जगात शांतता कशी आणायची? संतापून.
-
0:01 - 0:06आज मी संताप या विषयावर बोलणार आहे.
-
0:09 - 0:11मी अकरा वर्षांचा असताना
-
0:11 - 0:14माझ्या काही मित्रांना
शिक्षण सोडताना पाहिलं. -
0:14 - 0:19त्यांच्या पालकांना पुस्तकांचा खर्च
परवडत नसे, म्हणून. -
0:19 - 0:21ते पाहून मला संताप आला.
-
0:23 - 0:26२७ व्या वर्षी, मी
-
0:26 - 0:31एका गुलामीत जगणाऱ्या
अगतिक पित्याची अवस्था ऐकली. -
0:31 - 0:36त्याच्या कन्येला एका वेश्यागृहाला
विकलं जात होतं -
0:36 - 0:39हे ऐकून मला संताप आला.
-
0:40 - 0:43पन्नासाव्या वर्षी,
-
0:43 - 0:48मी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलो
-
0:48 - 0:51माझ्या मुलासमवेत.
-
0:51 - 0:53याचा मला संताप आला.
-
0:55 - 1:00प्रिय मित्रांनो, संताप हा वाईट असतो
असं आपल्याला शतकानुशतकं शिकवलं गेलं. -
1:01 - 1:03आपले पालक, गुरुजन आणि धर्मगुरू -
-
1:03 - 1:09सर्वानीच आपल्याला, संतापावर ताबा ठेवून
तो दडपून कसा टाकावा, हे शिकवलं -
1:12 - 1:14पण मी विचारतो, "का?"
-
1:16 - 1:21आपण आपल्या संतापाचं रुपांतर
समाजाच्या भल्यात का करू शकत नाही? -
1:21 - 1:22आपण आपला संताप,
-
1:22 - 1:26जगातल्या वाईट गोष्टींशी सामना करून,
त्या बदलण्यासाठी का वापरू शकत नाही? -
1:30 - 1:32हे करण्याचा मी प्रयत्न केला.
-
1:34 - 1:36मित्रांनो,
-
1:37 - 1:43माझ्या बऱ्याचशा तेजस्वी कल्पनांचा जन्म
संतापापोटीच झाला. -
1:44 - 1:54उदाहरणार्थ, जेव्हा मी ३५ व्या वर्षी,
एका छोट्या कारागृहात बंदी होतो, -
1:55 - 1:57ती संपूर्ण रात्र मी संतापात काढली.
-
1:58 - 2:01पण त्यातून एका नवीन कल्पनेचा जन्म झाला.
-
2:01 - 2:04पण त्याबद्दल मी नंतर बोलेन.
-
2:04 - 2:11प्रथम, मी स्वतःचं नाव कसं ठेवलं,
त्या गोष्टीपासून सुरुवात करू. -
2:13 - 2:18माझ्या बालपणापासून मी महात्मा गांधींचा
जोरदार चाहता आहे. -
2:19 - 2:24गांधीजी स्वतंत्र भारत चळवळीचे नेते होते.
-
2:25 - 2:27पण त्याहून महत्त्वाचं,
-
2:27 - 2:34त्यांनी शिकवलं, ते
समाजाच्या सर्वात दुर्बल घटकांना -
2:34 - 2:38आणि सर्वाधिक वंचित लोकांना
मानाची आणि आदराची वागणूक देणं. -
2:40 - 2:45आणि म्हणूनच, १९६९ साली,
-
2:45 - 2:48जेव्हा भारतभर महात्मा गांधींची
जन्मशताब्दी साजरी केली जात होती, -
2:48 - 2:50- त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो-
-
2:50 - 2:52तेव्हा मला एक कल्पना सुचली.
-
2:54 - 2:57आपण ती वेगळ्या रीतीने का साजरी करून नये?
-
2:57 - 3:03मला ठाऊक होतं,
आणि कदाचित तुम्हीही जाणत असाल, -
3:03 - 3:11की भारतात पुष्कळ लोक
निम्नतम जातींमध्ये जन्मतात. -
3:12 - 3:15आणि त्यांना अस्पृश्य म्हणून वागवलं जातं.
