नवीन भाषा लवकर शिकण्यासाठीची रहस्य !
-
0:02 - 0:05मला परदेशी भाषा शिकायला आवडतं .
-
0:05 - 0:09मला हे इतकं मनापासून आवडतं कि;
मी दर दोन वर्षांनी एक नवी भाषा शिकते. -
0:09 - 0:11सध्या मी माझी आठवी भाषा शिकत आहे.
-
0:11 - 0:13जेंव्हा लोकांना हे कळतं,
तेंव्हा ते विचारतात; -
0:14 - 0:16तुम्ही हे कसं करता ?
यामागचं रहस्य काय ? -
0:16 - 0:19आणि खरंतर,
बरीच वर्षे माझं उत्तर होत, -
0:19 - 0:21"मला माहित नाही.
मला भाषा शिकायला आवडतात इतकंच." -
0:22 - 0:24पण हे उत्तर लोकांना पटायचच नाही.
-
0:24 - 0:28त्यांना जाणून घ्यायचं असायचं कि, त्यांनी
इतकी वर्षे एकच भाषा शिकायचा प्रयत्न करूनही -
0:28 - 0:30प्रभुत्व का मिळवता येत नाही?
-
0:30 - 0:33आणि इथे मी मात्र,
भाषांवर भाषा शिकते आहे. -
0:33 - 0:35बहुभाषिक होण्याचं रहस्य
त्यांना हवं असायचं. -
0:35 - 0:37अनेक भाषा बोलू शकतात असे लोक.
-
0:37 - 0:39मग मी ही विचारात पडले कि,
-
0:39 - 0:41इतर बहुभाषिक हे कसं साध्य करतात?
-
0:41 - 0:43आमच्यात सारखं असं काय आहे?
-
0:43 - 0:45असं काय आहे ज्यामुळे
-
0:45 - 0:47आम्हाला इतरांपेक्षा
अधिक वेगाने भाषा शिकता येतात? -
0:48 - 0:51माझ्यासारख्याच इतरांना भेटून,
मी हे जाणून घ्यायचं ठरवलं. -
0:52 - 0:54बहुभाषिकांना भेटण्याची मस्त जागा म्हणजे
-
0:54 - 0:56जिथे अनेक भाषा प्रेमी लोक भेटून
-
0:56 - 0:59आपल्या भाषिक ज्ञानाचा वापर करतात
असा एखादा कार्यक्रम. -
0:59 - 1:02जगभर बहुभाषिकांसाठी
असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. -
1:02 - 1:04मी तिथे जाऊन,
-
1:04 - 1:06या लोकांकडून
त्यांच्या पद्धती जाणून घ्यायचं ठरवलं. -
1:07 - 1:09तिथेच मी आयर्लंडच्या बेनीला भेटले.
-
1:09 - 1:13'अगदी पहिल्या दिवसापासून त्या भाषेत
बोलायला सुरुवात करायची' हि त्याची पद्धत. -
1:14 - 1:17प्रवाश्यांसाठीच्या पुस्तकातील
काही वाक्य तो शिकून घेतो -
1:17 - 1:19आणि स्थानिक लोकांना भेटतो.
-
1:19 - 1:22मग लगेचच त्यांच्याशी
संभाषण साधण्याचा प्रयत्न करतो. -
1:22 - 1:24दिवसागणिक २०० चुका झाल्या
तरी त्याला वावगं वाटत नाही. -
1:24 - 1:27कारण मिळणाऱ्या
अभिप्रायाच्या मदतीनेच तर तो शिकतो. -
1:27 - 1:31आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे;
आजकाल खूप प्रवास करायचीही गरज नाही. -
1:31 - 1:34कारण आजकाल तुम्ही
स्थानिक लोकांशी सहज संवाद साधू शकता, -
1:34 - 1:36वेबसाईट चा वापर करत,
अगदी घरबसल्या ! -
1:36 - 1:38मी ब्राझीलच्या ल्युकासला देखील भेटले.
-
1:38 - 1:41रशियन शिकायची त्याची
एक गमतीशीर पद्धत होती. -
1:41 - 1:47त्याने चक्क Skype वर
शेकडो रशियन बोलणाऱ्या लोकांना ऍड केलं. -
1:47 - 1:51आणि त्यातल्या एकाशी बोलायला
चॅट विंडो उघडली. -
1:51 - 1:52आणि रशियन मध्ये 'हाय' लिहिले.
