< Return to Video

नवीन भाषा लवकर शिकण्यासाठीची रहस्य !

  • 0:02 - 0:05
    मला परदेशी भाषा शिकायला आवडतं .
  • 0:05 - 0:09
    मला हे इतकं मनापासून आवडतं कि;
    मी दर दोन वर्षांनी एक नवी भाषा शिकते.
  • 0:09 - 0:11
    सध्या मी माझी आठवी भाषा शिकत आहे.
  • 0:11 - 0:13
    जेंव्हा लोकांना हे कळतं,
    तेंव्हा ते विचारतात;
  • 0:14 - 0:16
    तुम्ही हे कसं करता ?
    यामागचं रहस्य काय ?
  • 0:16 - 0:19
    आणि खरंतर,
    बरीच वर्षे माझं उत्तर होत,
  • 0:19 - 0:21
    "मला माहित नाही.
    मला भाषा शिकायला आवडतात इतकंच."
  • 0:22 - 0:24
    पण हे उत्तर लोकांना पटायचच नाही.
  • 0:24 - 0:28
    त्यांना जाणून घ्यायचं असायचं कि, त्यांनी
    इतकी वर्षे एकच भाषा शिकायचा प्रयत्न करूनही
  • 0:28 - 0:30
    प्रभुत्व का मिळवता येत नाही?
  • 0:30 - 0:33
    आणि इथे मी मात्र,
    भाषांवर भाषा शिकते आहे.
  • 0:33 - 0:35
    बहुभाषिक होण्याचं रहस्य
    त्यांना हवं असायचं.
  • 0:35 - 0:37
    अनेक भाषा बोलू शकतात असे लोक.
  • 0:37 - 0:39
    मग मी ही विचारात पडले कि,
  • 0:39 - 0:41
    इतर बहुभाषिक हे कसं साध्य करतात?
  • 0:41 - 0:43
    आमच्यात सारखं असं काय आहे?
  • 0:43 - 0:45
    असं काय आहे ज्यामुळे
  • 0:45 - 0:47
    आम्हाला इतरांपेक्षा
    अधिक वेगाने भाषा शिकता येतात?
  • 0:48 - 0:51
    माझ्यासारख्याच इतरांना भेटून,
    मी हे जाणून घ्यायचं ठरवलं.
  • 0:52 - 0:54
    बहुभाषिकांना भेटण्याची मस्त जागा म्हणजे
  • 0:54 - 0:56
    जिथे अनेक भाषा प्रेमी लोक भेटून
  • 0:56 - 0:59
    आपल्या भाषिक ज्ञानाचा वापर करतात
    असा एखादा कार्यक्रम.
  • 0:59 - 1:02
    जगभर बहुभाषिकांसाठी
    असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • 1:02 - 1:04
    मी तिथे जाऊन,
  • 1:04 - 1:06
    या लोकांकडून
    त्यांच्या पद्धती जाणून घ्यायचं ठरवलं.
  • 1:07 - 1:09
    तिथेच मी आयर्लंडच्या बेनीला भेटले.
  • 1:09 - 1:13
    'अगदी पहिल्या दिवसापासून त्या भाषेत
    बोलायला सुरुवात करायची' हि त्याची पद्धत.
  • 1:14 - 1:17
    प्रवाश्यांसाठीच्या पुस्तकातील
    काही वाक्य तो शिकून घेतो
  • 1:17 - 1:19
    आणि स्थानिक लोकांना भेटतो.
  • 1:19 - 1:22
    मग लगेचच त्यांच्याशी
    संभाषण साधण्याचा प्रयत्न करतो.
  • 1:22 - 1:24
    दिवसागणिक २०० चुका झाल्या
    तरी त्याला वावगं वाटत नाही.
  • 1:24 - 1:27
    कारण मिळणाऱ्या
    अभिप्रायाच्या मदतीनेच तर तो शिकतो.
