< Return to Video

मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.

  • 0:01 - 0:03
    मागचं वर्ष
  • 0:03 - 0:04
    फारच वाईट गेलं.
  • 0:04 - 0:06
    (हशा)
  • 0:09 - 0:12
    मी पहिल्यांदाच
    नायजेरियन जोलोफ भात खाल्ला.
  • 0:12 - 0:14
    (हशा)
  • 0:15 - 0:17
    खरोखरीच सांगतो,
  • 0:17 - 0:20
    त्यावेळी मी अत्यंत कठीण
    परिस्थितीतून जात होतो.
  • 0:21 - 0:23
    प्रचंड ताणाला तोंड देता देता
  • 0:23 - 0:25
    मला चिंताविकाराचा झटका आला.
  • 0:27 - 0:29
    काही दिवशी, मी कुठलंच काम करू शकत नसे.
  • 0:30 - 0:32
    आणि इतर दिवशी,
  • 0:32 - 0:36
    मला बिछान्यात पडून रडत राहावं
    असं वाटत असे.
  • 0:37 - 0:42
    ताण आणि चिंताविकार याबद्दल
    मनोविकार तज्ज्ञांशी बोलावं,
  • 0:42 - 0:44
    असं माझ्या डॉक्टरांनी सुचवलं.
  • 0:45 - 0:46
    मनोविकार?
  • 0:47 - 0:51
    माझी वाचाच बसली.
    मी जोरजोरात मान हलवून विरोध दर्शवला.
  • 0:53 - 0:57
    मला प्रचंड शरम वाटली.
  • 0:58 - 1:02
    या लांच्छनास्पद जाणिवेचं ओझं
    मला जाणवू लागलं.
  • 1:03 - 1:05
    माझं कुटुंब प्रेमळ आहे.
    त्यांचा मला आधार वाटतो.
  • 1:06 - 1:08
    जीवाला जीव देणारे मित्र आहेत.
  • 1:08 - 1:12
    तरीही या वेदनेबद्दल कुणाशी बोलावं,
  • 1:12 - 1:14
    ही कल्पनाच मी सहन करू शकलो नाही.
  • 1:16 - 1:20
    आफ्रिकन मर्दानगीच्या कल्पनांच्या
    भक्कम तटबंदीमध्ये
  • 1:20 - 1:23
    मी गुदमरून गेलो होतो.
  • 1:24 - 1:26
    "लोकांपुढे खरोखरीचे प्रश्न असतात, संगू.
  • 1:26 - 1:27
    तुझ्या नसत्या कल्पना आवर."
  • 1:29 - 1:31
    "मानसिक आरोग्य" हे शब्द प्रथम ऐकले,
  • 1:32 - 1:36
    तेव्हा मी नुकताच घानाहून बोटीने येऊन,
    न्यू जर्सीतल्या पेडी स्कूलचा
  • 1:36 - 1:38
    निवासी विद्यार्थी झालो होतो.
  • 1:39 - 1:42
    त्याच महिन्यात मी सात जीवलग गमावण्याचा
  • 1:42 - 1:45
    विदारक अनुभव घेतला होता.
  • 1:47 - 1:48
    माझ्यावरच्या या आपत्तीमुळे
  • 1:48 - 1:52
    शाळेच्या नर्सला माझी काळजी वाटली.
    देव तिचं भलं करो.
  • 1:52 - 1:54
    तिने माझ्या मानसिक आरोग्याबद्दल विचारलं.
  • 1:55 - 1:57
    मला वाटलं, "ही मेंटल आहे का?"
  • 1:58 - 2:01
    मी एक आफ्रिकन पुरुष आहे,
    हे तिला ठाऊक नाही का?
  • 2:01 - 2:02
    (हशा)
  • 2:02 - 2:04
    "थिंग्ज फाॅल अपार्ट" मधल्या
  • 2:04 - 2:08
    ओकोन्कोवोप्रमाणे, आम्ही आफ्रिकन पुरुष
    भावना व्यक्त न करता, प्रक्रिया न करता
  • 2:09 - 2:11
    समस्या दडपून टाकतो.
  • 2:11 - 2:12
    (टाळ्या)
  • 2:13 - 2:15
    आम्ही समस्या दडपून टाकतो.
