हृदयाशी संवाद साधा । मर्लिन लॅशे । TEDxTrondheim
-
0:09 - 0:15जवळजवळ साडेछत्तीस कोटी
लोकांची इंग्लिश हि मातृभाषा आहे. -
0:17 - 0:21इतर दोन अब्जाहून अधिक लोक
इंग्लिश शिकतात आणि बोलतात -
0:21 - 0:23द्वितीय किंवा तृतीय भाषेच्या रूपाने.
-
0:24 - 0:26जर तुम्ही इंग्लिश बोललात.
-
0:26 - 0:32तर तुम्ही २.५ अब्ज लोकांशी
व्यवस्थित संवाद साधू शकता. -
0:32 - 0:37दुसरी कुठली परदेशी भाषा शिकायची
तुम्हाला का गरज भासेल? -
0:37 - 0:41तो एक हास्यास्पद असा वेळेचा
अपव्यय नाही का? -
0:41 - 0:45नेल्सन मंडेलांवर प्रचंड टीका केली होती
-
0:45 - 0:49कृष्णवर्णीय दक्षिण आफ्रिकी लोकांनी
आफ्रिकान्स भाषा बोलल्याबद्दल. -
0:50 - 0:51त्यांचं उत्तर होतं,
-
0:51 - 0:55"जेव्हा तुम्ही एखाद्याला समजणाऱ्या
भाषेतून त्याच्याशी संवाद साधता -
0:56 - 0:58तो त्याच्या
मस्तिष्काला भिडतो -
0:59 - 1:02जेव्हा तुम्ही त्याच्या स्वतःच्या
भाषेतून संवाद साधता -
1:03 - 1:04तो त्याच्या हृदयाला भिडतो."
-
1:05 - 1:07मग एक गोष्ट लक्षात घ्या:
-
1:07 - 1:09जर तुम्हाला कुणाला जिंकायचं असेल,
-
1:09 - 1:12तर तुम्ही त्यांच्या मनाशी
संवाद साधायला हवा -
1:13 - 1:15पोपना हे माहिती आहे.
-
1:15 - 1:19जॉन पॉल दुसरे दहा भाषा
अस्खलितपणे बोलत असत -
1:19 - 1:22आणि एक डझनभर इतर प्राथमिक पातळीवर बोलत.
-
1:23 - 1:27ते जिथे कुठे जात, ते लोकांशी बोलत असत
-
1:27 - 1:31किमान काही वाक्ये तिथल्या
स्थानिक भाषेत उच्च्चारुन; -
1:31 - 1:36आणि त्यांच्या प्रसिद्धीला कारणीभूत
तो एक महत्वाचा मुद्दा होता. -
1:37 - 1:40ज्या लोकांच्या सासवा परदेशी असतात,
-
1:40 - 1:43किंवा होणाऱ्या सासवा परदेशी असतात,
तेदेखील हे ओळखून असतात. -
1:44 - 1:46ते त्यांच्या मैत्रिणीशी इंग्लीश बोलतील,
-
1:46 - 1:51पण जेव्हा त्यांना मुलीच्या आईसोबत
सलोखा हवा असतो, -
1:51 - 1:55तरुण पुरुष अगदी विचित्र भाषा
शिकायला तयार असतात -
1:55 - 1:57अगदी डचसुद्धा.
-
1:57 - 1:59(हशा)
-
1:59 - 2:01आणि ते खरंच काम करतं.
-
2:02 - 2:03का?
-
2:04 - 2:09कारण आपली बोलीभाषा हि
पूर्णतः गुंफलेली असते -
2:09 - 2:13आपल्या व्यक्तिमत्वाने आणि व्यक्तित्वाने.
-
2:13 - 2:18आपला पूर्ण वैयक्तिक इतिहास
हा घट्ट रोवलेला आहे, -
2:18 - 2:21आपल्या मातृभाषेत तो मुरलेला आहे.
