1 00:00:08,842 --> 00:00:12,412 कोट्यावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा त्यावरील - 2 00:00:12,412 --> 00:00:17,432 - साधी जैविक संयुगे एकत्रित येऊन अधिक जटिल बनली. 3 00:00:17,432 --> 00:00:20,122 ही संयुगे स्वतः पुनरुत्पादन करून वाढू शकली. 4 00:00:20,122 --> 00:00:23,372 एवढेच नव्हे तर हीच पृथ्वीवरील सर्वात पहिली सजीव सृष्टी होती, 5 00:00:23,372 --> 00:00:27,512 आणि त्यांच्यापासूनच उदय झाला तो कोट्यवधी प्रजातींचा 6 00:00:27,512 --> 00:00:30,602 ज्या आपल्या पृथ्वीवर वास्तव्य करत आल्या. 7 00:00:30,602 --> 00:00:33,712 आपण आज ज्या वातावरणास सजीव सृष्टीसाठी अनुकूल असे म्हणतो, 8 00:00:33,712 --> 00:00:38,282 ते वातावरण त्यावेळी पृथ्वीवर नव्हते. 9 00:00:38,282 --> 00:00:41,725 त्यावेळी पृथ्वीवरील बऱ्याच ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होत होता 10 00:00:41,725 --> 00:00:45,335 आणि अश्या वातावरणामुळे विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली होती. 11 00:00:45,335 --> 00:00:48,835 मग, पृथ्वीवर सजीव सृष्टी सुरू झाली तरी कुठे? 12 00:00:48,835 --> 00:00:51,365 सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा शोध सुरू करण्याआधी, 13 00:00:51,365 --> 00:00:56,715 कोणत्याही सजीवाच्या मूलभूत गरजा कोणत्या हे समजणे महत्वाचे आहे. 14 00:00:56,715 --> 00:01:01,940 हायड्रोजन, मिथेन, नायट्रोजन ही घटके आणि कार्बन डाय ऑक्साईड, 15 00:01:01,940 --> 00:01:05,468 फॉस्फेट, अमोनिया ही संयुगे सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. 16 00:01:05,468 --> 00:01:09,828 हे घटक एकत्र येण्यासाठी आणि त्यांची एकमेकांशी प्रतिक्रिया होण्यासाठी 17 00:01:09,828 --> 00:01:13,260 त्यांना विद्रावक पदार्थाची म्हणजेच पाण्याची आवश्यकता असते. 18 00:01:13,260 --> 00:01:15,700 तसेच त्यांच्या वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी, 19 00:01:15,700 --> 00:01:19,260 सर्व सजीवांना ऊर्जेची गरज असते. 20 00:01:19,260 --> 00:01:22,300 सजीवांचे दोन प्रकार आहेत: 21 00:01:22,300 --> 00:01:26,030 स्वावलंबी, जसे की वनस्पती, ज्या स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करतात, 22 00:01:26,030 --> 00:01:31,330 आणि परावलंबी, जसे की प्राणी, जे उर्जेसाठी इतर जीवांचे सेवन करतात. 23 00:01:31,330 --> 00:01:35,920 साहजिकच, पहिल्या सजीवाच्या सेवनासाठी इतर कोणतेही जीव उपलब्ध नव्हते. 24 00:01:35,920 --> 00:01:38,391 याचा अर्थ, पहिला सजीव स्वावलंबी असला असणार, 25 00:01:38,391 --> 00:01:43,241 जो सूर्यापासून नाहीतर रासायनिक प्रक्रियांपासून ऊर्जा निर्माण करत असणार. 26 00:01:43,241 --> 00:01:46,641 अश्या या सर्व गरजांची पूर्तता होईल, अशी ठिकाणे कुठे असावीत? 27 00:01:46,641 --> 00:01:49,751 जमिनीवर किंवा समुद्राच्या पृष्ठभागाजवळील ठिकाणांवर 28 00:01:49,751 --> 00:01:52,591 सूर्यप्रकाश सहजरित्या पोहचू शकतो. 29 00:01:52,591 --> 00:01:57,631 परंतु जेव्हा सजीव सृष्टीची सुरुवात झाली, तेव्हा सूर्याची अतिनील किरणे 30 00:01:57,631 --> 00:02:01,221 सजीव सृष्टीच्या वास्तव्यासाठी खूपच तीव्र होती. 31 00:02:01,221 --> 00:02:04,511 मग, जेथे या किरणांपासून संरक्षण मिळेल आणि इतर माध्यमाने 32 00:02:04,511 --> 00:02:07,221 ऊर्जाही मिळेल अशी परिस्थिती असलेले ठिकाण एकच: 33 00:02:07,221 --> 00:02:11,321 महासागरांच्या तळाशी वाहणाऱ्या धारांची जलौषणिक छिद्रे. जी, समुद्रपातळीच्या 34 00:02:11,321 --> 00:02:16,847 काही किलोमीटर खोल सम्पूर्ण अंधाराने आणि पाण्याने झाकलेली आहेत. 35 00:02:16,847 --> 00:02:20,771 ही जलौषणिक छिद्रे म्हणजे पृथ्वीच्या कवचाला पडलेल्या भेगा आहेत 36 00:02:20,771 --> 00:02:23,891 ज्यांच्यातून समुद्राचे पाणी पृथ्वीच्या अंतर्भागात प्रवेश करते 37 00:02:23,891 --> 00:02:27,291 व याच छिद्रांतून हे पाणी परत जोराने बाहेर फेकले जाते तेव्हा या पाण्याचे 38 00:02:27,291 --> 00:02:32,521 तापमान जास्त आणि त्यात साधी रासायनिक संयुगे आणि क्षार यांचे मिश्रण सुद्धा असते. 