0:00:00.000,0:00:03.000 मी ३०० लहान मुलांशी बोलत होते 0:00:03.000,0:00:05.000 त्यांचे वय ६ ते ८ वर्ष असावे, एका लहान मुलांच्या वस्तुसंग्रहालयात आमची बातचीत चालू होती 0:00:05.000,0:00:09.000 आणि माझ्या बरोबर मी एक पायांची पिशवी आणली होती 0:00:09.000,0:00:11.000 इथे जशी तुम्ही पाहताय तशी 0:00:11.000,0:00:13.000 मी पाय एक टेबलावर मांडले होते, त्या मुलांसाठी 0:00:13.000,0:00:17.000 आणि माझ्या अनुभवाप्रमाणे, लहान मुले मुळातच चिकित्सक असतात 0:00:17.000,0:00:19.000 त्यांना काय माहीत नाही किंवा समजत नाही 0:00:19.000,0:00:21.000 किंवा जे त्यांनी अजुन पर्यन्त पाहिले नाही त्या बद्दल 0:00:21.000,0:00:23.000 ती त्या वेगळेपणाला तेव्हाच भिऊ लागतात 0:00:23.000,0:00:26.000 जेव्हा मोठी माणसे तसे वागण्याविषयी शिकवतात. 0:00:26.000,0:00:29.000 आणि त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेवर थोडीफार बंधने घालतात, 0:00:29.000,0:00:32.000 किंवा त्यांच्या प्रश्न विचारण्यावर बंदी घालतात 0:00:32.000,0:00:34.000 त्यांना नम्र मुले बनविण्याच्या दृष्टीने. 0:00:34.000,0:00:38.000 माझ्या डोळ्यांसमोर एक पहिलीच्या बाई येतात, व्हरांडयामध्ये वांड पोरांना सांगणाऱ्या 0:00:38.000,0:00:41.000 "आता, काही करा पण" 0:00:41.000,0:00:43.000 "त्यांच्या पायांकडे पाहू नका." 0:00:43.000,0:00:45.000 पण अर्थातच तोच तर मूळ मुद्दा आहे 0:00:45.000,0:00:48.000 म्हणूनच मी तिथे होते. मला त्यांना पहायला आणि शोधायला आमंत्रित करायचे होते. 0:00:48.000,0:00:52.000 म्हणून मी त्यांच्या पालकांबरोबर करार केला 0:00:52.000,0:00:55.000 की मुले कोणाही प्रौढांविना आत येऊ शकतील दोन मिनिटांसाठी 0:00:55.000,0:00:57.000 त्यांची तीच. 0:00:57.000,0:01:01.000 दारे उघडतात, आणि सर्व मुले ह्या पायांच्या टेबलापाशी येतात. 0:01:01.000,0:01:04.000 आणि मुले एकमेकांना खुणावत, पायांची बोटे हलवत उभी राहतात 0:01:04.000,0:01:06.000 आणि ती त्यांचे संपूर्ण वजन धावण्याच्या पायावर टाकून 0:01:06.000,0:01:08.000 पहात असतात, काय होते ते 0:01:08.000,0:01:10.000 मग मी म्हणाले, "मुलांनो, लगेच सांगा -- 0:01:10.000,0:01:14.000 आज मी सकाळी उठले आणि मला एका घरावरून उडी मारावीशी वाटली 0:01:14.000,0:01:16.000 खूप मोठे नाही, बस दोन तीन मजले असलेले 0:01:16.000,0:01:21.000 पण तुम्ही कोणताही प्राणी, कोणताही महानायक, किंवा कार्टून यांचा विचार करू शकला 0:01:21.000,0:01:23.000 कोणतेही जे तुम्हाला आता लगेच सुचू शकेल असे 0:01:23.000,0:01:25.000 तर त्यांपैकी कोणासारखे पाय तुम्ही माझ्यासाठी बनवाल 0:01:25.000,0:01:28.000 आणि लगेचच कोणीतरी म्हणाले, "कांगारू" 0:01:28.000,0:01:30.000 "नको, नको, नको, बेडूक असला पाहिजे" 0:01:30.000,0:01:32.000 "नाही गो गो गॅजेट असले पाहिजे!" 0:01:32.000,0:01:34.000 "नाही, नाही, नाही! दी इन्क्रेडिबल्स असले पाहिजे." 