-
3:15 - 3:17तर या लोकांना,
-
3:17 - 3:21देवळात जाण्याची परवानगी मिळणं
तर सोडाच, -
3:21 - 3:28त्यांना उच्च जातीच्या लोकांच्या घरी
किंवा दुकानांत देखील जाता येत नाही. -
3:28 - 3:34तर, माझ्या गावच्या नेत्यांचा
माझ्यावर प्रभाव पडला. -
3:34 - 3:38ते जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा
जोरदार विरोध करीत असत. -
3:38 - 3:40आणि गांधीवादी आदर्शांबद्दल बोलत असत.
-
3:42 - 3:45तर ती प्रेरणा घेऊन मी ठरवलं,
आपण लोकांसमोर एक आदर्श ठेवू. -
3:45 - 3:51अस्पृश्य समाजाने रांधून वाढलेलं अन्न
-
3:51 - 3:55ग्रहण करण्याचं या नेत्यांना आमंत्रण देऊ.
-
3:55 - 4:00मी काही निम्न जातीच्या,
तथाकथित अस्पृश्य, लोकांकडे गेलो. -
4:01 - 4:06त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
पण हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं. -
4:06 - 4:10ते म्हणाले, " छे छे. हे अशक्य आहे.
असं आजपर्यंत कधीच घडलं नाही." -
4:11 - 4:13मी म्हणालो, " हे नेते पहा,"
-
4:13 - 4:15हे महान आहेत.
यांचा अस्पृश्यतेला विरोध आहे. -
4:15 - 4:18ते येतील. कुणीच आलं नाही,
तर आपण एक उदाहरण घालून देऊ. -
4:21 - 4:27त्या लोकांना मी अगदी भोळसट वाटलो.
-
4:28 - 4:31शेवटी एकदाचे ते तयार झाले.
-
4:31 - 4:36मी आणि माझे मित्र सायकली घेऊन गेलो.
त्या राजकीय नेत्यांना आमंत्रण देऊन आलो. -
4:38 - 4:41त्यातल्या प्रत्येकाने
आमंत्रण स्वीकारल्याचं पाहून -
4:41 - 4:46मी उत्तेजित झालो, नव्हे,
माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. -
4:47 - 4:50मला वाटलं, "किती महान कल्पना.
आपण एक आदर्श समाजासमोर ठेवू. -
4:50 - 4:54आपण समाजात परिवर्तन घडवून आणू."
-
4:55 - 4:57तो दिवस उगवला.
-
4:58 - 5:03हे सारे अस्पृश्य,
तीन स्त्रिया आणि दोन पुरुष, -
5:03 - 5:07यायला कबूल झाले.
-
5:07 - 5:13त्यांनी आपल्याजवळचे सर्वोत्तम कपडे
घातले होते, असं मला स्मरतं. -
5:14 - 5:17त्यांनी नवीन भांडी आणली होती.
-
5:18 - 5:20त्यांनी शेकडो वेळा आंघोळी केल्या होत्या.
-
5:20 - 5:23कारण असं काही करणं
हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं. -
5:23 - 5:26परिवर्तनाचा क्षण आला होता.
-
5:27 - 5:30ते एकत्र जमले आणि त्यांनी स्वयंपाक केला.
-
5:30 - 5:33सात वाजले.
-
5:33 - 5:36आठ वाजेपर्यंत आम्ही वाट बघत राहिलो.
-
5:36 - 5:41कारण नेते उशीरा येणं हे तर नेहमीचंच आहे.
-
5:41 - 5:43म्हणजे एखादा तास उशीरा येणं.
-
5:43 - 5:50तर, आठ वाजल्यानंतर आम्ही सायकली काढल्या
आणि त्या नेत्यांच्या घरी गेलो. -
5:50 - 5:52फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी.
-
5:54 - 5:59त्यांच्यापैकी एका नेत्याच्या पत्नीने
मला सांगितलं, -
5:59 - 6:04"माफ करा, त्यांचं डोकं दुखतं आहे.
बहुतेक ते येऊ शकणार नाहीत." -
6:04 - 6:06मी दुसऱ्या नेत्याकडे गेलो.
-
6:06 - 6:10आणि त्यांची पत्नी म्हणाली,
"बरं. तुम्ही जा. ते नक्की येतील." -
6:11 - 6:15म्हणून मला वाटलं,
हा जेवणाचा कार्यक्रम नक्की पार पडणार. -
6:15 - 6:20तितक्याशा मोठ्या प्रमाणावर का नसेना.
