0:00:21.475 पण अजिबात वावगं घडलेलं नसताना सुद्धा, 0:00:21.499,0:00:25.458 मला कधीकधी प्रचंड प्रमाणात[br]असं उध्वस्त झाल्यासारखं वाटतं, 0:00:25.482,0:00:28.444 संकट जसं सभोवती माझ्यावरच पाळत ठेवून आहे. 0:00:29.057,0:00:31.173 बघा, काही वर्षं अगोदर, 0:00:31.197,0:00:33.694 मला साधारण अस्वस्थतेने[br]ग्रासल्याचं निदान झालं 0:00:33.718,0:00:34.868 आणि तसंच नैराश्यानेही... 0:00:35.289,0:00:37.709 दोन्ही प्रतिकूलता सहसा सोबतच ओढवतात. 0:00:38.073,0:00:42.338 आता, ती वेळ आली होती[br]हे मी कोणालाही सांगायला नकोय, 0:00:42.362,0:00:44.822 खासकरून, बहुसंख्य प्रेक्षकांसमोर नकोच. 0:00:44.846,0:00:46.373 एक कृष्णवर्णीय स्त्री म्हणून, 0:00:46.397,0:00:50.037 यशस्वी होण्यासाठी मला विलक्षण चिवटपणा[br]विकसित करावा लागलाय 0:00:50.061,0:00:52.040 आणि माझ्या समुदायातील बऱ्याच लोकांसारखं, 0:00:52.064,0:00:55.872 माझाही गैरसमज होता की[br]नैराश्य हे दुर्बलतेचं प्रतीक आहे, 0:00:55.896,0:00:57.432 स्वभावातील एक दोष, 0:00:57.456,0:00:59.030 परंतु मी काही कमकुवत नव्हते; 0:00:59.054,0:01:00.524 एक उत्तुंग विजेती होते 0:01:00.925,0:01:03.128 मी माध्यमशास्त्रात[br]पदव्युत्तर पदवी प्राप्त केली 0:01:03.152,0:01:07.261 आणि चित्रपट व टीव्ही उद्योगात[br]एकामागोमाग उत्कृष्ट दर्जाची नोकरी केली. 0:01:07.734,0:01:10.784 मेहनतीचं चीज म्हणून मला[br]२ एमी अवॉर्ड्सही मिळाले. 0:01:11.436,0:01:14.452 खरंच मी खूप व्यस्त होते, 0:01:14.476,0:01:17.146 एकेकाळी आनंद देणाऱ्या गोष्टीतही[br]रस वाटत नव्हता, 0:01:17.170,0:01:18.468 थोडंफार जेवायचे, 0:01:18.492,0:01:20.395 मी निद्रानाशाचा सामना करत होते 0:01:20.419,0:01:23.043 आणि फारच एकाकी व कमीपणा वाटत होता. 0:01:23.562,0:01:24.914 परंतु निराश? 0:01:24.938,0:01:26.462 नाही, मी नाही. 0:01:27.921,0:01:30.127 मी हे कबूल करण्यास मात्र २ आठवडे लागले. 0:01:30.151,0:01:31.580 पण डॉक्टरांचं बरोबर होतं: 0:01:31.604,0:01:32.882 मी नैराश्यात होते. 0:01:33.411,0:01:36.959 अद्याप, मी माझ्या रोगनिदानाविषयी[br]कोणाकडेही वाच्यता केलेली नव्हती. 0:01:37.522,0:01:39.135 मला खूपच लज्जास्पद वाटत होतं. 0:01:39.159,0:01:41.676 नैराश्यात जाण्याचा अधिकार आहे[br]असा विचार केला नव्हता. 0:01:42.418,0:01:44.048 मला समृद्ध जीवन लाभलं होतं 0:01:44.072,0:01:47.172 जीवाभावाचं कुटुंब आणि यशस्वी करिअर यासोबतच 0:01:47.708,0:01:50.300 आणि मी जेव्हा अकथनीय दहशतीबद्दल विचार केला 0:01:50.324,0:01:52.812 की माझे पूर्वज या देशात[br]तिला सामोरे गेले होते 0:01:52.836,0:01:54.804 जेणेकरून मला हायसं वाटू शकेल, 0:01:54.828,0:01:56.506 पण माझा संकोच आणखी गहिरा झाला. 0:01:56.980,0:01:59.073 माझ्या जगण्याला त्यांचेच अधिष्ठान होते. 0:01:59.097,0:02:00.699 मी त्यांचा अपेक्षाभंग कसा करू? 0:02:01.382,0:02:03.435 मी आत्मविश्वासाने व ताठ मानेने जगेन, 0:02:03.459,0:02:05.819 माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवीन 0:02:05.843,0:02:07.551 आणि कोणालाही जाणवू देणार नाही. 