-
1:53 - 1:56तिकडूनही "कसा आहेस?" असे प्रत्युत्तर आले.
-
1:56 - 2:00ल्युकासनेही तेच कॉपी केले
आणि दुसऱ्याला पाठवले. -
2:00 - 2:04दुसऱ्याने प्रत्त्युत्तर दिले,
"मी मजेत. धन्यवाद. तू कसा आहेस?" -
2:04 - 2:07ल्युकासने हेच कॉपी करून
पहिल्याला पाठवले. -
2:07 - 2:10अशा गमतीशीर प्रकारे तो
दोन अनोळखी लोकांचा संवाद घडवून आणत होता, -
2:10 - 2:12तेही त्यांच्या नकळत.
-
2:12 - 2:13(हश्या)
-
2:13 - 2:15काही काळातच तो भाषा शिकला.
-
2:15 - 2:17कारण त्याने
असे अनेक संवाद साधले होते. -
2:17 - 2:20ज्यातून रशियन संभाषणाची सुरुवात
कशी होते याचा अंदाज आला. -
2:20 - 2:22किती कल्पक पद्धत आहे ना ?
-
2:22 - 2:27भाषेतल्या आवाजांचे अनुकरण करत
शिकणाऱ्या बहुभाषिकांनाही मी भेटले. -
2:27 - 2:31आणि एखाद्या भाषेतील
५०० उपयुक्त शब्द शिकणाऱ्या अनेकांनाही. -
2:31 - 2:35काही तर व्याकरणाचे नियम
वाचूनही सुरुवात करतात. -
2:36 - 2:38मी अंदाजे १०० लोकांना
विचारलं असेल आणि -
2:38 - 2:42त्यांच्याकडून मी भाषा शिकण्याच्या
१०० वेगवेगळ्या पद्धती ऐकल्या. -
2:42 - 2:45भाषा शिकण्याची प्रत्येकाची
आपली खास पद्धत असते. -
2:45 - 2:49पद्धती वेगळ्या मात्र अंतिम परिणाम एकच
- भाषा उत्तम बोलता येणे. -
2:50 - 2:54हे सगळे बहुभाषिक लोक
त्यांच्या पद्धतींबद्दल सांगत असतांना, -
2:54 - 2:57मला अचानक जाणवलं ते म्हणजे
-
2:57 - 3:00आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती
आणि ती म्हणजे; -
3:00 - 3:05भाषा शिक्षणाची प्रक्रिया मनोरंजक
बनवण्याच्या पद्धती आम्ही शोधल्या आहेत. -
3:05 - 3:08हे सगळेच लोक भाषा शिकणे
किती आनंददायी आहे -
3:08 - 3:10याबद्दल सांगत होते.
-
3:10 - 3:11त्यांचे चेहरे पाहायला हवे होते
-
3:11 - 3:14जेंव्हा ते त्यांचे व्याकरणाचे
रंगीत तक्ते दाखवत होते. -
3:14 - 3:16आणि त्यांनी काळजीपूर्वक
बनवलेले 'फ्लॅश कार्ड्स'. -
3:16 - 3:19ऍप च्या मदतीने शब्दसंग्रह
शिकण्याची आकडेवारी वगैरे -
3:19 - 3:24किंवा परकीय भाषेतील एखादी पाककृती बनवायला
त्यांना कशी मजा येते हे सांगतांना. -
3:25 - 3:26प्रत्येकाने वेगवेगळी पद्धत वापरली,
-
3:26 - 3:30पण त्यातून आपल्याला
आनंद मिळतोय का याची खात्री करत. -
3:30 - 3:34मला जाणवलं कि मी सुद्धा
अशाच प्रकारे भाषा शिकते. -
3:34 - 3:38मी स्पॅनिश शिकत असतांना
मला पुस्तकातले धडे वाचून कंटाळा आला होता. -
3:38 - 3:39म्हणजे खरंच,
'होझे' बद्दल कोण वाचेल? -
3:40 - 3:43रेल्वे स्टेशन ला जायचा रस्ता वगैरे.
