1 00:00:00,000 --> 00:00:03,000 मी ३०० लहान मुलांशी बोलत होते 2 00:00:03,000 --> 00:00:05,000 त्यांचे वय ६ ते ८ वर्ष असावे, एका लहान मुलांच्या वस्तुसंग्रहालयात आमची बातचीत चालू होती 3 00:00:05,000 --> 00:00:09,000 आणि माझ्या बरोबर मी एक पायांची पिशवी आणली होती 4 00:00:09,000 --> 00:00:11,000 इथे जशी तुम्ही पाहताय तशी 5 00:00:11,000 --> 00:00:13,000 मी पाय एक टेबलावर मांडले होते, त्या मुलांसाठी 6 00:00:13,000 --> 00:00:17,000 आणि माझ्या अनुभवाप्रमाणे, लहान मुले मुळातच चिकित्सक असतात 7 00:00:17,000 --> 00:00:19,000 त्यांना काय माहीत नाही किंवा समजत नाही 8 00:00:19,000 --> 00:00:21,000 किंवा जे त्यांनी अजुन पर्यन्त पाहिले नाही त्या बद्दल 9 00:00:21,000 --> 00:00:23,000 ती त्या वेगळेपणाला तेव्हाच भिऊ लागतात 10 00:00:23,000 --> 00:00:26,000 जेव्हा मोठी माणसे तसे वागण्याविषयी शिकवतात. 11 00:00:26,000 --> 00:00:29,000 आणि त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेवर थोडीफार बंधने घालतात, 12 00:00:29,000 --> 00:00:32,000 किंवा त्यांच्या प्रश्न विचारण्यावर बंदी घालतात 13 00:00:32,000 --> 00:00:34,000 त्यांना नम्र मुले बनविण्याच्या दृष्टीने. 14 00:00:34,000 --> 00:00:38,000 माझ्या डोळ्यांसमोर एक पहिलीच्या बाई येतात, व्हरांडयामध्ये वांड पोरांना सांगणाऱ्या 15 00:00:38,000 --> 00:00:41,000 "आता, काही करा पण" 16 00:00:41,000 --> 00:00:43,000 "त्यांच्या पायांकडे पाहू नका." 17 00:00:43,000 --> 00:00:45,000 पण अर्थातच तोच तर मूळ मुद्दा आहे 18 00:00:45,000 --> 00:00:48,000 म्हणूनच मी तिथे होते. मला त्यांना पहायला आणि शोधायला आमंत्रित करायचे होते. 19 00:00:48,000 --> 00:00:52,000 म्हणून मी त्यांच्या पालकांबरोबर करार केला 20 00:00:52,000 --> 00:00:55,000 की मुले कोणाही प्रौढांविना आत येऊ शकतील दोन मिनिटांसाठी 21 00:00:55,000 --> 00:00:57,000 त्यांची तीच. 22 00:00:57,000 --> 00:01:01,000 दारे उघडतात, आणि सर्व मुले ह्या पायांच्या टेबलापाशी येतात. 23 00:01:01,000 --> 00:01:04,000 आणि मुले एकमेकांना खुणावत, पायांची बोटे हलवत उभी राहतात 24 00:01:04,000 --> 00:01:06,000 आणि ती त्यांचे संपूर्ण वजन धावण्याच्या पायावर टाकून 25 00:01:06,000 --> 00:01:08,000 पहात असतात, काय होते ते 26 00:01:08,000 --> 00:01:10,000 मग मी म्हणाले, "मुलांनो, लगेच सांगा -- 27 00:01:10,000 --> 00:01:14,000 आज मी सकाळी उठले आणि मला एका घरावरून उडी मारावीशी वाटली 28 00:01:14,000 --> 00:01:16,000 खूप मोठे नाही, बस दोन तीन मजले असलेले 29 00:01:16,000 --> 00:01:21,000 पण तुम्ही कोणताही प्राणी, कोणताही महानायक, किंवा कार्टून यांचा विचार करू शकला 30 00:01:21,000 --> 00:01:23,000 कोणतेही जे तुम्हाला आता लगेच सुचू शकेल असे 31 00:01:23,000 --> 00:01:25,000 तर त्यांपैकी कोणासारखे पाय तुम्ही माझ्यासाठी बनवाल 32 00:01:25,000 --> 00:01:28,000 आणि लगेचच कोणीतरी म्हणाले, "कांगारू" 33 00:01:28,000 --> 00:01:30,000 "नको, नको, नको, बेडूक असला पाहिजे" 34 00:01:30,000 --> 00:01:32,000 "नाही गो गो गॅजेट असले पाहिजे!" 