  • 1:27 - 1:31
    आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे;
    आजकाल खूप प्रवास करायचीही गरज नाही.
  • 1:31 - 1:34
    कारण आजकाल तुम्ही
    स्थानिक लोकांशी सहज संवाद साधू शकता,
  • 1:34 - 1:36
    वेबसाईट चा वापर करत,
    अगदी घरबसल्या !
  • 1:36 - 1:38
    मी ब्राझीलच्या ल्युकासला देखील भेटले.
  • 1:38 - 1:41
    रशियन शिकायची त्याची
    एक गमतीशीर पद्धत होती.
  • 1:41 - 1:47
    त्याने चक्क Skype वर
    शेकडो रशियन बोलणाऱ्या लोकांना ऍड केलं.
  • 1:47 - 1:51
    आणि त्यातल्या एकाशी बोलायला
    चॅट विंडो उघडली.
  • 1:51 - 1:52
    आणि रशियन मध्ये 'हाय' लिहिले.
  • 1:53 - 1:56
    तिकडूनही "कसा आहेस?" असे प्रत्युत्तर आले.
  • 1:56 - 2:00
    ल्युकासनेही तेच कॉपी केले
    आणि दुसऱ्याला पाठवले.
  • 2:00 - 2:04
    दुसऱ्याने प्रत्त्युत्तर दिले,
    "मी मजेत. धन्यवाद. तू कसा आहेस?"
  • 2:04 - 2:07
    ल्युकासने हेच कॉपी करून
    पहिल्याला पाठवले.
  • 2:07 - 2:10
    अशा गमतीशीर प्रकारे तो
    दोन अनोळखी लोकांचा संवाद घडवून आणत होता,
  • 2:10 - 2:12
    तेही त्यांच्या नकळत.
  • 2:12 - 2:13
    (हश्या)
  • 2:13 - 2:15
    काही काळातच तो भाषा शिकला.
  • 2:15 - 2:17
    कारण त्याने
    असे अनेक संवाद साधले होते.
  • 2:17 - 2:20
    ज्यातून रशियन संभाषणाची सुरुवात
    कशी होते याचा अंदाज आला.
  • 2:20 - 2:22
    किती कल्पक पद्धत आहे ना ?
  • 2:22 - 2:27
    भाषेतल्या आवाजांचे अनुकरण करत
    शिकणाऱ्या बहुभाषिकांनाही मी भेटले.
  • 2:27 - 2:31
    आणि एखाद्या भाषेतील
    ५०० उपयुक्त शब्द शिकणाऱ्या अनेकांनाही.
  • 2:31 - 2:35
    काही तर व्याकरणाचे नियम
    वाचूनही सुरुवात करतात.
  • 2:36 - 2:38
    मी अंदाजे १०० लोकांना
    विचारलं असेल आणि
  • 2:38 - 2:42
    त्यांच्याकडून मी भाषा शिकण्याच्या
    १०० वेगवेगळ्या पद्धती ऐकल्या.
  • 2:42 - 2:45
    भाषा शिकण्याची प्रत्येकाची
    आपली खास पद्धत असते.
  • 2:45 - 2:49
    पद्धती वेगळ्या मात्र अंतिम परिणाम एकच
    - भाषा उत्तम बोलता येणे.
  • 2:50 - 2:54
    हे सगळे बहुभाषिक लोक
    त्यांच्या पद्धतींबद्दल सांगत असतांना,
  • 2:54 - 2:57
    मला अचानक जाणवलं ते म्हणजे
  • 2:57 - 3:00
    आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती
    आणि ती म्हणजे;
  • 3:00 - 3:05
    भाषा शिक्षणाची प्रक्रिया मनोरंजक
    बनवण्याच्या पद्धती आम्ही शोधल्या आहेत.
  • 3:05 - 3:08
    हे सगळेच लोक भाषा शिकणे
    किती आनंददायी आहे
  • 3:08 - 3:10
    याबद्दल सांगत होते.