-
2:21 - 2:28शब्दांशी, भावनांशी निगडीत अशा पुष्कळशा
आठवणी आणि भावना आहेत, -
2:29 - 2:32आपण जे शिकत वाढलो त्या व्याकरणाशीसुद्धा.
-
2:33 - 2:37म्हणून जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची
भाषा शिकलात, -
2:37 - 2:40तर असं दिसतं कि तुम्हाला खरोखरच रस आहे
-
2:40 - 2:44त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या
व्यक्तिमत्वात. -
2:45 - 2:48कुठली सासू खुश होणार नाही?
-
2:49 - 2:53जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची भाषा ऐकता
तेव्हा जोडले गेल्याची भावना निर्माण होते. -
2:54 - 2:56जेव्हा तुम्ही प्रवासात असता,
-
2:56 - 3:00आणि अनेक दिवस किंवा आठवडे
परदेशी भाषेत बोलत असता, -
3:01 - 3:03ज्याक्षणी तुम्ही विमानात बसता
-
3:03 - 3:06जिथे विमानातील कर्मचारी तुमचं
स्वागत तुमच्या भाषेत करतात -
3:06 - 3:08तुम्हाला कळतं कि तुम्ही घरी जात आहात.
-
3:10 - 3:14जर मातृभाषांना गंध असते,
-
3:14 - 3:19तर मला वाटतं ते कुकीजसारखे असते,
-
3:19 - 3:21आणि उबदार अशा चिकन सूपसारखे,
-
3:22 - 3:24आणि आजीच्या अत्तरासारखे --
-
3:25 - 3:28किंवा कदाचित काही अंशी डांबराच्या
गोळ्यांसारखे. -
3:29 - 3:34हे एक महत्वाचं कारण असू शकतं रचित भाषा,
-
3:34 - 3:40एस्पेरांतोसारख्या, अपेक्षेप्रमाणे
प्रसारीत न होण्याचं -
3:41 - 3:44तथापि चातुर्याने रचलेली,
-
3:44 - 3:47आणि साधी, शिकायला सोपी,
-
3:48 - 3:53कुठल्याही देशाने एक कृत्रीम भाषा
राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारलेली नाही. -
3:54 - 3:59किंवा एक परदेशी भाषा म्हणूनही नाही जी
पद्धतशीरपणे शिकवली जाते -
3:59 - 4:03मोठ्या प्रमाणात दीर्घकाळापर्यंत,
-
4:03 - 4:05जरी तसे प्रयत्न झाले असले तरी.
-
4:06 - 4:12पण का कोण जाणे, नैसर्गिक भाषांमध्ये
अडचणी असल्या तरी -- -
4:12 - 4:15जशा तापदायक असमानता,
-
4:15 - 4:20स्पेलिंग आणि उच्च्चारांत असणारा फरक,
-
4:20 - 4:25कधी व्याकरणाची हास्यास्पद गुंतागुंत --
-
4:26 - 4:27पण असं असूनही,
-
4:28 - 4:34आपण त्याच भाषा शिकणं पसंत करतो ज्या
लोकांसोबत नैसर्गिकरित्या वाढल्या आहेत. -
4:36 - 4:40रचित भाषा मस्तिष्काशी संवाद साधतात.
-
4:41 - 4:45नैसर्गिक भाषांना कुकीजचा गंध येतो.
-
4:46 - 4:52नेल्सन मंडेलांसाठी आफ्रिकान्स शिकणं
हे "शत्रूला ओळखणं" होतं. -
4:52 - 4:57त्यांनी म्हणलंय, "तुम्हाला त्यांची भाषा
अवगत हवी, आवडी माहिती हव्यात, -
4:57 - 5:00आणि आकांक्षा, आणि भयप्रद गोष्टी, जर
त्यांचा पराभव करायचा असेल तर." -
5:01 - 5:04त्यांनी ते केलं आणि ते कामी आलं.
-
5:05 - 5:08पण हे दरवेळी शत्रुंबाबतीत नाही, आहे का?
