WEBVTT 00:00:01.111 --> 00:00:06.451 आज मी संताप या विषयावर बोलणार आहे. 00:00:09.128 --> 00:00:11.130 मी अकरा वर्षांचा असताना 00:00:11.130 --> 00:00:14.462 माझ्या काही मित्रांना शिक्षण सोडताना पाहिलं. 00:00:14.462 --> 00:00:18.684 त्यांच्या पालकांना पुस्तकांचा खर्च परवडत नसे, म्हणून. 00:00:18.684 --> 00:00:21.186 ते पाहून मला संताप आला. 00:00:23.316 --> 00:00:26.068 २७ व्या वर्षी, मी 00:00:26.068 --> 00:00:31.280 एका गुलामीत जगणाऱ्या अगतिक पित्याची अवस्था ऐकली. 00:00:31.280 --> 00:00:36.292 त्याच्या कन्येला एका वेश्यागृहाला विकलं जात होतं 00:00:36.302 --> 00:00:38.683 हे ऐकून मला संताप आला. 00:00:40.423 --> 00:00:42.763 पन्नासाव्या वर्षी, 00:00:42.763 --> 00:00:47.586 मी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलो 00:00:47.586 --> 00:00:50.532 माझ्या मुलासमवेत. 00:00:50.532 --> 00:00:52.999 याचा मला संताप आला. NOTE Paragraph 00:00:55.299 --> 00:01:00.484 प्रिय मित्रांनो, संताप हा वाईट असतो असं आपल्याला शतकानुशतकं शिकवलं गेलं. 00:01:01.274 --> 00:01:03.486 आपले पालक, गुरुजन आणि धर्मगुरू - 00:01:03.486 --> 00:01:09.371 सर्वानीच आपल्याला, संतापावर ताबा ठेवून तो दडपून कसा टाकावा, हे शिकवलं 00:01:12.241 --> 00:01:14.146 पण मी विचारतो, "का?" 00:01:15.596 --> 00:01:20.513 आपण आपल्या संतापाचं रुपांतर समाजाच्या भल्यात का करू शकत नाही? 00:01:20.513 --> 00:01:22.109 आपण आपला संताप, 00:01:22.109 --> 00:01:25.615 जगातल्या वाईट गोष्टींशी सामना करून, त्या बदलण्यासाठी का वापरू शकत नाही? 00:01:29.705 --> 00:01:32.176 हे करण्याचा मी प्रयत्न केला. NOTE Paragraph 00:01:34.036 --> 00:01:35.847 मित्रांनो, 00:01:37.367 --> 00:01:43.370 माझ्या बऱ्याचशा तेजस्वी कल्पनांचा जन्म संतापापोटीच झाला. 00:01:43.814 --> 00:01:53.514 उदाहरणार्थ, जेव्हा मी ३५ व्या वर्षी, एका छोट्या कारागृहात बंदी होतो, 00:01:54.564 --> 00:01:57.067 ती संपूर्ण रात्र मी संतापात काढली. 00:01:57.957 --> 00:02:01.017 पण त्यातून एका नवीन कल्पनेचा जन्म झाला. 00:02:01.017 --> 00:02:04.176 पण त्याबद्दल मी नंतर बोलेन. 00:02:04.176 --> 00:02:11.041 प्रथम, मी स्वतःचं नाव कसं ठेवलं, त्या गोष्टीपासून सुरुवात करू. NOTE Paragraph 00:02:13.481 --> 00:02:17.622 माझ्या बालपणापासून मी महात्मा गांधींचा जोरदार चाहता आहे. 00:02:19.032 --> 00:02:24.321 गांधीजी स्वतंत्र भारत चळवळीचे नेते होते. 00:02:25.261 --> 00:02:27.299 पण त्याहून महत्त्वाचं, 00:02:27.299 --> 00:02:34.034 त्यांनी शिकवलं, ते समाजाच्या सर्वात दुर्बल घटकांना 00:02:34.034 --> 00:02:38.305 आणि सर्वाधिक वंचित लोकांना मानाची आणि आदराची वागणूक देणं. 00:02:39.595 --> 00:02:44.562 आणि म्हणूनच, १९६९ साली, 00:02:44.562 --> 00:02:47.829 जेव्हा भारतभर महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली जात होती, 00:02:47.829 --> 00:02:50.117 - त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो- 00:02:50.117 --> 00:02:52.474 तेव्हा मला एक कल्पना सुचली. 