  • 3:10 - 3:11
    त्यांचे चेहरे पाहायला हवे होते
  • 3:11 - 3:14
    जेंव्हा ते त्यांचे व्याकरणाचे
    रंगीत तक्ते दाखवत होते.
  • 3:14 - 3:16
    आणि त्यांनी काळजीपूर्वक
    बनवलेले 'फ्लॅश कार्ड्स'.
  • 3:16 - 3:19
    ऍप च्या मदतीने शब्दसंग्रह
    शिकण्याची आकडेवारी वगैरे
  • 3:19 - 3:24
    किंवा परकीय भाषेतील एखादी पाककृती बनवायला
    त्यांना कशी मजा येते हे सांगतांना.
  • 3:25 - 3:26
    प्रत्येकाने वेगवेगळी पद्धत वापरली,
  • 3:26 - 3:30
    पण त्यातून आपल्याला
    आनंद मिळतोय का याची खात्री करत.
  • 3:30 - 3:34
    मला जाणवलं कि मी सुद्धा
    अशाच प्रकारे भाषा शिकते.
  • 3:34 - 3:38
    मी स्पॅनिश शिकत असतांना
    मला पुस्तकातले धडे वाचून कंटाळा आला होता.
  • 3:38 - 3:39
    म्हणजे खरंच,
    'होझे' बद्दल कोण वाचेल?
  • 3:40 - 3:43
    रेल्वे स्टेशन ला जायचा रस्ता वगैरे.
  • 3:43 - 3:45
    त्यापेक्षा मला 'हॅरी पॉटर' वाचायचं होत.
  • 3:45 - 3:47
    कारण लहानपणी ते माझं आवडतं पुस्तक होत.
  • 3:47 - 3:49
    आणि मी ते अनेकदा वाचलं आहे.
  • 3:49 - 3:52
    मी 'हॅरी पॉटर' चा स्पॅनिश अनुवाद मिळवला
    आणि वाचायला सुरुवात केली.
  • 3:53 - 3:56
    सुरुवातीला मला अगदी काहीही कळलं नाही.
  • 3:56 - 3:58
    तरीही मी वाचत राहिले
    कारण मला पुस्तक आवडायचं.
  • 3:58 - 4:02
    पुस्तक संपेपर्यंत मला
    हळूहळू कळू लागलं होत.
  • 4:02 - 4:05
    मी जर्मन शिकू लागले
    तेंव्हाही काहीसं असंच घडलं.
  • 4:05 - 4:08
    माझ्या आवडीची 'फ्रेंड्स' मालिका
    मी जर्मन मधून पाहायचं ठरवलं.
  • 4:08 - 4:11
    आणि सुरुवातीला मला
    अक्षरशः काहीही झेपलं नाही.
  • 4:11 - 4:15
    एक शब्द संपून दुसरा कधी
    सुरु झाला हेही कळायचं नाही.
  • 4:15 - 4:17
    पण मी दररोज पाहत राहिले
    कारण ते 'फ्रेंड्स' होत.
  • 4:17 - 4:20
    मला ते इतकं आवडतं कि
    मी कोणत्याही भाषेत पाहू शकते.
  • 4:20 - 4:22
    आणि मग दुसऱ्या कि तिसऱ्या सिझन नंतर
  • 4:22 - 4:24
    मला डायलॉग्ज चे अर्थ समजू लागले.
  • 4:25 - 4:28
    इतर बहुभाषिक लोकांना
    भेटल्या नंतर माझ्या हे लक्षात आलं.
  • 4:28 - 4:30
    आम्ही खूप बुद्धिमान नाही.
  • 4:30 - 4:32
    भाषा शिकण्याचा कोणताही
    'शॉर्टकट' आमच्याकडे नाही.
  • 4:32 - 4:36
    आम्ही फक्त शिकण्याची प्रक्रिया
    आनंददायी बनवण्याचे मार्ग शोधले.
