पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य - लुका राईट
-
0:09 - 0:12कोट्यावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी
अस्तित्वात आली तेव्हा त्यावरील - -
0:12 - 0:17- साधी जैविक संयुगे एकत्रित
येऊन अधिक जटिल बनली. -
0:17 - 0:20ही संयुगे स्वतः पुनरुत्पादन
करून वाढू शकली. -
0:20 - 0:23एवढेच नव्हे तर हीच पृथ्वीवरील
सर्वात पहिली सजीव सृष्टी होती, -
0:23 - 0:28आणि त्यांच्यापासूनच उदय झाला
तो कोट्यवधी प्रजातींचा -
0:28 - 0:31ज्या आपल्या पृथ्वीवर
वास्तव्य करत आल्या. -
0:31 - 0:34आपण आज ज्या वातावरणास सजीव
सृष्टीसाठी अनुकूल असे म्हणतो, -
0:34 - 0:38ते वातावरण त्यावेळी
पृथ्वीवर नव्हते. -
0:38 - 0:42त्यावेळी पृथ्वीवरील बऱ्याच ठिकाणी
ज्वालामुखी उद्रेक होत होता -
0:42 - 0:45आणि अश्या वातावरणामुळे विध्वंसक
परिस्थिती निर्माण झाली होती. -
0:45 - 0:49मग, पृथ्वीवर सजीव सृष्टी
सुरू झाली तरी कुठे? -
0:49 - 0:51सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा
शोध सुरू करण्याआधी, -
0:51 - 0:57कोणत्याही सजीवाच्या मूलभूत गरजा
कोणत्या हे समजणे महत्वाचे आहे. -
0:57 - 1:02हायड्रोजन, मिथेन, नायट्रोजन ही
घटके आणि कार्बन डाय ऑक्साईड, -
1:02 - 1:05फॉस्फेट, अमोनिया ही संयुगे सजीव
सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. -
1:05 - 1:10हे घटक एकत्र येण्यासाठी आणि त्यांची
एकमेकांशी प्रतिक्रिया होण्यासाठी -
1:10 - 1:13त्यांना विद्रावक पदार्थाची म्हणजेच
पाण्याची आवश्यकता असते. -
1:13 - 1:16तसेच त्यांच्या वाढीसाठी
आणि पुनरुत्पादनासाठी, -
1:16 - 1:19सर्व सजीवांना
ऊर्जेची गरज असते. -
1:19 - 1:22सजीवांचे दोन
प्रकार आहेत: -
1:22 - 1:26स्वावलंबी, जसे की वनस्पती, ज्या
स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करतात, -
1:26 - 1:31आणि परावलंबी, जसे की प्राणी,
जे उर्जेसाठी इतर जीवांचे सेवन करतात. -
1:31 - 1:36साहजिकच, पहिल्या सजीवाच्या सेवनासाठी
इतर कोणतेही जीव उपलब्ध नव्हते. -
1:36 - 1:38याचा अर्थ, पहिला सजीव
स्वावलंबी असला असणार, -
1:38 - 1:43जो सूर्यापासून नाहीतर रासायनिक
प्रक्रियांपासून ऊर्जा निर्माण करत असणार. -
1:43 - 1:47अश्या या सर्व गरजांची पूर्तता होईल,
अशी ठिकाणे कुठे असावीत? -
1:47 - 1:50जमिनीवर किंवा समुद्राच्या
पृष्ठभागाजवळील ठिकाणांवर -
1:50 - 1:53सूर्यप्रकाश सहजरित्या
पोहचू शकतो. -
1:53 - 1:58परंतु जेव्हा सजीव सृष्टीची सुरुवात
झाली, तेव्हा सूर्याची अतिनील किरणे -
1:58 - 2:01सजीव सृष्टीच्या वास्तव्यासाठी
खूपच तीव्र होती. -
2:01 - 2:05मग, जेथे या किरणांपासून
संरक्षण मिळेल आणि इतर माध्यमाने -
2:05 - 2:07ऊर्जाही मिळेल अशी
परिस्थिती असलेले ठिकाण एकच: -
2:07 - 2:11महासागरांच्या तळाशी वाहणाऱ्या धारांची
जलौषणिक छिद्रे. जी, समुद्रपातळीच्या -
2:11 - 2:17काही किलोमीटर खोल सम्पूर्ण अंधाराने
आणि पाण्याने झाकलेली आहेत. -
2:17 - 2:21ही जलौषणिक छिद्रे म्हणजे पृथ्वीच्या
कवचाला पडलेल्या भेगा आहेत -
2:21 - 2:24ज्यांच्यातून समुद्राचे पाणी पृथ्वीच्या
अंतर्भागात प्रवेश करते -
2:24 - 2:27व याच छिद्रांतून हे पाणी परत जोराने
बाहेर फेकले जाते तेव्हा या पाण्याचे -
2:27 - 2:33तापमान जास्त आणि त्यात साधी रासायनिक
संयुगे आणि क्षार यांचे मिश्रण सुद्धा असते. -
2:33 - 2:35त्यावेळी या जलौषणिक
छिद्रांवर असलेल्या -
2:35 - 2:40तीव्र रासायनिक थरांमध्ये
ऊर्जा केंद्रित होते. -
2:40 - 2:43आता आपण जलौषणिक छिद्रांकडे
नेणारा दुसरा पुरावा बघूया: -
2:43 - 2:49हा पुरावा म्हणजे सजीव सृष्टीतील
सर्वांचा शेवटचा पूर्वज - 'लुका'. -
2:49 - 2:54'लुका' पृथ्वीवरील सर्वात पहिला जीव नसून,
