0:00:01.760,0:00:04.656 मला परदेशी भाषा शिकायला आवडतं . 0:00:04.680,0:00:08.736 मला हे इतकं मनापासून आवडतं कि; [br]मी दर दोन वर्षांनी एक नवी भाषा शिकते. 0:00:08.760,0:00:10.856 सध्या मी माझी आठवी भाषा शिकत आहे. 0:00:10.880,0:00:13.496 जेंव्हा लोकांना हे कळतं, [br]तेंव्हा ते विचारतात; 0:00:13.520,0:00:15.616 तुम्ही हे कसं करता ? [br]यामागचं रहस्य काय ? 0:00:15.640,0:00:18.656 आणि खरंतर, [br]बरीच वर्षे माझं उत्तर होत,[br] 0:00:18.680,0:00:21.000 "मला माहित नाही. [br]मला भाषा शिकायला आवडतात इतकंच." 0:00:21.720,0:00:23.976 पण हे उत्तर लोकांना पटायचच नाही. 0:00:24.000,0:00:27.976 त्यांना जाणून घ्यायचं असायचं कि, त्यांनी [br]इतकी वर्षे एकच भाषा शिकायचा प्रयत्न करूनही 0:00:28.000,0:00:29.536 प्रभुत्व का मिळवता येत नाही? 0:00:29.560,0:00:32.616 आणि इथे मी मात्र,[br]भाषांवर भाषा शिकते आहे. 0:00:32.640,0:00:34.856 बहुभाषिक होण्याचं रहस्य[br]त्यांना हवं असायचं. 0:00:34.880,0:00:36.600 अनेक भाषा बोलू शकतात असे लोक. 0:00:37.400,0:00:38.816 मग मी ही विचारात पडले कि, 0:00:38.840,0:00:41.136 इतर बहुभाषिक हे कसं साध्य करतात? 0:00:41.160,0:00:42.656 आमच्यात सारखं असं काय आहे?[br] 0:00:42.680,0:00:44.616 असं काय आहे ज्यामुळे [br] 0:00:44.640,0:00:47.080 आम्हाला इतरांपेक्षा [br]अधिक वेगाने भाषा शिकता येतात? 0:00:47.880,0:00:50.720 माझ्यासारख्याच इतरांना भेटून,[br]मी हे जाणून घ्यायचं ठरवलं. 0:00:51.760,0:00:53.816 बहुभाषिकांना भेटण्याची मस्त जागा म्हणजे 0:00:53.840,0:00:56.136 जिथे अनेक भाषा प्रेमी लोक भेटून [br] 0:00:56.160,0:00:59.016 आपल्या भाषिक ज्ञानाचा वापर करतात[br]असा एखादा कार्यक्रम. 0:00:59.040,0:01:02.336 जगभर बहुभाषिकांसाठी [br]असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. 0:01:02.360,0:01:03.736 मी तिथे जाऊन, 0:01:03.760,0:01:06.200 या लोकांकडून [br]त्यांच्या पद्धती जाणून घ्यायचं ठरवलं. 0:01:07.200,0:01:09.136 तिथेच मी आयर्लंडच्या बेनीला भेटले. 0:01:09.160,0:01:13.320 'अगदी पहिल्या दिवसापासून त्या भाषेत[br]बोलायला सुरुवात करायची' हि त्याची पद्धत. 0:01:14.240,0:01:17.136 प्रवाश्यांसाठीच्या पुस्तकातील[br]काही वाक्य तो शिकून घेतो 0:01:17.160,0:01:18.736 आणि स्थानिक लोकांना भेटतो. 0:01:18.760,0:01:21.576 मग लगेचच त्यांच्याशी[br]संभाषण साधण्याचा प्रयत्न करतो. 0:01:21.600,0:01:24.376 दिवसागणिक २०० चुका झाल्या[br]तरी त्याला वावगं वाटत नाही. 