0:00:01.111,0:00:06.451 आज मी संताप या विषयावर बोलणार आहे. 0:00:09.128,0:00:11.130 मी अकरा वर्षांचा असताना 0:00:11.130,0:00:14.462 माझ्या काही मित्रांना [br]शिक्षण सोडताना पाहिलं. 0:00:14.462,0:00:18.684 त्यांच्या पालकांना पुस्तकांचा खर्च [br]परवडत नसे, म्हणून. 0:00:18.684,0:00:21.186 ते पाहून मला संताप आला. 0:00:23.316,0:00:26.068 २७ व्या वर्षी, मी 0:00:26.068,0:00:31.280 एका गुलामीत जगणाऱ्या [br]अगतिक पित्याची अवस्था ऐकली. 0:00:31.280,0:00:36.292 त्याच्या कन्येला एका वेश्यागृहाला [br]विकलं जात होतं 0:00:36.302,0:00:38.683 हे ऐकून मला संताप आला. 0:00:40.423,0:00:42.763 पन्नासाव्या वर्षी, 0:00:42.763,0:00:47.586 मी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलो 0:00:47.586,0:00:50.532 माझ्या मुलासमवेत. 0:00:50.532,0:00:52.999 याचा मला संताप आला. 0:00:55.299,0:01:00.484 प्रिय मित्रांनो, संताप हा वाईट असतो [br]असं आपल्याला शतकानुशतकं शिकवलं गेलं. 0:01:01.274,0:01:03.486 आपले पालक, गुरुजन आणि धर्मगुरू - 0:01:03.486,0:01:09.371 सर्वानीच आपल्याला, संतापावर ताबा ठेवून [br]तो दडपून कसा टाकावा, हे शिकवलं 0:01:12.241,0:01:14.146 पण मी विचारतो, "का?" 0:01:15.596,0:01:20.513 आपण आपल्या संतापाचं रुपांतर [br]समाजाच्या भल्यात का करू शकत नाही? 0:01:20.513,0:01:22.109 आपण आपला संताप, 0:01:22.109,0:01:25.615 जगातल्या वाईट गोष्टींशी सामना करून, [br]त्या बदलण्यासाठी का वापरू शकत नाही? 0:01:29.705,0:01:32.176 हे करण्याचा मी प्रयत्न केला. 0:01:34.036,0:01:35.847 मित्रांनो, 0:01:37.367,0:01:43.370 माझ्या बऱ्याचशा तेजस्वी कल्पनांचा जन्म [br]संतापापोटीच झाला. 0:01:43.814,0:01:53.514 उदाहरणार्थ, जेव्हा मी ३५ व्या वर्षी, [br]एका छोट्या कारागृहात बंदी होतो, 0:01:54.564,0:01:57.067 ती संपूर्ण रात्र मी संतापात काढली. 0:01:57.957,0:02:01.017 पण त्यातून एका नवीन कल्पनेचा जन्म झाला. 0:02:01.017,0:02:04.176 पण त्याबद्दल मी नंतर बोलेन. 0:02:04.176,0:02:11.041 प्रथम, मी स्वतःचं नाव कसं ठेवलं, [br]त्या गोष्टीपासून सुरुवात करू. 0:02:13.481,0:02:17.622 माझ्या बालपणापासून मी महात्मा गांधींचा [br]जोरदार चाहता आहे. 0:02:19.032,0:02:24.321 गांधीजी स्वतंत्र भारत चळवळीचे नेते होते. 0:02:25.261,0:02:27.299 पण त्याहून महत्त्वाचं, 0:02:27.299,0:02:34.034 त्यांनी शिकवलं, ते [br]समाजाच्या सर्वात दुर्बल घटकांना 0:02:34.034,0:02:38.305 आणि सर्वाधिक वंचित लोकांना [br]मानाची आणि आदराची वागणूक देणं. 0:02:39.595,0:02:44.562 आणि म्हणूनच, १९६९ साली, 0:02:44.562,0:02:47.829 जेव्हा भारतभर महात्मा गांधींची [br]जन्मशताब्दी साजरी केली जात होती, 0:02:47.829,0:02:50.117 - त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो- 0:02:50.117,0:02:52.474 तेव्हा मला एक कल्पना सुचली. 