00:02:53.774 --> 00:02:57.244 आपण ती वेगळ्या रीतीने का साजरी करून नये? 00:02:57.244 --> 00:03:02.672 मला ठाऊक होतं, आणि कदाचित तुम्हीही जाणत असाल, 00:03:02.672 --> 00:03:10.665 की भारतात पुष्कळ लोक निम्नतम जातींमध्ये जन्मतात. 00:03:12.185 --> 00:03:15.324 आणि त्यांना अस्पृश्य म्हणून वागवलं जातं. 00:03:15.324 --> 00:03:16.656 तर या लोकांना, 00:03:16.656 --> 00:03:21.066 देवळात जाण्याची परवानगी मिळणं तर सोडाच, 00:03:21.066 --> 00:03:28.250 त्यांना उच्च जातीच्या लोकांच्या घरी किंवा दुकानांत देखील जाता येत नाही. NOTE Paragraph 00:03:28.250 --> 00:03:33.564 तर, माझ्या गावच्या नेत्यांचा माझ्यावर प्रभाव पडला. 00:03:33.564 --> 00:03:38.102 ते जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा जोरदार विरोध करीत असत. 00:03:38.102 --> 00:03:40.274 आणि गांधीवादी आदर्शांबद्दल बोलत असत. 00:03:41.774 --> 00:03:44.944 तर ती प्रेरणा घेऊन मी ठरवलं, आपण लोकांसमोर एक आदर्श ठेवू. 00:03:44.944 --> 00:03:51.389 अस्पृश्य समाजाने रांधून वाढलेलं अन्न 00:03:51.389 --> 00:03:54.619 ग्रहण करण्याचं या नेत्यांना आमंत्रण देऊ. 00:03:54.619 --> 00:03:59.551 मी काही निम्न जातीच्या, तथाकथित अस्पृश्य, लोकांकडे गेलो. 00:04:01.421 --> 00:04:05.807 त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं. 00:04:05.807 --> 00:04:09.760 ते म्हणाले, " छे छे. हे अशक्य आहे. असं आजपर्यंत कधीच घडलं नाही." 00:04:11.070 --> 00:04:12.784 मी म्हणालो, " हे नेते पहा," 00:04:12.784 --> 00:04:15.221 हे महान आहेत. यांचा अस्पृश्यतेला विरोध आहे. 00:04:15.221 --> 00:04:17.911 ते येतील. कुणीच आलं नाही, तर आपण एक उदाहरण घालून देऊ. 00:04:20.891 --> 00:04:26.751 त्या लोकांना मी अगदी भोळसट वाटलो. 00:04:28.161 --> 00:04:30.651 शेवटी एकदाचे ते तयार झाले. NOTE Paragraph 00:04:30.651 --> 00:04:36.352 मी आणि माझे मित्र सायकली घेऊन गेलो. त्या राजकीय नेत्यांना आमंत्रण देऊन आलो. 00:04:37.982 --> 00:04:41.126 त्यातल्या प्रत्येकाने आमंत्रण स्वीकारल्याचं पाहून 00:04:41.126 --> 00:04:45.722 मी उत्तेजित झालो, नव्हे, माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. 00:04:47.192 --> 00:04:50.083 मला वाटलं, "किती महान कल्पना. आपण एक आदर्श समाजासमोर ठेवू. 00:04:50.083 --> 00:04:53.711 आपण समाजात परिवर्तन घडवून आणू." NOTE Paragraph 00:04:55.451 --> 00:04:57.004 तो दिवस उगवला. 00:04:57.724 --> 00:05:03.467 हे सारे अस्पृश्य, तीन स्त्रिया आणि दोन पुरुष, 00:05:03.467 --> 00:05:06.816 यायला कबूल झाले. 00:05:07.436 --> 00:05:13.075 त्यांनी आपल्याजवळचे सर्वोत्तम कपडे घातले होते, असं मला स्मरतं. 00:05:14.475 --> 00:05:16.740 त्यांनी नवीन भांडी आणली होती. 00:05:18.000 --> 00:05:20.339 त्यांनी शेकडो वेळा आंघोळी केल्या होत्या. 00:05:20.339 --> 00:05:23.300 कारण असं काही करणं हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं. 