35 00:01:32,000 --> 00:01:34,000 "नाही, नाही, नाही! दी इन्क्रेडिबल्स असले पाहिजे." 36 00:01:34,000 --> 00:01:37,000 आणि इतर गोष्टी ज्या मला तेव्हा माहीत नव्हत्या 37 00:01:37,000 --> 00:01:39,000 मग एक आठ वर्षांचे पोर म्हणाले, 38 00:01:39,000 --> 00:01:43,000 "तुला उडायला आवडणार नाही काय?" 39 00:01:44,000 --> 00:01:47,000 आणि ती संपूर्ण खोली माझ्या सोबत म्हणाली , "हो!" 40 00:01:47,000 --> 00:01:49,000 (हशा) 41 00:01:49,000 --> 00:01:52,000 आणि तिथल्या तिथे, मी एका अपंग बाईपासून 42 00:01:52,000 --> 00:01:56,000 जिला ह्या मुलांना "पंगू" म्हणून पहायचे शिक्षण मिळाले असते 43 00:01:56,000 --> 00:02:01,000 अशी महिला झाले, जिच्या शरीरात अशी क्षमता आहे, जी अजुन त्यांच्या शरीरात नव्हती, 44 00:02:01,000 --> 00:02:03,000 कोणीतरी जिची क्षमता कदाचित कमालीची आहे. 45 00:02:03,000 --> 00:02:05,000 गंमतच आहे. 46 00:02:05,000 --> 00:02:10,000 तर तुम्हापैकी काही लोकांनी माला TED मध्ये ११ वर्षांपूर्वी पाहिले असेल, 47 00:02:10,000 --> 00:02:14,000 आणि हे संमेलन वक्ता आणि सहभागी ह्या दोघांसाठीही किती जीवन बदलणारे आहे, 48 00:02:14,000 --> 00:02:18,000 ह्याबद्दल खूप गोष्टी झाल्या आहेत आणि मी ही त्याला अपवाद नाही. 49 00:02:18,000 --> 00:02:24,000 TED च्या मंचावरूनच मी माझ्या आयुष्याच्या शोधाच्या पुढच्या दशकाकडे पदार्पण केले. 50 00:02:24,000 --> 00:02:29,000 तेव्हा जे पाय मी प्रस्तुत केले ते कृत्रिम अवयावांमध्ये अतिशय असाधारण होते. 51 00:02:29,000 --> 00:02:31,000 माझ्याकडे विणलेल्या कार्बन फायबरचे, धावण्याचे पाय होते 52 00:02:31,000 --> 00:02:33,000 चित्त्याच्या मागच्या पायांचे प्रतिरूप असलेले, 53 00:02:33,000 --> 00:02:35,000 जे तुम्ही काल TED च्या मंचावर पाहिले असतील 54 00:02:35,000 --> 00:02:41,000 आणि हो, हे खरेखुरे वाटणारे, स्वाभाविकरित्या रंगवलेले सिलिकोन पायही. 55 00:02:41,000 --> 00:02:45,000 त्यावेळी मला संधी मिळाली संबोधित करण्याची 56 00:02:45,000 --> 00:02:49,000 अशा अन्वेशकांना, जे पारंपारिक वैद्यकीय-कृत्रिम अवयव निर्मात्यांच्या घोळक्याच्या बाहेर होते 57 00:02:49,000 --> 00:02:53,000 त्यांची अक्कल हुशारी पाय निर्माण करण्याच्या 58 00:02:53,000 --> 00:02:55,000 विज्ञान आणि कला यांमध्ये लावण्यासाठी. 59 00:02:55,000 --> 00:03:00,000 म्हणजे आपण आकृती, उपयोग आणि सौंदर्य ह्यांच्यात फरक करणे थांबवू शकू 60 00:03:00,000 --> 00:03:02,000 आणि त्यांना वेगवेगळे मूल्य देणे थांबवू शकू. 