0:01:34.000,0:01:37.000 आणि इतर गोष्टी ज्या मला तेव्हा माहीत नव्हत्या 0:01:37.000,0:01:39.000 मग एक आठ वर्षांचे पोर म्हणाले, 0:01:39.000,0:01:43.000 "तुला उडायला आवडणार नाही काय?" 0:01:44.000,0:01:47.000 आणि ती संपूर्ण खोली माझ्या सोबत म्हणाली , "हो!" 0:01:47.000,0:01:49.000 (हशा) 0:01:49.000,0:01:52.000 आणि तिथल्या तिथे, मी एका अपंग बाईपासून 0:01:52.000,0:01:56.000 जिला ह्या मुलांना "पंगू" म्हणून पहायचे शिक्षण मिळाले असते 0:01:56.000,0:02:01.000 अशी महिला झाले, जिच्या शरीरात अशी क्षमता आहे, जी अजुन त्यांच्या शरीरात नव्हती, 0:02:01.000,0:02:03.000 कोणीतरी जिची क्षमता कदाचित कमालीची आहे. 0:02:03.000,0:02:05.000 गंमतच आहे. 0:02:05.000,0:02:10.000 तर तुम्हापैकी काही लोकांनी माला TED मध्ये ११ वर्षांपूर्वी पाहिले असेल, 0:02:10.000,0:02:14.000 आणि हे संमेलन वक्ता आणि सहभागी ह्या दोघांसाठीही किती जीवन बदलणारे आहे, 0:02:14.000,0:02:18.000 ह्याबद्दल खूप गोष्टी झाल्या आहेत आणि मी ही त्याला अपवाद नाही. 0:02:18.000,0:02:24.000 TED च्या मंचावरूनच मी माझ्या आयुष्याच्या शोधाच्या पुढच्या दशकाकडे पदार्पण केले. 0:02:24.000,0:02:29.000 तेव्हा जे पाय मी प्रस्तुत केले ते कृत्रिम अवयावांमध्ये अतिशय असाधारण होते. 0:02:29.000,0:02:31.000 माझ्याकडे विणलेल्या कार्बन फायबरचे, धावण्याचे पाय होते 0:02:31.000,0:02:33.000 चित्त्याच्या मागच्या पायांचे प्रतिरूप असलेले, 0:02:33.000,0:02:35.000 जे तुम्ही काल TED च्या मंचावर पाहिले असतील 0:02:35.000,0:02:41.000 आणि हो, हे खरेखुरे वाटणारे, स्वाभाविकरित्या रंगवलेले सिलिकोन पायही. 0:02:41.000,0:02:45.000 त्यावेळी मला संधी मिळाली संबोधित करण्याची 0:02:45.000,0:02:49.000 अशा अन्वेशकांना, जे पारंपारिक वैद्यकीय-कृत्रिम अवयव निर्मात्यांच्या घोळक्याच्या बाहेर होते 0:02:49.000,0:02:53.000 त्यांची अक्कल हुशारी पाय निर्माण करण्याच्या 0:02:53.000,0:02:55.000 विज्ञान आणि कला यांमध्ये लावण्यासाठी. 0:02:55.000,0:03:00.000 म्हणजे आपण आकृती, उपयोग आणि सौंदर्य ह्यांच्यात फरक करणे थांबवू शकू 0:03:00.000,0:03:02.000 आणि त्यांना वेगवेगळे मूल्य देणे थांबवू शकू. 0:03:02.000,0:03:06.000 मी भाग्यवान होते म्हणून माझी हाक अनेकांनी ऐकली 0:03:06.000,0:03:11.000 आणि गंमत म्हणजे ती यात्रा, TED संमेलनात हजर असलेल्या एका स्त्री पासूनच सुरू झाली -- 0:03:11.000,0:03:14.000 ची पार्लमन, आशा आहे की ती कुठेतरी दर्शकांमध्ये बसली असेल. 0:03:14.000,0:03:17.000 ती तेव्हा एक ID नामक पत्रिकेची संपादक होती, 0:03:17.000,0:03:20.000 आणि तिने माझ्यावर तिच्या पत्रिकेत मुखपृष्ठ सदर लिहिले. 0:03:20.000,0:03:23.000 आणि ही अविश्वसनीय यात्रा सुरू झाली. 0:03:23.000,0:03:25.000 अनेक विचित्र गाठीभेटी माझ्या बरोबर तेव्हा खूपदा होत असत; 0:03:25.000,0:03:28.000 मी तेव्हा अनेक वक्ता म्हणून जाण्याची आमंत्रणे स्वीकारत होते 0:03:28.000,0:03:31.000 जगभरात, चित्त्याच्या पायांच्या रचनेबद्दल सांगायला 0:03:31.000,0:03:34.000 लोक संमेलनानंतर, माझे भाषण झाल्यावर माझ्याशी बोलण्याकरिता येत असत, 0:03:34.000,0:03:36.000 पुरूष व बायका. 