-
5:09 - 5:12सर्व प्रकारच्या मानवी संबंधांना
हे लागू पडतं. -
5:13 - 5:18आणि सासवा या शत्रू असतात असं
म्हणणारी मी शेवटची व्यक्ती असेन -- -
5:18 - 5:19व्याख्येनुसार.
-
5:20 - 5:23सात आठ वर्षांपूर्वी,
-
5:23 - 5:26माझ्या कुटुंबासोबत मी पोलंड
मधून जात होते. -
5:27 - 5:31आणि दुकानं बंद व्हायला लागली होती, आणि
आम्हाला खायला विकत घेणं गरजेचं होतं. -
5:32 - 5:36शेवटी, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला
आम्हाला एक सुपर मार्केट दिसलं. -
5:37 - 5:42तिथे वेळेत पोहोचण्यासाठी यु टर्न
घेणे हा एकच मार्ग होता. -
5:42 - 5:43म्हणून मी तेच केलं.
-
5:44 - 5:47ते बहुदा धोक्याचं होतं.
-
5:48 - 5:50ते नक्कीच बेकायदेशीर होतं.
-
5:52 - 5:58गाडीतळावर, मी गाडी बंद करायच्या आतच --
-
5:58 - 6:00-- मी टक टक आवाज ऐकला.
-
6:01 - 6:06म्हणून मी काच खाली केली आणि
डोळ्यांच्या दोन जोड्या दिसल्या. -
6:08 - 6:12डोळ्यांची प्रत्येक जोडी एका
पोलिसाची होती. -
6:13 - 6:18आता, मला पोलिश भाषा उत्तम येते
असं मी म्हणू शकत नाही -
6:18 - 6:19अगदी परिस्थिती चांगली
असतानासुद्धा, -
6:20 - 6:24पण एक साधं संभाषण मी करू शकते.
-
6:24 - 6:28पण तरीसुद्धा त्या परिस्थितीत
अपराधभावनेने, -
6:29 - 6:32गणवेषातील त्या दोन कायदेरक्षकांशी
नेत्रपल्लवी करताना -
6:33 - 6:38मला माहिती असलेला सयुक्तिक असा
प्रत्येक पोलिश शब्द गळून पडला. -
6:40 - 6:44हो, मी क्षणभरही विचार केला नाही,
-
6:45 - 6:48त्या परिस्थितीत इंग्लीश वापरण्याचा.
-
6:49 - 6:53इंग्लिशमुळे कदाचित मला भाषेचा
फायदा झाला असता, -
6:54 - 6:57पण पोलिसांना कदाचित ते त्रासाचं
झालं असतं. -
6:58 - 7:01म्हणून मी पोलिशच बोलायचं ठरवलं.
-
7:02 - 7:03कसं?
-
7:04 - 7:09पोलिश जाणणारा माझ्या मेंदूचा भाग
नुकताच निकामी झाला होता -
7:10 - 7:12पण एका गोष्टीचा अपवाद वगळता.
-
7:13 - 7:18एक गोष्ट अशी होती कि जी मी इतक्या
वेळा केलेली होती कि -
7:18 - 7:21मी ती झोपेतदेखील म्हणू शकले असते.
-
7:23 - 7:25ती एक लहान मुलांची कविता होती,
-
7:28 - 7:30एका आजारी बेडकाची.
-
7:30 - 7:32(हशा)
-
7:33 - 7:35माझ्याकडे तेवढंच होतं.
-
7:35 - 7:40मला माहिती आहे कि ती करण्यासारखी
एक विचित्र गोष्ट होती पण मी बरळले: -
7:40 - 7:43(पोलिश) एका बेडकाला वाटलं अशक्त
-
7:43 - 7:46म्हणून तो गेला डॉक्टरांकडे आणि
म्हणाला मला बरं नाही वाटतं. -
7:46 - 7:50चष्मा घालतात ते डॉक्टर
कारण ते होते खूप वयस्कर." -
7:52 - 7:54मी पोलिसांकडे पाहिलं.