0:02:10.466,0:02:13.743 ४ जुलै २०१३ या दिवशी, 0:02:14.479,0:02:16.667 माझ्या अस्तित्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. 0:02:17.399,0:02:20.300 हा तोच दिवस होता जेव्हा मला आईचा फोन आला 0:02:20.324,0:02:24.514 ती बोलली की माझा २२-वर्षीय पुतण्या, पॉलने[br]आत्महत्या केली होती, 0:02:24.538,0:02:27.179 चिंता आणि नैराश्याचा खूप वर्षं सामना करून. 0:02:28.668,0:02:31.823 माझं पुरतं कोलमडणं वर्णन करायला[br]माझ्याकडे शब्दच नाहीत. 0:02:32.667,0:02:33.961 पॉल आणि मी खूप निकट होतो, 0:02:33.985,0:02:36.039 पण तो इतका दुःखी असेल[br]याची मला कल्पना नव्हती 0:02:36.696,0:02:40.254 आम्ही कोणीही आपल्या संघर्षाबद्दल[br]एकमेकांशी कधीही चर्चा केलेली नव्हती. 0:02:40.278,0:02:42.442 लज्जा आणि कलंक यांनी[br]आम्हा दोघांना गप्प ठेवलं. 0:02:44.161,0:02:48.164 आता, माझ्याकडे मार्ग शिल्लक होता[br]प्रतिकूलतेशी दोन हात करण्याचा, 0:02:48.188,0:02:51.346 म्हणून मी पुढील २ वर्षे चिंता व नैराश्यावर[br]संशोधन करण्यात घालवली. 0:02:51.370,0:02:54.137 आणि मला जे सापडलं ते मनोवेधक होतं. 0:02:54.764,0:02:56.738 जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते 0:02:56.762,0:03:01.986 की नैराश्य हे आजारपण आणि दुबळेपणा[br]यामागचं प्रमुख कारण आहे 0:03:02.010,0:03:03.349 जगभरात. 0:03:04.039,0:03:07.030 तथापि नैराश्याचं खरं कारण अजून अस्पष्ट आहे 0:03:07.054,0:03:10.152 संशोधन हे सुचवतं की[br]बऱ्याच मानसिक व्याधी अशा बळावतात 0:03:10.176,0:03:11.903 किमान अंशतः, 0:03:11.927,0:03:14.582 मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे, 0:03:14.606,0:03:17.162 आणि/ किंवा अंतर्निहित जनुकीय कल असल्याने. 0:03:19.042,0:03:21.662 म्हणून तुम्ही लगेच बरे होऊ शकत नाहीत. 0:03:22.912,0:03:24.632 कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना 0:03:24.672,0:03:28.718 वंशद्वेष आणि सामाजिक-आर्थिक[br]विषमतेसारख्या घटकांनी 0:03:28.742,0:03:33.782 त्यांना मानसिक व्याधी बळावण्याच्या[br]२०% अधिक धोक्याकडे ढकललंय, 0:03:33.806,0:03:36.218 अद्यापही ते मानसिक आरोग्य सेवांपासून[br]वंचित आहेत 0:03:36.242,0:03:38.981 गौरवर्णीय अमेरिकनांच्या[br]जवळपास अर्ध्या दराने. 0:03:39.544,0:03:42.394 काळिमा हे एक कारण आहे, 0:03:42.418,0:03:48.635 त्यासह, ६३% कृष्णवर्णीय अमेरिकन लोक[br]नैराश्याला कमकुवतपणा समजतात. 0:03:49.603,0:03:53.861 हे दुःखद आहे की,[br]कृष्णवर्णीय मुलांमधील आत्महत्या दर 0:03:53.885,0:03:56.572 गेल्या २० वर्षांत दुप्पट झालेला आहे. 0:03:57.843,0:04:00.048 आता, एक चांगली बातमी अशी: 0:04:00.603,0:04:04.885 नैराश्याला तोंड देणाऱ्या[br]७०% लोकांमध्ये सुधारणा होईल 0:04:04.909,0:04:08.266 रोगनिवारण, उपचार आणि औषधोपचार यामुळे. 0:04:09.458,0:04:11.120 या माहितीने सज्ज असतांना, 0:04:11.144,0:04:12.851 मी एक निश्चय केला: 0:04:12.875,0:04:15.843 मी आता अजिबात शांत बसणार नव्हते. 