0:00:01.122,0:00:02.813 मागचं वर्ष 0:00:02.837,0:00:04.040 फारच वाईट गेलं. 0:00:04.064,0:00:05.862 (हशा) 0:00:08.571,0:00:12.123 मी पहिल्यांदाच [br]नायजेरियन जोलोफ भात खाल्ला. 0:00:12.147,0:00:13.729 (हशा) 0:00:14.616,0:00:17.475 खरोखरीच सांगतो, 0:00:17.499,0:00:20.313 त्यावेळी मी अत्यंत कठीण [br]परिस्थितीतून जात होतो. 0:00:21.235,0:00:23.416 प्रचंड ताणाला तोंड देता देता 0:00:23.440,0:00:25.463 मला चिंताविकाराचा झटका आला. 0:00:26.542,0:00:29.232 काही दिवशी, मी कुठलंच काम करू शकत नसे. 0:00:30.336,0:00:32.232 आणि इतर दिवशी, 0:00:32.256,0:00:35.545 मला बिछान्यात पडून रडत राहावं [br]असं वाटत असे. 0:00:36.658,0:00:41.907 ताण आणि चिंताविकार याबद्दल [br]मनोविकार तज्ज्ञांशी बोलावं, 0:00:41.931,0:00:44.034 असं माझ्या डॉक्टरांनी सुचवलं. 0:00:44.769,0:00:46.071 मनोविकार? 0:00:46.972,0:00:50.862 माझी वाचाच बसली. [br]मी जोरजोरात मान हलवून विरोध दर्शवला. 0:00:53.245,0:00:56.997 मला प्रचंड शरम वाटली. 0:00:58.413,0:01:01.851 या लांच्छनास्पद जाणिवेचं ओझं [br]मला जाणवू लागलं. 0:01:03.139,0:01:05.498 माझं कुटुंब प्रेमळ आहे. [br]त्यांचा मला आधार वाटतो. 0:01:05.522,0:01:07.829 जीवाला जीव देणारे मित्र आहेत. 0:01:07.853,0:01:12.422 तरीही या वेदनेबद्दल कुणाशी बोलावं, 0:01:12.446,0:01:14.476 ही कल्पनाच मी सहन करू शकलो नाही. 0:01:16.004,0:01:20.471 आफ्रिकन मर्दानगीच्या कल्पनांच्या [br]भक्कम तटबंदीमध्ये 0:01:20.495,0:01:22.785 मी गुदमरून गेलो होतो. 0:01:23.765,0:01:25.880 "लोकांपुढे खरोखरीचे प्रश्न असतात, संगू. 0:01:25.904,0:01:27.359 तुझ्या नसत्या कल्पना आवर." 0:01:28.956,0:01:30.937 "मानसिक आरोग्य" हे शब्द प्रथम ऐकले,[br] 0:01:31.880,0:01:35.843 तेव्हा मी नुकताच घानाहून बोटीने येऊन, [br]न्यू जर्सीतल्या पेडी स्कूलचा 0:01:35.867,0:01:37.798 निवासी विद्यार्थी झालो होतो. 0:01:39.067,0:01:42.473 त्याच महिन्यात मी सात जीवलग गमावण्याचा 0:01:42.497,0:01:45.050 विदारक अनुभव घेतला होता. 0:01:46.569,0:01:48.025 माझ्यावरच्या या आपत्तीमुळे 0:01:48.049,0:01:52.113 शाळेच्या नर्सला माझी काळजी वाटली. [br]देव तिचं भलं करो. 0:01:52.137,0:01:54.087 तिने माझ्या मानसिक आरोग्याबद्दल विचारलं. 0:01:55.426,0:01:57.409 मला वाटलं, "ही मेंटल आहे का?" 0:01:58.214,0:02:00.658 मी एक आफ्रिकन पुरुष आहे, [br]हे तिला ठाऊक नाही का? 0:02:00.682,0:02:01.696 (हशा)[br] 0:02:01.720,0:02:03.591 "थिंग्ज फाॅल अपार्ट" मधल्या[br] 0:02:03.615,0:02:08.356 ओकोन्कोवोप्रमाणे, आम्ही आफ्रिकन पुरुष [br]भावना व्यक्त न करता, प्रक्रिया न करता 0:02:08.971,0:02:10.662 समस्या दडपून टाकतो. 0:02:10.686,0:02:12.229 (टाळ्या) 0:02:13.181,0:02:15.180 आम्ही समस्या दडपून टाकतो. 