39 00:02:32,521 --> 00:02:35,276 त्यावेळी या जलौषणिक छिद्रांवर असलेल्या 40 00:02:35,276 --> 00:02:39,566 तीव्र रासायनिक थरांमध्ये ऊर्जा केंद्रित होते. 41 00:02:39,566 --> 00:02:42,882 आता आपण जलौषणिक छिद्रांकडे नेणारा दुसरा पुरावा बघूया: 42 00:02:42,882 --> 00:02:48,952 हा पुरावा म्हणजे सजीव सृष्टीतील सर्वांचा शेवटचा पूर्वज - 'लुका'. 43 00:02:48,952 --> 00:02:54,042 'लुका' पृथ्वीवरील सर्वात पहिला जीव नसून, आतापर्यंत शोध लागलेला शेवटचा जीव आहे. 44 00:02:54,042 --> 00:02:57,959 अजून देखील, लुका प्रत्यक्षात कसा दिसत असेल हे आपल्याला माहीत नाही. 45 00:02:57,959 --> 00:03:02,029 लुकाचा कोणताही जीवाष्म किंवा जिवंत लुका नजिकच्या काळात आढळलेला नाही, 46 00:03:02,029 --> 00:03:07,159 परंतु वैज्ञानिकांना आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या 47 00:03:07,161 --> 00:03:11,161 तिन्ही प्रकारांमध्ये काही सर्वसमान जनुके आढळलेली आहेत. 48 00:03:11,161 --> 00:03:15,501 ज्या अर्थी ही जनुके सर्व प्रजातींमध्ये सामायिक आहेत त्याअर्थी, 49 00:03:15,501 --> 00:03:19,488 ही जनुके एका सामान्य पूर्वजाकडून प्राप्त झाली असावित असे आढळते. 50 00:03:19,488 --> 00:03:25,298 या सामायिक जनुकांपासून असे कळते की, लुका एका गरम, ऑक्सिजन-मुक्त 51 00:03:25,298 --> 00:03:28,488 अश्या ठिकाणी रासायनिक थरांपासून ऊर्जा मिळवून जगत होता - 52 00:03:28,488 --> 00:03:31,748 अगदी जलौषणिक छिद्रांवरील थरांप्रमाणे. 53 00:03:31,748 --> 00:03:34,718 जलौषणिक छिद्रांचे दोन प्रकार आहेत: 54 00:03:34,718 --> 00:03:37,398 काळा धूर सोडणारी छिद्रे व पांढरा धूर सोडणारी छिद्रे 55 00:03:37,398 --> 00:03:41,488 काळा धूर सोडणाऱ्या छिद्रातून आम्ल, कार्बनडाय ऑक्साईड असलेले पाणी, 56 00:03:41,488 --> 00:03:47,268 जे शेकडो अंशांपर्यंत गरम होते, त्यासोबत सल्फर, लोह, तांबे 57 00:03:47,268 --> 00:03:50,136 आणि जीवनासाठी आवश्यक असलेले इतर धातू बाहेर फेकले जातात. 58 00:03:50,136 --> 00:03:55,196 पण शास्त्रज्ञ आता मानतात काळा धूर सोडणारी छिद्रे लुकासाठी अत्यंत गरम होती- 59 00:03:55,196 --> 00:04:00,163 तर आता पांढरा धूर सोडणारी छिद्रे हीच सजीव सृष्टीच्या निर्मितीची अव्वल उमेदवार आहेत. 60 00:04:00,163 --> 00:04:01,637 पांढरा धूर सोडणाऱ्या छिद्रांत, 61 00:04:01,637 --> 00:04:07,067 मध्य अटलांटिक रांगेवरील जलौषणिक छिद्रांच्या क्षेत्र म्हणजेच 'लॉस्ट सिटी' 62 00:04:07,067 --> 00:04:11,157 हे सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी सर्वात अनुकूल आहेत. 63 00:04:11,157 --> 00:04:16,607 येथे बाहेर फेकले जाणारे समुद्राचे पाणी अत्यंत अल्कधर्मी व कार्बनडायऑक्सिड नसलेले, 64 00:04:16,607 --> 00:04:21,101 परंतु मिथेनने समृद्ध व अनुकूल तापमान असलेले आहे. 65 00:04:21,101 --> 00:04:25,770 जवळील काळा धूर सोडणाऱ्या छिद्रांनी लॉस्ट सिटीतील सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठीची 66 00:04:25,770 --> 00:04:28,122 कार्बनडाय ऑक्साईडची कमी भरून काढली असावी, 67 00:04:28,122 --> 00:04:31,652 ज्यामुळे पहिल्या सजीवाला गरज असलेले सर्व घटक दिले गेले, 68 00:04:31,652 --> 00:04:36,132 जे आज पृथ्वीवर असणाऱ्या अविश्वसनीय जैवविविधतेच्या रूपाने उत्सर्जित झाले.