-
अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | रिले प्रोग्रॅमिंग
-
हाय, मी आहे ॲना! आज आपण रिले
प्रोग्रॅमिंग करणार आहोत.
-
यामध्ये तणावाखाली प्रोग्रॅमिंग करणे आणि तुम्ही खूप गडबडीत काम करताना किंवा टीम्समध्ये काम करताना
-
कधीकधी होणाऱ्या चुका डीबग करणे याचा समावेश आहे. आपण कोडींग सिम्युलेट करण्यासाठी आलेख
-
कागद प्रोग्रॅमिंग शिकू आणि डेडलाईन सिम्युलेट करण्यासाठी रिले रेसेसचा वापर करू. रिले प्रोग्रॅमिंगमध्ये
-
आपण आलेख कागदाचे प्रोग्रॅमिंग पूर्ण करण्यासाठी रेसिंग करू. तुम्हाला तुमच्या टीममेटचे काम तपासावे
-
लागेल किंवा डीबग करावे लागेल, चूक असेल तर ती दुरुस्त करावी लागेल. तुमचा बाण जोडावा लागेल, मग तुम्ही मागे पळत जाल आणि तुमच्या टीममेटला टॅग कराल.
-
आपल्या अल्गोरीदम्स किंवा कोडमधील समस्या शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅमर्स डीबगिंगचा खूप वापर करतात.
-
समस्या डीबग करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील सर्वांत सोपा म्हणजे काय चुकले हे कळेपर्यंत
-
पायरीपायरीने पुढे जाणे आणि मग दुरुस्त करणे. इथे, मी एक बॅक हँडस्प्रिंग करण्याचा प्रयत्न करत आहे
-
पण मी पडते आहे. मी प्रत्येक भाग पायरी पायरीने करून बघितला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली.
-
माझ्या कोचनं मला दाखवलं की मी हात बीमवर योग्यप्रकारे ठेवत नव्हते.
-
मग मी हाताची नवीन स्थिती वापरून दुसरा बॅक हँडस्प्रिंग केला आणि
-
मला जमलं! मी माझा बॅक हँडस्प्रिंग डीबग केला याचा मला खरंच आनंद झाला. आम्ही चूक शोधून काढली!
-
डीबगिंग म्हणजे समस्या शोधणे आणि दुरुस्त करणे.
-
छान, ॲना! मस्त कामगिरी!