  • 2:15 - 2:20
    मी माझ्या भावाला फोन केला आणि
    आम्ही हसलो - ओईबो (गोऱ्या) लोकांना,
  • 2:20 - 2:22
    आणि त्यांच्या विचित्र आजारांना.
  • 2:22 - 2:25
    नैराश्य, ए डी डी यासारख्या
    चमत्कारिक गोष्टींना.
  • 2:26 - 2:28
    लहानपणी, पश्चिम आफ्रिकेत असताना
  • 2:29 - 2:33
    कोणी "मेंटल" शब्द वापरला,
    की एक वेडा आठवे.
  • 2:33 - 2:35
    मलिन केसांच्या जटा घेऊन
  • 2:35 - 2:38
    अर्धनग्न अवस्थेत रस्तोरस्ती भटकणारा.
  • 2:39 - 2:41
    आम्हां सगळ्यांना तो ठाऊक होता.
  • 2:41 - 2:43
    पालक आम्हांला
    त्याच्यापासून सावध राहायला सांगत.
  • 2:44 - 2:45
    "आई, आई, तो वेडा कसा झाला?"
  • 2:45 - 2:47
    "ड्रग्ज !"
  • 2:47 - 2:49
    "ड्रग्ज कडे नुसतं पाहिलंस ना,
    तरी असा वेडा होशील."
  • 2:49 - 2:50
    (हशा)
  • 2:51 - 2:53
    न्यूमोनिया झाला असता,
  • 2:53 - 2:56
    तर आई लगेच सर्वात जवळच्या
    हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असती.
  • 2:56 - 2:57
    वैद्यकीय उपचारासाठी.
  • 2:58 - 3:01
    पण नैराश्य आलं आहे असं सांगण्याचं
    धाडस केलं असतं,
  • 3:01 - 3:05
    तर पाद्री भूतपिशाच्च उतरवायला
    आला असता, आणि चेटक्यांवर
  • 3:05 - 3:07
    त्याचं खापर फोडलं असतं.
  • 3:07 - 3:10
    जागतिक आरोग्य संस्थेनुसार,
    मानसिक आरोग्य म्हणजे
  • 3:10 - 3:13
    आयुष्यात माफक ताण निर्माण करणाऱ्या
  • 3:13 - 3:15
    घटकांना तोंड देता येणे,
  • 3:16 - 3:19
    काही उपयुक्त काम करता येणे
  • 3:19 - 3:23
    आणि आपल्या समाजात हातभार लावता येणे.
  • 3:24 - 3:30
    मानसिक आरोग्य याचा अर्थ आपले भावनिक,
    मानसशास्त्रीय आणि सामाजिक आरोग्य.
  • 3:31 - 3:36
    जगातील मानसिक आजारांपैकी ७५ टक्के केसेस
  • 3:36 - 3:38
    गरीब देशांत आढळतात.
  • 3:38 - 3:40
    असं असूनही,
    आफ्रिकेतील अनेक राज्यकर्ते
  • 3:40 - 3:44
    त्यांच्या एकूण आरोग्यविषयक अंदाजपत्रकाच्या
    एक टक्क्याहूनही कमी रक्कम
  • 3:44 - 3:46
    मानसिक आरोग्यात गुंतवतात.
  • 3:47 - 3:48
    त्याहूनही वाईट म्हणजे,
  • 3:48 - 3:52
    आफ्रिकेत मानसोपचार तज्ज्ञांची संख्या
    अतिशय कमी आहे.
  • 3:53 - 3:57
    उदाहरणार्थ, नायजेरियात केवळ २०० आहेत,
  • 3:58 - 4:01
    आणि देशाची लोकसंख्या आहे २०० दशलक्ष.
  • 4:02 - 4:04
    संपूर्ण आफ्रिकेत,
  • 4:04 - 4:08
    ९०% लोकांना मानसोपचार सहज उपलब्ध नाहीत.
  • 4:09 - 4:10
    त्यामुळे, आम्ही एकाकी अवस्थेत
  • 4:10 - 4:13
    केवळ सहन करीत राहतो.
  • 4:13 - 4:16
    या कलंकामुळे मुके होतो.
