मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.
-
0:01 - 0:03मागचं वर्ष
-
0:03 - 0:04फारच वाईट गेलं.
-
0:04 - 0:06(हशा)
-
0:09 - 0:12मी पहिल्यांदाच
नायजेरियन जोलोफ भात खाल्ला. -
0:12 - 0:14(हशा)
-
0:15 - 0:17खरोखरीच सांगतो,
-
0:17 - 0:20त्यावेळी मी अत्यंत कठीण
परिस्थितीतून जात होतो. -
0:21 - 0:23प्रचंड ताणाला तोंड देता देता
-
0:23 - 0:25मला चिंताविकाराचा झटका आला.
-
0:27 - 0:29काही दिवशी, मी कुठलंच काम करू शकत नसे.
-
0:30 - 0:32आणि इतर दिवशी,
-
0:32 - 0:36मला बिछान्यात पडून रडत राहावं
असं वाटत असे. -
0:37 - 0:42ताण आणि चिंताविकार याबद्दल
मनोविकार तज्ज्ञांशी बोलावं, -
0:42 - 0:44असं माझ्या डॉक्टरांनी सुचवलं.
-
0:45 - 0:46मनोविकार?
-
0:47 - 0:51माझी वाचाच बसली.
मी जोरजोरात मान हलवून विरोध दर्शवला. -
0:53 - 0:57मला प्रचंड शरम वाटली.
-
0:58 - 1:02या लांच्छनास्पद जाणिवेचं ओझं
मला जाणवू लागलं. -
1:03 - 1:05माझं कुटुंब प्रेमळ आहे.
त्यांचा मला आधार वाटतो. -
1:06 - 1:08जीवाला जीव देणारे मित्र आहेत.
-
1:08 - 1:12तरीही या वेदनेबद्दल कुणाशी बोलावं,
-
1:12 - 1:14ही कल्पनाच मी सहन करू शकलो नाही.
-
1:16 - 1:20आफ्रिकन मर्दानगीच्या कल्पनांच्या
भक्कम तटबंदीमध्ये -
1:20 - 1:23मी गुदमरून गेलो होतो.
-
1:24 - 1:26"लोकांपुढे खरोखरीचे प्रश्न असतात, संगू.
-
1:26 - 1:27तुझ्या नसत्या कल्पना आवर."
-
1:29 - 1:31"मानसिक आरोग्य" हे शब्द प्रथम ऐकले,
-
1:32 - 1:36तेव्हा मी नुकताच घानाहून बोटीने येऊन,
न्यू जर्सीतल्या पेडी स्कूलचा -
1:36 - 1:38निवासी विद्यार्थी झालो होतो.
-
1:39 - 1:42त्याच महिन्यात मी सात जीवलग गमावण्याचा
-
1:42 - 1:45विदारक अनुभव घेतला होता.
-
1:47 - 1:48माझ्यावरच्या या आपत्तीमुळे
-
1:48 - 1:52शाळेच्या नर्सला माझी काळजी वाटली.
देव तिचं भलं करो. -
1:52 - 1:54तिने माझ्या मानसिक आरोग्याबद्दल विचारलं.
-
1:55 - 1:57मला वाटलं, "ही मेंटल आहे का?"
-
1:58 - 2:01मी एक आफ्रिकन पुरुष आहे,
हे तिला ठाऊक नाही का? -
2:01 - 2:02(हशा)
-
2:02 - 2:04"थिंग्ज फाॅल अपार्ट" मधल्या
-
2:04 - 2:08ओकोन्कोवोप्रमाणे, आम्ही आफ्रिकन पुरुष
भावना व्यक्त न करता, प्रक्रिया न करता -
2:09 - 2:11समस्या दडपून टाकतो.
-
2:11 - 2:12(टाळ्या)
-
2:13 - 2:15आम्ही समस्या दडपून टाकतो.