-
3:43 - 3:45त्यापेक्षा मला 'हॅरी पॉटर' वाचायचं होत.
-
3:45 - 3:47कारण लहानपणी ते माझं आवडतं पुस्तक होत.
-
3:47 - 3:49आणि मी ते अनेकदा वाचलं आहे.
-
3:49 - 3:52मी 'हॅरी पॉटर' चा स्पॅनिश अनुवाद मिळवला
आणि वाचायला सुरुवात केली. -
3:53 - 3:56सुरुवातीला मला अगदी काहीही कळलं नाही.
-
3:56 - 3:58तरीही मी वाचत राहिले
कारण मला पुस्तक आवडायचं. -
3:58 - 4:02पुस्तक संपेपर्यंत मला
हळूहळू कळू लागलं होत. -
4:02 - 4:05मी जर्मन शिकू लागले
तेंव्हाही काहीसं असंच घडलं. -
4:05 - 4:08माझ्या आवडीची 'फ्रेंड्स' मालिका
मी जर्मन मधून पाहायचं ठरवलं. -
4:08 - 4:11आणि सुरुवातीला मला
अक्षरशः काहीही झेपलं नाही. -
4:11 - 4:15एक शब्द संपून दुसरा कधी
सुरु झाला हेही कळायचं नाही. -
4:15 - 4:17पण मी दररोज पाहत राहिले
कारण ते 'फ्रेंड्स' होत. -
4:17 - 4:20मला ते इतकं आवडतं कि
मी कोणत्याही भाषेत पाहू शकते. -
4:20 - 4:22आणि मग दुसऱ्या कि तिसऱ्या सिझन नंतर
-
4:22 - 4:24मला डायलॉग्ज चे अर्थ समजू लागले.
-
4:25 - 4:28इतर बहुभाषिक लोकांना
भेटल्या नंतर माझ्या हे लक्षात आलं. -
4:28 - 4:30आम्ही खूप बुद्धिमान नाही.
-
4:30 - 4:32भाषा शिकण्याचा कोणताही
'शॉर्टकट' आमच्याकडे नाही. -
4:32 - 4:36आम्ही फक्त शिकण्याची प्रक्रिया
आनंददायी बनवण्याचे मार्ग शोधले. -
4:36 - 4:39असे मार्ग ज्यामुळे भाषा हा
कंटाळवाणा शैक्षणिक विषय न राहता -
4:39 - 4:43तुम्हाला रोज करायला आवडेल
अशी गोष्ट बनेल. -
4:44 - 4:46शब्द कागदावर लिहणे
कंटाळवाणे वाटत असेल तर, -
4:46 - 4:47तुम्ही ते ऍप मध्ये टाईप करू शकता.
-
4:47 - 4:50तुम्हाला कंटाळवाणे पुस्तकी विषय
ऐकायला आवडत नसेल तर -
4:50 - 4:55हव्यात्या भाषेतील रोचक गोष्टी
Youtube किंवा पॉडकास्ट वर शोधून काढा. -
4:55 - 4:56तुम्ही खूपच अंतर्मुख असाल तर,
-
4:56 - 4:59आणि पटकन स्थानिक लोकांशी
संवाद साधने तुम्हाला शक्य नसेल तर, -
4:59 - 5:02तुम्ही स्वतःशी बोलण्याची पद्धत
अवलंबू शकता. -
5:02 - 5:04तुम्ही तुमच्या खोलीत
आरामात स्वतःशी बोलू शकता. -
5:04 - 5:07तुमचा दिवस कसा होता,
सुट्टीत काय करायचा विचार आहे हे सांगा. -
5:07 - 5:09किंवा फोन मधला
एखादा फोटो / चित्र घेऊन -
5:09 - 5:13तुमच्या काल्पनिक मित्राला
त्याबद्दल सांगा. -
5:13 - 5:16बहुभाषिक लोक अश्या प्रकारेच
भाषा शिकतात. -
5:16 - 5:19सर्वात छान गोष्ट म्हणजे
या पद्धती कोणालाही सहज उपलब्ध आहेत. -
5:19 - 5:21जे स्वतःचे स्वतः भाषा शिकू इच्छितात
अश्या सगळ्यांसाठी. -
5:23 - 5:25इतर बहुभाषिकांना भेटल्यामुळे
मला जाणवलं कि, -
5:25 - 5:28यासगळ्यात आनंद शोधणं खूप महत्वाचं आहे.