  • 4:36 - 4:39
    असे मार्ग ज्यामुळे भाषा हा
    कंटाळवाणा शैक्षणिक विषय न राहता
  • 4:39 - 4:43
    तुम्हाला रोज करायला आवडेल
    अशी गोष्ट बनेल.
  • 4:44 - 4:46
    शब्द कागदावर लिहणे
    कंटाळवाणे वाटत असेल तर,
  • 4:46 - 4:47
    तुम्ही ते ऍप मध्ये टाईप करू शकता.
  • 4:47 - 4:50
    तुम्हाला कंटाळवाणे पुस्तकी विषय
    ऐकायला आवडत नसेल तर
  • 4:50 - 4:55
    हव्यात्या भाषेतील रोचक गोष्टी
    Youtube किंवा पॉडकास्ट वर शोधून काढा.
  • 4:55 - 4:56
    तुम्ही खूपच अंतर्मुख असाल तर,
  • 4:56 - 4:59
    आणि पटकन स्थानिक लोकांशी
    संवाद साधने तुम्हाला शक्य नसेल तर,
  • 4:59 - 5:02
    तुम्ही स्वतःशी बोलण्याची पद्धत
    अवलंबू शकता.
  • 5:02 - 5:04
    तुम्ही तुमच्या खोलीत
    आरामात स्वतःशी बोलू शकता.
  • 5:04 - 5:07
    तुमचा दिवस कसा होता,
    सुट्टीत काय करायचा विचार आहे हे सांगा.
  • 5:07 - 5:09
    किंवा फोन मधला
    एखादा फोटो / चित्र घेऊन
  • 5:09 - 5:13
    तुमच्या काल्पनिक मित्राला
    त्याबद्दल सांगा.
  • 5:13 - 5:16
    बहुभाषिक लोक अश्या प्रकारेच
    भाषा शिकतात.
  • 5:16 - 5:19
    सर्वात छान गोष्ट म्हणजे
    या पद्धती कोणालाही सहज उपलब्ध आहेत.
  • 5:19 - 5:21
    जे स्वतःचे स्वतः भाषा शिकू इच्छितात
    अश्या सगळ्यांसाठी.
  • 5:23 - 5:25
    इतर बहुभाषिकांना भेटल्यामुळे
    मला जाणवलं कि,
  • 5:25 - 5:28
    यासगळ्यात आनंद शोधणं खूप महत्वाचं आहे.
  • 5:28 - 5:30
    भाषा शिकण्याच्या या प्रक्रियेत
  • 5:30 - 5:33
    मात्र फक्त आनंद शोधून चालणार नाही.
  • 5:34 - 5:36
    जर परकीय भाषेवर
    प्रभुत्व मिळवायचं असेल तर
  • 5:36 - 5:39
    तुम्हाला तीन महत्वाची तत्व
    अंगीकारावी लागतील.
  • 5:40 - 5:42
    सर्वप्रथम तुमच्याकडे हवी प्रभावी पद्धत.
  • 5:43 - 5:47
    जर उद्याच्या परीक्षेसाठी
    तुम्ही शब्दांची यादी पाठ करायचं ठरवलं
  • 5:47 - 5:49
    तर ते 'शॉर्ट टर्म मेमरी' मध्ये
    साठवले जातील.
  • 5:49 - 5:51
    आणि काही दिवसांतच
    तुम्ही विसरूनही जाल.
  • 5:51 - 5:54
    तुम्हाला हे शब्द दीर्घकाळ
    लक्षात ठेवायचे असतील तर,
  • 5:54 - 5:57
    काही दिवस नियमित
    त्याची उजळणी करणं गरजेचं आहे.
  • 5:57 - 6:00
    ह्याला 'स्पेस्ड रिपीटिशन'
    पद्धत ही म्हणतात.