-
2:15 - 2:20मी माझ्या भावाला फोन केला आणि
आम्ही हसलो - ओईबो (गोऱ्या) लोकांना, -
2:20 - 2:22आणि त्यांच्या विचित्र आजारांना.
-
2:22 - 2:25नैराश्य, ए डी डी यासारख्या
चमत्कारिक गोष्टींना. -
2:26 - 2:28लहानपणी, पश्चिम आफ्रिकेत असताना
-
2:29 - 2:33कोणी "मेंटल" शब्द वापरला,
की एक वेडा आठवे. -
2:33 - 2:35मलिन केसांच्या जटा घेऊन
-
2:35 - 2:38अर्धनग्न अवस्थेत रस्तोरस्ती भटकणारा.
-
2:39 - 2:41आम्हां सगळ्यांना तो ठाऊक होता.
-
2:41 - 2:43पालक आम्हांला
त्याच्यापासून सावध राहायला सांगत. -
2:44 - 2:45"आई, आई, तो वेडा कसा झाला?"
-
2:45 - 2:47"ड्रग्ज !"
-
2:47 - 2:49"ड्रग्ज कडे नुसतं पाहिलंस ना,
तरी असा वेडा होशील." -
2:49 - 2:50(हशा)
-
2:51 - 2:53न्यूमोनिया झाला असता,
-
2:53 - 2:56तर आई लगेच सर्वात जवळच्या
हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असती. -
2:56 - 2:57वैद्यकीय उपचारासाठी.
-
2:58 - 3:01पण नैराश्य आलं आहे असं सांगण्याचं
धाडस केलं असतं, -
3:01 - 3:05तर पाद्री भूतपिशाच्च उतरवायला
आला असता, आणि चेटक्यांवर -
3:05 - 3:07त्याचं खापर फोडलं असतं.
-
3:07 - 3:10जागतिक आरोग्य संस्थेनुसार,
मानसिक आरोग्य म्हणजे -
3:10 - 3:13आयुष्यात माफक ताण निर्माण करणाऱ्या
-
3:13 - 3:15घटकांना तोंड देता येणे,
-
3:16 - 3:19काही उपयुक्त काम करता येणे
-
3:19 - 3:23आणि आपल्या समाजात हातभार लावता येणे.
-
3:24 - 3:30मानसिक आरोग्य याचा अर्थ आपले भावनिक,
मानसशास्त्रीय आणि सामाजिक आरोग्य. -
3:31 - 3:36जगातील मानसिक आजारांपैकी ७५ टक्के केसेस
-
3:36 - 3:38गरीब देशांत आढळतात.
-
3:38 - 3:40असं असूनही,
आफ्रिकेतील अनेक राज्यकर्ते -
3:40 - 3:44त्यांच्या एकूण आरोग्यविषयक अंदाजपत्रकाच्या
एक टक्क्याहूनही कमी रक्कम -
3:44 - 3:46मानसिक आरोग्यात गुंतवतात.
-
3:47 - 3:48त्याहूनही वाईट म्हणजे,
-
3:48 - 3:52आफ्रिकेत मानसोपचार तज्ज्ञांची संख्या
अतिशय कमी आहे. -
3:53 - 3:57उदाहरणार्थ, नायजेरियात केवळ २०० आहेत,
-
3:58 - 4:01आणि देशाची लोकसंख्या आहे २०० दशलक्ष.
-
4:02 - 4:04संपूर्ण आफ्रिकेत,
-
4:04 - 4:08९०% लोकांना मानसोपचार सहज उपलब्ध नाहीत.
-
4:09 - 4:10त्यामुळे, आम्ही एकाकी अवस्थेत
-
4:10 - 4:13केवळ सहन करीत राहतो.
-
4:13 - 4:16या कलंकामुळे मुके होतो.
-
4:17 - 4:22आम्ही आफ्रिकन लोक मानसिक समस्यांवर
साधारणपणे हे उपाय वापरतो: दूर पळणे, -
4:23 - 4:24अज्ञान,
-
4:25 - 4:26अपराधीपणा,
-
4:26 - 4:27भीती
-
4:28 - 4:29आणि संताप.