61 00:03:02,000 --> 00:03:06,000 मी भाग्यवान होते म्हणून माझी हाक अनेकांनी ऐकली 62 00:03:06,000 --> 00:03:11,000 आणि गंमत म्हणजे ती यात्रा, TED संमेलनात हजर असलेल्या एका स्त्री पासूनच सुरू झाली -- 63 00:03:11,000 --> 00:03:14,000 ची पार्लमन, आशा आहे की ती कुठेतरी दर्शकांमध्ये बसली असेल. 64 00:03:14,000 --> 00:03:17,000 ती तेव्हा एक ID नामक पत्रिकेची संपादक होती, 65 00:03:17,000 --> 00:03:20,000 आणि तिने माझ्यावर तिच्या पत्रिकेत मुखपृष्ठ सदर लिहिले. 66 00:03:20,000 --> 00:03:23,000 आणि ही अविश्वसनीय यात्रा सुरू झाली. 67 00:03:23,000 --> 00:03:25,000 अनेक विचित्र गाठीभेटी माझ्या बरोबर तेव्हा खूपदा होत असत; 68 00:03:25,000 --> 00:03:28,000 मी तेव्हा अनेक वक्ता म्हणून जाण्याची आमंत्रणे स्वीकारत होते 69 00:03:28,000 --> 00:03:31,000 जगभरात, चित्त्याच्या पायांच्या रचनेबद्दल सांगायला 70 00:03:31,000 --> 00:03:34,000 लोक संमेलनानंतर, माझे भाषण झाल्यावर माझ्याशी बोलण्याकरिता येत असत, 71 00:03:34,000 --> 00:03:36,000 पुरूष व बायका. 72 00:03:36,000 --> 00:03:38,000 आणि ते संभाषण ह्या प्रमाणे चालायचे 73 00:03:38,000 --> 00:03:42,000 "तुला माहीत आहे एमी, तू खूप छान दिसतेस" 74 00:03:42,000 --> 00:03:44,000 "तू अजिबात अपंग दिसत नाहीस." 75 00:03:44,000 --> 00:03:45,000 (हशा) 76 00:03:45,000 --> 00:03:47,000 मग मी म्हणायचे "खरच कमाल आहे, 77 00:03:47,000 --> 00:03:49,000 "कारण, मी विकलांग आहे असे मलाही वाटत नाही." 78 00:03:49,000 --> 00:03:54,000 आणि मग माझे डोळे उघडले, 79 00:03:54,000 --> 00:03:56,000 सौंदर्याबद्दल होऊ शकणाऱ्या संभाषणाबाबत 80 00:03:56,000 --> 00:03:59,000 एक सुंदर स्त्री कशाप्रमाणे दिसली पाहिजे? 81 00:03:59,000 --> 00:04:01,000 एक मादक शरीर काय आहे? 82 00:04:01,000 --> 00:04:03,000 आणि अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून 83 00:04:03,000 --> 00:04:06,000 विकलांग असण्याचा अर्थ काय आहे? 84 00:04:06,000 --> 00:04:09,000 म्हणजे पामेला अँडरसन जवळ कदाचित माझ्याहून जास्त कृत्रिम अवयव असतील. 85 00:04:09,000 --> 00:04:11,000 पण तरी तिला कोणी अपंग नाही म्हणत. 86 00:04:11,000 --> 00:04:16,000 (हशा) 87 00:04:17,000 --> 00:04:21,000 तर ही पत्रिका पीटर सॅविल ह्या ग्राफिक डिझायनरांच्या हस्ते 88 00:04:21,000 --> 00:04:26,000 अलेक्झांडर मॅक्वीन ह्या फॅशन डिझायनरकडे आणि निक नाईट ह्या छायाचित्रकाराकडे जाऊन पोहोचली, 89 00:04:26,000 --> 00:04:28,000 ज्यांना ते संभाषण पुढे नेण्यात रूची होती. 