00:05:23.300 --> 00:05:25.944 परिवर्तनाचा क्षण आला होता. 00:05:27.254 --> 00:05:29.702 ते एकत्र जमले आणि त्यांनी स्वयंपाक केला. 00:05:30.402 --> 00:05:33.000 सात वाजले. 00:05:33.000 --> 00:05:35.876 आठ वाजेपर्यंत आम्ही वाट बघत राहिलो. 00:05:35.876 --> 00:05:40.857 कारण नेते उशीरा येणं हे तर नेहमीचंच आहे. 00:05:40.857 --> 00:05:42.539 म्हणजे एखादा तास उशीरा येणं. NOTE Paragraph 00:05:43.239 --> 00:05:49.922 तर, आठ वाजल्यानंतर आम्ही सायकली काढल्या आणि त्या नेत्यांच्या घरी गेलो. 00:05:49.922 --> 00:05:52.278 फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी. 00:05:54.248 --> 00:05:58.945 त्यांच्यापैकी एका नेत्याच्या पत्नीने मला सांगितलं, 00:05:58.945 --> 00:06:03.960 "माफ करा, त्यांचं डोकं दुखतं आहे. बहुतेक ते येऊ शकणार नाहीत." 00:06:03.960 --> 00:06:06.037 मी दुसऱ्या नेत्याकडे गेलो. 00:06:06.037 --> 00:06:10.097 आणि त्यांची पत्नी म्हणाली, "बरं. तुम्ही जा. ते नक्की येतील." 00:06:11.357 --> 00:06:15.469 म्हणून मला वाटलं, हा जेवणाचा कार्यक्रम नक्की पार पडणार. 00:06:15.469 --> 00:06:19.952 तितक्याशा मोठ्या प्रमाणावर का नसेना. मी आमच्या ठिकाणी परत गेलो. NOTE Paragraph 00:06:21.352 --> 00:06:27.319 हे ठिकाण म्हणजे नवीनच बांधलेलं महात्मा गांधी उद्यान. 00:06:28.559 --> 00:06:30.053 दहा वाजले. 00:06:31.483 --> 00:06:34.822 एकही नेता आला नाही. 00:06:36.132 --> 00:06:38.835 या गोष्टीचा मला संताप आला. 00:06:40.275 --> 00:06:46.679 मी महात्मा गांधींच्या पुतळ्याला टेकून उभा होतो. 00:06:49.839 --> 00:06:54.310 मी मनातून थकलो होतो. पार गळून गेलो होतो. 00:06:56.890 --> 00:07:02.375 जिथे जेवण ठेवलं होतं, तिथे मी बसलो. 00:07:05.695 --> 00:07:07.785 मी माझ्या भावना काबूत ठेवल्या होत्या. 00:07:07.785 --> 00:07:12.279 पण पहिला घास घेताक्षणी 00:07:12.279 --> 00:07:15.210 मला रडू कोसळलं. 00:07:15.210 --> 00:07:20.149 आणि अचानक मला खांद्यावर एका हाताचा स्पर्श जाणवला. 00:07:20.149 --> 00:07:26.047 तो होता जखमा भरणारा मातेचा स्पर्श. एका अस्पृश्य स्त्रीचा स्पर्श. 00:07:26.047 --> 00:07:30.278 आणि ती म्हणाली, "कैलाश, कशासाठी रडतो आहेस तू?" 00:07:31.598 --> 00:07:34.011 तू तुझं काम केलंस. 00:07:34.011 --> 00:07:37.136 तू अस्पृश्यांच्या हातचं जेवलास. 00:07:37.136 --> 00:07:40.127 आमच्या आठवणीत असं कधीच घडलं नव्हतं. 00:07:41.207 --> 00:07:45.789 ती म्हणाली, "आज तू जिंकलास." 00:07:45.789 --> 00:07:50.759 आणि माझ्या मित्रांनो, तिचं म्हणणं बरोबर होतं. NOTE Paragraph 00:07:52.059 --> 00:07:55.789 मध्यरात्रीनंतर मी घरी परतलो. 00:07:55.789 --> 00:08:00.363 अंगणात बसलेले अनेक उच्चवर्णीय वयोवृद्ध लोक पाहून 00:08:00.363 --> 00:08:02.517 मला धक्काच बसला. 00:08:02.517 --> 00:08:05.613 माझी आई आणि घरातल्या इतर वयस्कर स्त्रिया रडत होत्या 00:08:05.613 --> 00:08:10.071 आणि त्या वयोवृद्ध लोकांच्या विनवण्या करीत होत्या. 