< Return to Video

एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पाय

  • 0:00 - 0:03
    मी ३०० लहान मुलांशी बोलत होते
  • 0:03 - 0:05
    त्यांचे वय ६ ते ८ वर्ष असावे, एका लहान मुलांच्या वस्तुसंग्रहालयात आमची बातचीत चालू होती
  • 0:05 - 0:09
    आणि माझ्या बरोबर मी एक पायांची पिशवी आणली होती
  • 0:09 - 0:11
    इथे जशी तुम्ही पाहताय तशी
  • 0:11 - 0:13
    मी पाय एक टेबलावर मांडले होते, त्या मुलांसाठी
  • 0:13 - 0:17
    आणि माझ्या अनुभवाप्रमाणे, लहान मुले मुळातच चिकित्सक असतात
  • 0:17 - 0:19
    त्यांना काय माहीत नाही किंवा समजत नाही
  • 0:19 - 0:21
    किंवा जे त्यांनी अजुन पर्यन्त पाहिले नाही त्या बद्दल
  • 0:21 - 0:23
    ती त्या वेगळेपणाला तेव्हाच भिऊ लागतात
  • 0:23 - 0:26
    जेव्हा मोठी माणसे तसे वागण्याविषयी शिकवतात.
  • 0:26 - 0:29
    आणि त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेवर थोडीफार बंधने घालतात,
  • 0:29 - 0:32
    किंवा त्यांच्या प्रश्न विचारण्यावर बंदी घालतात
  • 0:32 - 0:34
    त्यांना नम्र मुले बनविण्याच्या दृष्टीने.
  • 0:34 - 0:38
    माझ्या डोळ्यांसमोर एक पहिलीच्या बाई येतात, व्हरांडयामध्ये वांड पोरांना सांगणाऱ्या
  • 0:38 - 0:41
    "आता, काही करा पण"
  • 0:41 - 0:43
    "त्यांच्या पायांकडे पाहू नका."
  • 0:43 - 0:45
    पण अर्थातच तोच तर मूळ मुद्दा आहे
  • 0:45 - 0:48
    म्हणूनच मी तिथे होते. मला त्यांना पहायला आणि शोधायला आमंत्रित करायचे होते.
  • 0:48 - 0:52
    म्हणून मी त्यांच्या पालकांबरोबर करार केला
  • 0:52 - 0:55
    की मुले कोणाही प्रौढांविना आत येऊ शकतील दोन मिनिटांसाठी
  • 0:55 - 0:57
    त्यांची तीच.
  • 0:57 - 1:01
    दारे उघडतात, आणि सर्व मुले ह्या पायांच्या टेबलापाशी येतात.
  • 1:01 - 1:04
    आणि मुले एकमेकांना खुणावत, पायांची बोटे हलवत उभी राहतात
  • 1:04 - 1:06
    आणि ती त्यांचे संपूर्ण वजन धावण्याच्या पायावर टाकून
  • 1:06 - 1:08
    पहात असतात, काय होते ते
  • 1:08 - 1:10
    मग मी म्हणाले, "मुलांनो, लगेच सांगा --
  • 1:10 - 1:14
    आज मी सकाळी उठले आणि मला एका घरावरून उडी मारावीशी वाटली
  • 1:14 - 1:16
    खूप मोठे नाही, बस दोन तीन मजले असलेले
  • 1:16 - 1:21
    पण तुम्ही कोणताही प्राणी, कोणताही महानायक, किंवा कार्टून यांचा विचार करू शकला
  • 1:21 - 1:23
    कोणतेही जे तुम्हाला आता लगेच सुचू शकेल असे
  • 1:23 - 1:25
    तर त्यांपैकी कोणासारखे पाय तुम्ही माझ्यासाठी बनवाल
  • 1:25 - 1:28
    आणि लगेचच कोणीतरी म्हणाले, "कांगारू"
  • 1:28 - 1:30
    "नको, नको, नको, बेडूक असला पाहिजे"
  • 1:30 - 1:32
    "नाही गो गो गॅजेट असले पाहिजे!"
  • 1:32 - 1:34
    "नाही, नाही, नाही! दी इन्क्रेडिबल्स असले पाहिजे."
  • 1:34 - 1:37
    आणि इतर गोष्टी ज्या मला तेव्हा माहीत नव्हत्या
  • 1:37 - 1:39
    मग एक आठ वर्षांचे पोर म्हणाले,
  • 1:39 - 1:43
    "तुला उडायला आवडणार नाही काय?"
  • 1:44 - 1:47
    आणि ती संपूर्ण खोली माझ्या सोबत म्हणाली , "हो!"
