एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पाय
-
0:00 - 0:03मी ३०० लहान मुलांशी बोलत होते
-
0:03 - 0:05त्यांचे वय ६ ते ८ वर्ष असावे, एका लहान मुलांच्या वस्तुसंग्रहालयात आमची बातचीत चालू होती
-
0:05 - 0:09आणि माझ्या बरोबर मी एक पायांची पिशवी आणली होती
-
0:09 - 0:11इथे जशी तुम्ही पाहताय तशी
-
0:11 - 0:13मी पाय एक टेबलावर मांडले होते, त्या मुलांसाठी
-
0:13 - 0:17आणि माझ्या अनुभवाप्रमाणे, लहान मुले मुळातच चिकित्सक असतात
-
0:17 - 0:19त्यांना काय माहीत नाही किंवा समजत नाही
-
0:19 - 0:21किंवा जे त्यांनी अजुन पर्यन्त पाहिले नाही त्या बद्दल
-
0:21 - 0:23ती त्या वेगळेपणाला तेव्हाच भिऊ लागतात
-
0:23 - 0:26जेव्हा मोठी माणसे तसे वागण्याविषयी शिकवतात.
-
0:26 - 0:29आणि त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेवर थोडीफार बंधने घालतात,
-
0:29 - 0:32किंवा त्यांच्या प्रश्न विचारण्यावर बंदी घालतात
-
0:32 - 0:34त्यांना नम्र मुले बनविण्याच्या दृष्टीने.
-
0:34 - 0:38माझ्या डोळ्यांसमोर एक पहिलीच्या बाई येतात, व्हरांडयामध्ये वांड पोरांना सांगणाऱ्या
-
0:38 - 0:41"आता, काही करा पण"
-
0:41 - 0:43"त्यांच्या पायांकडे पाहू नका."
-
0:43 - 0:45पण अर्थातच तोच तर मूळ मुद्दा आहे
-
0:45 - 0:48म्हणूनच मी तिथे होते. मला त्यांना पहायला आणि शोधायला आमंत्रित करायचे होते.
-
0:48 - 0:52म्हणून मी त्यांच्या पालकांबरोबर करार केला
-
0:52 - 0:55की मुले कोणाही प्रौढांविना आत येऊ शकतील दोन मिनिटांसाठी
-
0:55 - 0:57त्यांची तीच.
-
0:57 - 1:01दारे उघडतात, आणि सर्व मुले ह्या पायांच्या टेबलापाशी येतात.
-
1:01 - 1:04आणि मुले एकमेकांना खुणावत, पायांची बोटे हलवत उभी राहतात
-
1:04 - 1:06आणि ती त्यांचे संपूर्ण वजन धावण्याच्या पायावर टाकून
-
1:06 - 1:08पहात असतात, काय होते ते
-
1:08 - 1:10मग मी म्हणाले, "मुलांनो, लगेच सांगा --
-
1:10 - 1:14आज मी सकाळी उठले आणि मला एका घरावरून उडी मारावीशी वाटली
-
1:14 - 1:16खूप मोठे नाही, बस दोन तीन मजले असलेले
-
1:16 - 1:21पण तुम्ही कोणताही प्राणी, कोणताही महानायक, किंवा कार्टून यांचा विचार करू शकला
-
1:21 - 1:23कोणतेही जे तुम्हाला आता लगेच सुचू शकेल असे
-
1:23 - 1:25तर त्यांपैकी कोणासारखे पाय तुम्ही माझ्यासाठी बनवाल
-
1:25 - 1:28आणि लगेचच कोणीतरी म्हणाले, "कांगारू"
-
1:28 - 1:30"नको, नको, नको, बेडूक असला पाहिजे"
-
1:30 - 1:32"नाही गो गो गॅजेट असले पाहिजे!"
-
1:32 - 1:34"नाही, नाही, नाही! दी इन्क्रेडिबल्स असले पाहिजे."
-
1:34 - 1:37आणि इतर गोष्टी ज्या मला तेव्हा माहीत नव्हत्या
-
1:37 - 1:39मग एक आठ वर्षांचे पोर म्हणाले,
-
1:39 - 1:43"तुला उडायला आवडणार नाही काय?"