00:08:10.071 --> 00:08:13.005 कारण त्यांनी आमच्या घराण्याला वाळीत टाकण्याची धमकी दिली होती. 00:08:14.345 --> 00:08:19.477 आणि घराणं वाळीत टाकणं ही सामाजिक शिक्षा, 00:08:19.477 --> 00:08:22.591 कल्पनेतल्या कुठल्याही शिक्षेहून मोठी आहे. 00:08:23.975 --> 00:08:28.821 मला एकट्याला शिक्षा द्यायला ते कसेबसे राजी झाले. 00:08:28.821 --> 00:08:33.336 ही शिक्षा म्हणजे शुद्धीकरण. म्हणजे मी गावापासून ६०० मैलावर जायचं. 00:08:33.336 --> 00:08:37.267 गंगा नदीत बुडी मारून पवित्र व्हायचं. 00:08:37.267 --> 00:08:41.691 आणि त्यानंतर १०१ पुरोहितांना भोजन द्यायचं. 00:08:41.691 --> 00:08:45.239 त्यांचे पाय धुवून, ते चरणतीर्थ प्यायचं. NOTE Paragraph 00:08:46.529 --> 00:08:49.528 हा शुद्ध मूर्खपणा होता. 00:08:49.528 --> 00:08:52.417 मी ही शिक्षा नाकारली. 00:08:53.267 --> 00:08:55.397 मग त्यांनी मला कोणती शिक्षा केली? 00:08:55.397 --> 00:09:01.194 त्यांनी मला माझ्याच स्वयंपाकघरात आणि भोजनघरात जायला बंदी केली. 00:09:01.194 --> 00:09:04.246 माझी भांडीकुंडी वेगळी ठेवण्यात आली. 00:09:04.246 --> 00:09:09.300 पण ज्या रात्री मला संताप आला होता, तेव्हा त्यांना मला वाळीत टाकायचं होतं. 00:09:10.600 --> 00:09:14.633 पण मी संपूर्ण जातीव्यवस्थेलाच वाळीत टाकण्याचं ठरवलं. 00:09:15.503 --> 00:09:20.228 (टाळ्या) NOTE Paragraph 00:09:20.988 --> 00:09:26.003 आणि ते शक्य होतं, कारण त्याची सुरुवात 00:09:26.003 --> 00:09:28.119 स्वतःचं आडनाव बदलून करता आली असती. 00:09:28.119 --> 00:09:31.784 कारण भारतात, बरीचशी आडनावं ही जातींची नावं असतात. 00:09:31.784 --> 00:09:34.306 म्हणून मी स्वतःचं आडनाव गाळून टाकलं. 00:09:34.306 --> 00:09:40.810 आणि त्यानंतर मी स्वतःला एक नवीन आडनाव दिलं : सत्यार्थी. 00:09:40.810 --> 00:09:43.776 त्याचा अर्थ, सत्याचा शोध घेणारा. 00:09:45.216 --> 00:09:49.248 (टाळ्या) 00:09:49.248 --> 00:09:52.585 संतापातून परिवर्तन घडवण्याची सुरुवात ही अशी झाली. NOTE Paragraph 00:09:54.095 --> 00:09:56.704 मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी ओळखेल का, 00:09:56.704 --> 00:10:01.530 बाल अधिकार कार्यकर्ता होण्यापूर्वी मी काय करीत होतो? 00:10:02.410 --> 00:10:03.788 कोणाला ठाऊक आहे का? 00:10:04.898 --> 00:10:06.169 नाही. 00:10:06.169 --> 00:10:12.558 मी एक इंजिनीयर होतो. इलेक्ट्रिकल इंजिनीयर. 00:10:12.558 --> 00:10:17.662 आणि त्यावेळी मी शिकलो, की ऊर्जा 00:10:17.662 --> 00:10:22.146 कोळसा जाळून निर्माण होणारी, 00:10:22.146 --> 00:10:26.250 अणुभट्टीतल्या स्फोटांतून निर्माण होणारी, 00:10:26.250 --> 00:10:29.442 रोरावणाऱ्या नदीच्या प्रवाहातली, 00:10:29.442 --> 00:10:33.066 सोसाट्याच्या वाऱ्यामधली, 00:10:33.066 --> 00:10:38.083 तिचं परिवर्तन केल्यावर, लक्षावधी लोकांची आयुष्यं उजळू शकते. 00:10:38.963 --> 00:10:43.495 मी हे ही शिकलो की, अत्यंत दुर्दम्य रूपातली ऊर्जा कशा प्रकारे 00:10:43.495 --> 00:10:47.970 समाजाच्या हितासाठी चांगल्या कामी जुंपता येते. NOTE Paragraph 00:10:52.925 --> 00:10:59.692 तर आता, मी तुरुंगात कसा गेलो, त्या गोष्टीकडे वळतो. 