0:02:53.774,0:02:57.244 आपण ती वेगळ्या रीतीने का साजरी करून नये? 0:02:57.244,0:03:02.672 मला ठाऊक होतं, [br]आणि कदाचित तुम्हीही जाणत असाल, 0:03:02.672,0:03:10.665 की भारतात पुष्कळ लोक [br]निम्नतम जातींमध्ये जन्मतात. 0:03:12.185,0:03:15.324 आणि त्यांना अस्पृश्य म्हणून वागवलं जातं. 0:03:15.324,0:03:16.656 तर या लोकांना, 0:03:16.656,0:03:21.066 देवळात जाण्याची परवानगी मिळणं [br]तर सोडाच, 0:03:21.066,0:03:28.250 त्यांना उच्च जातीच्या लोकांच्या घरी [br]किंवा दुकानांत देखील जाता येत नाही. 0:03:28.250,0:03:33.564 तर, माझ्या गावच्या नेत्यांचा [br]माझ्यावर प्रभाव पडला. 0:03:33.564,0:03:38.102 ते जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा [br]जोरदार विरोध करीत असत. 0:03:38.102,0:03:40.274 आणि गांधीवादी आदर्शांबद्दल बोलत असत. 0:03:41.774,0:03:44.944 तर ती प्रेरणा घेऊन मी ठरवलं, [br]आपण लोकांसमोर एक आदर्श ठेवू. 0:03:44.944,0:03:51.389 अस्पृश्य समाजाने रांधून वाढलेलं अन्न 0:03:51.389,0:03:54.619 ग्रहण करण्याचं या नेत्यांना आमंत्रण देऊ. 0:03:54.619,0:03:59.551 मी काही निम्न जातीच्या, [br]तथाकथित अस्पृश्य, लोकांकडे गेलो. 0:04:01.421,0:04:05.807 त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. [br]पण हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं. 0:04:05.807,0:04:09.760 ते म्हणाले, " छे छे. हे अशक्य आहे. [br]असं आजपर्यंत कधीच घडलं नाही." 0:04:11.070,0:04:12.784 मी म्हणालो, " हे नेते पहा," 0:04:12.784,0:04:15.221 हे महान आहेत. [br]यांचा अस्पृश्यतेला विरोध आहे. 0:04:15.221,0:04:17.911 ते येतील. कुणीच आलं नाही, [br]तर आपण एक उदाहरण घालून देऊ. 0:04:20.891,0:04:26.751 त्या लोकांना मी अगदी भोळसट वाटलो. 0:04:28.161,0:04:30.651 शेवटी एकदाचे ते तयार झाले. 0:04:30.651,0:04:36.352 मी आणि माझे मित्र सायकली घेऊन गेलो. [br]त्या राजकीय नेत्यांना आमंत्रण देऊन आलो. 0:04:37.982,0:04:41.126 त्यातल्या प्रत्येकाने [br]आमंत्रण स्वीकारल्याचं पाहून 0:04:41.126,0:04:45.722 मी उत्तेजित झालो, नव्हे, [br]माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. 0:04:47.192,0:04:50.083 मला वाटलं, "किती महान कल्पना. [br]आपण एक आदर्श समाजासमोर ठेवू. 0:04:50.083,0:04:53.711 आपण समाजात परिवर्तन घडवून आणू." 0:04:55.451,0:04:57.004 तो दिवस उगवला. 0:04:57.724,0:05:03.467 हे सारे अस्पृश्य, [br]तीन स्त्रिया आणि दोन पुरुष, 0:05:03.467,0:05:06.816 यायला कबूल झाले. 0:05:07.436,0:05:13.075 त्यांनी आपल्याजवळचे सर्वोत्तम कपडे[br]घातले होते, असं मला स्मरतं. 0:05:14.475,0:05:16.740 त्यांनी नवीन भांडी आणली होती. 0:05:18.000,0:05:20.339 त्यांनी शेकडो वेळा आंघोळी केल्या होत्या. 