-
5:28 - 5:30भाषा शिकण्याच्या या प्रक्रियेत
-
5:30 - 5:33मात्र फक्त आनंद शोधून चालणार नाही.
-
5:34 - 5:36जर परकीय भाषेवर
प्रभुत्व मिळवायचं असेल तर -
5:36 - 5:39तुम्हाला तीन महत्वाची तत्व
अंगीकारावी लागतील. -
5:40 - 5:42सर्वप्रथम तुमच्याकडे हवी प्रभावी पद्धत.
-
5:43 - 5:47जर उद्याच्या परीक्षेसाठी
तुम्ही शब्दांची यादी पाठ करायचं ठरवलं -
5:47 - 5:49तर ते 'शॉर्ट टर्म मेमरी' मध्ये
साठवले जातील. -
5:49 - 5:51आणि काही दिवसांतच
तुम्ही विसरूनही जाल. -
5:51 - 5:54तुम्हाला हे शब्द दीर्घकाळ
लक्षात ठेवायचे असतील तर, -
5:54 - 5:57काही दिवस नियमित
त्याची उजळणी करणं गरजेचं आहे. -
5:57 - 6:00ह्याला 'स्पेस्ड रिपीटिशन'
पद्धत ही म्हणतात. -
6:00 - 6:04अशी पद्धत अनुसरणारे 'Anki', 'Memrise'
सारखे ऍप तुम्ही यासाठी वापरू शकता. -
6:04 - 6:07किंवा 'गोल्ड लिस्ट' पद्धतीचा वापरून
वहीत शब्दांच्या याद्या बनवू शकता. -
6:07 - 6:10बरेचसे बहुभाषिक हि पद्धत वापरतात.
-
6:10 - 6:14जर या पद्धतींचा प्रभावीपणा आणि
उपलबध्दता याबद्दल फारशी माहिती नसेल तर, -
6:14 - 6:17बहुभाषिक लोकांचे युट्युब चॅनेल
किंवा वेबसाइट पहा. -
6:17 - 6:18आणि त्यापासून प्रेरित व्हा.
-
6:19 - 6:21त्यांना याचा उपयोग झाला असेल
तर तो तुम्हालाही नक्कीच होईल. -
6:23 - 6:25तिसरं महत्वाचं तत्व म्हणजे
-
6:25 - 6:27शिकण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणायला हवी.
-
6:28 - 6:32आपण सगळेच खूप व्यस्त असतो आणि
आजकाल भाषा शिकण्याइतका वेळ कोणाकडेच नसतो. -
6:32 - 6:36मात्र थोडं पूर्वनियोजन केलं तर
आपण वेळ नक्की काढू शकतो. -
6:36 - 6:39तुम्ही नेहमीपेक्षा फक्त १५ मिनिटे
लवकर उठू शकाल का? -
6:39 - 6:42शब्दांची उजळणी करण्यास
तितका वेळ अगदी पुरेसा आहे. -
6:43 - 6:46कामावर जातांना प्रवासात प्रक्षेपित कथा
म्हणजे पॉडकास्ट ऐकू शकता ? -
6:46 - 6:50ऐकण्याचा सराव करण्यासाठी
तो एक उत्तम उपाय आहे. -
6:50 - 6:53जास्तीचा वेळ न काढताही
आपण खूप गोष्टी करू शकतो. -
6:53 - 6:56जसं कि कामाच्या ठिकाणी जाताजाता
पॉडकास्ट ऐकणं. -
6:56 - 6:58किंवा घरकाम करता करता ऐकणं.
-
6:58 - 7:01शिकण्यासाठीची योजना आखणे सर्वात महत्वाचे.
-
7:01 - 7:03"मी दर मंगळवार आणि गुरुवार
-
7:03 - 7:05मित्रांसोबत २०मिनिट बोलण्याचा सराव करेन.
-
7:06 - 7:10नाश्ता करता करता युट्युब व्हिडिओ ऐकेन."