00:10:59.692 --> 00:11:03.919 मी डझनभर मुलांना गुलामगिरीतून सोडवल्याच्या आनंदात होतो. 00:11:03.919 --> 00:11:06.890 त्यांना त्यांच्या पालकांच्या हातात सोपवलं होतं. 00:11:06.890 --> 00:11:10.078 एखाद्या मुलाला मुक्त केल्यावर मला अवर्णनीय आनंद होतो. 00:11:11.238 --> 00:11:12.428 मी खूप आनंदात होतो. 00:11:13.458 --> 00:11:19.021 पण दिल्लीत परतण्यासाठी आगगाडीची वाट पाहत असताना, 00:11:19.021 --> 00:11:22.264 मला डझनावारी मुलं येताना दिसली. 00:11:22.264 --> 00:11:25.562 कोणीतरी त्यांचा अपव्यापार करीत होतं. 00:11:25.562 --> 00:11:28.415 त्या लोकांना मी थांबवलं. 00:11:28.415 --> 00:11:30.517 पोलिसांजवळ त्यांची तक्रार केली. 00:11:30.517 --> 00:11:35.071 पण त्या पोलिसांनी मला मदत करण्याऐवजी 00:11:35.071 --> 00:11:40.773 मला या छोट्या कोठडीत टाकलं, एखाद्या जनावरासारखं. 00:11:41.573 --> 00:11:43.121 आणि त्याच संतापभरल्या रात्रीतून 00:11:43.121 --> 00:11:46.972 एका अत्यंत तेजस्वी आणि महान कल्पनेचा जन्म झाला. 00:11:47.632 --> 00:11:53.100 मला वाटलं, मी १० मुलांना मुक्त करीत असेन, पण आणखी ५० मुलं त्यात ओढली जात असतील, 00:11:53.100 --> 00:11:54.560 तर त्यात काही अर्थ नाही. 00:11:54.560 --> 00:11:57.368 ग्राहकांच्या ताकदीवर माझा विश्वास आहे. 00:11:57.368 --> 00:12:00.852 आणि तुम्हाला सांगतो, एक गोष्ट 00:12:00.852 --> 00:12:05.968 माझ्या हातूनच नव्हे, तर जगभरात प्रथमच घडली. 00:12:05.968 --> 00:12:10.041 ग्राहकांना माहिती देऊन, जागरूक करून, 00:12:10.041 --> 00:12:14.501 बालमजूर न वापरता बनवलेल्या गालिच्यांची मागणी करण्यासाठी चळवळ उभारली गेली. 00:12:15.691 --> 00:12:19.083 युरोप आणि अमेरिकेत आम्हाला यश मिळालं आहे. 00:12:19.083 --> 00:12:23.768 आणि दक्षिण आशियाई देशांत 00:12:23.768 --> 00:12:27.024 बालमजुरीत ८० टक्के घट झाली आहे. 00:12:27.024 --> 00:12:30.406 (टाळ्या) NOTE Paragraph 00:12:32.736 --> 00:12:39.397 इतकंच नव्हे, तर हा नव्याने जन्मलेला ग्राहकाचा संताप, किंवा ही ग्राहक चळवळ 00:12:39.397 --> 00:12:43.505 इतर देशांत आणि इतर उद्योगांमध्ये पसरली आहे. 00:12:43.505 --> 00:12:48.931 चॉकोलेट असो, कपडे असोत, पादत्राणे असोत, त्याहूनही पलिकडे पोहोचली आहे. 00:12:51.271 --> 00:12:52.823 वयाच्या ११व्या वर्षी मी संतापलो. 00:12:52.823 --> 00:12:58.176 जेव्हा मला कळलं की प्रत्येक मुलासाठी शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, 00:12:58.176 --> 00:13:05.821 वापरलेली पुस्तकं जमा करून, गरीब मुलांना मदत करण्याची कल्पना मला सुचली. 00:13:05.821 --> 00:13:09.270 वयाच्या ११व्या वर्षी मी पुस्तक-पेढी स्थापन केली. 00:13:10.570 --> 00:13:11.813 मी इतकं करून थांबलो नाही. 00:13:11.813 --> 00:13:14.046 कालांतराने, मी सहसंस्थापक झालो, 00:13:14.046 --> 00:13:18.580 नागरी समाजातल्या एकमेव आणि सर्वात मोठ्या शैक्षणिक मोहिमेचा. 