0:05:20.339,0:05:23.300 कारण असं काही करणं [br]हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं. 0:05:23.300,0:05:25.944 परिवर्तनाचा क्षण आला होता. 0:05:27.254,0:05:29.702 ते एकत्र जमले आणि त्यांनी स्वयंपाक केला. 0:05:30.402,0:05:33.000 सात वाजले. 0:05:33.000,0:05:35.876 आठ वाजेपर्यंत आम्ही वाट बघत राहिलो. 0:05:35.876,0:05:40.857 कारण नेते उशीरा येणं हे तर नेहमीचंच आहे. 0:05:40.857,0:05:42.539 म्हणजे एखादा तास उशीरा येणं. 0:05:43.239,0:05:49.922 तर, आठ वाजल्यानंतर आम्ही सायकली काढल्या [br]आणि त्या नेत्यांच्या घरी गेलो. 0:05:49.922,0:05:52.278 फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी. 0:05:54.248,0:05:58.945 त्यांच्यापैकी एका नेत्याच्या पत्नीने [br]मला सांगितलं, 0:05:58.945,0:06:03.960 "माफ करा, त्यांचं डोकं दुखतं आहे. [br]बहुतेक ते येऊ शकणार नाहीत." 0:06:03.960,0:06:06.037 मी दुसऱ्या नेत्याकडे गेलो. 0:06:06.037,0:06:10.097 आणि त्यांची पत्नी म्हणाली, [br]"बरं. तुम्ही जा. ते नक्की येतील." 0:06:11.357,0:06:15.469 म्हणून मला वाटलं, [br]हा जेवणाचा कार्यक्रम नक्की पार पडणार. 0:06:15.469,0:06:19.952 तितक्याशा मोठ्या प्रमाणावर का नसेना.[br]मी आमच्या ठिकाणी परत गेलो. 0:06:21.352,0:06:27.319 हे ठिकाण म्हणजे [br]नवीनच बांधलेलं महात्मा गांधी उद्यान. 0:06:28.559,0:06:30.053 दहा वाजले. 0:06:31.483,0:06:34.822 एकही नेता आला नाही. 0:06:36.132,0:06:38.835 या गोष्टीचा मला संताप आला. 0:06:40.275,0:06:46.679 मी महात्मा गांधींच्या पुतळ्याला [br]टेकून उभा होतो. 0:06:49.839,0:06:54.310 मी मनातून थकलो होतो. पार गळून गेलो होतो. 0:06:56.890,0:07:02.375 जिथे जेवण ठेवलं होतं, तिथे मी बसलो. 0:07:05.695,0:07:07.785 मी माझ्या भावना काबूत ठेवल्या होत्या. 0:07:07.785,0:07:12.279 पण पहिला घास घेताक्षणी 0:07:12.279,0:07:15.210 मला रडू कोसळलं. 0:07:15.210,0:07:20.149 आणि अचानक मला खांद्यावर [br]एका हाताचा स्पर्श जाणवला. 0:07:20.149,0:07:26.047 तो होता जखमा भरणारा मातेचा स्पर्श. [br]एका अस्पृश्य स्त्रीचा स्पर्श. 0:07:26.047,0:07:30.278 आणि ती म्हणाली, [br]"कैलाश, कशासाठी रडतो आहेस तू?" 0:07:31.598,0:07:34.011 तू तुझं काम केलंस. 0:07:34.011,0:07:37.136 तू अस्पृश्यांच्या हातचं जेवलास. 0:07:37.136,0:07:40.127 आमच्या आठवणीत असं कधीच घडलं नव्हतं. 0:07:41.207,0:07:45.789 ती म्हणाली, "आज तू जिंकलास." 0:07:45.789,0:07:50.759 आणि माझ्या मित्रांनो, [br]तिचं म्हणणं बरोबर होतं. 0:07:52.059,0:07:55.789 मध्यरात्रीनंतर मी घरी परतलो. 0:07:55.789,0:08:00.363 अंगणात बसलेले अनेक उच्चवर्णीय [br]वयोवृद्ध लोक पाहून 0:08:00.363,0:08:02.517 मला धक्काच बसला. 0:08:02.517,0:08:05.613 माझी आई आणि [br]घरातल्या इतर वयस्कर स्त्रिया रडत होत्या 0:08:05.613,0:08:10.071 आणि त्या वयोवृद्ध लोकांच्या [br]विनवण्या करीत होत्या. 