आतापर्यंत शोध लागलेला शेवटचा जीव आहे. -
2:54 - 2:58अजून देखील, लुका प्रत्यक्षात कसा
दिसत असेल हे आपल्याला माहीत नाही. -
2:58 - 3:02लुकाचा कोणताही जीवाष्म किंवा जिवंत
लुका नजिकच्या काळात आढळलेला नाही, -
3:02 - 3:07परंतु वैज्ञानिकांना आज अस्तित्वात
असलेल्या सजीवांच्या -
3:07 - 3:11तिन्ही प्रकारांमध्ये काही सर्वसमान
जनुके आढळलेली आहेत. -
3:11 - 3:16ज्या अर्थी ही जनुके सर्व प्रजातींमध्ये
सामायिक आहेत त्याअर्थी, -
3:16 - 3:19ही जनुके एका सामान्य पूर्वजाकडून
प्राप्त झाली असावित असे आढळते. -
3:19 - 3:25या सामायिक जनुकांपासून असे कळते की,
लुका एका गरम, ऑक्सिजन-मुक्त -
3:25 - 3:28अश्या ठिकाणी रासायनिक थरांपासून
ऊर्जा मिळवून जगत होता - -
3:28 - 3:32अगदी जलौषणिक
छिद्रांवरील थरांप्रमाणे. -
3:32 - 3:35जलौषणिक छिद्रांचे
दोन प्रकार आहेत: -
3:35 - 3:37काळा धूर सोडणारी छिद्रे व
पांढरा धूर सोडणारी छिद्रे -
3:37 - 3:41काळा धूर सोडणाऱ्या छिद्रातून आम्ल,
कार्बनडाय ऑक्साईड असलेले पाणी, -
3:41 - 3:47जे शेकडो अंशांपर्यंत गरम होते,
त्यासोबत सल्फर, लोह, तांबे -
3:47 - 3:50आणि जीवनासाठी आवश्यक असलेले
इतर धातू बाहेर फेकले जातात. -
3:50 - 3:55पण शास्त्रज्ञ आता मानतात काळा धूर
सोडणारी छिद्रे लुकासाठी अत्यंत गरम होती- -
3:55 - 4:00तर आता पांढरा धूर सोडणारी छिद्रे हीच सजीव
सृष्टीच्या निर्मितीची अव्वल उमेदवार आहेत. -
4:00 - 4:02पांढरा धूर सोडणाऱ्या छिद्रांत,
-
4:02 - 4:07मध्य अटलांटिक रांगेवरील जलौषणिक
छिद्रांच्या क्षेत्र म्हणजेच 'लॉस्ट सिटी' -
4:07 - 4:11हे सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी
सर्वात अनुकूल आहेत. -
4:11 - 4:17येथे बाहेर फेकले जाणारे समुद्राचे पाणी
अत्यंत अल्कधर्मी व कार्बनडायऑक्सिड नसलेले, -
4:17 - 4:21परंतु मिथेनने समृद्ध व अनुकूल
तापमान असलेले आहे. -
4:21 - 4:26जवळील काळा धूर सोडणाऱ्या छिद्रांनी लॉस्ट
सिटीतील सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठीची -
4:26 - 4:28कार्बनडाय ऑक्साईडची
कमी भरून काढली असावी, -
4:28 - 4:32ज्यामुळे पहिल्या सजीवाला गरज
असलेले सर्व घटक दिले गेले, -
4:32 - 4:36जे आज पृथ्वीवर असणाऱ्या अविश्वसनीय
जैवविविधतेच्या रूपाने उत्सर्जित झाले.
- Title:
- पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य - लुका राईट
- Speaker:
- लुका राईट
- Description:
-
पूर्ण धडा पहाण्यसाठीची लिंक: https://ed.ted.com/lessons/the-mysterious-origins-of-life-on-earth-luka-seamus-wright
कोट्यावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा त्यावरील साधी जैविक संयुगे एकत्रित येऊन अधिक जटिल बनली. ही संयुगे स्वतः पुनरुत्पादन करून वाढू शकली. त्यावेळी पृथ्वीवरील बऱ्याच ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होत होता आणि विध्वंसक अशी वातावरण होते. सजीव सृष्टीसाठी अनुकूल अशी परिस्थिती अजिबातच नव्हती. मग, पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती झाली तरी कुठे? या व्हिडीओ द्वारे सजीव सृष्टीच्या निर्मितेचे कारण लुका राईट शोधून दाखवितो.
वक्तव्य: लुका राईट, दिग्दर्शन: निक हिलडिच.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:37
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Smita Kantak accepted Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Omkar Khadamkar edited Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Omkar Khadamkar edited Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth | |
![]() |
Omkar Khadamkar edited Marathi subtitles for The mysterious origins of life on Earth |