90 00:04:28,000 --> 00:04:31,000 TED झाल्यावर ३ महिन्यांनंतर मी विमानात बसले 91 00:04:31,000 --> 00:04:36,000 मी लंडनला गेले माझ्या पहिल्या फोटो शूटसाठी, 92 00:04:36,000 --> 00:04:37,000 त्यातून निघाले हे मुखपृष्ठ -- 93 00:04:37,000 --> 00:04:40,000 दिसतेय ना मी फॅशनेबल? 94 00:04:40,000 --> 00:04:44,000 त्यानंतर ३ महिन्यांनी मी माझा प्रथम फॅशन शो केला, मॅक्वीन ह्यांच्यासाठी 95 00:04:44,000 --> 00:04:49,000 राखेपासून बनवलेल्या हातांनी नक्षी केलेल्या जड लाकडाच्या दोन पायांवर 96 00:04:49,000 --> 00:04:52,000 सर्वांना वाटले की ते लाकडी बूट होते. 97 00:04:52,000 --> 00:04:54,000 खरेतर ते पाय मी आज ह्या मंचावर माझ्या सोबत आणले आहेत: 98 00:04:55,000 --> 00:04:59,000 द्राक्षांचे वेल, फुले, खरेच अप्रतिम 99 00:05:00,000 --> 00:05:03,000 कविता महत्त्वाची आहे 100 00:05:03,000 --> 00:05:08,000 कविता जुनाट आणि दुर्लक्ष केलेल्या गोष्टीला उदात्त करून 101 00:05:08,000 --> 00:05:10,000 कलेच्या दुनियेत घेऊन जाते. 102 00:05:10,000 --> 00:05:16,000 ज्या गोष्टीने लोकांना घाबरवले आहे, त्या गोष्टीचा कायापालट करते 103 00:05:16,000 --> 00:05:18,000 एका अश्या गोष्टीत, जी लोकांना आमंत्रित करते पुढे येऊन पहायला , 104 00:05:18,000 --> 00:05:21,000 आणि थोडा जास्त वेळ पहायला, 105 00:05:21,000 --> 00:05:23,000 कदाचित समजावून घ्यायलासुद्धा. 106 00:05:23,000 --> 00:05:27,000 हे मी शिकले माझ्या पुढच्या साहसातून. 107 00:05:27,000 --> 00:05:31,000 कलाकार मॅथ्यू बर्नी एक चित्रपट बनवत होता, "The Cremaster cycle" म्हणून 108 00:05:31,000 --> 00:05:34,000 तेव्हा एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला की -- 109 00:05:34,000 --> 00:05:36,000 माझे पाय हे एक घालण्यायोग्य शिल्पकृती असू शकतात. 110 00:05:36,000 --> 00:05:43,000 आणि मी त्या वेळेला सुद्धा, मनुष्यवत दिसणे हा एकच सौंदर्याचा आदर्श 111 00:05:43,000 --> 00:05:45,000 या कल्पनेपासून दूर जात होते. 112 00:05:45,000 --> 00:05:49,000 म्हणून आम्ही कृत्रिम पाय बनवले, ज्याला लोक प्रेमाने म्हणत असत काचेचे पाय 113 00:05:49,000 --> 00:05:53,000 जरी ते पाय खरे तर पारदर्शक पॉलीयुरेथेनने बनवले होते, 114 00:05:53,000 --> 00:05:55,000 म्हणजे बॉलिंगचे चेंडू ज्यापासून बनवतात ते. 115 00:05:55,000 --> 00:05:56,000 जड! 116 00:05:56,000 --> 00:05:58,000 मग आम्ही मातीचे पाय बनवले 117 00:05:58,000 --> 00:06:02,000 ज्यात बटाटे उगवत होते आणि वरून बीट बाहेर येत होते, 118 00:06:02,000 --> 00:06:04,000 आणि एक सुंदर पितळी बोटसुद्धा होते त्या पायाला. 119 00:06:04,000 --> 00:06:06,000 हे त्या बोटाचे जवळचे छायाचित्र आहे. 120 00:06:06,000 --> 00:06:08,000 आणि अजुन एक पात्र होते अर्ध-स्त्री आणि अर्ध-चित्त्याचे -- 121 00:06:08,000 --> 00:06:10,000 माझ्या माझ्या धावपटू आयुष्याला सन्मान देण्याकरिता 122 00:06:10,000 --> 00:06:13,000 १४ तासांची कृत्रिम द्रव्याची वेशभूषा 123 00:06:13,000 --> 00:06:17,000 त्या प्राण्याच्या आत घुसायला. त्या प्राण्याकडे जोडले गेलेले पंजे होते 124 00:06:17,000 --> 00:06:21,000 नखे व चाबकासारखे फटके मारणारी शेपटीसुद्धा होती 125 00:06:21,000 --> 00:06:23,000 एका सरड्यासारखी. 