0:08:10.071,0:08:13.005 कारण त्यांनी आमच्या घराण्याला[br]वाळीत टाकण्याची धमकी दिली होती. 0:08:14.345,0:08:19.477 आणि घराणं वाळीत टाकणं [br]ही सामाजिक शिक्षा, 0:08:19.477,0:08:22.591 कल्पनेतल्या कुठल्याही शिक्षेहून मोठी आहे. 0:08:23.975,0:08:28.821 मला एकट्याला शिक्षा द्यायला [br]ते कसेबसे राजी झाले. 0:08:28.821,0:08:33.336 ही शिक्षा म्हणजे शुद्धीकरण. [br]म्हणजे मी गावापासून ६०० मैलावर जायचं. 0:08:33.336,0:08:37.267 गंगा नदीत बुडी मारून पवित्र व्हायचं. 0:08:37.267,0:08:41.691 आणि त्यानंतर १०१ पुरोहितांना [br]भोजन द्यायचं. 0:08:41.691,0:08:45.239 त्यांचे पाय धुवून, ते चरणतीर्थ प्यायचं. 0:08:46.529,0:08:49.528 हा शुद्ध मूर्खपणा होता. 0:08:49.528,0:08:52.417 मी ही शिक्षा नाकारली. 0:08:53.267,0:08:55.397 मग त्यांनी मला कोणती शिक्षा केली? 0:08:55.397,0:09:01.194 त्यांनी मला माझ्याच स्वयंपाकघरात [br]आणि भोजनघरात जायला बंदी केली. 0:09:01.194,0:09:04.246 माझी भांडीकुंडी वेगळी ठेवण्यात आली. 0:09:04.246,0:09:09.300 पण ज्या रात्री मला संताप आला होता, [br]तेव्हा त्यांना मला वाळीत टाकायचं होतं. 0:09:10.600,0:09:14.633 पण मी संपूर्ण जातीव्यवस्थेलाच [br]वाळीत टाकण्याचं ठरवलं. 0:09:15.503,0:09:20.228 (टाळ्या) 0:09:20.988,0:09:26.003 आणि ते शक्य होतं, कारण त्याची सुरुवात 0:09:26.003,0:09:28.119 स्वतःचं आडनाव बदलून करता आली असती. 0:09:28.119,0:09:31.784 कारण भारतात, [br]बरीचशी आडनावं ही जातींची नावं असतात. 0:09:31.784,0:09:34.306 म्हणून मी स्वतःचं आडनाव गाळून टाकलं. 0:09:34.306,0:09:40.810 आणि त्यानंतर मी स्वतःला [br]एक नवीन आडनाव दिलं : सत्यार्थी. 0:09:40.810,0:09:43.776 त्याचा अर्थ, सत्याचा शोध घेणारा. 0:09:45.216,0:09:49.248 (टाळ्या) 0:09:49.248,0:09:52.585 संतापातून परिवर्तन घडवण्याची सुरुवात [br]ही अशी झाली. 0:09:54.095,0:09:56.704 मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी ओळखेल का, 0:09:56.704,0:10:01.530 बाल अधिकार कार्यकर्ता होण्यापूर्वी [br]मी काय करीत होतो? 0:10:02.410,0:10:03.788 कोणाला ठाऊक आहे का? 0:10:04.898,0:10:06.169 नाही. 0:10:06.169,0:10:12.558 मी एक इंजिनीयर होतो. [br]इलेक्ट्रिकल इंजिनीयर. 0:10:12.558,0:10:17.662 आणि त्यावेळी मी शिकलो, की ऊर्जा 0:10:17.662,0:10:22.146 कोळसा जाळून निर्माण होणारी, 0:10:22.146,0:10:26.250 अणुभट्टीतल्या स्फोटांतून निर्माण होणारी, 0:10:26.250,0:10:29.442 रोरावणाऱ्या नदीच्या प्रवाहातली, 0:10:29.442,0:10:33.066 सोसाट्याच्या वाऱ्यामधली, 0:10:33.066,0:10:38.083 तिचं परिवर्तन केल्यावर, [br]लक्षावधी लोकांची आयुष्यं उजळू शकते. 0:10:38.963,0:10:43.495 मी हे ही शिकलो की,[br]अत्यंत दुर्दम्य रूपातली ऊर्जा कशा प्रकारे 0:10:43.495,0:10:47.970 समाजाच्या हितासाठी [br]चांगल्या कामी जुंपता येते. 