  • 4:17 - 4:22
    आम्ही आफ्रिकन लोक मानसिक समस्यांवर
    साधारणपणे हे उपाय वापरतो: दूर पळणे,
  • 4:23 - 4:24
    अज्ञान,
  • 4:25 - 4:26
    अपराधीपणा,
  • 4:26 - 4:27
    भीती
  • 4:28 - 4:29
    आणि संताप.
  • 4:30 - 4:35
    अरबोलेडा फ्लोरेज यांनी आपल्या संशोधनात
    थेट प्रश्न विचारला,
  • 4:35 - 4:39
    "मानसिक आजाराचं कारण काय?"
  • 4:40 - 4:45
    ३४ टक्के नायजेरियन प्रतिसादक म्हणाले,
    "ड्रग्जचा गैरवापर".
  • 4:46 - 4:52
    १९ टक्के म्हणाले, "दैवी प्रकोप"
    आणि "परमेश्वराची इच्छा"
  • 4:52 - 4:53
    (हशा)
  • 4:53 - 4:55
    १२ टक्के म्हणाले,
  • 4:56 - 4:59
    "चेटूक आणि भूतबाधा"
  • 5:00 - 5:04
    पण काहींनी माहितीतल्या
    इतर कारणांचे दाखले दिले.
  • 5:04 - 5:06
    जसे, "अनुवंशिकता",
  • 5:06 - 5:08
    "आर्थिक आणि सामाजिक स्तर",
  • 5:08 - 5:10
    "युद्ध",
  • 5:10 - 5:11
    "प्रतिकूल परिस्थिती",
  • 5:11 - 5:13
    "आप्ताचा मृत्यु".
  • 5:14 - 5:17
    मानसिक आजार लांच्छनास्पद मानले गेल्यामुळे
  • 5:17 - 5:21
    मनोरुग्ण बहिष्कृत होतात,
    वाईट ठरवले जातात.
  • 5:22 - 5:26
    पत्रकार रॉबिन हॅमंड यांनी अशा
    प्रकारच्या छळाच्या नोंदी केल्या आहेत.
  • 5:26 - 5:28
    युगांडात,
  • 5:29 - 5:30
    सोमालियात
  • 5:31 - 5:33
    आणि इथे नायजेरियात
  • 5:36 - 5:37
    मला स्वतःला
  • 5:38 - 5:40
    या लांच्छनाचा अनुभव आला आहे.
  • 5:42 - 5:44
    २००९ मध्ये
  • 5:45 - 5:48
    एका मध्यरात्री मला अत्यंत भयाकूल स्वरात
    एक फोन आला.
  • 5:49 - 5:52
    माझ्या अत्यंत जिवलग मित्राला
  • 5:52 - 5:57
    - एका बुद्धिमान, तत्वज्ञानी, आकर्षक,
    सुस्वरूप तरुण मुलाला -
  • 5:57 - 5:59
    स्किझोफ्रेनिया झाला होता.
  • 6:01 - 6:05
    हे ऐकून लहानपणापासूनचे आमचे काही मित्र
    मागे सरलेले मी पाहिले.
  • 6:07 - 6:09
    त्यांना आडून हसताना पाहिलं.
  • 6:10 - 6:11
    त्यांची कुजबुज ऐकली.
  • 6:12 - 6:14
    "त्याला वेड लागलंय.
    तुम्हाला ठाऊक आहे का?"
  • 6:15 - 6:18
    "तो वेडा आहे!"
  • 6:18 - 6:22
    त्याच्या अवस्थेबद्दल
    अपमानास्पद टीका टिप्पणी.
  • 6:22 - 6:26
    कॅन्सर किंवा मलेरियाच्या रुग्णाबद्दल
  • 6:26 - 6:28
    असे शब्द आपण कधीही बोलणार नाही.
  • 6:29 - 6:32
    का कोण जाणे, मानसिक आरोग्याचा संबंध आला,
    की आपलं अज्ञान,
  • 6:32 - 6:35
    आपली अनुकंपा नष्ट करून टाकतं.
  • 6:37 - 6:41
    समाजाने त्याला एकटं टाकलं,
    तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो.
  • 6:42 - 6:44
    आमची मैत्री कधीच कमी झाली नाही.
  • 6:46 - 6:49
    नकळत मला मानसिक आरोग्याबद्दल
    प्रचंड ओढ निर्माण झाली.