0:01:24.400,0:01:26.840 कारण मिळणाऱ्या [br]अभिप्रायाच्या मदतीनेच तर तो शिकतो. 0:01:27.480,0:01:30.616 आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे;[br]आजकाल खूप प्रवास करायचीही गरज नाही. 0:01:30.640,0:01:33.576 कारण आजकाल तुम्ही [br]स्थानिक लोकांशी सहज संवाद साधू शकता, 0:01:33.600,0:01:36.296 वेबसाईट चा वापर करत,[br]अगदी घरबसल्या ! 0:01:36.320,0:01:38.096 मी ब्राझीलच्या ल्युकासला देखील भेटले. 0:01:38.120,0:01:40.600 रशियन शिकायची त्याची[br]एक गमतीशीर पद्धत होती. 0:01:41.200,0:01:46.856 त्याने चक्क Skype वर [br]शेकडो रशियन बोलणाऱ्या लोकांना ऍड केलं. 0:01:46.880,0:01:50.776 आणि त्यातल्या एकाशी बोलायला[br]चॅट विंडो उघडली. 0:01:50.800,0:01:52.240 आणि रशियन मध्ये 'हाय' लिहिले. 0:01:53.000,0:01:55.576 तिकडूनही "कसा आहेस?" असे प्रत्युत्तर आले. 0:01:55.600,0:02:00.056 ल्युकासनेही तेच कॉपी केले[br]आणि दुसऱ्याला पाठवले. 0:02:00.080,0:02:03.656 दुसऱ्याने प्रत्त्युत्तर दिले, [br]"मी मजेत. धन्यवाद. तू कसा आहेस?" 0:02:03.680,0:02:06.656 ल्युकासने हेच कॉपी करून[br]पहिल्याला पाठवले. 0:02:06.680,0:02:10.136 अशा गमतीशीर प्रकारे तो [br]दोन अनोळखी लोकांचा संवाद घडवून आणत होता, 0:02:10.160,0:02:11.576 तेही त्यांच्या नकळत. 0:02:11.600,0:02:12.856 (हश्या) 0:02:12.880,0:02:14.776 काही काळातच तो भाषा शिकला. 0:02:14.800,0:02:16.936 कारण त्याने [br]असे अनेक संवाद साधले होते. 0:02:16.960,0:02:19.976 ज्यातून रशियन संभाषणाची सुरुवात[br]कशी होते याचा अंदाज आला. 0:02:20.000,0:02:22.336 किती कल्पक पद्धत आहे ना ?[br] 0:02:22.360,0:02:26.856 भाषेतल्या आवाजांचे अनुकरण करत[br]शिकणाऱ्या बहुभाषिकांनाही मी भेटले. 0:02:26.880,0:02:31.296 आणि एखाद्या भाषेतील [br]५०० उपयुक्त शब्द शिकणाऱ्या अनेकांनाही. 0:02:31.320,0:02:34.720 काही तर व्याकरणाचे नियम[br]वाचूनही सुरुवात करतात. 0:02:35.600,0:02:37.896 मी अंदाजे १०० लोकांना [br]विचारलं असेल आणि 0:02:37.920,0:02:41.536 त्यांच्याकडून मी भाषा शिकण्याच्या [br]१०० वेगवेगळ्या पद्धती ऐकल्या. 0:02:41.560,0:02:45.176 भाषा शिकण्याची प्रत्येकाची[br]आपली खास पद्धत असते. 0:02:45.200,0:02:49.080 पद्धती वेगळ्या मात्र अंतिम परिणाम एकच[br]- भाषा उत्तम बोलता येणे. 