0:10:52.925,0:10:59.692 तर आता, मी तुरुंगात कसा गेलो, [br]त्या गोष्टीकडे वळतो. 0:10:59.692,0:11:03.919 मी डझनभर मुलांना [br]गुलामगिरीतून सोडवल्याच्या आनंदात होतो. 0:11:03.919,0:11:06.890 त्यांना त्यांच्या पालकांच्या हातात [br]सोपवलं होतं. 0:11:06.890,0:11:10.078 एखाद्या मुलाला मुक्त केल्यावर [br]मला अवर्णनीय आनंद होतो. 0:11:11.238,0:11:12.428 मी खूप आनंदात होतो. 0:11:13.458,0:11:19.021 पण दिल्लीत परतण्यासाठी [br]आगगाडीची वाट पाहत असताना, 0:11:19.021,0:11:22.264 मला डझनावारी मुलं येताना दिसली. 0:11:22.264,0:11:25.562 कोणीतरी त्यांचा अपव्यापार करीत होतं. 0:11:25.562,0:11:28.415 त्या लोकांना मी थांबवलं. 0:11:28.415,0:11:30.517 पोलिसांजवळ त्यांची तक्रार केली. 0:11:30.517,0:11:35.071 पण त्या पोलिसांनी मला मदत करण्याऐवजी 0:11:35.071,0:11:40.773 मला या छोट्या कोठडीत टाकलं, [br]एखाद्या जनावरासारखं. 0:11:41.573,0:11:43.121 आणि त्याच संतापभरल्या रात्रीतून 0:11:43.121,0:11:46.972 एका अत्यंत तेजस्वी आणि [br]महान कल्पनेचा जन्म झाला. 0:11:47.632,0:11:53.100 मला वाटलं, मी १० मुलांना मुक्त करीत असेन, [br]पण आणखी ५० मुलं त्यात ओढली जात असतील, 0:11:53.100,0:11:54.560 तर त्यात काही अर्थ नाही. 0:11:54.560,0:11:57.368 ग्राहकांच्या ताकदीवर माझा विश्वास आहे. 0:11:57.368,0:12:00.852 आणि तुम्हाला सांगतो, एक गोष्ट [br] 0:12:00.852,0:12:05.968 माझ्या हातूनच नव्हे, [br]तर जगभरात प्रथमच घडली. 0:12:05.968,0:12:10.041 ग्राहकांना माहिती देऊन, जागरूक करून, 0:12:10.041,0:12:14.501 बालमजूर न वापरता बनवलेल्या गालिच्यांची [br]मागणी करण्यासाठी चळवळ उभारली गेली. 0:12:15.691,0:12:19.083 युरोप आणि अमेरिकेत [br]आम्हाला यश मिळालं आहे. 0:12:19.083,0:12:23.768 आणि दक्षिण आशियाई देशांत 0:12:23.768,0:12:27.024 बालमजुरीत ८० टक्के घट झाली आहे. 0:12:27.024,0:12:30.406 (टाळ्या) 0:12:32.736,0:12:39.397 इतकंच नव्हे, तर हा नव्याने जन्मलेला [br]ग्राहकाचा संताप, किंवा ही ग्राहक चळवळ 0:12:39.397,0:12:43.505 इतर देशांत आणि इतर उद्योगांमध्ये [br]पसरली आहे. 0:12:43.505,0:12:48.931 चॉकोलेट असो, कपडे असोत, पादत्राणे असोत, [br]त्याहूनही पलिकडे पोहोचली आहे. 0:12:51.271,0:12:52.823 वयाच्या ११व्या वर्षी मी संतापलो. 0:12:52.823,0:12:58.176 जेव्हा मला कळलं की प्रत्येक मुलासाठी [br]शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, 0:12:58.176,0:13:05.821 वापरलेली पुस्तकं जमा करून, गरीब मुलांना [br]मदत करण्याची कल्पना मला सुचली. 0:13:05.821,0:13:09.270 वयाच्या ११व्या वर्षी मी [br]पुस्तक-पेढी स्थापन केली. 0:13:10.570,0:13:11.813 मी इतकं करून थांबलो नाही. 