  • 1:47 - 1:49
    (हशा)
  • 1:49 - 1:52
    आणि तिथल्या तिथे, मी एका अपंग बाईपासून
  • 1:52 - 1:56
    जिला ह्या मुलांना "पंगू" म्हणून पहायचे शिक्षण मिळाले असते
  • 1:56 - 2:01
    अशी महिला झाले, जिच्या शरीरात अशी क्षमता आहे, जी अजुन त्यांच्या शरीरात नव्हती,
  • 2:01 - 2:03
    कोणीतरी जिची क्षमता कदाचित कमालीची आहे.
  • 2:03 - 2:05
    गंमतच आहे.
  • 2:05 - 2:10
    तर तुम्हापैकी काही लोकांनी माला TED मध्ये ११ वर्षांपूर्वी पाहिले असेल,
  • 2:10 - 2:14
    आणि हे संमेलन वक्ता आणि सहभागी ह्या दोघांसाठीही किती जीवन बदलणारे आहे,
  • 2:14 - 2:18
    ह्याबद्दल खूप गोष्टी झाल्या आहेत आणि मी ही त्याला अपवाद नाही.
  • 2:18 - 2:24
    TED च्या मंचावरूनच मी माझ्या आयुष्याच्या शोधाच्या पुढच्या दशकाकडे पदार्पण केले.
  • 2:24 - 2:29
    तेव्हा जे पाय मी प्रस्तुत केले ते कृत्रिम अवयावांमध्ये अतिशय असाधारण होते.
  • 2:29 - 2:31
    माझ्याकडे विणलेल्या कार्बन फायबरचे, धावण्याचे पाय होते
  • 2:31 - 2:33
    चित्त्याच्या मागच्या पायांचे प्रतिरूप असलेले,
  • 2:33 - 2:35
    जे तुम्ही काल TED च्या मंचावर पाहिले असतील
  • 2:35 - 2:41
    आणि हो, हे खरेखुरे वाटणारे, स्वाभाविकरित्या रंगवलेले सिलिकोन पायही.
  • 2:41 - 2:45
    त्यावेळी मला संधी मिळाली संबोधित करण्याची
  • 2:45 - 2:49
    अशा अन्वेशकांना, जे पारंपारिक वैद्यकीय-कृत्रिम अवयव निर्मात्यांच्या घोळक्याच्या बाहेर होते
  • 2:49 - 2:53
    त्यांची अक्कल हुशारी पाय निर्माण करण्याच्या
  • 2:53 - 2:55
    विज्ञान आणि कला यांमध्ये लावण्यासाठी.
  • 2:55 - 3:00
    म्हणजे आपण आकृती, उपयोग आणि सौंदर्य ह्यांच्यात फरक करणे थांबवू शकू
  • 3:00 - 3:02
    आणि त्यांना वेगवेगळे मूल्य देणे थांबवू शकू.
  • 3:02 - 3:06
    मी भाग्यवान होते म्हणून माझी हाक अनेकांनी ऐकली
  • 3:06 - 3:11
    आणि गंमत म्हणजे ती यात्रा, TED संमेलनात हजर असलेल्या एका स्त्री पासूनच सुरू झाली --
  • 3:11 - 3:14
    ची पार्लमन, आशा आहे की ती कुठेतरी दर्शकांमध्ये बसली असेल.
  • 3:14 - 3:17
    ती तेव्हा एक ID नामक पत्रिकेची संपादक होती,
  • 3:17 - 3:20
    आणि तिने माझ्यावर तिच्या पत्रिकेत मुखपृष्ठ सदर लिहिले.
  • 3:20 - 3:23
    आणि ही अविश्वसनीय यात्रा सुरू झाली.
  • 3:23 - 3:25
    अनेक विचित्र गाठीभेटी माझ्या बरोबर तेव्हा खूपदा होत असत;
  • 3:25 - 3:28
    मी तेव्हा अनेक वक्ता म्हणून जाण्याची आमंत्रणे स्वीकारत होते
  • 3:28 - 3:31
    जगभरात, चित्त्याच्या पायांच्या रचनेबद्दल सांगायला
  • 3:31 - 3:34
    लोक संमेलनानंतर, माझे भाषण झाल्यावर माझ्याशी बोलण्याकरिता येत असत,
  • 3:34 - 3:36
    पुरूष व बायका.
  • 3:36 - 3:38
    आणि ते संभाषण ह्या प्रमाणे चालायचे
  • 3:38 - 3:42
    "तुला माहीत आहे एमी, तू खूप छान दिसतेस"
  • 3:42 - 3:44
    "तू अजिबात अपंग दिसत नाहीस."
  • 3:44 - 3:45
    (हशा)
  • 3:45 - 3:47
    मग मी म्हणायचे "खरच कमाल आहे,
  • 3:47 - 3:49
    "कारण, मी विकलांग आहे असे मलाही वाटत नाही."