00:13:18.580 --> 00:13:21.571 ही मोहीम म्हणजे ग्लोबल कँपेन फॉर एज्युकेशन 00:13:22.221 --> 00:13:26.866 या मोहिमेने शिक्षणाबद्दलची पूर्ण विचारसरणी बदलून टाकली आहे. 00:13:26.866 --> 00:13:29.257 शिक्षण हा दानधर्म नसून, एक मानवी अधिकार ठरला आहे. 00:13:29.257 --> 00:13:34.026 आणि त्यामुळे शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या कमी होण्यात ठोस मदत झाली आहे. 00:13:34.026 --> 00:13:37.614 गेल्या १५ वर्षांत ही संख्या अर्धी झाली आहे. 00:13:37.614 --> 00:13:41.693 (टाळ्या) NOTE Paragraph 00:13:43.753 --> 00:13:46.867 २७ व्या वर्षी मला आलेल्या संतापामुळे 00:13:46.867 --> 00:13:52.235 एक मुलगी वेश्यागृहात विकली जाण्यापासून वाचली. 00:13:52.235 --> 00:13:57.018 आणि त्यामुळे मला एक नवीन कल्पना सुचली. 00:13:57.018 --> 00:14:01.271 धाड घालून सुटका करण्याचं एक नवीन तंत्र. 00:14:01.271 --> 00:14:04.188 मुलांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी. 00:14:04.758 --> 00:14:10.614 आणि मला सांगायला अभिमान वाटतो, की सुदैवाने एक नव्हे, दहा-वीस नव्हे, तर 00:14:10.614 --> 00:14:16.957 ८३, ००० बालमजुरांना मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुक्त केलं आहे. 00:14:16.962 --> 00:14:20.093 आणि त्यांना त्यांच्या कुटुंबांकडे, मातांकडे सुपूर्द केलं आहे. 00:14:20.093 --> 00:14:23.452 (टाळ्या) NOTE Paragraph 00:14:25.692 --> 00:14:27.979 याबद्दल जागतिक धोरणं हवीत, हे मला ठाऊक होतं. 00:14:27.979 --> 00:14:31.011 आम्ही जगभर बालमजुरीच्या विरोधात पदयात्रा आयोजित केल्या. 00:14:31.011 --> 00:14:37.073 यातून एक नवा आंतरराष्ट्रीय ठराव निर्माण झाला. 00:14:37.073 --> 00:14:41.172 अत्यंत वाईट परिस्थितीतल्या मुलांचं संरक्षण करणारा. 00:14:42.262 --> 00:14:46.351 याचा ठोस परिणाम म्हणजे जगभरातल्या बालमजुरांची संख्या 00:14:46.351 --> 00:14:51.891 गेल्या १५ वर्षांत १/३ ने कमी झाली आहे. 00:14:51.891 --> 00:14:56.311 (टाळ्या) NOTE Paragraph 00:14:56.311 --> 00:14:59.721 तर, प्रत्येक वेळी, 00:14:59.721 --> 00:15:03.510 संतापाने सुरुवात झाली. 00:15:03.510 --> 00:15:06.159 त्याचं कल्पनेत रुपांतर झालं. 00:15:06.159 --> 00:15:09.565 मग, कृती. 00:15:09.565 --> 00:15:12.441 तर, संताप, पुढे काय? 00:15:12.441 --> 00:15:14.920 कल्पना, आणि.. 00:15:14.920 --> 00:15:16.278 श्रोते: कृती 00:15:16.278 --> 00:15:20.835 कै. स.: संताप, कल्पना, कृती. जे करण्याचा मी प्रयत्न केला. NOTE Paragraph 00:15:22.254 --> 00:15:24.751 संताप ही एक शक्ती आहे, संताप ही एक ऊर्जा आहे. 00:15:24.751 --> 00:15:27.552 आणि निसर्ग नियमानुसार, 00:15:27.552 --> 00:15:32.795 ऊर्जा निर्माण करता येत नाही, किंवा नष्टही करता येत नाही. 00:15:32.795 --> 00:15:39.685 तर मग, संतापाच्या ऊर्जेचं परिवर्तन करून, तिला कामाला का जुंपू नये? 00:15:39.685 --> 00:15:44.221 एक जास्त चांगलं, सुंदर, निःपक्ष आणि न्यायपूर्ण जग निर्माण करण्यासाठी. NOTE Paragraph 00:15:44.861 --> 00:15:47.341 आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात संताप असतोच. 00:15:47.341 --> 00:15:53.241 आणि आता थोडक्यात एक गुपित सांगतो. 