0:13:11.813,0:13:14.046 कालांतराने, मी सहसंस्थापक झालो, 0:13:14.046,0:13:18.580 नागरी समाजातल्या एकमेव आणि सर्वात मोठ्या [br]शैक्षणिक मोहिमेचा. 0:13:18.580,0:13:21.571 ही मोहीम म्हणजे ग्लोबल कँपेन फॉर एज्युकेशन 0:13:22.221,0:13:26.866 या मोहिमेने शिक्षणाबद्दलची पूर्ण विचारसरणी[br]बदलून टाकली आहे. 0:13:26.866,0:13:29.257 शिक्षण हा दानधर्म नसून, [br]एक मानवी अधिकार ठरला आहे. 0:13:29.257,0:13:34.026 आणि त्यामुळे शाळेत न जाणाऱ्या मुलांची [br]संख्या कमी होण्यात ठोस मदत झाली आहे. 0:13:34.026,0:13:37.614 गेल्या १५ वर्षांत ही संख्या [br]अर्धी झाली आहे. 0:13:37.614,0:13:41.693 (टाळ्या) 0:13:43.753,0:13:46.867 २७ व्या वर्षी मला आलेल्या संतापामुळे 0:13:46.867,0:13:52.235 एक मुलगी [br]वेश्यागृहात विकली जाण्यापासून वाचली. 0:13:52.235,0:13:57.018 आणि त्यामुळे मला एक नवीन कल्पना सुचली. 0:13:57.018,0:14:01.271 धाड घालून सुटका करण्याचं एक नवीन तंत्र. 0:14:01.271,0:14:04.188 मुलांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी. 0:14:04.758,0:14:10.614 आणि मला सांगायला अभिमान वाटतो,[br]की सुदैवाने एक नव्हे, दहा-वीस नव्हे, तर 0:14:10.614,0:14:16.957 ८३, ००० बालमजुरांना [br]मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुक्त केलं आहे. 0:14:16.962,0:14:20.093 आणि त्यांना त्यांच्या कुटुंबांकडे, [br]मातांकडे सुपूर्द केलं आहे. 0:14:20.093,0:14:23.452 (टाळ्या) 0:14:25.692,0:14:27.979 याबद्दल जागतिक धोरणं हवीत, [br]हे मला ठाऊक होतं. 0:14:27.979,0:14:31.011 आम्ही जगभर बालमजुरीच्या विरोधात [br]पदयात्रा आयोजित केल्या. 0:14:31.011,0:14:37.073 यातून एक नवा आंतरराष्ट्रीय ठराव [br]निर्माण झाला. 0:14:37.073,0:14:41.172 अत्यंत वाईट परिस्थितीतल्या मुलांचं [br]संरक्षण करणारा. 0:14:42.262,0:14:46.351 याचा ठोस परिणाम म्हणजे [br]जगभरातल्या बालमजुरांची संख्या 0:14:46.351,0:14:51.891 गेल्या १५ वर्षांत १/३ ने कमी झाली आहे. 0:14:51.891,0:14:56.311 (टाळ्या) 0:14:56.311,0:14:59.721 तर, प्रत्येक वेळी, 0:14:59.721,0:15:03.510 संतापाने सुरुवात झाली. 0:15:03.510,0:15:06.159 त्याचं कल्पनेत रुपांतर झालं. 0:15:06.159,0:15:09.565 मग, कृती. 0:15:09.565,0:15:12.441 तर, संताप, पुढे काय? 0:15:12.441,0:15:14.920 कल्पना, आणि.. 0:15:14.920,0:15:16.278 श्रोते: कृती 0:15:16.278,0:15:20.835 कै. स.: संताप, कल्पना, कृती. [br]जे करण्याचा मी प्रयत्न केला. 0:15:22.254,0:15:24.751 संताप ही एक शक्ती आहे, [br]संताप ही एक ऊर्जा आहे. 0:15:24.751,0:15:27.552 आणि निसर्ग नियमानुसार, 0:15:27.552,0:15:32.795 ऊर्जा निर्माण करता येत नाही, [br]किंवा नष्टही करता येत नाही. 0:15:32.795,0:15:39.685 तर मग, संतापाच्या ऊर्जेचं परिवर्तन करून, [br]तिला कामाला का जुंपू नये? 0:15:39.685,0:15:44.221 एक जास्त चांगलं, सुंदर, निःपक्ष [br]आणि न्यायपूर्ण जग निर्माण करण्यासाठी. 