-
1:44 - 1:47आणि ती संपूर्ण खोली माझ्या सोबत म्हणाली , "हो!"
-
1:47 - 1:49(हशा)
-
1:49 - 1:52आणि तिथल्या तिथे, मी एका अपंग बाईपासून
-
1:52 - 1:56जिला ह्या मुलांना "पंगू" म्हणून पहायचे शिक्षण मिळाले असते
-
1:56 - 2:01अशी महिला झाले, जिच्या शरीरात अशी क्षमता आहे, जी अजुन त्यांच्या शरीरात नव्हती,
-
2:01 - 2:03कोणीतरी जिची क्षमता कदाचित कमालीची आहे.
-
2:03 - 2:05गंमतच आहे.
-
2:05 - 2:10तर तुम्हापैकी काही लोकांनी माला TED मध्ये ११ वर्षांपूर्वी पाहिले असेल,
-
2:10 - 2:14आणि हे संमेलन वक्ता आणि सहभागी ह्या दोघांसाठीही किती जीवन बदलणारे आहे,
-
2:14 - 2:18ह्याबद्दल खूप गोष्टी झाल्या आहेत आणि मी ही त्याला अपवाद नाही.
-
2:18 - 2:24TED च्या मंचावरूनच मी माझ्या आयुष्याच्या शोधाच्या पुढच्या दशकाकडे पदार्पण केले.
-
2:24 - 2:29तेव्हा जे पाय मी प्रस्तुत केले ते कृत्रिम अवयावांमध्ये अतिशय असाधारण होते.
-
2:29 - 2:31माझ्याकडे विणलेल्या कार्बन फायबरचे, धावण्याचे पाय होते
-
2:31 - 2:33चित्त्याच्या मागच्या पायांचे प्रतिरूप असलेले,
-
2:33 - 2:35जे तुम्ही काल TED च्या मंचावर पाहिले असतील
-
2:35 - 2:41आणि हो, हे खरेखुरे वाटणारे, स्वाभाविकरित्या रंगवलेले सिलिकोन पायही.
-
2:41 - 2:45त्यावेळी मला संधी मिळाली संबोधित करण्याची
-
2:45 - 2:49अशा अन्वेशकांना, जे पारंपारिक वैद्यकीय-कृत्रिम अवयव निर्मात्यांच्या घोळक्याच्या बाहेर होते
-
2:49 - 2:53त्यांची अक्कल हुशारी पाय निर्माण करण्याच्या
-
2:53 - 2:55विज्ञान आणि कला यांमध्ये लावण्यासाठी.
-
2:55 - 3:00म्हणजे आपण आकृती, उपयोग आणि सौंदर्य ह्यांच्यात फरक करणे थांबवू शकू
-
3:00 - 3:02आणि त्यांना वेगवेगळे मूल्य देणे थांबवू शकू.
-
3:02 - 3:06मी भाग्यवान होते म्हणून माझी हाक अनेकांनी ऐकली
-
3:06 - 3:11आणि गंमत म्हणजे ती यात्रा, TED संमेलनात हजर असलेल्या एका स्त्री पासूनच सुरू झाली --
-
3:11 - 3:14ची पार्लमन, आशा आहे की ती कुठेतरी दर्शकांमध्ये बसली असेल.
-
3:14 - 3:17ती तेव्हा एक ID नामक पत्रिकेची संपादक होती,
-
3:17 - 3:20आणि तिने माझ्यावर तिच्या पत्रिकेत मुखपृष्ठ सदर लिहिले.
-
3:20 - 3:23आणि ही अविश्वसनीय यात्रा सुरू झाली.
-
3:23 - 3:25अनेक विचित्र गाठीभेटी माझ्या बरोबर तेव्हा खूपदा होत असत;
-
3:25 - 3:28मी तेव्हा अनेक वक्ता म्हणून जाण्याची आमंत्रणे स्वीकारत होते
-
3:28 - 3:31जगभरात, चित्त्याच्या पायांच्या रचनेबद्दल सांगायला
-
3:31 - 3:34लोक संमेलनानंतर, माझे भाषण झाल्यावर माझ्याशी बोलण्याकरिता येत असत,
-
3:34 - 3:36पुरूष व बायका.