  • 6:00 - 6:04
    अशी पद्धत अनुसरणारे 'Anki', 'Memrise'
    सारखे ऍप तुम्ही यासाठी वापरू शकता.
  • 6:04 - 6:07
    किंवा 'गोल्ड लिस्ट' पद्धतीचा वापरून
    वहीत शब्दांच्या याद्या बनवू शकता.
  • 6:07 - 6:10
    बरेचसे बहुभाषिक हि पद्धत वापरतात.
  • 6:10 - 6:14
    जर या पद्धतींचा प्रभावीपणा आणि
    उपलबध्दता याबद्दल फारशी माहिती नसेल तर,
  • 6:14 - 6:17
    बहुभाषिक लोकांचे युट्युब चॅनेल
    किंवा वेबसाइट पहा.
  • 6:17 - 6:18
    आणि त्यापासून प्रेरित व्हा.
  • 6:19 - 6:21
    त्यांना याचा उपयोग झाला असेल
    तर तो तुम्हालाही नक्कीच होईल.
  • 6:23 - 6:25
    तिसरं महत्वाचं तत्व म्हणजे
  • 6:25 - 6:27
    शिकण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणायला हवी.
  • 6:28 - 6:32
    आपण सगळेच खूप व्यस्त असतो आणि
    आजकाल भाषा शिकण्याइतका वेळ कोणाकडेच नसतो.
  • 6:32 - 6:36
    मात्र थोडं पूर्वनियोजन केलं तर
    आपण वेळ नक्की काढू शकतो.
  • 6:36 - 6:39
    तुम्ही नेहमीपेक्षा फक्त १५ मिनिटे
    लवकर उठू शकाल का?
  • 6:39 - 6:42
    शब्दांची उजळणी करण्यास
    तितका वेळ अगदी पुरेसा आहे.
  • 6:43 - 6:46
    कामावर जातांना प्रवासात प्रक्षेपित कथा
    म्हणजे पॉडकास्ट ऐकू शकता ?
  • 6:46 - 6:50
    ऐकण्याचा सराव करण्यासाठी
    तो एक उत्तम उपाय आहे.
  • 6:50 - 6:53
    जास्तीचा वेळ न काढताही
    आपण खूप गोष्टी करू शकतो.
  • 6:53 - 6:56
    जसं कि कामाच्या ठिकाणी जाताजाता
    पॉडकास्ट ऐकणं.
  • 6:56 - 6:58
    किंवा घरकाम करता करता ऐकणं.
  • 6:58 - 7:01
    शिकण्यासाठीची योजना आखणे सर्वात महत्वाचे.
  • 7:01 - 7:03
    "मी दर मंगळवार आणि गुरुवार
  • 7:03 - 7:05
    मित्रांसोबत २०मिनिट बोलण्याचा सराव करेन.
  • 7:06 - 7:10
    नाश्ता करता करता युट्युब व्हिडिओ ऐकेन."
  • 7:10 - 7:12
    शिकण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणल्यास
  • 7:12 - 7:14
    जास्तीचा वेळ काढण्याचीही गरज नाही.
  • 7:14 - 7:16
    कारण अभ्यास तुमच्या
    रोजच्या जगण्याचाच भाग बनेल.
  • 7:18 - 7:21
    आणि कोणत्याही भाषेत
    पारंगत व्हायचं असेल तर,
  • 7:21 - 7:24
    थोडासा सय्यम हा हवाच.
  • 7:25 - 7:27
    दोनच महिन्यात नवी भाषा
    शिकता येणे अशक्य आहे.
  • 7:27 - 7:31
    मात्र दोन महिन्यात चांगली प्रगती करणे
    नक्कीच शक्य आहे.
  • 7:31 - 7:35
    तुम्हाला आवडेल अश्या पद्धतीने
    रोज थोडं जरी शिकलात तर हे शक्य आहे.
  • 7:35 - 7:37
    आणि आपल्याला सर्वाधिक प्रेरणा
  • 7:37 - 7:38
    स्वतःच्या यशातूनच मिळते.