0:15:44.861,0:15:47.341 आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात [br]संताप असतोच. 0:15:47.341,0:15:53.241 आणि आता थोडक्यात एक गुपित सांगतो. 0:15:53.241,0:16:00.795 आपण अहंकाराच्या अरुंद कवचात [br]बंदिस्त राहिलो, 0:16:00.795,0:16:05.225 स्वार्थाच्या वर्तुळात फिरत राहिलो, 0:16:05.225,0:16:12.709 तर संतापाचं रुपांतर [br]तिरस्कार, हिंसा, सूड, नाश यात होईल. 0:16:13.539,0:16:16.595 पण आपण ही वर्तुळं भेदू शकलो, 0:16:16.595,0:16:22.481 तर त्याच संतापाचं रूपांतर [br]एका महान शक्तीमध्ये होईल. 0:16:22.481,0:16:26.828 आपण आपल्या अंगभूत करुणेद्वारे [br]ही वर्तुळं भेदू शकतो. 0:16:26.828,0:16:30.678 आणि जगाशी करुणेतून संबंध जोडू शकतो. [br]जग जास्त चांगलं बनवू शकतो. 0:16:30.678,0:16:34.351 तोच संताप करुणेत रूपांतरित करता येऊ शकतो. 0:16:34.351,0:16:38.936 तर प्रिय मित्रांनो, बंधुंनो आणि भगिनींनो, [br]नोबेल विजेता या नात्याने, पुन्हा एकदा 0:16:39.956,0:16:42.711 मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा 0:16:43.841,0:16:46.983 मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा. 0:16:48.003,0:16:52.299 आपल्यापैकी सर्वात जास्त संतापी तो, 0:16:52.299,0:16:59.510 जो आपल्या संतापाचं रुपांतर [br]कल्पना आणि कृतीमध्ये करेल. 0:17:00.440,0:17:02.275 अनेक धन्यवाद. 0:17:02.275,0:17:06.245 (टाळ्या) 0:17:15.115,0:17:18.924 ख्रिस एण्डर्सन: गेली अनेक वर्षे [br]आपण अनेकांचं प्रेरणास्थान आहात. 0:17:18.924,0:17:22.109 तुम्हाला प्रेरणा कोणापासून किंवा [br]कशापासून मिळते? आणि का? 0:17:22.629,0:17:24.341 कै.स. : प्रश्न चांगला आहे. 0:17:24.341,0:17:28.335 ख्रिस, तुम्हाला मी सत्य सांगतो, 0:17:28.335,0:17:32.849 दरवेळी जेव्हा मी एखाद्या मुलाला [br]मुक्त करतो, 0:17:32.849,0:17:37.028 तेव्हा आपल्या मातेला पुन्हा भेटण्याची आशा [br]सोडून दिलेल्या त्या मुलाचं, 0:17:37.028,0:17:41.335 मुक्त झाल्यावरचं हास्य, 0:17:41.335,0:17:43.890 आणि आपलं मूल 0:17:43.890,0:17:50.501 परत येऊन आपल्या मांडीवर बसेल [br]ही आशा पूर्णपणे गमावलेल्या मातेच्या 0:17:50.501,0:17:52.656 गालावर ओघळणारा तो आनंदाचा पहिला अश्रु. 0:17:52.656,0:17:57.809 त्यांच्या अनावर झालेल्या भावना. 0:17:57.809,0:18:01.154 त्यात मला देवाची झलक दिसते. [br]तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा. 0:18:01.154,0:18:06.032 आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, [br]एकदा नव्हे, तर हजारो वेळा 0:18:06.032,0:18:09.628 मला माझा हा देव पाहण्याचं [br]भाग्य लाभलं आहे. 0:18:09.628,0:18:11.640 आणि तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा. 0:18:11.640,0:18:13.652 धन्यवाद. 0:18:13.652,0:18:15.665 (टाळ्या)