0:03:36.000,0:03:38.000 आणि ते संभाषण ह्या प्रमाणे चालायचे 0:03:38.000,0:03:42.000 "तुला माहीत आहे एमी, तू खूप छान दिसतेस" 0:03:42.000,0:03:44.000 "तू अजिबात अपंग दिसत नाहीस." 0:03:44.000,0:03:45.000 (हशा) 0:03:45.000,0:03:47.000 मग मी म्हणायचे "खरच कमाल आहे, 0:03:47.000,0:03:49.000 "कारण, मी विकलांग आहे असे मलाही वाटत नाही." 0:03:49.000,0:03:54.000 आणि मग माझे डोळे उघडले, 0:03:54.000,0:03:56.000 सौंदर्याबद्दल होऊ शकणाऱ्या संभाषणाबाबत 0:03:56.000,0:03:59.000 एक सुंदर स्त्री कशाप्रमाणे दिसली पाहिजे? 0:03:59.000,0:04:01.000 एक मादक शरीर काय आहे? 0:04:01.000,0:04:03.000 आणि अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून 0:04:03.000,0:04:06.000 विकलांग असण्याचा अर्थ काय आहे? 0:04:06.000,0:04:09.000 म्हणजे पामेला अँडरसन जवळ कदाचित माझ्याहून जास्त कृत्रिम अवयव असतील. 0:04:09.000,0:04:11.000 पण तरी तिला कोणी अपंग नाही म्हणत. 0:04:11.000,0:04:16.000 (हशा) 0:04:17.000,0:04:21.000 तर ही पत्रिका पीटर सॅविल ह्या ग्राफिक डिझायनरांच्या हस्ते 0:04:21.000,0:04:26.000 अलेक्झांडर मॅक्वीन ह्या फॅशन डिझायनरकडे आणि निक नाईट ह्या छायाचित्रकाराकडे जाऊन पोहोचली, 0:04:26.000,0:04:28.000 ज्यांना ते संभाषण पुढे नेण्यात रूची होती. 0:04:28.000,0:04:31.000 TED झाल्यावर ३ महिन्यांनंतर मी विमानात बसले 0:04:31.000,0:04:36.000 मी लंडनला गेले माझ्या पहिल्या फोटो शूटसाठी, 0:04:36.000,0:04:37.000 त्यातून निघाले हे मुखपृष्ठ -- 0:04:37.000,0:04:40.000 दिसतेय ना मी फॅशनेबल? 0:04:40.000,0:04:44.000 त्यानंतर ३ महिन्यांनी मी माझा प्रथम फॅशन शो केला, मॅक्वीन ह्यांच्यासाठी 0:04:44.000,0:04:49.000 राखेपासून बनवलेल्या हातांनी नक्षी केलेल्या जड लाकडाच्या दोन पायांवर 0:04:49.000,0:04:52.000 सर्वांना वाटले की ते लाकडी बूट होते. 0:04:52.000,0:04:54.000 खरेतर ते पाय मी आज ह्या मंचावर माझ्या सोबत आणले आहेत: 0:04:55.000,0:04:59.000 द्राक्षांचे वेल, फुले, खरेच अप्रतिम 0:05:00.000,0:05:03.000 कविता महत्त्वाची आहे 0:05:03.000,0:05:08.000 कविता जुनाट आणि दुर्लक्ष केलेल्या गोष्टीला उदात्त करून 0:05:08.000,0:05:10.000 कलेच्या दुनियेत घेऊन जाते. 0:05:10.000,0:05:16.000 ज्या गोष्टीने लोकांना घाबरवले आहे, त्या गोष्टीचा कायापालट करते 0:05:16.000,0:05:18.000 एका अश्या गोष्टीत, जी लोकांना आमंत्रित करते पुढे येऊन पहायला , 0:05:18.000,0:05:21.000 आणि थोडा जास्त वेळ पहायला, 0:05:21.000,0:05:23.000 कदाचित समजावून घ्यायलासुद्धा. 0:05:23.000,0:05:27.000 हे मी शिकले माझ्या पुढच्या साहसातून. 0:05:27.000,0:05:31.000 कलाकार मॅथ्यू बर्नी एक चित्रपट बनवत होता, "The Cremaster cycle" म्हणून 0:05:31.000,0:05:34.000 तेव्हा एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला की -- 0:05:34.000,0:05:36.000 माझे पाय हे एक घालण्यायोग्य शिल्पकृती असू शकतात. 0:05:36.000,0:05:43.000 आणि मी त्या वेळेला सुद्धा, मनुष्यवत दिसणे हा एकच सौंदर्याचा आदर्श 0:05:43.000,0:05:45.000 या कल्पनेपासून दूर जात होते. 