-
3:36 - 3:38आणि ते संभाषण ह्या प्रमाणे चालायचे
-
3:38 - 3:42"तुला माहीत आहे एमी, तू खूप छान दिसतेस"
-
3:42 - 3:44"तू अजिबात अपंग दिसत नाहीस."
-
3:44 - 3:45(हशा)
-
3:45 - 3:47मग मी म्हणायचे "खरच कमाल आहे,
-
3:47 - 3:49"कारण, मी विकलांग आहे असे मलाही वाटत नाही."
-
3:49 - 3:54आणि मग माझे डोळे उघडले,
-
3:54 - 3:56सौंदर्याबद्दल होऊ शकणाऱ्या संभाषणाबाबत
-
3:56 - 3:59एक सुंदर स्त्री कशाप्रमाणे दिसली पाहिजे?
-
3:59 - 4:01एक मादक शरीर काय आहे?
-
4:01 - 4:03आणि अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून
-
4:03 - 4:06विकलांग असण्याचा अर्थ काय आहे?
-
4:06 - 4:09म्हणजे पामेला अँडरसन जवळ कदाचित माझ्याहून जास्त कृत्रिम अवयव असतील.
-
4:09 - 4:11पण तरी तिला कोणी अपंग नाही म्हणत.
-
4:11 - 4:16(हशा)
-
4:17 - 4:21तर ही पत्रिका पीटर सॅविल ह्या ग्राफिक डिझायनरांच्या हस्ते
-
4:21 - 4:26अलेक्झांडर मॅक्वीन ह्या फॅशन डिझायनरकडे आणि निक नाईट ह्या छायाचित्रकाराकडे जाऊन पोहोचली,
-
4:26 - 4:28ज्यांना ते संभाषण पुढे नेण्यात रूची होती.
-
4:28 - 4:31TED झाल्यावर ३ महिन्यांनंतर मी विमानात बसले
-
4:31 - 4:36मी लंडनला गेले माझ्या पहिल्या फोटो शूटसाठी,
-
4:36 - 4:37त्यातून निघाले हे मुखपृष्ठ --
-
4:37 - 4:40दिसतेय ना मी फॅशनेबल?
-
4:40 - 4:44त्यानंतर ३ महिन्यांनी मी माझा प्रथम फॅशन शो केला, मॅक्वीन ह्यांच्यासाठी
-
4:44 - 4:49राखेपासून बनवलेल्या हातांनी नक्षी केलेल्या जड लाकडाच्या दोन पायांवर
-
4:49 - 4:52सर्वांना वाटले की ते लाकडी बूट होते.
-
4:52 - 4:54खरेतर ते पाय मी आज ह्या मंचावर माझ्या सोबत आणले आहेत:
-
4:55 - 4:59द्राक्षांचे वेल, फुले, खरेच अप्रतिम
-
5:00 - 5:03कविता महत्त्वाची आहे
-
5:03 - 5:08कविता जुनाट आणि दुर्लक्ष केलेल्या गोष्टीला उदात्त करून
-
5:08 - 5:10कलेच्या दुनियेत घेऊन जाते.
-
5:10 - 5:16ज्या गोष्टीने लोकांना घाबरवले आहे, त्या गोष्टीचा कायापालट करते
-
5:16 - 5:18एका अश्या गोष्टीत, जी लोकांना आमंत्रित करते पुढे येऊन पहायला ,
-
5:18 - 5:21आणि थोडा जास्त वेळ पहायला,
-
5:21 - 5:23कदाचित समजावून घ्यायलासुद्धा.
-
5:23 - 5:27हे मी शिकले माझ्या पुढच्या साहसातून.
-
5:27 - 5:31कलाकार मॅथ्यू बर्नी एक चित्रपट बनवत होता, "The Cremaster cycle" म्हणून
-
5:31 - 5:34तेव्हा एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला की --
-
5:34 - 5:36माझे पाय हे एक घालण्यायोग्य शिल्पकृती असू शकतात.
-
5:36 - 5:43आणि मी त्या वेळेला सुद्धा, मनुष्यवत दिसणे हा एकच सौंदर्याचा आदर्श
-
5:43 - 5:45या कल्पनेपासून दूर जात होते.
