अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | रिले प्रोग्रॅमिंग हाय, मी आहे ॲना! आज आपण रिले प्रोग्रॅमिंग करणार आहोत. यामध्ये तणावाखाली प्रोग्रॅमिंग करणे आणि तुम्ही खूप गडबडीत काम करताना किंवा टीम्समध्ये काम करताना कधीकधी होणाऱ्या चुका डीबग करणे याचा समावेश आहे. आपण कोडींग सिम्युलेट करण्यासाठी आलेख कागद प्रोग्रॅमिंग शिकू आणि डेडलाईन सिम्युलेट करण्यासाठी रिले रेसेसचा वापर करू. रिले प्रोग्रॅमिंगमध्ये आपण आलेख कागदाचे प्रोग्रॅमिंग पूर्ण करण्यासाठी रेसिंग करू. तुम्हाला तुमच्या टीममेटचे काम तपासावे लागेल किंवा डीबग करावे लागेल, चूक असेल तर ती दुरुस्त करावी लागेल. तुमचा बाण जोडावा लागेल, मग तुम्ही मागे पळत जाल आणि तुमच्या टीममेटला टॅग कराल. आपल्या अल्गोरीदम्स किंवा कोडमधील समस्या शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅमर्स डीबगिंगचा खूप वापर करतात. समस्या डीबग करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील सर्वांत सोपा म्हणजे काय चुकले हे कळेपर्यंत पायरीपायरीने पुढे जाणे आणि मग दुरुस्त करणे. इथे, मी एक बॅक हँडस्प्रिंग करण्याचा प्रयत्न करत आहे पण मी पडते आहे. मी प्रत्येक भाग पायरी पायरीने करून बघितला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. माझ्या कोचनं मला दाखवलं की मी हात बीमवर योग्यप्रकारे ठेवत नव्हते. मग मी हाताची नवीन स्थिती वापरून दुसरा बॅक हँडस्प्रिंग केला आणि मला जमलं! मी माझा बॅक हँडस्प्रिंग डीबग केला याचा मला खरंच आनंद झाला. आम्ही चूक शोधून काढली! डीबगिंग म्हणजे समस्या शोधणे आणि दुरुस्त करणे. छान, ॲना! मस्त कामगिरी!