0:05:45.000,0:05:49.000 म्हणून आम्ही कृत्रिम पाय बनवले, ज्याला लोक प्रेमाने म्हणत असत काचेचे पाय 0:05:49.000,0:05:53.000 जरी ते पाय खरे तर पारदर्शक पॉलीयुरेथेनने बनवले होते, 0:05:53.000,0:05:55.000 म्हणजे बॉलिंगचे चेंडू ज्यापासून बनवतात ते. 0:05:55.000,0:05:56.000 जड! 0:05:56.000,0:05:58.000 मग आम्ही मातीचे पाय बनवले 0:05:58.000,0:06:02.000 ज्यात बटाटे उगवत होते आणि वरून बीट बाहेर येत होते, 0:06:02.000,0:06:04.000 आणि एक सुंदर पितळी बोटसुद्धा होते त्या पायाला. 0:06:04.000,0:06:06.000 हे त्या बोटाचे जवळचे छायाचित्र आहे. 0:06:06.000,0:06:08.000 आणि अजुन एक पात्र होते अर्ध-स्त्री आणि अर्ध-चित्त्याचे -- 0:06:08.000,0:06:10.000 माझ्या माझ्या धावपटू आयुष्याला सन्मान देण्याकरिता 0:06:10.000,0:06:13.000 १४ तासांची कृत्रिम द्रव्याची वेशभूषा 0:06:13.000,0:06:17.000 त्या प्राण्याच्या आत घुसायला. त्या प्राण्याकडे जोडले गेलेले पंजे होते 0:06:17.000,0:06:21.000 नखे व चाबकासारखे फटके मारणारी शेपटीसुद्धा होती 0:06:21.000,0:06:23.000 एका सरड्यासारखी. 0:06:23.000,0:06:24.000 (हशा) 0:06:25.000,0:06:29.000 आणि अजुन एक प्रकारचे पाय आम्ही बनवले, असे होते 0:06:29.000,0:06:31.000 जेली माशासारखे! 0:06:31.000,0:06:33.000 हे पण पॉलीयुरेथेनचेच. 0:06:33.000,0:06:36.000 आणि ह्या पायांचे काम एकच, 0:06:36.000,0:06:39.000 चित्रपटाच्या प्रसंगाबाहेर, 0:06:39.000,0:06:42.000 भावनांना उत्तेजित करणे आणि कल्पनेची ठिणगी पेटवणे 0:06:42.000,0:06:45.000 म्हणून विलक्षणपणा महत्त्वाचा असतो. 0:06:45.000,0:06:51.000 आज माझ्याकडे एक डझनपेक्षा अधिक पाय आहेत. 0:06:51.000,0:06:53.000 जे वेगवेगळ्या लोकांनी माझ्यासाठी बनवले आहेत, 0:06:53.000,0:06:57.000 आणि त्यांच्यामुळे माझ्याकडे जमिनीवरून वेगवेगळ्या रीतीने चालण्याची साधने आहेत 0:06:57.000,0:06:59.000 आणि मी माझी उंची बदलू शकते -- 0:06:59.000,0:07:01.000 माझ्याकडे पाच वेगवेगळ्या उंच्या आहेत. 0:07:01.000,0:07:03.000 (हशा) 0:07:03.000,0:07:05.000 आज माझी उंची ६'१" आहे. 0:07:05.000,0:07:08.000 आणि हे पाय मी एका वर्षापूर्वी बनवून घेतले होते 0:07:08.000,0:07:10.000 इंग्लंडमधील डोरसेट ऑर्थोपेडिककडून 0:07:10.000,0:07:12.000 आणि हे पाय मी घरी आणले मॅनहॅटनमध्ये 0:07:12.000,0:07:14.000 शहरातील पहिल्या संध्याकाळी, मी बाहेर गेले एका उच्चभ्रू पार्टीमध्ये 0:07:14.000,0:07:17.000 आणि तिथे एक मुलगी होती, जी अनेक वर्षे ओळखते 0:07:17.000,0:07:19.000 ५'८" असलेल्या मला. 0:07:19.000,0:07:21.000 ती मला पाहिल्यावर आश्चर्यचकित झाली 0:07:21.000,0:07:24.000 आणि म्हणाली, "पण तू इतकी उंच आहेस!" 0:07:24.000,0:07:26.000 मी म्हणाले, "हो! किती मजा आहे ना!" 