-
7:54 - 7:56आणि ते माझ्याकडे जणू टक लावून पाहात होते.
-
7:56 - 7:58(हशा)
-
7:59 - 8:02मला आठवतंय त्यांच्यापैकी एकाने
खूप विचार केला. -
8:03 - 8:05आणि मग ते हसले.
-
8:06 - 8:07ते हसले.
-
8:07 - 8:11आणि त्यामुळे मला हायसं वाटलं,
-
8:11 - 8:14इतका कि काही सयुक्तिक शब्द
-
8:14 - 8:17माझ्या डोक्यात आले,
-
8:17 - 8:20काही वाक्य मी अडखळत बोलले,
-
8:20 - 8:23"माफ करा, खायला हवं होतं, पुन्हा कधी
असं करणार नाही." -
8:25 - 8:26त्यांनी मला सोडलं.
-
8:27 - 8:32मी दुकानाकडे धावत असताना ते म्हणाले,
(पोलिश) "स्टेशुली बद्रुज!" -
8:32 - 8:34"तुमचा प्रवास चांगला होवो!"
-
8:35 - 8:39भाषा शिकण्यासाठी तुम्हाला उदयुक्त
करण्यामागे माझा उद्देश हा नव्हे -
8:39 - 8:43कि जेणेकरून तुम्ही जगभ्रमंती करावी, कायदे
मोडावेत व त्यातून सुटका करून घ्यावी. -
8:45 - 8:49पण हा छोटासा किस्सा दाखवतो
कि कसे काही शब्द, -
8:50 - 8:54कितीही साधे किंवा निरर्थक, अगदी
थोडकेच शब्द, -
8:54 - 8:58हृदयाला भिडतात आणि त्याचं परिवर्तन करतात.
-
8:59 - 9:02आणि हो, आजारी बेडकाला एक पर्याय होता.
-
9:02 - 9:04मला एक गोष्ट तेवढीच चांगली ठाऊक होती:
-
9:06 - 9:07पितानाचं गाणं.
-
9:07 - 9:09(हशा)
-
9:09 - 9:11त्यामुळे मला कदाचित स्मितहास्य मिळालं नसतं
-
9:12 - 9:14बहुदा स्थानिक पोलीस स्टेशनची एक
वारी घडली असती -
9:14 - 9:16रक्त तपासणीसाठी.
-
9:18 - 9:21तुम्हाला अनेक भाषा शिकणं जरुरी नाही,
-
9:21 - 9:24आणि तुम्ही त्यांचा खोल अभ्यास करून
शिकणं गरजेचं नाही. -
9:24 - 9:26अगदी थोडं शिकणं खूप फायद्याचं ठरू शकतं.
-
9:27 - 9:30हृदयाला भिडणारे दहा शब्द अधिक
परिणामकारक ठरू शकतात -
9:30 - 9:33मस्तिष्काला भिडणाऱ्या हजार शब्दांपेक्षा.
-
9:35 - 9:39तुम्ही नेहमी इंग्लिश बोलून मध्य
गाठू शकता. -
9:40 - 9:45पण तुम्ही अशीही व्यक्ती होऊ शकता
जी ती मधली रेषा ओलांडून -
9:45 - 9:49तुमच्या नव्या मित्राला किंवा शत्रूला
भेटते, तो जो कोणी असेल -
9:49 - 9:51त्याला त्याच्याच प्रदेशात भेटते.
-
9:52 - 9:55दुसऱ्याची भाषा बोलण्याने तुम्ही कुठे
कमी पडत नाही -
9:55 - 9:57त्याने तुमचा प्रभाव वाढतो.
-
9:58 - 10:04तीच व्यक्ती जिच्याकडे धैर्य आहे आणि
जी रेषा ओलांडण्याचे प्रयत्न करते -
10:05 - 10:07तीच अखेरीस विजयी होते.