0:02:15.204,0:02:19.975 मी माझ्या भावाला फोन केला आणि [br]आम्ही हसलो - ओईबो (गोऱ्या) लोकांना, 0:02:19.999,0:02:21.856 आणि त्यांच्या विचित्र आजारांना. 0:02:21.880,0:02:25.118 नैराश्य, ए डी डी यासारख्या [br]चमत्कारिक गोष्टींना. 0:02:26.500,0:02:28.491 लहानपणी, पश्चिम आफ्रिकेत असताना 0:02:28.515,0:02:32.896 कोणी "मेंटल" शब्द वापरला, [br]की एक वेडा आठवे. 0:02:32.920,0:02:35.163 मलिन केसांच्या जटा घेऊन 0:02:35.187,0:02:37.963 अर्धनग्न अवस्थेत रस्तोरस्ती भटकणारा. 0:02:39.084,0:02:40.904 आम्हां सगळ्यांना तो ठाऊक होता. 0:02:40.928,0:02:43.209 पालक आम्हांला [br]त्याच्यापासून सावध राहायला सांगत. 0:02:43.820,0:02:45.365 "आई, आई, तो वेडा कसा झाला?" 0:02:45.389,0:02:46.601 "ड्रग्ज !" 0:02:46.625,0:02:49.014 "ड्रग्ज कडे नुसतं पाहिलंस ना, [br]तरी असा वेडा होशील." 0:02:49.038,0:02:50.227 (हशा) 0:02:50.980,0:02:53.045 न्यूमोनिया झाला असता, 0:02:53.069,0:02:55.661 तर आई लगेच सर्वात जवळच्या[br]हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असती. 0:02:55.661,0:02:57.087 वैद्यकीय उपचारासाठी. 0:02:58.090,0:03:00.706 पण नैराश्य आलं आहे असं सांगण्याचं [br]धाडस केलं असतं, 0:03:01.458,0:03:04.860 तर पाद्री भूतपिशाच्च उतरवायला [br]आला असता, आणि चेटक्यांवर 0:03:04.884,0:03:06.728 त्याचं खापर फोडलं असतं. 0:03:07.298,0:03:10.198 जागतिक आरोग्य संस्थेनुसार, [br]मानसिक आरोग्य म्हणजे 0:03:10.222,0:03:13.280 आयुष्यात माफक ताण निर्माण करणाऱ्या [br] 0:03:13.304,0:03:15.003 घटकांना तोंड देता येणे, 0:03:15.921,0:03:19.364 काही उपयुक्त काम करता येणे 0:03:19.388,0:03:23.015 आणि आपल्या समाजात हातभार लावता येणे. 0:03:23.501,0:03:30.113 मानसिक आरोग्य याचा अर्थ आपले भावनिक, [br]मानसशास्त्रीय आणि सामाजिक आरोग्य. 0:03:30.856,0:03:35.616 जगातील मानसिक आजारांपैकी ७५ टक्के केसेस 0:03:35.640,0:03:38.274 गरीब देशांत आढळतात. 0:03:38.298,0:03:40.130 असं असूनही,[br]आफ्रिकेतील अनेक राज्यकर्ते 0:03:40.154,0:03:44.361 त्यांच्या एकूण आरोग्यविषयक अंदाजपत्रकाच्या[br]एक टक्क्याहूनही कमी रक्कम 0:03:44.385,0:03:45.661 मानसिक आरोग्यात गुंतवतात. 0:03:46.681,0:03:47.861 त्याहूनही वाईट म्हणजे, 0:03:47.885,0:03:52.004 आफ्रिकेत मानसोपचार तज्ज्ञांची संख्या [br]अतिशय कमी आहे. 0:03:52.836,0:03:57.119 उदाहरणार्थ, नायजेरियात केवळ २०० आहेत, 0:03:57.812,0:04:00.833 आणि देशाची लोकसंख्या आहे २०० दशलक्ष. 0:04:02.422,0:04:03.891 संपूर्ण आफ्रिकेत, 0:04:03.915,0:04:07.818 ९०% लोकांना मानसोपचार सहज उपलब्ध नाहीत. 0:04:08.681,0:04:10.434 त्यामुळे, आम्ही एकाकी अवस्थेत 0:04:10.458,0:04:13.462 केवळ सहन करीत राहतो. 0:04:13.486,0:04:15.930 या कलंकामुळे मुके होतो. 