मी आमच्या ठिकाणी परत गेलो. -
6:21 - 6:27हे ठिकाण म्हणजे
नवीनच बांधलेलं महात्मा गांधी उद्यान. -
6:29 - 6:30दहा वाजले.
-
6:31 - 6:35एकही नेता आला नाही.
-
6:36 - 6:39या गोष्टीचा मला संताप आला.
-
6:40 - 6:47मी महात्मा गांधींच्या पुतळ्याला
टेकून उभा होतो. -
6:50 - 6:54मी मनातून थकलो होतो. पार गळून गेलो होतो.
-
6:57 - 7:02जिथे जेवण ठेवलं होतं, तिथे मी बसलो.
-
7:06 - 7:08मी माझ्या भावना काबूत ठेवल्या होत्या.
-
7:08 - 7:12पण पहिला घास घेताक्षणी
-
7:12 - 7:15मला रडू कोसळलं.
-
7:15 - 7:20आणि अचानक मला खांद्यावर
एका हाताचा स्पर्श जाणवला. -
7:20 - 7:26तो होता जखमा भरणारा मातेचा स्पर्श.
एका अस्पृश्य स्त्रीचा स्पर्श. -
7:26 - 7:30आणि ती म्हणाली,
"कैलाश, कशासाठी रडतो आहेस तू?" -
7:32 - 7:34तू तुझं काम केलंस.
-
7:34 - 7:37तू अस्पृश्यांच्या हातचं जेवलास.
-
7:37 - 7:40आमच्या आठवणीत असं कधीच घडलं नव्हतं.
-
7:41 - 7:46ती म्हणाली, "आज तू जिंकलास."
-
7:46 - 7:51आणि माझ्या मित्रांनो,
तिचं म्हणणं बरोबर होतं. -
7:52 - 7:56मध्यरात्रीनंतर मी घरी परतलो.
-
7:56 - 8:00अंगणात बसलेले अनेक उच्चवर्णीय
वयोवृद्ध लोक पाहून -
8:00 - 8:03मला धक्काच बसला.
-
8:03 - 8:06माझी आई आणि
घरातल्या इतर वयस्कर स्त्रिया रडत होत्या -
8:06 - 8:10आणि त्या वयोवृद्ध लोकांच्या
विनवण्या करीत होत्या. -
8:10 - 8:13कारण त्यांनी आमच्या घराण्याला
वाळीत टाकण्याची धमकी दिली होती. -
8:14 - 8:19आणि घराणं वाळीत टाकणं
ही सामाजिक शिक्षा, -
8:19 - 8:23कल्पनेतल्या कुठल्याही शिक्षेहून मोठी आहे.
-
8:24 - 8:29मला एकट्याला शिक्षा द्यायला
ते कसेबसे राजी झाले. -
8:29 - 8:33ही शिक्षा म्हणजे शुद्धीकरण.
म्हणजे मी गावापासून ६०० मैलावर जायचं. -
8:33 - 8:37गंगा नदीत बुडी मारून पवित्र व्हायचं.
-
8:37 - 8:42आणि त्यानंतर १०१ पुरोहितांना
भोजन द्यायचं. -
8:42 - 8:45त्यांचे पाय धुवून, ते चरणतीर्थ प्यायचं.
-
8:47 - 8:50हा शुद्ध मूर्खपणा होता.
-
8:50 - 8:52मी ही शिक्षा नाकारली.
-
8:53 - 8:55मग त्यांनी मला कोणती शिक्षा केली?
-
8:55 - 9:01त्यांनी मला माझ्याच स्वयंपाकघरात
आणि भोजनघरात जायला बंदी केली. -
9:01 - 9:04माझी भांडीकुंडी वेगळी ठेवण्यात आली.
-
9:04 - 9:09पण ज्या रात्री मला संताप आला होता,
तेव्हा त्यांना मला वाळीत टाकायचं होतं. -
9:11 - 9:15पण मी संपूर्ण जातीव्यवस्थेलाच
वाळीत टाकण्याचं ठरवलं. -
9:16 - 9:20(टाळ्या)
-
9:21 - 9:26आणि ते शक्य होतं, कारण त्याची सुरुवात
-
9:26 - 9:28स्वतःचं आडनाव बदलून करता आली असती.
-
9:28 - 9:32कारण भारतात,
बरीचशी आडनावं ही जातींची नावं असतात. -
9:32 - 9:34म्हणून मी स्वतःचं आडनाव गाळून टाकलं.