  • 3:49 - 3:54
    आणि मग माझे डोळे उघडले,
  • 3:54 - 3:56
    सौंदर्याबद्दल होऊ शकणाऱ्या संभाषणाबाबत
  • 3:56 - 3:59
    एक सुंदर स्त्री कशाप्रमाणे दिसली पाहिजे?
  • 3:59 - 4:01
    एक मादक शरीर काय आहे?
  • 4:01 - 4:03
    आणि अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून
  • 4:03 - 4:06
    विकलांग असण्याचा अर्थ काय आहे?
  • 4:06 - 4:09
    म्हणजे पामेला अँडरसन जवळ कदाचित माझ्याहून जास्त कृत्रिम अवयव असतील.
  • 4:09 - 4:11
    पण तरी तिला कोणी अपंग नाही म्हणत.
  • 4:11 - 4:16
    (हशा)
  • 4:17 - 4:21
    तर ही पत्रिका पीटर सॅविल ह्या ग्राफिक डिझायनरांच्या हस्ते
  • 4:21 - 4:26
    अलेक्झांडर मॅक्वीन ह्या फॅशन डिझायनरकडे आणि निक नाईट ह्या छायाचित्रकाराकडे जाऊन पोहोचली,
  • 4:26 - 4:28
    ज्यांना ते संभाषण पुढे नेण्यात रूची होती.
  • 4:28 - 4:31
    TED झाल्यावर ३ महिन्यांनंतर मी विमानात बसले
  • 4:31 - 4:36
    मी लंडनला गेले माझ्या पहिल्या फोटो शूटसाठी,
  • 4:36 - 4:37
    त्यातून निघाले हे मुखपृष्ठ --
  • 4:37 - 4:40
    दिसतेय ना मी फॅशनेबल?
  • 4:40 - 4:44
    त्यानंतर ३ महिन्यांनी मी माझा प्रथम फॅशन शो केला, मॅक्वीन ह्यांच्यासाठी
  • 4:44 - 4:49
    राखेपासून बनवलेल्या हातांनी नक्षी केलेल्या जड लाकडाच्या दोन पायांवर
  • 4:49 - 4:52
    सर्वांना वाटले की ते लाकडी बूट होते.
  • 4:52 - 4:54
    खरेतर ते पाय मी आज ह्या मंचावर माझ्या सोबत आणले आहेत:
  • 4:55 - 4:59
    द्राक्षांचे वेल, फुले, खरेच अप्रतिम
  • 5:00 - 5:03
    कविता महत्त्वाची आहे
  • 5:03 - 5:08
    कविता जुनाट आणि दुर्लक्ष केलेल्या गोष्टीला उदात्त करून
  • 5:08 - 5:10
    कलेच्या दुनियेत घेऊन जाते.
  • 5:10 - 5:16
    ज्या गोष्टीने लोकांना घाबरवले आहे, त्या गोष्टीचा कायापालट करते
  • 5:16 - 5:18
    एका अश्या गोष्टीत, जी लोकांना आमंत्रित करते पुढे येऊन पहायला ,
  • 5:18 - 5:21
    आणि थोडा जास्त वेळ पहायला,
  • 5:21 - 5:23
    कदाचित समजावून घ्यायलासुद्धा.
  • 5:23 - 5:27
    हे मी शिकले माझ्या पुढच्या साहसातून.
  • 5:27 - 5:31
    कलाकार मॅथ्यू बर्नी एक चित्रपट बनवत होता, "The Cremaster cycle" म्हणून
  • 5:31 - 5:34
    तेव्हा एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला की --
  • 5:34 - 5:36
    माझे पाय हे एक घालण्यायोग्य शिल्पकृती असू शकतात.
  • 5:36 - 5:43
    आणि मी त्या वेळेला सुद्धा, मनुष्यवत दिसणे हा एकच सौंदर्याचा आदर्श
  • 5:43 - 5:45
    या कल्पनेपासून दूर जात होते.
  • 5:45 - 5:49
    म्हणून आम्ही कृत्रिम पाय बनवले, ज्याला लोक प्रेमाने म्हणत असत काचेचे पाय
  • 5:49 - 5:53
    जरी ते पाय खरे तर पारदर्शक पॉलीयुरेथेनने बनवले होते,
  • 5:53 - 5:55
    म्हणजे बॉलिंगचे चेंडू ज्यापासून बनवतात ते.
  • 5:55 - 5:56
    जड!
  • 5:56 - 5:58
    मग आम्ही मातीचे पाय बनवले
  • 5:58 - 6:02
    ज्यात बटाटे उगवत होते आणि वरून बीट बाहेर येत होते,
  • 6:02 - 6:04
    आणि एक सुंदर पितळी बोटसुद्धा होते त्या पायाला.
  • 6:04 - 6:06
    हे त्या बोटाचे जवळचे छायाचित्र आहे.