  • 7:39 - 7:41
    मला स्पष्ट आठवतंय..
  • 7:41 - 7:45
    फ्रेंड्स' मालिका जर्मन मधून पाहात असतांना
    मला जेंव्हा पहिला विनोद समजला होता,
  • 7:45 - 7:47
    मी खूप आनंदित आणि प्रेरित झाले होते.
  • 7:47 - 7:50
    इतकी कि त्या दिवशी
    मी सलग दोन भाग बघितले.
  • 7:50 - 7:52
    मी जसजसं बघत गेले,
  • 7:52 - 7:56
    तसतसं मला जास्त समजत गेलं.
    माझ्यासाठी यशच होत.
  • 7:56 - 8:00
    आणि मग हळूहळू मला
    ती भाषा वापरता येऊ लागली.
  • 8:00 - 8:03
    मोकळेपणाने आणि व्यवस्थित
    म्हणणं मांडता येऊ लागलं.
  • 8:03 - 8:04
    अशावेळी खूप छान वाटतं.
  • 8:05 - 8:06
    मला हे खूप आवडतं.
  • 8:07 - 8:09
    आणि म्हणूनच मी दर दोन वर्षांनी
    नवी भाषा शिकते.
  • 8:09 - 8:11
    तर असं आहे बहुभाषिक होण्याचं रहस्य.
  • 8:11 - 8:14
    व्ययस्थित वापरता येतील अश्या
    प्रभावी पद्धती शोधा,
  • 8:14 - 8:18
    ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
  • 8:18 - 8:22
    अश्याच प्रकारे काही महिन्यातच
    बहुभाषिक लोक नवनव्या भाषा शिकतात.
  • 8:23 - 8:25
    तुमच्यापैकी काहींना वाटत असेल,
  • 8:25 - 8:27
    "भाषा शिकण्याचा आनंद घेणे वगैरे ठीक आहे,
  • 8:27 - 8:30
    पण खरं रहस्य तुम्ही बहुभाषिक लोक
  • 8:30 - 8:32
    इतरांपेक्षा प्रचंड हुशार असता,
    हे तर नव्हे?"
  • 8:33 - 8:36
    खरंतर बेनी आणि ल्युकास बद्दल
    तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही.
  • 8:37 - 8:43
    बेनी शाळेत ११वर्ष आयरिश गेलिक
    आणि ५वर्ष जर्मन शिकलाय.
  • 8:43 - 8:46
    मात्र शाळा सोडतांना त्याला
    या भाषा जराही बोलता येत नव्हत्या.
  • 8:46 - 8:50
    २१व्या वर्षांपर्यंत भाषा शिकण्यासाठीचे गुण
    आपल्यात नाहीत असं त्याला वाटत होत.
  • 8:50 - 8:53
    इतर कोणती भाषा बोलणंही त्याला जमत नव्हतं.
  • 8:53 - 8:56
    मग त्याने भाषा शिकण्यासाठी
    स्वतःची अशी पद्धत शोधायचं ठरवलं.
  • 8:56 - 9:00
    स्थानिक लोकांशी बोलून त्यांचा
    अभिप्राय घेणं हि त्याची पद्धत.
  • 9:00 - 9:04
    आणि आज बेनी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये
    सहज बोलू शकतो.
  • 9:05 - 9:08
    ल्युकासने शाळेत १०वर्ष
    इंग्रजी शिकायचा प्रयत्न केला.
  • 9:08 - 9:11
    तो वर्गातला सगळ्यात 'ढ' मुलगा होता.
  • 9:11 - 9:13
    त्याचे मित्र त्याची टर उडवायचे.
  • 9:13 - 9:15
    एकदा मजा म्हणून त्यांनी ह्याला
    रशियन पाठयपुस्तक दिले.