-
9:34 - 9:41आणि त्यानंतर मी स्वतःला
एक नवीन आडनाव दिलं : सत्यार्थी. -
9:41 - 9:44त्याचा अर्थ, सत्याचा शोध घेणारा.
-
9:45 - 9:49(टाळ्या)
-
9:49 - 9:53संतापातून परिवर्तन घडवण्याची सुरुवात
ही अशी झाली. -
9:54 - 9:57मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी ओळखेल का,
-
9:57 - 10:02बाल अधिकार कार्यकर्ता होण्यापूर्वी
मी काय करीत होतो? -
10:02 - 10:04कोणाला ठाऊक आहे का?
-
10:05 - 10:06नाही.
-
10:06 - 10:13मी एक इंजिनीयर होतो.
इलेक्ट्रिकल इंजिनीयर. -
10:13 - 10:18आणि त्यावेळी मी शिकलो, की ऊर्जा
-
10:18 - 10:22कोळसा जाळून निर्माण होणारी,
-
10:22 - 10:26अणुभट्टीतल्या स्फोटांतून निर्माण होणारी,
-
10:26 - 10:29रोरावणाऱ्या नदीच्या प्रवाहातली,
-
10:29 - 10:33सोसाट्याच्या वाऱ्यामधली,
-
10:33 - 10:38तिचं परिवर्तन केल्यावर,
लक्षावधी लोकांची आयुष्यं उजळू शकते. -
10:39 - 10:43मी हे ही शिकलो की,
अत्यंत दुर्दम्य रूपातली ऊर्जा कशा प्रकारे -
10:43 - 10:48समाजाच्या हितासाठी
चांगल्या कामी जुंपता येते. -
10:53 - 11:00तर आता, मी तुरुंगात कसा गेलो,
त्या गोष्टीकडे वळतो. -
11:00 - 11:04मी डझनभर मुलांना
गुलामगिरीतून सोडवल्याच्या आनंदात होतो. -
11:04 - 11:07त्यांना त्यांच्या पालकांच्या हातात
सोपवलं होतं. -
11:07 - 11:10एखाद्या मुलाला मुक्त केल्यावर
मला अवर्णनीय आनंद होतो. -
11:11 - 11:12मी खूप आनंदात होतो.
-
11:13 - 11:19पण दिल्लीत परतण्यासाठी
आगगाडीची वाट पाहत असताना, -
11:19 - 11:22मला डझनावारी मुलं येताना दिसली.
-
11:22 - 11:26कोणीतरी त्यांचा अपव्यापार करीत होतं.
-
11:26 - 11:28त्या लोकांना मी थांबवलं.
-
11:28 - 11:31पोलिसांजवळ त्यांची तक्रार केली.
-
11:31 - 11:35पण त्या पोलिसांनी मला मदत करण्याऐवजी
-
11:35 - 11:41मला या छोट्या कोठडीत टाकलं,
एखाद्या जनावरासारखं. -
11:42 - 11:43आणि त्याच संतापभरल्या रात्रीतून
-
11:43 - 11:47एका अत्यंत तेजस्वी आणि
महान कल्पनेचा जन्म झाला. -
11:48 - 11:53मला वाटलं, मी १० मुलांना मुक्त करीत असेन,
पण आणखी ५० मुलं त्यात ओढली जात असतील, -
11:53 - 11:55तर त्यात काही अर्थ नाही.
-
11:55 - 11:57ग्राहकांच्या ताकदीवर माझा विश्वास आहे.
-
11:57 - 12:01आणि तुम्हाला सांगतो, एक गोष्ट
-
12:01 - 12:06माझ्या हातूनच नव्हे,
तर जगभरात प्रथमच घडली. -
12:06 - 12:10ग्राहकांना माहिती देऊन, जागरूक करून,
-
12:10 - 12:15बालमजूर न वापरता बनवलेल्या गालिच्यांची
मागणी करण्यासाठी चळवळ उभारली गेली. -
12:16 - 12:19युरोप आणि अमेरिकेत
आम्हाला यश मिळालं आहे. -
12:19 - 12:24आणि दक्षिण आशियाई देशांत
-
12:24 - 12:27बालमजुरीत ८० टक्के घट झाली आहे.