0:02:50.120,0:02:54.416 हे सगळे बहुभाषिक लोक[br]त्यांच्या पद्धतींबद्दल सांगत असतांना, 0:02:54.440,0:02:56.736 मला अचानक जाणवलं ते म्हणजे 0:02:56.760,0:02:59.896 आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती [br]आणि ती म्हणजे; 0:02:59.920,0:03:05.456 भाषा शिक्षणाची प्रक्रिया मनोरंजक[br]बनवण्याच्या पद्धती आम्ही शोधल्या आहेत. 0:03:05.480,0:03:08.256 हे सगळेच लोक भाषा शिकणे [br]किती आनंददायी आहे 0:03:08.280,0:03:09.536 याबद्दल सांगत होते. 0:03:09.560,0:03:11.136 त्यांचे चेहरे पाहायला हवे होते 0:03:11.160,0:03:13.776 जेंव्हा ते त्यांचे व्याकरणाचे[br]रंगीत तक्ते दाखवत होते. 0:03:13.800,0:03:16.296 आणि त्यांनी काळजीपूर्वक[br]बनवलेले 'फ्लॅश कार्ड्स'. 0:03:16.320,0:03:19.336 ऍप च्या मदतीने शब्दसंग्रह[br]शिकण्याची आकडेवारी वगैरे 0:03:19.360,0:03:23.560 किंवा परकीय भाषेतील एखादी पाककृती बनवायला[br]त्यांना कशी मजा येते हे सांगतांना. 0:03:24.680,0:03:26.416 प्रत्येकाने वेगवेगळी पद्धत वापरली, 0:03:26.440,0:03:30.216 पण त्यातून आपल्याला [br]आनंद मिळतोय का याची खात्री करत. 0:03:30.240,0:03:34.136 मला जाणवलं कि मी सुद्धा[br]अशाच प्रकारे भाषा शिकते. 0:03:34.160,0:03:37.736 मी स्पॅनिश शिकत असतांना [br]मला पुस्तकातले धडे वाचून कंटाळा आला होता. 0:03:37.760,0:03:39.496 म्हणजे खरंच, [br]'होझे' बद्दल कोण वाचेल? 0:03:39.520,0:03:42.656 रेल्वे स्टेशन ला जायचा रस्ता वगैरे. 0:03:42.680,0:03:45.016 त्यापेक्षा मला 'हॅरी पॉटर' वाचायचं होत. 0:03:45.040,0:03:47.176 कारण लहानपणी ते माझं आवडतं पुस्तक होत. 0:03:47.200,0:03:48.856 आणि मी ते अनेकदा वाचलं आहे. 0:03:48.880,0:03:52.496 मी 'हॅरी पॉटर' चा स्पॅनिश अनुवाद मिळवला[br]आणि वाचायला सुरुवात केली. 0:03:52.520,0:03:55.856 सुरुवातीला मला अगदी काहीही कळलं नाही. 0:03:55.880,0:03:58.096 तरीही मी वाचत राहिले [br]कारण मला पुस्तक आवडायचं. 0:03:58.120,0:04:02.256 पुस्तक संपेपर्यंत मला[br]हळूहळू कळू लागलं होत. 0:04:02.280,0:04:04.896 मी जर्मन शिकू लागले [br]तेंव्हाही काहीसं असंच घडलं. 0:04:04.920,0:04:08.216 माझ्या आवडीची 'फ्रेंड्स' मालिका[br]मी जर्मन मधून पाहायचं ठरवलं. 0:04:08.240,0:04:11.336 आणि सुरुवातीला मला [br]अक्षरशः काहीही झेपलं नाही. 0:04:11.360,0:04:14.536 एक शब्द संपून दुसरा कधी[br]सुरु झाला हेही कळायचं नाही. 0:04:14.560,0:04:17.216 पण मी दररोज पाहत राहिले[br]कारण ते 'फ्रेंड्स' होत. 0:04:17.240,0:04:19.616 मला ते इतकं आवडतं कि[br]मी कोणत्याही भाषेत पाहू शकते. 0:04:19.640,0:04:21.656 आणि मग दुसऱ्या कि तिसऱ्या सिझन नंतर 0:04:21.680,0:04:24.040 मला डायलॉग्ज चे अर्थ समजू लागले. 0:04:25.080,0:04:28.136 इतर बहुभाषिक लोकांना[br]भेटल्या नंतर माझ्या हे लक्षात आलं. 