  • 6:50 - 6:53
    माझ्या मित्राच्या अवस्थेकडून
    प्रेरणा घेऊन,
  • 6:53 - 6:56
    मी मानसिक आरोग्याला वाहिलेला
    माजी विद्यार्थीगट
  • 6:56 - 6:58
    कॉलेजमध्ये सुरु केला.
  • 6:58 - 7:01
    आणि पदव्युत्तर कॉलेजचा
    निवासी शिक्षक असण्याच्या काळात
  • 7:01 - 7:05
    अनेक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य
    सावरण्यासाठी आधार दिला.
  • 7:05 - 7:08
    आफ्रिकन विद्यार्थी मानसिक आजारांशी
    झगडताना मी पाहिले.
  • 7:08 - 7:10
    ते कोणाला काही सांगू शकत नव्हते.
  • 7:11 - 7:15
    हे ठाऊक असताना, आणि त्या
    विद्यार्थ्यांच्या कहाण्या ठाऊक असतानाही,
  • 7:15 - 7:17
    माझी वेळ आली, तेव्हा मीही तसाच झगडलो.
  • 7:17 - 7:21
    माझ्या चिंताविकाराविषयी
    कोणालाच काही सांगू शकलो नाही.
  • 7:21 - 7:25
    वेडा ठरण्याची भीती
    ही इतकी खोल रुजलेली असते.
  • 7:28 - 7:29
    आपल्याला सर्वांनाच -
  • 7:30 - 7:32
    आणि खासकरून आम्हां आफ्रिकन लोकांना -
  • 7:33 - 7:39
    समजायला हवं, की मानसिक आजारांशी
    झगडण्यामुळे पौरुष कमी होत नाही.
  • 7:39 - 7:42
    किंवा वेदनेच्या आघातामुळे
    सामर्थ्याला कलंक लागत नाही.
  • 7:43 - 7:48
    मानसिक आजाराला, शारीरिक आजाराइतकंच
    महत्त्व द्यायला हवं.
  • 7:49 - 7:53
    मूकपणे त्रास सहन करणं थांबवायला हवं.
  • 7:54 - 7:58
    मानसिक आजाराला कलंक समजणं
    थांबवलंच पाहिजे,
  • 7:58 - 8:00
    आणि मनोरुग्णाचा छळ करणंही.
  • 8:02 - 8:03
    आपल्या मित्रांशी बोला.
  • 8:04 - 8:06
    आप्तांशी बोला.
  • 8:07 - 8:08
    आरोग्यसेवा देणाऱ्या व्यक्तींशी बोला.
  • 8:10 - 8:11
    आधार घ्यायला लाजू नका.
  • 8:12 - 8:14
    आपण एकटे नाही,
  • 8:15 - 8:17
    असा विश्वास बाळगा.
  • 8:18 - 8:20
    मानसिक आजाराशी झगडत असाल,
    तर कोणाशी तरी बोला.
  • 8:23 - 8:26
    आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे
  • 8:26 - 8:28
    आपलं दुबळेपण नव्हे,
  • 8:29 - 8:30
    तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं.
  • 8:32 - 8:36
    मानसिक आजारांना लागलेला कलंक
    धुवून टाकण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
  • 8:37 - 8:41
    यापुढे जेव्हा "मेंटल" शब्द ऐकाल,
  • 8:41 - 8:43
    तेव्हा कोण्या वेड्याची नव्हे,
  • 8:44 - 8:46
    तर माझी आठवण काढा.
  • 8:46 - 8:48
    (टाळ्या)
  • 8:48 - 8:49
    धन्यवाद.
  • 8:49 - 8:53
    (टाळ्या)
Title:
मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.
Speaker:
संगू डेले
Description:

जेव्हा उद्योजक संगू डेले यांना ताण असह्य झाला, तेव्हा त्यांना स्वतःच्याच मनात खोल रुजलेल्या एका समजुतीचा सामना करावा लागला. पुरुषांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची नसते, ही ती समजूत. भावनाप्रदर्शन सहन न करणाऱ्या समाजात आपण चिंताविकाराचा सामना करायला कसे शिकलो, ते डेले आपल्या या भाषणात सांगताहेत. ते म्हणतात, आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे आपलं दुबळेपण नव्हे, तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
08:53

Marathi subtitles

Revisions