-
4:30 - 4:35अरबोलेडा फ्लोरेज यांनी आपल्या संशोधनात
थेट प्रश्न विचारला, -
4:35 - 4:39"मानसिक आजाराचं कारण काय?"
-
4:40 - 4:45३४ टक्के नायजेरियन प्रतिसादक म्हणाले,
"ड्रग्जचा गैरवापर". -
4:46 - 4:52१९ टक्के म्हणाले, "दैवी प्रकोप"
आणि "परमेश्वराची इच्छा" -
4:52 - 4:53(हशा)
-
4:53 - 4:55१२ टक्के म्हणाले,
-
4:56 - 4:59"चेटूक आणि भूतबाधा"
-
5:00 - 5:04पण काहींनी माहितीतल्या
इतर कारणांचे दाखले दिले. -
5:04 - 5:06जसे, "अनुवंशिकता",
-
5:06 - 5:08"आर्थिक आणि सामाजिक स्तर",
-
5:08 - 5:10"युद्ध",
-
5:10 - 5:11"प्रतिकूल परिस्थिती",
-
5:11 - 5:13"आप्ताचा मृत्यु".
-
5:14 - 5:17मानसिक आजार लांच्छनास्पद मानले गेल्यामुळे
-
5:17 - 5:21मनोरुग्ण बहिष्कृत होतात,
वाईट ठरवले जातात. -
5:22 - 5:26पत्रकार रॉबिन हॅमंड यांनी अशा
प्रकारच्या छळाच्या नोंदी केल्या आहेत. -
5:26 - 5:28युगांडात,
-
5:29 - 5:30सोमालियात
-
5:31 - 5:33आणि इथे नायजेरियात
-
5:36 - 5:37मला स्वतःला
-
5:38 - 5:40या लांच्छनाचा अनुभव आला आहे.
-
5:42 - 5:44२००९ मध्ये
-
5:45 - 5:48एका मध्यरात्री मला अत्यंत भयाकूल स्वरात
एक फोन आला. -
5:49 - 5:52माझ्या अत्यंत जिवलग मित्राला
-
5:52 - 5:57- एका बुद्धिमान, तत्वज्ञानी, आकर्षक,
सुस्वरूप तरुण मुलाला - -
5:57 - 5:59स्किझोफ्रेनिया झाला होता.
-
6:01 - 6:05हे ऐकून लहानपणापासूनचे आमचे काही मित्र
मागे सरलेले मी पाहिले. -
6:07 - 6:09त्यांना आडून हसताना पाहिलं.
-
6:10 - 6:11त्यांची कुजबुज ऐकली.
-
6:12 - 6:14"त्याला वेड लागलंय.
तुम्हाला ठाऊक आहे का?" -
6:15 - 6:18"तो वेडा आहे!"
-
6:18 - 6:22त्याच्या अवस्थेबद्दल
अपमानास्पद टीका टिप्पणी. -
6:22 - 6:26कॅन्सर किंवा मलेरियाच्या रुग्णाबद्दल
-
6:26 - 6:28असे शब्द आपण कधीही बोलणार नाही.
-
6:29 - 6:32का कोण जाणे, मानसिक आरोग्याचा संबंध आला,
की आपलं अज्ञान, -
6:32 - 6:35आपली अनुकंपा नष्ट करून टाकतं.
-
6:37 - 6:41समाजाने त्याला एकटं टाकलं,
तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो. -
6:42 - 6:44आमची मैत्री कधीच कमी झाली नाही.
-
6:46 - 6:49नकळत मला मानसिक आरोग्याबद्दल
प्रचंड ओढ निर्माण झाली. -
6:50 - 6:53माझ्या मित्राच्या अवस्थेकडून
प्रेरणा घेऊन, -
6:53 - 6:56मी मानसिक आरोग्याला वाहिलेला
माजी विद्यार्थीगट -
6:56 - 6:58कॉलेजमध्ये सुरु केला.