0:07:26.000,0:07:28.000 म्हणजे ते थोडे घोडेकाठी वर घोडेकाठी घालून चालण्यासारखे होते 0:07:28.000,0:07:31.000 आणि दारांच्या चौकटीबरोबर तर माझे वेगळेच नाते जडत होते 0:07:31.000,0:07:33.000 जे मला कधीच वाटले नव्हते. 0:07:33.000,0:07:36.000 आणि मला मजा येत होती. 0:07:36.000,0:07:38.000 ती माझ्याकडे पाहून म्हणाली, 0:07:38.000,0:07:40.000 "पण एमी हा तर अन्याय आहे!" 0:07:40.000,0:07:43.000 (हशा) 0:07:43.000,0:07:45.000 (टाळ्या) 0:07:45.000,0:07:49.000 पण अविश्वसनीय गोष्ट ही होती की ती मुलगी खोटे बोलत नव्हती. 0:07:49.000,0:07:51.000 "खरच तुला तुझी उंची तुला हवी तशी बदलता यावी, 0:07:51.000,0:07:53.000 हा (इतरांवर) एक अन्याय आहे." 0:07:53.000,0:07:55.000 आणि तेव्हा मला माहित पडले की -- 0:07:55.000,0:07:58.000 समजाबरोबरच्या संभाषणात 0:07:58.000,0:08:00.000 महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत 0:08:00.000,0:08:02.000 गेल्या दशकात. 0:08:02.000,0:08:07.000 संभाषण आता उणीव भरून काढण्याबद्दल राहिले नव्हते 0:08:07.000,0:08:09.000 आता हे संभाषण वृद्धीबद्दल चालले आहे. 0:08:09.000,0:08:13.000 संभाषण आहे शक्तीबद्दल. 0:08:13.000,0:08:18.000 कृत्रिम अवयव उणीव पूर्ण करण्यासाठी राहिले नव्हते 0:08:18.000,0:08:21.000 ते प्रतीक आहेत 0:08:21.000,0:08:24.000 वापरणाऱ्यांच्या त्या जागेत जे हवे ते निर्माण करू शकण्याच्या 0:08:24.000,0:08:26.000 शक्तीचे. 0:08:26.000,0:08:29.000 म्हणून समजात अपंग समजले जाणारे लोक 0:08:29.000,0:08:34.000 आता त्यांच्या अस्तित्वाचे निर्माते होऊ शकतात 0:08:34.000,0:08:36.000 आणि खऱ्या अर्थाने ते अस्तित्व कायम बदलू ही शकतात. 0:08:36.000,0:08:38.000 त्यांच्या देहाची रचना करून. 0:08:38.000,0:08:41.000 एका सबळ करण्याच्या जागेतून. 0:08:41.000,0:08:46.000 आणि मला आज ह्या गोष्टीतून अतिशय प्रेरणा मिळत आहे 0:08:46.000,0:08:50.000 की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या -- 0:08:50.000,0:08:52.000 रोबोटिक्सच्या, बायोनिक्सच्या -- 0:08:52.000,0:08:54.000 आणि जुन्या-पुराण्या कवितेच्या संगमातून 0:08:54.000,0:09:00.000 आपण आपल्या सामुदायिक माणुसकीच्या अर्थाच्या जवळ जात आहोत. 0:09:00.000,0:09:05.000 आणि जर आपल्याला आपल्या माणुसकीच्या सामर्थ्याचा 0:09:05.000,0:09:07.000 पूर्ण अविष्कार करायचा असेल, 0:09:07.000,0:09:11.000 तर आपण हृदयभंग करणारी ताकद आणि आपल्या सर्वांच्यात असलेले 0:09:11.000,0:09:14.000 तेजोमय पंगुत्व दोन्ही साजरे केले पाहिजेत - . 0:09:14.000,0:09:17.000 मला शेकस्पियरच्या शायलॉकची आठवण येत आहे: 0:09:17.000,0:09:21.000 "तुम्ही जर आम्हाला बोचले, तर आम्हाला रक्त येत नाही काय 0:09:21.000,0:09:24.000 आणि जर तुम्ही आम्हाला गुदगुल्या केल्या, तर आम्ही हसत नाही काय?" 0:09:24.000,0:09:27.000 आपली माणुसकीच आहे, 0:09:27.000,0:09:29.000 आणि त्यातील सर्व सामर्थ्य, 0:09:29.000,0:09:32.000 जी आपल्याला सुंदर बनवते. 0:09:32.000,0:09:33.000 धन्यवाद. 0:09:33.000,0:09:40.000 (टाळ्यांचा गजर)