0:04:28.160,0:04:29.736 आम्ही खूप बुद्धिमान नाही. 0:04:29.760,0:04:32.176 भाषा शिकण्याचा कोणताही[br]'शॉर्टकट' आमच्याकडे नाही. 0:04:32.200,0:04:36.016 आम्ही फक्त शिकण्याची प्रक्रिया[br]आनंददायी बनवण्याचे मार्ग शोधले. 0:04:36.040,0:04:39.416 असे मार्ग ज्यामुळे भाषा हा[br]कंटाळवाणा शैक्षणिक विषय न राहता 0:04:39.440,0:04:42.640 तुम्हाला रोज करायला आवडेल[br]अशी गोष्ट बनेल. 0:04:43.520,0:04:45.696 शब्द कागदावर लिहणे[br]कंटाळवाणे वाटत असेल तर, 0:04:45.720,0:04:47.416 तुम्ही ते ऍप मध्ये टाईप करू शकता. 0:04:47.440,0:04:50.256 तुम्हाला कंटाळवाणे पुस्तकी विषय[br]ऐकायला आवडत नसेल तर 0:04:50.280,0:04:54.576 हव्यात्या भाषेतील रोचक गोष्टी[br]Youtube किंवा पॉडकास्ट वर शोधून काढा. 0:04:54.600,0:04:56.296 तुम्ही खूपच अंतर्मुख असाल तर, 0:04:56.320,0:04:59.336 आणि पटकन स्थानिक लोकांशी[br]संवाद साधने तुम्हाला शक्य नसेल तर, 0:04:59.360,0:05:01.696 तुम्ही स्वतःशी बोलण्याची पद्धत[br]अवलंबू शकता. 0:05:01.720,0:05:04.296 तुम्ही तुमच्या खोलीत [br]आरामात स्वतःशी बोलू शकता. 0:05:04.320,0:05:07.216 तुमचा दिवस कसा होता, [br]सुट्टीत काय करायचा विचार आहे हे सांगा. 0:05:07.240,0:05:09.376 किंवा फोन मधला [br]एखादा फोटो / चित्र घेऊन 0:05:09.400,0:05:13.136 तुमच्या काल्पनिक मित्राला[br]त्याबद्दल सांगा. 0:05:13.160,0:05:15.656 बहुभाषिक लोक अश्या प्रकारेच[br]भाषा शिकतात. 0:05:15.680,0:05:18.536 सर्वात छान गोष्ट म्हणजे [br]या पद्धती कोणालाही सहज उपलब्ध आहेत. 0:05:18.560,0:05:21.240 जे स्वतःचे स्वतः भाषा शिकू इच्छितात[br]अश्या सगळ्यांसाठी. 0:05:22.520,0:05:24.616 इतर बहुभाषिकांना भेटल्यामुळे[br]मला जाणवलं कि, 0:05:24.640,0:05:27.656 यासगळ्यात आनंद शोधणं खूप महत्वाचं आहे. [br] 0:05:27.680,0:05:29.776 भाषा शिकण्याच्या या प्रक्रियेत 0:05:29.800,0:05:32.840 मात्र फक्त आनंद शोधून चालणार नाही. 0:05:33.680,0:05:36.416 जर परकीय भाषेवर[br]प्रभुत्व मिळवायचं असेल तर 0:05:36.440,0:05:38.920 तुम्हाला तीन महत्वाची तत्व [br]अंगीकारावी लागतील. 0:05:39.760,0:05:42.360 सर्वप्रथम तुमच्याकडे हवी प्रभावी पद्धत. 0:05:43.160,0:05:46.576 जर उद्याच्या परीक्षेसाठी[br]तुम्ही शब्दांची यादी पाठ करायचं ठरवलं 0:05:46.600,0:05:48.976 तर ते 'शॉर्ट टर्म मेमरी' मध्ये [br]साठवले जातील. 0:05:49.000,0:05:50.905 आणि काही दिवसांतच [br]तुम्ही विसरूनही जाल. 0:05:51.400,0:05:54.336 तुम्हाला हे शब्द दीर्घकाळ[br]लक्षात ठेवायचे असतील तर, 0:05:54.360,0:05:57.296 काही दिवस नियमित [br]त्याची उजळणी करणं गरजेचं आहे. 