00:15:53.241 --> 00:16:00.795 आपण अहंकाराच्या अरुंद कवचात बंदिस्त राहिलो, 00:16:00.795 --> 00:16:05.225 स्वार्थाच्या वर्तुळात फिरत राहिलो, 00:16:05.225 --> 00:16:12.709 तर संतापाचं रुपांतर तिरस्कार, हिंसा, सूड, नाश यात होईल. 00:16:13.539 --> 00:16:16.595 पण आपण ही वर्तुळं भेदू शकलो, 00:16:16.595 --> 00:16:22.481 तर त्याच संतापाचं रूपांतर एका महान शक्तीमध्ये होईल. 00:16:22.481 --> 00:16:26.828 आपण आपल्या अंगभूत करुणेद्वारे ही वर्तुळं भेदू शकतो. 00:16:26.828 --> 00:16:30.678 आणि जगाशी करुणेतून संबंध जोडू शकतो. जग जास्त चांगलं बनवू शकतो. 00:16:30.678 --> 00:16:34.351 तोच संताप करुणेत रूपांतरित करता येऊ शकतो. NOTE Paragraph 00:16:34.351 --> 00:16:38.936 तर प्रिय मित्रांनो, बंधुंनो आणि भगिनींनो, नोबेल विजेता या नात्याने, पुन्हा एकदा 00:16:39.956 --> 00:16:42.711 मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा 00:16:43.841 --> 00:16:46.983 मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा. 00:16:48.003 --> 00:16:52.299 आपल्यापैकी सर्वात जास्त संतापी तो, 00:16:52.299 --> 00:16:59.510 जो आपल्या संतापाचं रुपांतर कल्पना आणि कृतीमध्ये करेल. NOTE Paragraph 00:17:00.440 --> 00:17:02.275 अनेक धन्यवाद. NOTE Paragraph 00:17:02.275 --> 00:17:06.245 (टाळ्या) NOTE Paragraph 00:17:15.115 --> 00:17:18.924 ख्रिस एण्डर्सन: गेली अनेक वर्षे आपण अनेकांचं प्रेरणास्थान आहात. 00:17:18.924 --> 00:17:22.109 तुम्हाला प्रेरणा कोणापासून किंवा कशापासून मिळते? आणि का? NOTE Paragraph 00:17:22.629 --> 00:17:24.341 कै.स. : प्रश्न चांगला आहे. 00:17:24.341 --> 00:17:28.335 ख्रिस, तुम्हाला मी सत्य सांगतो, 00:17:28.335 --> 00:17:32.849 दरवेळी जेव्हा मी एखाद्या मुलाला मुक्त करतो, 00:17:32.849 --> 00:17:37.028 तेव्हा आपल्या मातेला पुन्हा भेटण्याची आशा सोडून दिलेल्या त्या मुलाचं, 00:17:37.028 --> 00:17:41.335 मुक्त झाल्यावरचं हास्य, 00:17:41.335 --> 00:17:43.890 आणि आपलं मूल 00:17:43.890 --> 00:17:50.501 परत येऊन आपल्या मांडीवर बसेल ही आशा पूर्णपणे गमावलेल्या मातेच्या 00:17:50.501 --> 00:17:52.656 गालावर ओघळणारा तो आनंदाचा पहिला अश्रु. 00:17:52.656 --> 00:17:57.809 त्यांच्या अनावर झालेल्या भावना. 00:17:57.809 --> 00:18:01.154 त्यात मला देवाची झलक दिसते. तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा. 00:18:01.154 --> 00:18:06.032 आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, एकदा नव्हे, तर हजारो वेळा 00:18:06.032 --> 00:18:09.628 मला माझा हा देव पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. 00:18:09.628 --> 00:18:11.640 आणि तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा. 00:18:11.640 --> 00:18:13.652 धन्यवाद. NOTE Paragraph 00:18:13.652 --> 00:18:15.665 (टाळ्या)