  • 9:15 - 9:19
    कारण त्यांना वाटलं हा रशियनच काय
    कोणतीच भाषा शिकू शकणार नाही.
  • 9:19 - 9:21
    ल्युकासने विविध पद्धती
    आजमावायला सुरुवात केली.
  • 9:22 - 9:23
    स्वतःची पद्धत
    त्याला शोधायची होती.
  • 9:25 - 9:29
    जसं कि Skype च्या माध्यमातून
    लोकांशी संवाद साधत भाषा शिकणे.
  • 9:29 - 9:31
    आणि फक्त १०वर्षांनंतर,
  • 9:31 - 9:34
    ल्युकास ११ विविध भाषा
    उत्तम बोलू शकतो.
  • 9:35 - 9:37
    एखादा चमत्कार वाटतोय ना ?
  • 9:37 - 9:40
    मी अशे चमत्कार रोज पहाते.
  • 9:41 - 9:42
    एक भाषा मार्गदर्शक म्हणून,
  • 9:42 - 9:45
    मी लोकांना स्वतःच्यास्वतः
    भाषा शिकायला मदत करते.
  • 9:45 - 9:46
    म्हणून मी हे रोज पहाते.
  • 9:46 - 9:50
    ५,१०,इतकंच काय २० वर्ष प्रयत्न करूनही
    लोकांना भाषा शिकता येत नाही.
  • 9:50 - 9:54
    आणि मग अचानक एक दिवस ते
    स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करू लागतात.
  • 9:54 - 9:57
    अधिक प्रभावी पद्धती,
    साहित्य जे त्यांना आवडतं.
  • 9:57 - 9:59
    ते आपण काय शिकलो
    याचा मागोवा घेऊ लागतात
  • 9:59 - 10:02
    जेणेकरून झालेली प्रगती त्यांना जाणवेल.
  • 10:02 - 10:04
    आणि मग अचानक
  • 10:04 - 10:08
    आजवर न जमलेलं, भाषा शिकण्याचं
    कैशल्य त्यांना प्राप्त होत.
  • 10:09 - 10:12
    तुम्हीही भाषा शिकण्याचा
    प्रयत्न केला असेल,
  • 10:12 - 10:14
    आणि खूप अवघड वाटून
    अर्ध्यावर सोडला असेल,
  • 10:14 - 10:16
    भाषा शिकण्यासाठीचं
    कैशल्य तुमच्यात नसेल तर,
  • 10:16 - 10:18
    एकदा प्रयत्न नक्की करून पाहा.
  • 10:18 - 10:21
    कदाचित तुम्हीही केवळ
    एक मजेदार पाऊल दूर असाल,
  • 10:21 - 10:23
    त्या भाषेत पारंगत होण्यापासून.
  • 10:23 - 10:27
    कदाचित बहुभाषिक होण्यापासून
    तुम्ही केवळ एक पद्धत दूर असाल.
  • 10:27 - 10:28
    धन्यवाद.
  • 10:28 - 10:32
    (टाळ्या)
Title:
नवीन भाषा लवकर शिकण्यासाठीची रहस्य !
Speaker:
लिडिया माचोवा
Description:

एखादी नवीन भाषा शिकायची इच्छा आहे पण कशी आणि कुठून सुरुवात करावी याबद्दल धास्ती वाटतेय? यासाठी तुम्हाला नक्कीच कोणत्या खास प्रतिभा किंवा अनुवांशिकतेने आलेल्या गुणांची वगैरे गरज नाही याची खात्री देतायत 'लिडिया माचोवा'. आपल्या प्रेरणादायी आणि उत्साही शैलीत त्या 'बहुभाषिकांची' काही रहस्य उलगडून सांगतायत आणि त्याच बरोबर तुमच्यातील भाषिक प्रतिभा जागृत करण्यासाठी उपयुक्त अशी चार तत्व सुद्धा समजावून सांगत आहेत.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
10:45

Marathi subtitles

Revisions