0:05:57.320,0:05:59.536 ह्याला 'स्पेस्ड रिपीटिशन'[br]पद्धत ही म्हणतात. 0:05:59.560,0:06:03.816 अशी पद्धत अनुसरणारे 'Anki', 'Memrise' [br]सारखे ऍप तुम्ही यासाठी वापरू शकता. 0:06:03.840,0:06:07.176 किंवा 'गोल्ड लिस्ट' पद्धतीचा वापरून[br]वहीत शब्दांच्या याद्या बनवू शकता. 0:06:07.200,0:06:09.896 बरेचसे बहुभाषिक हि पद्धत वापरतात. 0:06:09.920,0:06:13.656 जर या पद्धतींचा प्रभावीपणा आणि[br]उपलबध्दता याबद्दल फारशी माहिती नसेल तर, 0:06:13.680,0:06:16.696 बहुभाषिक लोकांचे युट्युब चॅनेल[br]किंवा वेबसाइट पहा. 0:06:16.720,0:06:18.496 आणि त्यापासून प्रेरित व्हा. 0:06:18.520,0:06:21.440 त्यांना याचा उपयोग झाला असेल[br]तर तो तुम्हालाही नक्कीच होईल. 0:06:22.840,0:06:24.816 तिसरं महत्वाचं तत्व म्हणजे 0:06:24.840,0:06:27.000 शिकण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणायला हवी. 0:06:27.720,0:06:31.936 आपण सगळेच खूप व्यस्त असतो आणि[br]आजकाल भाषा शिकण्याइतका वेळ कोणाकडेच नसतो. 0:06:31.960,0:06:35.736 मात्र थोडं पूर्वनियोजन केलं तर [br]आपण वेळ नक्की काढू शकतो. 0:06:35.760,0:06:39.176 तुम्ही नेहमीपेक्षा फक्त १५ मिनिटे[br]लवकर उठू शकाल का? 0:06:39.200,0:06:42.496 शब्दांची उजळणी करण्यास[br]तितका वेळ अगदी पुरेसा आहे. 0:06:42.520,0:06:46.256 कामावर जातांना प्रवासात प्रक्षेपित कथा [br]म्हणजे पॉडकास्ट ऐकू शकता ? 0:06:46.280,0:06:49.736 ऐकण्याचा सराव करण्यासाठी[br]तो एक उत्तम उपाय आहे. 0:06:49.760,0:06:53.216 जास्तीचा वेळ न काढताही[br]आपण खूप गोष्टी करू शकतो. 0:06:53.240,0:06:55.896 जसं कि कामाच्या ठिकाणी जाताजाता[br]पॉडकास्ट ऐकणं. 0:06:55.920,0:06:57.576 किंवा घरकाम करता करता ऐकणं. 0:06:57.600,0:07:00.896 शिकण्यासाठीची योजना आखणे सर्वात महत्वाचे. 0:07:00.920,0:07:03.416 "मी दर मंगळवार आणि गुरुवार 0:07:03.440,0:07:05.496 मित्रांसोबत २०मिनिट बोलण्याचा सराव करेन. 0:07:05.520,0:07:09.936 नाश्ता करता करता युट्युब व्हिडिओ ऐकेन." 0:07:09.960,0:07:12.096 शिकण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणल्यास 0:07:12.120,0:07:14.016 जास्तीचा वेळ काढण्याचीही गरज नाही. 0:07:14.040,0:07:16.480 कारण अभ्यास तुमच्या [br]रोजच्या जगण्याचाच भाग बनेल. 0:07:17.880,0:07:21.096 आणि कोणत्याही भाषेत [br]पारंगत व्हायचं असेल तर, 0:07:21.120,0:07:23.840 थोडासा सय्यम हा हवाच. 0:07:24.600,0:07:27.336 दोनच महिन्यात नवी भाषा [br]शिकता येणे अशक्य आहे. 