-
5:45 - 5:49म्हणून आम्ही कृत्रिम पाय बनवले, ज्याला लोक प्रेमाने म्हणत असत काचेचे पाय
-
5:49 - 5:53जरी ते पाय खरे तर पारदर्शक पॉलीयुरेथेनने बनवले होते,
-
5:53 - 5:55म्हणजे बॉलिंगचे चेंडू ज्यापासून बनवतात ते.
-
5:55 - 5:56जड!
-
5:56 - 5:58मग आम्ही मातीचे पाय बनवले
-
5:58 - 6:02ज्यात बटाटे उगवत होते आणि वरून बीट बाहेर येत होते,
-
6:02 - 6:04आणि एक सुंदर पितळी बोटसुद्धा होते त्या पायाला.
-
6:04 - 6:06हे त्या बोटाचे जवळचे छायाचित्र आहे.
-
6:06 - 6:08आणि अजुन एक पात्र होते अर्ध-स्त्री आणि अर्ध-चित्त्याचे --
-
6:08 - 6:10माझ्या माझ्या धावपटू आयुष्याला सन्मान देण्याकरिता
-
6:10 - 6:13१४ तासांची कृत्रिम द्रव्याची वेशभूषा
-
6:13 - 6:17त्या प्राण्याच्या आत घुसायला. त्या प्राण्याकडे जोडले गेलेले पंजे होते
-
6:17 - 6:21नखे व चाबकासारखे फटके मारणारी शेपटीसुद्धा होती
-
6:21 - 6:23एका सरड्यासारखी.
-
6:23 - 6:24(हशा)
-
6:25 - 6:29आणि अजुन एक प्रकारचे पाय आम्ही बनवले, असे होते
-
6:29 - 6:31जेली माशासारखे!
-
6:31 - 6:33हे पण पॉलीयुरेथेनचेच.
-
6:33 - 6:36आणि ह्या पायांचे काम एकच,
-
6:36 - 6:39चित्रपटाच्या प्रसंगाबाहेर,
-
6:39 - 6:42भावनांना उत्तेजित करणे आणि कल्पनेची ठिणगी पेटवणे
-
6:42 - 6:45म्हणून विलक्षणपणा महत्त्वाचा असतो.
-
6:45 - 6:51आज माझ्याकडे एक डझनपेक्षा अधिक पाय आहेत.
-
6:51 - 6:53जे वेगवेगळ्या लोकांनी माझ्यासाठी बनवले आहेत,
-
6:53 - 6:57आणि त्यांच्यामुळे माझ्याकडे जमिनीवरून वेगवेगळ्या रीतीने चालण्याची साधने आहेत
-
6:57 - 6:59आणि मी माझी उंची बदलू शकते --
-
6:59 - 7:01माझ्याकडे पाच वेगवेगळ्या उंच्या आहेत.
-
7:01 - 7:03(हशा)
-
7:03 - 7:05आज माझी उंची ६'१" आहे.
-
7:05 - 7:08आणि हे पाय मी एका वर्षापूर्वी बनवून घेतले होते
-
7:08 - 7:10इंग्लंडमधील डोरसेट ऑर्थोपेडिककडून
-
7:10 - 7:12आणि हे पाय मी घरी आणले मॅनहॅटनमध्ये
-
7:12 - 7:14शहरातील पहिल्या संध्याकाळी, मी बाहेर गेले एका उच्चभ्रू पार्टीमध्ये
-
7:14 - 7:17आणि तिथे एक मुलगी होती, जी अनेक वर्षे ओळखते
-
7:17 - 7:19५'८" असलेल्या मला.
-
7:19 - 7:21ती मला पाहिल्यावर आश्चर्यचकित झाली
-
7:21 - 7:24आणि म्हणाली, "पण तू इतकी उंच आहेस!"
-
7:24 - 7:26मी म्हणाले, "हो! किती मजा आहे ना!"
-
7:26 - 7:28म्हणजे ते थोडे घोडेकाठी वर घोडेकाठी घालून चालण्यासारखे होते
-
7:28 - 7:31आणि दारांच्या चौकटीबरोबर तर माझे वेगळेच नाते जडत होते
-
7:31 - 7:33जे मला कधीच वाटले नव्हते.