126 00:06:23,000 --> 00:06:24,000 (हशा) 127 00:06:25,000 --> 00:06:29,000 आणि अजुन एक प्रकारचे पाय आम्ही बनवले, असे होते 128 00:06:29,000 --> 00:06:31,000 जेली माशासारखे! 129 00:06:31,000 --> 00:06:33,000 हे पण पॉलीयुरेथेनचेच. 130 00:06:33,000 --> 00:06:36,000 आणि ह्या पायांचे काम एकच, 131 00:06:36,000 --> 00:06:39,000 चित्रपटाच्या प्रसंगाबाहेर, 132 00:06:39,000 --> 00:06:42,000 भावनांना उत्तेजित करणे आणि कल्पनेची ठिणगी पेटवणे 133 00:06:42,000 --> 00:06:45,000 म्हणून विलक्षणपणा महत्त्वाचा असतो. 134 00:06:45,000 --> 00:06:51,000 आज माझ्याकडे एक डझनपेक्षा अधिक पाय आहेत. 135 00:06:51,000 --> 00:06:53,000 जे वेगवेगळ्या लोकांनी माझ्यासाठी बनवले आहेत, 136 00:06:53,000 --> 00:06:57,000 आणि त्यांच्यामुळे माझ्याकडे जमिनीवरून वेगवेगळ्या रीतीने चालण्याची साधने आहेत 137 00:06:57,000 --> 00:06:59,000 आणि मी माझी उंची बदलू शकते -- 138 00:06:59,000 --> 00:07:01,000 माझ्याकडे पाच वेगवेगळ्या उंच्या आहेत. 139 00:07:01,000 --> 00:07:03,000 (हशा) 140 00:07:03,000 --> 00:07:05,000 आज माझी उंची ६'१" आहे. 141 00:07:05,000 --> 00:07:08,000 आणि हे पाय मी एका वर्षापूर्वी बनवून घेतले होते 142 00:07:08,000 --> 00:07:10,000 इंग्लंडमधील डोरसेट ऑर्थोपेडिककडून 143 00:07:10,000 --> 00:07:12,000 आणि हे पाय मी घरी आणले मॅनहॅटनमध्ये 144 00:07:12,000 --> 00:07:14,000 शहरातील पहिल्या संध्याकाळी, मी बाहेर गेले एका उच्चभ्रू पार्टीमध्ये 145 00:07:14,000 --> 00:07:17,000 आणि तिथे एक मुलगी होती, जी अनेक वर्षे ओळखते 146 00:07:17,000 --> 00:07:19,000 ५'८" असलेल्या मला. 147 00:07:19,000 --> 00:07:21,000 ती मला पाहिल्यावर आश्चर्यचकित झाली 148 00:07:21,000 --> 00:07:24,000 आणि म्हणाली, "पण तू इतकी उंच आहेस!" 149 00:07:24,000 --> 00:07:26,000 मी म्हणाले, "हो! किती मजा आहे ना!" 150 00:07:26,000 --> 00:07:28,000 म्हणजे ते थोडे घोडेकाठी वर घोडेकाठी घालून चालण्यासारखे होते 151 00:07:28,000 --> 00:07:31,000 आणि दारांच्या चौकटीबरोबर तर माझे वेगळेच नाते जडत होते 152 00:07:31,000 --> 00:07:33,000 जे मला कधीच वाटले नव्हते. 153 00:07:33,000 --> 00:07:36,000 आणि मला मजा येत होती. 154 00:07:36,000 --> 00:07:38,000 ती माझ्याकडे पाहून म्हणाली, 155 00:07:38,000 --> 00:07:40,000 "पण एमी हा तर अन्याय आहे!" 156 00:07:40,000 --> 00:07:43,000 (हशा) 157 00:07:43,000 --> 00:07:45,000 (टाळ्या) 158 00:07:45,000 --> 00:07:49,000 पण अविश्वसनीय गोष्ट ही होती की ती मुलगी खोटे बोलत नव्हती. 