-
10:08 - 10:12चुका करायला घाबरू नका. चुकाच
तुम्हाला मानवी बनवतात. -
10:13 - 10:17आणि इथे या गोष्टीत, एक फायदा आहे:
-
10:18 - 10:21जर तुम्ही काही चूक केली,
-
10:21 - 10:26तर तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करायची,
तुम्हाला येऊन भेटायची संधी देता, -
10:26 - 10:32आणि अशा तऱ्हेने, ज्या संबंधाची सुरुवात
तुम्ही केली आहे तो अधिक घनिष्ट होईल. -
10:33 - 10:37मग, तुम्हाला समजून घ्यावंसं वाटतं
-
10:38 - 10:40का तुम्हाला जोडलं जावंसं वाटतं?
-
10:42 - 10:47आपण सर्वजण शिकणं आणि इंग्लिशचा
वापर चालू ठेऊ या. -
10:48 - 10:53जेणेकरून आपण मिश्र श्रोत्यांशी संवाद साधू
शकू, जसं आपण इथे TEDx मधे करतो आहोत. -
10:54 - 10:58इंग्लिश हे एक सामर्थ्यवान शस्त्र आहे
ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी, -
10:58 - 11:04जागतिक प्रश्नांच्या आंतरराष्ट्रीय
परिषदांसाठी. -
11:05 - 11:10सर्वांत महत्वाचं, इंग्लिश हा ३६५ दशलक्ष
हृदयांकडे जाण्याचा महामार्ग आहे. -
11:11 - 11:17३६५ दशलक्ष लोकांना इंग्लिश भाषेचा
कुकीजसारखा गंध येतो. -
11:19 - 11:21पण तिथेच का थांबायचं?
-
11:22 - 11:25थोडा अधिक प्रयत्न का करू नये
-
11:25 - 11:28आणि कमीतकमी एक परकीय भाषा का शिकू नये?
-
11:29 - 11:32वेगवेगळ्या चवींच्या बऱ्याच कुकीज आहेत.
-
11:32 - 11:34चला जाऊ या आणि एका नवीन कुकीची चव घेऊ या.
-
11:35 - 11:36धन्यवाद.
-
11:36 - 11:38(टाळ्या)
- Title:
- हृदयाशी संवाद साधा । मर्लिन लॅशे । TEDxTrondheim
- Description:
-
TED परिषदेचं स्वरूप वापरून एका TEDx कार्यक्रमात हे व्याख्यान दिलं आहे जो एका स्थानिक समुदायाने आयोजित केला होता. http://ted.com/tedx वर अधिक जाणून घ्या.
भाषांचा गंध आणि एक आजारी बेडूक कशी वेळ मारून नेऊ शकतो याबद्दल हे आहे.
मर्लिन या अशा एक भाषाशास्त्रज्ञ आणि संवादतज्ज्ञ आहेत ज्यांना कथाकथनाची आणि भाषांची प्रचंड आवड आहे.
त्यांच्या खेळकर अशा ब्लॉगमधे त्या बहुभाषिकतेच्या आणि सांस्कृतिक भिन्नतेच्या आनंद आणि फायद्यांबद्दल लिहितात. त्यांच्या ब्लॉगमधील कथा या त्यांच्या बहुभाषाकोविदाच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारीत आहेत आणि भाषिक आणि सांस्कृतिक अंतर्ज्ञान आणि अनुभव यांआधारे घट्ट रोवलेल्या आहेत.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDxTalks
- Duration:
- 11:56
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Speak to the heart | Marleen Laschet | TEDxTrondheim | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Speak to the heart | Marleen Laschet | TEDxTrondheim | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Speak to the heart | Marleen Laschet | TEDxTrondheim | |
![]() |
Amol Terkar edited Marathi subtitles for Speak to the heart | Marleen Laschet | TEDxTrondheim | |
![]() |
Amol Terkar edited Marathi subtitles for Speak to the heart | Marleen Laschet | TEDxTrondheim |