-
7:10 - 7:12शिकण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणल्यास
-
7:12 - 7:14जास्तीचा वेळ काढण्याचीही गरज नाही.
-
7:14 - 7:16कारण अभ्यास तुमच्या
रोजच्या जगण्याचाच भाग बनेल. -
7:18 - 7:21आणि कोणत्याही भाषेत
पारंगत व्हायचं असेल तर, -
7:21 - 7:24थोडासा सय्यम हा हवाच.
-
7:25 - 7:27दोनच महिन्यात नवी भाषा
शिकता येणे अशक्य आहे. -
7:27 - 7:31मात्र दोन महिन्यात चांगली प्रगती करणे
नक्कीच शक्य आहे. -
7:31 - 7:35तुम्हाला आवडेल अश्या पद्धतीने
रोज थोडं जरी शिकलात तर हे शक्य आहे. -
7:35 - 7:37आणि आपल्याला सर्वाधिक प्रेरणा
-
7:37 - 7:38स्वतःच्या यशातूनच मिळते.
-
7:39 - 7:41मला स्पष्ट आठवतंय..
-
7:41 - 7:45फ्रेंड्स' मालिका जर्मन मधून पाहात असतांना
मला जेंव्हा पहिला विनोद समजला होता, -
7:45 - 7:47मी खूप आनंदित आणि प्रेरित झाले होते.
-
7:47 - 7:50इतकी कि त्या दिवशी
मी सलग दोन भाग बघितले. -
7:50 - 7:52मी जसजसं बघत गेले,
-
7:52 - 7:56तसतसं मला जास्त समजत गेलं.
माझ्यासाठी यशच होत. -
7:56 - 8:00आणि मग हळूहळू मला
ती भाषा वापरता येऊ लागली. -
8:00 - 8:03मोकळेपणाने आणि व्यवस्थित
म्हणणं मांडता येऊ लागलं. -
8:03 - 8:04अशावेळी खूप छान वाटतं.
-
8:05 - 8:06मला हे खूप आवडतं.
-
8:07 - 8:09आणि म्हणूनच मी दर दोन वर्षांनी
नवी भाषा शिकते. -
8:09 - 8:11तर असं आहे बहुभाषिक होण्याचं रहस्य.
-
8:11 - 8:14व्ययस्थित वापरता येतील अश्या
प्रभावी पद्धती शोधा, -
8:14 - 8:18ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
-
8:18 - 8:22अश्याच प्रकारे काही महिन्यातच
बहुभाषिक लोक नवनव्या भाषा शिकतात. -
8:23 - 8:25तुमच्यापैकी काहींना वाटत असेल,
-
8:25 - 8:27"भाषा शिकण्याचा आनंद घेणे वगैरे ठीक आहे,
-
8:27 - 8:30पण खरं रहस्य तुम्ही बहुभाषिक लोक
-
8:30 - 8:32इतरांपेक्षा प्रचंड हुशार असता,
हे तर नव्हे?" -
8:33 - 8:36खरंतर बेनी आणि ल्युकास बद्दल
तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही. -
8:37 - 8:43बेनी शाळेत ११वर्ष आयरिश गेलिक
आणि ५वर्ष जर्मन शिकलाय. -
8:43 - 8:46मात्र शाळा सोडतांना त्याला
या भाषा जराही बोलता येत नव्हत्या. -
8:46 - 8:50२१व्या वर्षांपर्यंत भाषा शिकण्यासाठीचे गुण
आपल्यात नाहीत असं त्याला वाटत होत. -
8:50 - 8:53इतर कोणती भाषा बोलणंही त्याला जमत नव्हतं.
-
8:53 - 8:56मग त्याने भाषा शिकण्यासाठी
स्वतःची अशी पद्धत शोधायचं ठरवलं. -
8:56 - 9:00स्थानिक लोकांशी बोलून त्यांचा
अभिप्राय घेणं हि त्याची पद्धत. -
9:00 - 9:04आणि आज बेनी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये
सहज बोलू शकतो. -
9:05 - 9:08ल्युकासने शाळेत १०वर्ष
इंग्रजी शिकायचा प्रयत्न केला. -
9:08 - 9:11तो वर्गातला सगळ्यात 'ढ' मुलगा होता.