0:07:27.360,0:07:31.256 मात्र दोन महिन्यात चांगली प्रगती करणे[br]नक्कीच शक्य आहे. 0:07:31.280,0:07:35.016 तुम्हाला आवडेल अश्या पद्धतीने[br]रोज थोडं जरी शिकलात तर हे शक्य आहे. 0:07:35.040,0:07:37.176 आणि आपल्याला सर्वाधिक प्रेरणा[br] 0:07:37.200,0:07:38.440 स्वतःच्या यशातूनच मिळते. 0:07:39.120,0:07:41.016 मला स्पष्ट आठवतंय.. 0:07:41.040,0:07:44.720 फ्रेंड्स' मालिका जर्मन मधून पाहात असतांना[br]मला जेंव्हा पहिला विनोद समजला होता, 0:07:45.280,0:07:47.136 मी खूप आनंदित आणि प्रेरित झाले होते. 0:07:47.160,0:07:50.176 इतकी कि त्या दिवशी [br]मी सलग दोन भाग बघितले. 0:07:50.200,0:07:51.936 मी जसजसं बघत गेले,[br] 0:07:51.960,0:07:56.176 तसतसं मला जास्त समजत गेलं. [br]माझ्यासाठी यशच होत. 0:07:56.200,0:07:59.656 आणि मग हळूहळू मला[br]ती भाषा वापरता येऊ लागली. 0:07:59.680,0:08:02.536 मोकळेपणाने आणि व्यवस्थित[br]म्हणणं मांडता येऊ लागलं. 0:08:02.560,0:08:04.080 अशावेळी खूप छान वाटतं. 0:08:04.800,0:08:06.496 मला हे खूप आवडतं. 0:08:06.520,0:08:09.336 आणि म्हणूनच मी दर दोन वर्षांनी[br]नवी भाषा शिकते. 0:08:09.360,0:08:11.416 तर असं आहे बहुभाषिक होण्याचं रहस्य. 0:08:11.440,0:08:14.296 व्ययस्थित वापरता येतील अश्या[br]प्रभावी पद्धती शोधा, 0:08:14.320,0:08:17.616 ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. 0:08:17.640,0:08:21.520 अश्याच प्रकारे काही महिन्यातच[br]बहुभाषिक लोक नवनव्या भाषा शिकतात. 0:08:23.160,0:08:24.776 तुमच्यापैकी काहींना वाटत असेल, 0:08:24.800,0:08:27.136 "भाषा शिकण्याचा आनंद घेणे वगैरे ठीक आहे, 0:08:27.160,0:08:29.696 पण खरं रहस्य तुम्ही बहुभाषिक लोक 0:08:29.720,0:08:32.320 इतरांपेक्षा प्रचंड हुशार असता,[br]हे तर नव्हे?" 0:08:33.320,0:08:36.400 खरंतर बेनी आणि ल्युकास बद्दल[br]तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही. 0:08:37.159,0:08:42.976 बेनी शाळेत ११वर्ष आयरिश गेलिक[br]आणि ५वर्ष जर्मन शिकलाय. 0:08:43.000,0:08:46.216 मात्र शाळा सोडतांना त्याला[br]या भाषा जराही बोलता येत नव्हत्या. 0:08:46.240,0:08:50.416 २१व्या वर्षांपर्यंत भाषा शिकण्यासाठीचे गुण[br]आपल्यात नाहीत असं त्याला वाटत होत. 0:08:50.440,0:08:52.856 इतर कोणती भाषा बोलणंही त्याला जमत नव्हतं. 0:08:52.880,0:08:55.816 मग त्याने भाषा शिकण्यासाठी[br]स्वतःची अशी पद्धत शोधायचं ठरवलं. 