0:04:17.498,0:04:22.173 आम्ही आफ्रिकन लोक मानसिक समस्यांवर [br]साधारणपणे हे उपाय वापरतो: दूर पळणे, 0:04:22.844,0:04:24.046 अज्ञान, 0:04:24.535,0:04:25.713 अपराधीपणा, 0:04:26.134,0:04:27.340 भीती 0:04:27.934,0:04:29.220 आणि संताप. 0:04:30.309,0:04:34.986 अरबोलेडा फ्लोरेज यांनी आपल्या संशोधनात [br]थेट प्रश्न विचारला, 0:04:35.010,0:04:38.668 "मानसिक आजाराचं कारण काय?" 0:04:39.667,0:04:44.951 ३४ टक्के नायजेरियन प्रतिसादक म्हणाले, [br]"ड्रग्जचा गैरवापर". 0:04:46.340,0:04:51.524 १९ टक्के म्हणाले, "दैवी प्रकोप" [br]आणि "परमेश्वराची इच्छा" 0:04:51.548,0:04:52.853 (हशा) 0:04:53.450,0:04:54.908 १२ टक्के म्हणाले, 0:04:56.130,0:04:58.896 "चेटूक आणि भूतबाधा" 0:04:59.796,0:05:04.356 पण काहींनी माहितीतल्या [br]इतर कारणांचे दाखले दिले. 0:05:04.380,0:05:06.026 जसे, "अनुवंशिकता", 0:05:06.050,0:05:07.986 "आर्थिक आणि सामाजिक स्तर", 0:05:08.010,0:05:09.605 "युद्ध", 0:05:09.629,0:05:11.042 "प्रतिकूल परिस्थिती", 0:05:11.066,0:05:12.581 "आप्ताचा मृत्यु".[br] 0:05:14.009,0:05:16.896 मानसिक आजार लांच्छनास्पद मानले गेल्यामुळे 0:05:16.920,0:05:21.386 मनोरुग्ण बहिष्कृत होतात, [br]वाईट ठरवले जातात. 0:05:22.435,0:05:26.431 पत्रकार रॉबिन हॅमंड यांनी अशा [br]प्रकारच्या छळाच्या नोंदी केल्या आहेत. 0:05:26.455,0:05:27.848 युगांडात, 0:05:28.845,0:05:30.174 सोमालियात 0:05:31.269,0:05:33.098 आणि इथे नायजेरियात 0:05:35.554,0:05:36.896 मला स्वतःला 0:05:38.057,0:05:40.376 या लांच्छनाचा अनुभव आला आहे. 0:05:42.122,0:05:43.751 २००९ मध्ये 0:05:44.796,0:05:47.902 एका मध्यरात्री मला अत्यंत भयाकूल स्वरात [br]एक फोन आला. 0:05:49.359,0:05:51.707 माझ्या अत्यंत जिवलग मित्राला 0:05:51.731,0:05:56.870 - एका बुद्धिमान, तत्वज्ञानी, आकर्षक, [br]सुस्वरूप तरुण मुलाला - 0:05:56.894,0:05:59.045 स्किझोफ्रेनिया झाला होता. 0:06:00.604,0:06:05.022 हे ऐकून लहानपणापासूनचे आमचे काही मित्र [br]मागे सरलेले मी पाहिले. 0:06:07.316,0:06:08.839 त्यांना आडून हसताना पाहिलं. 0:06:09.628,0:06:11.220 त्यांची कुजबुज ऐकली. [br] 0:06:12.186,0:06:14.416 "त्याला वेड लागलंय. [br]तुम्हाला ठाऊक आहे का?" 0:06:15.275,0:06:17.805 "तो वेडा आहे!" 0:06:17.849,0:06:22.169 त्याच्या अवस्थेबद्दल [br]अपमानास्पद टीका टिप्पणी. 0:06:22.193,0:06:26.170 कॅन्सर किंवा मलेरियाच्या रुग्णाबद्दल 0:06:26.194,0:06:27.954 असे शब्द आपण कधीही बोलणार नाही. 0:06:28.664,0:06:32.343 का कोण जाणे, मानसिक आरोग्याचा संबंध आला,[br]की आपलं अज्ञान, 0:06:32.367,0:06:35.417 आपली अनुकंपा नष्ट करून टाकतं. 0:06:36.719,0:06:40.888 समाजाने त्याला एकटं टाकलं, [br]तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो. 