-
7:33 - 7:36आणि मला मजा येत होती.
-
7:36 - 7:38ती माझ्याकडे पाहून म्हणाली,
-
7:38 - 7:40"पण एमी हा तर अन्याय आहे!"
-
7:40 - 7:43(हशा)
-
7:43 - 7:45(टाळ्या)
-
7:45 - 7:49पण अविश्वसनीय गोष्ट ही होती की ती मुलगी खोटे बोलत नव्हती.
-
7:49 - 7:51"खरच तुला तुझी उंची तुला हवी तशी बदलता यावी,
-
7:51 - 7:53हा (इतरांवर) एक अन्याय आहे."
-
7:53 - 7:55आणि तेव्हा मला माहित पडले की --
-
7:55 - 7:58समजाबरोबरच्या संभाषणात
-
7:58 - 8:00महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत
-
8:00 - 8:02गेल्या दशकात.
-
8:02 - 8:07संभाषण आता उणीव भरून काढण्याबद्दल राहिले नव्हते
-
8:07 - 8:09आता हे संभाषण वृद्धीबद्दल चालले आहे.
-
8:09 - 8:13संभाषण आहे शक्तीबद्दल.
-
8:13 - 8:18कृत्रिम अवयव उणीव पूर्ण करण्यासाठी राहिले नव्हते
-
8:18 - 8:21ते प्रतीक आहेत
-
8:21 - 8:24वापरणाऱ्यांच्या त्या जागेत जे हवे ते निर्माण करू शकण्याच्या
-
8:24 - 8:26शक्तीचे.
-
8:26 - 8:29म्हणून समजात अपंग समजले जाणारे लोक
-
8:29 - 8:34आता त्यांच्या अस्तित्वाचे निर्माते होऊ शकतात
-
8:34 - 8:36आणि खऱ्या अर्थाने ते अस्तित्व कायम बदलू ही शकतात.
-
8:36 - 8:38त्यांच्या देहाची रचना करून.
-
8:38 - 8:41एका सबळ करण्याच्या जागेतून.
-
8:41 - 8:46आणि मला आज ह्या गोष्टीतून अतिशय प्रेरणा मिळत आहे
-
8:46 - 8:50की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या --
-
8:50 - 8:52रोबोटिक्सच्या, बायोनिक्सच्या --
-
8:52 - 8:54आणि जुन्या-पुराण्या कवितेच्या संगमातून
-
8:54 - 9:00आपण आपल्या सामुदायिक माणुसकीच्या अर्थाच्या जवळ जात आहोत.
-
9:00 - 9:05आणि जर आपल्याला आपल्या माणुसकीच्या सामर्थ्याचा
-
9:05 - 9:07पूर्ण अविष्कार करायचा असेल,
-
9:07 - 9:11तर आपण हृदयभंग करणारी ताकद आणि आपल्या सर्वांच्यात असलेले
-
9:11 - 9:14तेजोमय पंगुत्व दोन्ही साजरे केले पाहिजेत - .
-
9:14 - 9:17मला शेकस्पियरच्या शायलॉकची आठवण येत आहे:
-
9:17 - 9:21"तुम्ही जर आम्हाला बोचले, तर आम्हाला रक्त येत नाही काय
-
9:21 - 9:24आणि जर तुम्ही आम्हाला गुदगुल्या केल्या, तर आम्ही हसत नाही काय?"
-
9:24 - 9:27आपली माणुसकीच आहे,
-
9:27 - 9:29आणि त्यातील सर्व सामर्थ्य,
-
9:29 - 9:32जी आपल्याला सुंदर बनवते.
-
9:32 - 9:33धन्यवाद.
-
9:33 - 9:40(टाळ्यांचा गजर)
- Title:
- एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पाय
- Speaker:
- Aimee Mullins
- Description:
-
खेळाडू, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एमी मुल्लीन्स तिच्या खोट्या पायांबद्दल सांगत आहे. खोट्या पायांमुळे त्यांना अनेक उत्कृष्ट ताकदी अवगत आहेत - वेग, सौंदर्य आणि ६ इंच जास्त उंची. थोडक्यात शरीर कसे असावे ह्याची व्याख्या त्यांनी बदलली आहे.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 09:46