159 00:07:49,000 --> 00:07:51,000 "खरच तुला तुझी उंची तुला हवी तशी बदलता यावी, 160 00:07:51,000 --> 00:07:53,000 हा (इतरांवर) एक अन्याय आहे." 161 00:07:53,000 --> 00:07:55,000 आणि तेव्हा मला माहित पडले की -- 162 00:07:55,000 --> 00:07:58,000 समजाबरोबरच्या संभाषणात 163 00:07:58,000 --> 00:08:00,000 महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत 164 00:08:00,000 --> 00:08:02,000 गेल्या दशकात. 165 00:08:02,000 --> 00:08:07,000 संभाषण आता उणीव भरून काढण्याबद्दल राहिले नव्हते 166 00:08:07,000 --> 00:08:09,000 आता हे संभाषण वृद्धीबद्दल चालले आहे. 167 00:08:09,000 --> 00:08:13,000 संभाषण आहे शक्तीबद्दल. 168 00:08:13,000 --> 00:08:18,000 कृत्रिम अवयव उणीव पूर्ण करण्यासाठी राहिले नव्हते 169 00:08:18,000 --> 00:08:21,000 ते प्रतीक आहेत 170 00:08:21,000 --> 00:08:24,000 वापरणाऱ्यांच्या त्या जागेत जे हवे ते निर्माण करू शकण्याच्या 171 00:08:24,000 --> 00:08:26,000 शक्तीचे. 172 00:08:26,000 --> 00:08:29,000 म्हणून समजात अपंग समजले जाणारे लोक 173 00:08:29,000 --> 00:08:34,000 आता त्यांच्या अस्तित्वाचे निर्माते होऊ शकतात 174 00:08:34,000 --> 00:08:36,000 आणि खऱ्या अर्थाने ते अस्तित्व कायम बदलू ही शकतात. 175 00:08:36,000 --> 00:08:38,000 त्यांच्या देहाची रचना करून. 176 00:08:38,000 --> 00:08:41,000 एका सबळ करण्याच्या जागेतून. 177 00:08:41,000 --> 00:08:46,000 आणि मला आज ह्या गोष्टीतून अतिशय प्रेरणा मिळत आहे 178 00:08:46,000 --> 00:08:50,000 की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या -- 179 00:08:50,000 --> 00:08:52,000 रोबोटिक्सच्या, बायोनिक्सच्या -- 180 00:08:52,000 --> 00:08:54,000 आणि जुन्या-पुराण्या कवितेच्या संगमातून 181 00:08:54,000 --> 00:09:00,000 आपण आपल्या सामुदायिक माणुसकीच्या अर्थाच्या जवळ जात आहोत. 182 00:09:00,000 --> 00:09:05,000 आणि जर आपल्याला आपल्या माणुसकीच्या सामर्थ्याचा 183 00:09:05,000 --> 00:09:07,000 पूर्ण अविष्कार करायचा असेल, 184 00:09:07,000 --> 00:09:11,000 तर आपण हृदयभंग करणारी ताकद आणि आपल्या सर्वांच्यात असलेले 185 00:09:11,000 --> 00:09:14,000 तेजोमय पंगुत्व दोन्ही साजरे केले पाहिजेत - . 186 00:09:14,000 --> 00:09:17,000 मला शेकस्पियरच्या शायलॉकची आठवण येत आहे: 187 00:09:17,000 --> 00:09:21,000 "तुम्ही जर आम्हाला बोचले, तर आम्हाला रक्त येत नाही काय 188 00:09:21,000 --> 00:09:24,000 आणि जर तुम्ही आम्हाला गुदगुल्या केल्या, तर आम्ही हसत नाही काय?" 189 00:09:24,000 --> 00:09:27,000 आपली माणुसकीच आहे, 190 00:09:27,000 --> 00:09:29,000 आणि त्यातील सर्व सामर्थ्य, 191 00:09:29,000 --> 00:09:32,000 जी आपल्याला सुंदर बनवते. 192 00:09:32,000 --> 00:09:33,000 धन्यवाद. 193 00:09:33,000 --> 00:09:40,000 (टाळ्यांचा गजर)