-
6:58 - 7:01आणि पदव्युत्तर कॉलेजचा
निवासी शिक्षक असण्याच्या काळात -
7:01 - 7:05अनेक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य
सावरण्यासाठी आधार दिला. -
7:05 - 7:08आफ्रिकन विद्यार्थी मानसिक आजारांशी
झगडताना मी पाहिले. -
7:08 - 7:10ते कोणाला काही सांगू शकत नव्हते.
-
7:11 - 7:15हे ठाऊक असताना, आणि त्या
विद्यार्थ्यांच्या कहाण्या ठाऊक असतानाही, -
7:15 - 7:17माझी वेळ आली, तेव्हा मीही तसाच झगडलो.
-
7:17 - 7:21माझ्या चिंताविकाराविषयी
कोणालाच काही सांगू शकलो नाही. -
7:21 - 7:25वेडा ठरण्याची भीती
ही इतकी खोल रुजलेली असते. -
7:28 - 7:29आपल्याला सर्वांनाच -
-
7:30 - 7:32आणि खासकरून आम्हां आफ्रिकन लोकांना -
-
7:33 - 7:39समजायला हवं, की मानसिक आजारांशी
झगडण्यामुळे पौरुष कमी होत नाही. -
7:39 - 7:42किंवा वेदनेच्या आघातामुळे
सामर्थ्याला कलंक लागत नाही. -
7:43 - 7:48मानसिक आजाराला, शारीरिक आजाराइतकंच
महत्त्व द्यायला हवं. -
7:49 - 7:53मूकपणे त्रास सहन करणं थांबवायला हवं.
-
7:54 - 7:58मानसिक आजाराला कलंक समजणं
थांबवलंच पाहिजे, -
7:58 - 8:00आणि मनोरुग्णाचा छळ करणंही.
-
8:02 - 8:03आपल्या मित्रांशी बोला.
-
8:04 - 8:06आप्तांशी बोला.
-
8:07 - 8:08आरोग्यसेवा देणाऱ्या व्यक्तींशी बोला.
-
8:10 - 8:11आधार घ्यायला लाजू नका.
-
8:12 - 8:14आपण एकटे नाही,
-
8:15 - 8:17असा विश्वास बाळगा.
-
8:18 - 8:20मानसिक आजाराशी झगडत असाल,
तर कोणाशी तरी बोला. -
8:23 - 8:26आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे
-
8:26 - 8:28आपलं दुबळेपण नव्हे,
-
8:29 - 8:30तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं.
-
8:32 - 8:36मानसिक आजारांना लागलेला कलंक
धुवून टाकण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. -
8:37 - 8:41यापुढे जेव्हा "मेंटल" शब्द ऐकाल,
-
8:41 - 8:43तेव्हा कोण्या वेड्याची नव्हे,
-
8:44 - 8:46तर माझी आठवण काढा.
-
8:46 - 8:48(टाळ्या)
-
8:48 - 8:49धन्यवाद.
-
8:49 - 8:53(टाळ्या)
- Title:
- मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.
- Speaker:
- संगू डेले
- Description:
-
more » « less
जेव्हा उद्योजक संगू डेले यांना ताण असह्य झाला, तेव्हा त्यांना स्वतःच्याच मनात खोल रुजलेल्या एका समजुतीचा सामना करावा लागला. पुरुषांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची नसते, ही ती समजूत. भावनाप्रदर्शन सहन न करणाऱ्या समाजात आपण चिंताविकाराचा सामना करायला कसे शिकलो, ते डेले आपल्या या भाषणात सांगताहेत. ते म्हणतात, आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे आपलं दुबळेपण नव्हे, तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 08:53
|
Abhinav Garule approved Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | |
|
Abhinav Garule accepted Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | |
| Retired user edited Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | ||
| Retired user edited Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | ||
| Retired user edited Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health | ||
| Retired user edited Marathi subtitles for There's no shame in taking care of your mental health |