-
12:27 - 12:30(टाळ्या)
-
12:33 - 12:39इतकंच नव्हे, तर हा नव्याने जन्मलेला
ग्राहकाचा संताप, किंवा ही ग्राहक चळवळ -
12:39 - 12:44इतर देशांत आणि इतर उद्योगांमध्ये
पसरली आहे. -
12:44 - 12:49चॉकोलेट असो, कपडे असोत, पादत्राणे असोत,
त्याहूनही पलिकडे पोहोचली आहे. -
12:51 - 12:53वयाच्या ११व्या वर्षी मी संतापलो.
-
12:53 - 12:58जेव्हा मला कळलं की प्रत्येक मुलासाठी
शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, -
12:58 - 13:06वापरलेली पुस्तकं जमा करून, गरीब मुलांना
मदत करण्याची कल्पना मला सुचली. -
13:06 - 13:09वयाच्या ११व्या वर्षी मी
पुस्तक-पेढी स्थापन केली. -
13:11 - 13:12मी इतकं करून थांबलो नाही.
-
13:12 - 13:14कालांतराने, मी सहसंस्थापक झालो,
-
13:14 - 13:19नागरी समाजातल्या एकमेव आणि सर्वात मोठ्या
शैक्षणिक मोहिमेचा. -
13:19 - 13:22ही मोहीम म्हणजे ग्लोबल कँपेन फॉर एज्युकेशन
-
13:22 - 13:27या मोहिमेने शिक्षणाबद्दलची पूर्ण विचारसरणी
बदलून टाकली आहे. -
13:27 - 13:29शिक्षण हा दानधर्म नसून,
एक मानवी अधिकार ठरला आहे. -
13:29 - 13:34आणि त्यामुळे शाळेत न जाणाऱ्या मुलांची
संख्या कमी होण्यात ठोस मदत झाली आहे. -
13:34 - 13:38गेल्या १५ वर्षांत ही संख्या
अर्धी झाली आहे. -
13:38 - 13:42(टाळ्या)
-
13:44 - 13:47२७ व्या वर्षी मला आलेल्या संतापामुळे
-
13:47 - 13:52एक मुलगी
वेश्यागृहात विकली जाण्यापासून वाचली. -
13:52 - 13:57आणि त्यामुळे मला एक नवीन कल्पना सुचली.
-
13:57 - 14:01धाड घालून सुटका करण्याचं एक नवीन तंत्र.
-
14:01 - 14:04मुलांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी.
-
14:05 - 14:11आणि मला सांगायला अभिमान वाटतो,
की सुदैवाने एक नव्हे, दहा-वीस नव्हे, तर -
14:11 - 14:17८३, ००० बालमजुरांना
मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुक्त केलं आहे. -
14:17 - 14:20आणि त्यांना त्यांच्या कुटुंबांकडे,
मातांकडे सुपूर्द केलं आहे. -
14:20 - 14:23(टाळ्या)
-
14:26 - 14:28याबद्दल जागतिक धोरणं हवीत,
हे मला ठाऊक होतं. -
14:28 - 14:31आम्ही जगभर बालमजुरीच्या विरोधात
पदयात्रा आयोजित केल्या. -
14:31 - 14:37यातून एक नवा आंतरराष्ट्रीय ठराव
निर्माण झाला. -
14:37 - 14:41अत्यंत वाईट परिस्थितीतल्या मुलांचं
संरक्षण करणारा. -
14:42 - 14:46याचा ठोस परिणाम म्हणजे
जगभरातल्या बालमजुरांची संख्या -
14:46 - 14:52गेल्या १५ वर्षांत १/३ ने कमी झाली आहे.
-
14:52 - 14:56(टाळ्या)
-
14:56 - 15:00तर, प्रत्येक वेळी,
-
15:00 - 15:04संतापाने सुरुवात झाली.
-
15:04 - 15:06त्याचं कल्पनेत रुपांतर झालं.
-
15:06 - 15:10मग, कृती.
-
15:10 - 15:12तर, संताप, पुढे काय?
-
15:12 - 15:15कल्पना, आणि..
-
15:15 - 15:16श्रोते: कृती
-
15:16 - 15:21कै. स.: संताप, कल्पना, कृती.