-
9:11 - 9:13त्याचे मित्र त्याची टर उडवायचे.
-
9:13 - 9:15एकदा मजा म्हणून त्यांनी ह्याला
रशियन पाठयपुस्तक दिले. -
9:15 - 9:19कारण त्यांना वाटलं हा रशियनच काय
कोणतीच भाषा शिकू शकणार नाही. -
9:19 - 9:21ल्युकासने विविध पद्धती
आजमावायला सुरुवात केली. -
9:22 - 9:23स्वतःची पद्धत
त्याला शोधायची होती. -
9:25 - 9:29जसं कि Skype च्या माध्यमातून
लोकांशी संवाद साधत भाषा शिकणे. -
9:29 - 9:31आणि फक्त १०वर्षांनंतर,
-
9:31 - 9:34ल्युकास ११ विविध भाषा
उत्तम बोलू शकतो. -
9:35 - 9:37एखादा चमत्कार वाटतोय ना ?
-
9:37 - 9:40मी अशे चमत्कार रोज पहाते.
-
9:41 - 9:42एक भाषा मार्गदर्शक म्हणून,
-
9:42 - 9:45मी लोकांना स्वतःच्यास्वतः
भाषा शिकायला मदत करते. -
9:45 - 9:46म्हणून मी हे रोज पहाते.
-
9:46 - 9:50५,१०,इतकंच काय २० वर्ष प्रयत्न करूनही
लोकांना भाषा शिकता येत नाही. -
9:50 - 9:54आणि मग अचानक एक दिवस ते
स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करू लागतात. -
9:54 - 9:57अधिक प्रभावी पद्धती,
साहित्य जे त्यांना आवडतं. -
9:57 - 9:59ते आपण काय शिकलो
याचा मागोवा घेऊ लागतात -
9:59 - 10:02जेणेकरून झालेली प्रगती त्यांना जाणवेल.
-
10:02 - 10:04आणि मग अचानक
-
10:04 - 10:08आजवर न जमलेलं, भाषा शिकण्याचं
कैशल्य त्यांना प्राप्त होत. -
10:09 - 10:12तुम्हीही भाषा शिकण्याचा
प्रयत्न केला असेल, -
10:12 - 10:14आणि खूप अवघड वाटून
अर्ध्यावर सोडला असेल, -
10:14 - 10:16भाषा शिकण्यासाठीचं
कैशल्य तुमच्यात नसेल तर, -
10:16 - 10:18एकदा प्रयत्न नक्की करून पाहा.
-
10:18 - 10:21कदाचित तुम्हीही केवळ
एक मजेदार पाऊल दूर असाल, -
10:21 - 10:23त्या भाषेत पारंगत होण्यापासून.
-
10:23 - 10:27कदाचित बहुभाषिक होण्यापासून
तुम्ही केवळ एक पद्धत दूर असाल. -
10:27 - 10:28धन्यवाद.
-
10:28 - 10:32(टाळ्या)
- Title:
- नवीन भाषा लवकर शिकण्यासाठीची रहस्य !
- Speaker:
- लिडिया माचोवा
- Description:
-
एखादी नवीन भाषा शिकायची इच्छा आहे पण कशी आणि कुठून सुरुवात करावी याबद्दल धास्ती वाटतेय? यासाठी तुम्हाला नक्कीच कोणत्या खास प्रतिभा किंवा अनुवांशिकतेने आलेल्या गुणांची वगैरे गरज नाही याची खात्री देतायत 'लिडिया माचोवा'. आपल्या प्रेरणादायी आणि उत्साही शैलीत त्या 'बहुभाषिकांची' काही रहस्य उलगडून सांगतायत आणि त्याच बरोबर तुमच्यातील भाषिक प्रतिभा जागृत करण्यासाठी उपयुक्त अशी चार तत्व सुद्धा समजावून सांगत आहेत.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 10:45
Abhinav Garule approved Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Vibhavari Deshpande edited Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Vibhavari Deshpande edited Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Vibhavari Deshpande edited Marathi subtitles for The secrets to learning a new language | ||
Vibhavari Deshpande edited Marathi subtitles for The secrets to learning a new language |