0:08:55.840,0:08:59.696 स्थानिक लोकांशी बोलून त्यांचा [br]अभिप्राय घेणं हि त्याची पद्धत. 0:08:59.720,0:09:03.680 आणि आज बेनी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये [br]सहज बोलू शकतो. 0:09:05.120,0:09:08.416 ल्युकासने शाळेत १०वर्ष[br]इंग्रजी शिकायचा प्रयत्न केला. 0:09:08.440,0:09:11.056 तो वर्गातला सगळ्यात 'ढ' मुलगा होता. 0:09:11.080,0:09:12.696 त्याचे मित्र त्याची टर उडवायचे. 0:09:12.720,0:09:15.336 एकदा मजा म्हणून त्यांनी ह्याला[br]रशियन पाठयपुस्तक दिले. 0:09:15.360,0:09:19.096 कारण त्यांना वाटलं हा रशियनच काय[br]कोणतीच भाषा शिकू शकणार नाही. 0:09:19.120,0:09:21.496 ल्युकासने विविध पद्धती[br]आजमावायला सुरुवात केली. 0:09:21.520,0:09:23.320 स्वतःची पद्धत[br]त्याला शोधायची होती. 0:09:24.520,0:09:28.696 जसं कि Skype च्या माध्यमातून [br]लोकांशी संवाद साधत भाषा शिकणे. 0:09:28.720,0:09:30.536 आणि फक्त १०वर्षांनंतर, 0:09:30.560,0:09:33.880 ल्युकास ११ विविध भाषा[br]उत्तम बोलू शकतो. 0:09:35.000,0:09:36.560 एखादा चमत्कार वाटतोय ना ? 0:09:37.440,0:09:40.040 मी अशे चमत्कार रोज पहाते. 0:09:40.760,0:09:42.096 एक भाषा मार्गदर्शक म्हणून, 0:09:42.120,0:09:44.536 मी लोकांना स्वतःच्यास्वतः [br]भाषा शिकायला मदत करते. 0:09:44.560,0:09:45.856 म्हणून मी हे रोज पहाते. 0:09:45.880,0:09:50.056 ५,१०,इतकंच काय २० वर्ष प्रयत्न करूनही[br]लोकांना भाषा शिकता येत नाही. 0:09:50.080,0:09:53.936 आणि मग अचानक एक दिवस ते [br]स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करू लागतात. 0:09:53.960,0:09:57.256 अधिक प्रभावी पद्धती, [br]साहित्य जे त्यांना आवडतं. 0:09:57.280,0:09:59.096 ते आपण काय शिकलो[br]याचा मागोवा घेऊ लागतात 0:09:59.120,0:10:02.056 जेणेकरून झालेली प्रगती त्यांना जाणवेल. 0:10:02.080,0:10:04.016 आणि मग अचानक 0:10:04.040,0:10:08.240 आजवर न जमलेलं, भाषा शिकण्याचं[br]कैशल्य त्यांना प्राप्त होत. 0:10:09.480,0:10:11.656 तुम्हीही भाषा शिकण्याचा[br]प्रयत्न केला असेल, 0:10:11.680,0:10:14.096 आणि खूप अवघड वाटून [br]अर्ध्यावर सोडला असेल, 0:10:14.120,0:10:16.376 भाषा शिकण्यासाठीचं [br]कैशल्य तुमच्यात नसेल तर, 0:10:16.400,0:10:17.936 एकदा प्रयत्न नक्की करून पाहा. 0:10:17.960,0:10:20.816 कदाचित तुम्हीही केवळ [br]एक मजेदार पाऊल दूर असाल, 0:10:20.840,0:10:22.602 त्या भाषेत पारंगत होण्यापासून. 0:10:22.960,0:10:26.896 कदाचित बहुभाषिक होण्यापासून[br]तुम्ही केवळ एक पद्धत दूर असाल. 0:10:26.920,0:10:28.136 धन्यवाद. 0:10:28.160,0:10:32.360 (टाळ्या)