जे करण्याचा मी प्रयत्न केला. -
15:22 - 15:25संताप ही एक शक्ती आहे,
संताप ही एक ऊर्जा आहे. -
15:25 - 15:28आणि निसर्ग नियमानुसार,
-
15:28 - 15:33ऊर्जा निर्माण करता येत नाही,
किंवा नष्टही करता येत नाही. -
15:33 - 15:40तर मग, संतापाच्या ऊर्जेचं परिवर्तन करून,
तिला कामाला का जुंपू नये? -
15:40 - 15:44एक जास्त चांगलं, सुंदर, निःपक्ष
आणि न्यायपूर्ण जग निर्माण करण्यासाठी. -
15:45 - 15:47आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात
संताप असतोच. -
15:47 - 15:53आणि आता थोडक्यात एक गुपित सांगतो.
-
15:53 - 16:01आपण अहंकाराच्या अरुंद कवचात
बंदिस्त राहिलो, -
16:01 - 16:05स्वार्थाच्या वर्तुळात फिरत राहिलो,
-
16:05 - 16:13तर संतापाचं रुपांतर
तिरस्कार, हिंसा, सूड, नाश यात होईल. -
16:14 - 16:17पण आपण ही वर्तुळं भेदू शकलो,
-
16:17 - 16:22तर त्याच संतापाचं रूपांतर
एका महान शक्तीमध्ये होईल. -
16:22 - 16:27आपण आपल्या अंगभूत करुणेद्वारे
ही वर्तुळं भेदू शकतो. -
16:27 - 16:31आणि जगाशी करुणेतून संबंध जोडू शकतो.
जग जास्त चांगलं बनवू शकतो. -
16:31 - 16:34तोच संताप करुणेत रूपांतरित करता येऊ शकतो.
-
16:34 - 16:39तर प्रिय मित्रांनो, बंधुंनो आणि भगिनींनो,
नोबेल विजेता या नात्याने, पुन्हा एकदा -
16:40 - 16:43मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा
-
16:44 - 16:47मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा.
-
16:48 - 16:52आपल्यापैकी सर्वात जास्त संतापी तो,
-
16:52 - 17:00जो आपल्या संतापाचं रुपांतर
कल्पना आणि कृतीमध्ये करेल. -
17:00 - 17:02अनेक धन्यवाद.
-
17:02 - 17:06(टाळ्या)
-
17:15 - 17:19ख्रिस एण्डर्सन: गेली अनेक वर्षे
आपण अनेकांचं प्रेरणास्थान आहात. -
17:19 - 17:22तुम्हाला प्रेरणा कोणापासून किंवा
कशापासून मिळते? आणि का? -
17:23 - 17:24कै.स. : प्रश्न चांगला आहे.
-
17:24 - 17:28ख्रिस, तुम्हाला मी सत्य सांगतो,
-
17:28 - 17:33दरवेळी जेव्हा मी एखाद्या मुलाला
मुक्त करतो, -
17:33 - 17:37तेव्हा आपल्या मातेला पुन्हा भेटण्याची आशा
सोडून दिलेल्या त्या मुलाचं, -
17:37 - 17:41मुक्त झाल्यावरचं हास्य,
-
17:41 - 17:44आणि आपलं मूल
-
17:44 - 17:51परत येऊन आपल्या मांडीवर बसेल
ही आशा पूर्णपणे गमावलेल्या मातेच्या -
17:51 - 17:53गालावर ओघळणारा तो आनंदाचा पहिला अश्रु.
-
17:53 - 17:58त्यांच्या अनावर झालेल्या भावना.
-
17:58 - 18:01त्यात मला देवाची झलक दिसते.
तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा. -
18:01 - 18:06आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे,
एकदा नव्हे, तर हजारो वेळा -
18:06 - 18:10मला माझा हा देव पाहण्याचं
भाग्य लाभलं आहे. -
18:10 - 18:12आणि तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा.
-
18:12 - 18:14धन्यवाद.
-
18:14 - 18:16(टाळ्या)
- Title:
- जगात शांतता कशी आणायची? संतापून.
- Speaker:
- कैलाश सत्यार्थी
- Description:
-
भारतात, एका उच्च जातीत जन्मलेल्या तरुणाने ८३, ००० मुलांना गुलामगिरीतून कसं वाचवलं? जगात चांगला बदल घडवू इच्छिणाऱ्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी एक आश्चर्यकारक सल्ला देताहेत: अन्यायाविरुद्ध संतापून उठा. या ताकदवान भाषणात ते दाखवून देताहेत, एका संतापभरल्या आयुष्यातून एक शांतताजनक आयुष्य कसं निर्माण झालं.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 18:29
Abhinav Garule approved Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry | ||
Retired user edited Marathi subtitles for How to make peace? Get angry |