0:06:42.160,0:06:44.492 आमची मैत्री कधीच कमी झाली नाही. 0:06:45.848,0:06:48.927 नकळत मला मानसिक आरोग्याबद्दल [br]प्रचंड ओढ निर्माण झाली. 0:06:49.874,0:06:52.506 माझ्या मित्राच्या अवस्थेकडून[br]प्रेरणा घेऊन, 0:06:52.530,0:06:55.853 मी मानसिक आरोग्याला वाहिलेला [br]माजी विद्यार्थीगट 0:06:55.877,0:06:57.532 कॉलेजमध्ये सुरु केला. 0:06:57.556,0:07:00.933 आणि पदव्युत्तर कॉलेजचा [br]निवासी शिक्षक असण्याच्या काळात 0:07:00.957,0:07:04.919 अनेक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य [br]सावरण्यासाठी आधार दिला. 0:07:05.451,0:07:07.966 आफ्रिकन विद्यार्थी मानसिक आजारांशी[br]झगडताना मी पाहिले. 0:07:07.990,0:07:09.827 ते कोणाला काही सांगू शकत नव्हते. 0:07:10.746,0:07:14.742 हे ठाऊक असताना, आणि त्या [br]विद्यार्थ्यांच्या कहाण्या ठाऊक असतानाही, 0:07:14.766,0:07:16.752 माझी वेळ आली, तेव्हा मीही तसाच झगडलो. 0:07:16.776,0:07:21.349 माझ्या चिंताविकाराविषयी [br]कोणालाच काही सांगू शकलो नाही. 0:07:21.373,0:07:25.335 वेडा ठरण्याची भीती [br]ही इतकी खोल रुजलेली असते. 0:07:27.915,0:07:29.113 आपल्याला सर्वांनाच - 0:07:29.878,0:07:32.065 आणि खासकरून आम्हां आफ्रिकन लोकांना - 0:07:32.955,0:07:38.862 समजायला हवं, की मानसिक आजारांशी [br]झगडण्यामुळे पौरुष कमी होत नाही. 0:07:38.886,0:07:41.777 किंवा वेदनेच्या आघातामुळे [br]सामर्थ्याला कलंक लागत नाही. 0:07:42.936,0:07:47.645 मानसिक आजाराला, शारीरिक आजाराइतकंच [br]महत्त्व द्यायला हवं. 0:07:48.583,0:07:52.986 मूकपणे त्रास सहन करणं थांबवायला हवं. 0:07:54.119,0:07:57.577 मानसिक आजाराला कलंक समजणं [br]थांबवलंच पाहिजे, 0:07:57.601,0:07:59.807 आणि मनोरुग्णाचा छळ करणंही. 0:08:01.579,0:08:03.038 आपल्या मित्रांशी बोला. 0:08:04.014,0:08:05.590 आप्तांशी बोला. 0:08:06.574,0:08:08.339 आरोग्यसेवा देणाऱ्या व्यक्तींशी बोला. 0:08:09.617,0:08:10.895 आधार घ्यायला लाजू नका. 0:08:11.795,0:08:13.672 आपण एकटे नाही, 0:08:14.515,0:08:17.042 असा विश्वास बाळगा. 0:08:18.191,0:08:20.371 मानसिक आजाराशी झगडत असाल,[br]तर कोणाशी तरी बोला. 0:08:22.594,0:08:26.121 आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे [br] 0:08:26.145,0:08:27.804 आपलं दुबळेपण नव्हे, 0:08:28.809,0:08:30.352 तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं. 0:08:31.679,0:08:36.225 मानसिक आजारांना लागलेला कलंक [br]धुवून टाकण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. 0:08:37.110,0:08:40.521 यापुढे जेव्हा "मेंटल" शब्द ऐकाल, 0:08:41.408,0:08:43.403 तेव्हा कोण्या वेड्याची नव्हे, 0:08:44.343,0:08:45.552 तर माझी आठवण काढा. 0:08:45.976,0:08:47.900 (टाळ्या) 0:08:47.924,0:08:49.207 धन्यवाद. 0:08:49.231,0:08:53.223 (टाळ्या)