0:04:16.740,0:04:18.543 माझ्या परिवाराच्या आशीर्वादाने, 0:04:18.567,0:04:20.460 माझी कहाणी आपल्यासमोर मांडणार आहे 0:04:20.484,0:04:23.298 अपेक्षा आहे की[br]यातून राष्ट्रस्तरीय संवादाची ठिणगी पडेल. 0:04:24.140,0:04:26.911 माझी मैत्रीण, केली पियरे-लुईस, म्हटली, 0:04:26.935,0:04:29.426 "आपलं खंबीर असणंच आपल्याला कमजोर बनवतंय." 0:04:30.743,0:04:32.162 तिचं बरोबर होतं. 0:04:32.186,0:04:36.208 आपल्याला ती कंटाळवाणी, जुनीपुराणी आख्यानं[br]टाकून द्यायची आहेत 0:04:36.232,0:04:37.787 भक्कम कृष्णवर्णीय स्त्रीची 0:04:37.811,0:04:40.021 आणि कृष्णवर्णीय, सरस मर्द पुरुषाची, 0:04:40.045,0:04:42.965 जे, कितीही वेळा कोलमडून पडले तरीही, 0:04:42.989,0:04:45.224 सर्व विसरतात आणि पुन्हा लढायला सज्ज होतात. 0:04:45.770,0:04:49.485 भावनाशील असणं म्हणजे[br]कमकुवतपणाचं लक्षण नव्हे. 0:04:50.521,0:04:52.404 भावना दर्शवतात आपण माणसं आहोत. 0:04:52.850,0:04:54.869 आणि आपण जेव्हा मानवता नाकारतो, 0:04:54.893,0:04:57.009 आपल्याला अंतःकरणातून[br]पोकळ झाल्यासारखं वाटतं, 0:04:57.033,0:05:00.037 ही रिक्तता भरून काढण्यासाठी स्वतःच्या[br]औषधोपचाराचे मार्ग शोधतो. 0:05:00.585,0:05:03.330 माझं औषध म्हणजे मोठं यश होतं. 0:05:04.371,0:05:07.672 आजकाल, मी माझी कहाणी[br]मोकळेपणाने व्यक्त करते, 0:05:07.696,0:05:09.906 आणि इतरांनाही त्यांच्या कहाण्या[br]सांगायला लावते. 0:05:10.406,0:05:11.854 मला वाटतं हे तेच आहे जे 0:05:11.878,0:05:14.473 त्या लोकांना आधार देतं जे एकटेपणात[br]सारं सहन करत असावेत 0:05:14.497,0:05:16.706 यासाठी की ते एकटे नाहीत हे त्यांना कळावं 0:05:16.730,0:05:18.415 आणि हेही समजावं की या आधारामुळे, 0:05:18.439,0:05:19.780 ते बरे होऊ शकतात. 0:05:19.804,0:05:21.969 तर, मी अद्यापही झगडतेय, 0:05:21.993,0:05:24.281 विशेषतः अस्वस्थतेशी, 0:05:24.305,0:05:25.908 परंतु मी त्यावर मात करायला शिकलेय 0:05:25.932,0:05:30.806 नियमित ध्यानधारणा, योगा[br]आणि तुलनेने पोषक आहार घेऊन. 0:05:30.830,0:05:31.898 (हशा) 0:05:31.922,0:05:34.144 जर मला वाटलं परिस्थिती हाताबाहेर जातेय, 0:05:34.168,0:05:36.212 मी माझ्या उपचारतज्ज्ञाला भेटायची वेळ ठरवते 0:05:36.236,0:05:39.299 डॉन आर्मस्ट्राँग नावाची एक उत्साही महिला, 0:05:39.323,0:05:41.296 जिच्या ठायी उच्च विनोदबुद्धीसह 0:05:41.320,0:05:43.557 आपलेपणा आहे जो माझं सांत्वन करतो. 0:05:45.126,0:05:46.764 मला कायम पश्चात्ताप वाटत राहील 0:05:47.390,0:05:49.456 की मी माझ्या पुतण्याला आधार देऊ शकले नाही. 0:05:50.226,0:05:52.013 पण माझी सर्वांत प्रामाणिक उमेद 0:05:52.695,0:05:55.766 ही आहे की जो धडा मी घेतलाय[br]त्याद्वारे इतरांना प्रेरणा देईन. 0:05:59.182,0:06:01.652 जीवन खूप सुंदर आहे. 0:06:02.646,0:06:04.208 कधीकधी ते अस्ताव्यस्त असतं, 0:06:04.232,0:06:06.166 आणि नेहमीच अनाकलनीय असतं. 0:06:07.034,0:06:08.237 पण हे सर्व ठीक होईल 0:06:08.261,0:06:11.046 यातून सहीसलामत वाचण्यासाठी[br]जेव्हा तुमच्याकडे आधार असतो. 0:06:11.513,0:06:13.934 मला अपेक्षा आहे की[br]जेव्हा तुमचं ओझं खूप असह्य होईल, 0:06:13.958,0:06:15.664 तुम्ही मदतीचा हातसुद्धा मागाल. 0:06:15.688,0:06:16.855 आपले आभार. 0:06:16.879,0:06:19.761 (टाळ्यांचा कडकडाट)