  • 6:06 - 6:08
    आणि अजुन एक पात्र होते अर्ध-स्त्री आणि अर्ध-चित्त्याचे --
  • 6:08 - 6:10
    माझ्या माझ्या धावपटू आयुष्याला सन्मान देण्याकरिता
  • 6:10 - 6:13
    १४ तासांची कृत्रिम द्रव्याची वेशभूषा
  • 6:13 - 6:17
    त्या प्राण्याच्या आत घुसायला. त्या प्राण्याकडे जोडले गेलेले पंजे होते
  • 6:17 - 6:21
    नखे व चाबकासारखे फटके मारणारी शेपटीसुद्धा होती
  • 6:21 - 6:23
    एका सरड्यासारखी.
  • 6:23 - 6:24
    (हशा)
  • 6:25 - 6:29
    आणि अजुन एक प्रकारचे पाय आम्ही बनवले, असे होते
  • 6:29 - 6:31
    जेली माशासारखे!
  • 6:31 - 6:33
    हे पण पॉलीयुरेथेनचेच.
  • 6:33 - 6:36
    आणि ह्या पायांचे काम एकच,
  • 6:36 - 6:39
    चित्रपटाच्या प्रसंगाबाहेर,
  • 6:39 - 6:42
    भावनांना उत्तेजित करणे आणि कल्पनेची ठिणगी पेटवणे
  • 6:42 - 6:45
    म्हणून विलक्षणपणा महत्त्वाचा असतो.
  • 6:45 - 6:51
    आज माझ्याकडे एक डझनपेक्षा अधिक पाय आहेत.
  • 6:51 - 6:53
    जे वेगवेगळ्या लोकांनी माझ्यासाठी बनवले आहेत,
  • 6:53 - 6:57
    आणि त्यांच्यामुळे माझ्याकडे जमिनीवरून वेगवेगळ्या रीतीने चालण्याची साधने आहेत
  • 6:57 - 6:59
    आणि मी माझी उंची बदलू शकते --
  • 6:59 - 7:01
    माझ्याकडे पाच वेगवेगळ्या उंच्या आहेत.
  • 7:01 - 7:03
    (हशा)
  • 7:03 - 7:05
    आज माझी उंची ६'१" आहे.
  • 7:05 - 7:08
    आणि हे पाय मी एका वर्षापूर्वी बनवून घेतले होते
  • 7:08 - 7:10
    इंग्लंडमधील डोरसेट ऑर्थोपेडिककडून
  • 7:10 - 7:12
    आणि हे पाय मी घरी आणले मॅनहॅटनमध्ये
  • 7:12 - 7:14
    शहरातील पहिल्या संध्याकाळी, मी बाहेर गेले एका उच्चभ्रू पार्टीमध्ये
  • 7:14 - 7:17
    आणि तिथे एक मुलगी होती, जी अनेक वर्षे ओळखते
  • 7:17 - 7:19
    ५'८" असलेल्या मला.
  • 7:19 - 7:21
    ती मला पाहिल्यावर आश्चर्यचकित झाली
  • 7:21 - 7:24
    आणि म्हणाली, "पण तू इतकी उंच आहेस!"
  • 7:24 - 7:26
    मी म्हणाले, "हो! किती मजा आहे ना!"
  • 7:26 - 7:28
    म्हणजे ते थोडे घोडेकाठी वर घोडेकाठी घालून चालण्यासारखे होते
  • 7:28 - 7:31
    आणि दारांच्या चौकटीबरोबर तर माझे वेगळेच नाते जडत होते
  • 7:31 - 7:33
    जे मला कधीच वाटले नव्हते.
  • 7:33 - 7:36
    आणि मला मजा येत होती.
  • 7:36 - 7:38
    ती माझ्याकडे पाहून म्हणाली,
  • 7:38 - 7:40
    "पण एमी हा तर अन्याय आहे!"
  • 7:40 - 7:43
    (हशा)
  • 7:43 - 7:45
    (टाळ्या)
  • 7:45 - 7:49
    पण अविश्वसनीय गोष्ट ही होती की ती मुलगी खोटे बोलत नव्हती.
  • 7:49 - 7:51
    "खरच तुला तुझी उंची तुला हवी तशी बदलता यावी,
  • 7:51 - 7:53
    हा (इतरांवर) एक अन्याय आहे."
  • 7:53 - 7:55
    आणि तेव्हा मला माहित पडले की --
  • 7:55 - 7:58
    समजाबरोबरच्या संभाषणात
  • 7:58 - 8:00
    महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत
  • 8:00 - 8:02
    गेल्या दशकात.
  • 8:02 - 8:07
    संभाषण आता उणीव भरून काढण्याबद्दल राहिले नव्हते
  • 8:07 - 8:09
    आता हे संभाषण वृद्धीबद्दल चालले आहे.
  • 8:09 - 8:13
    संभाषण आहे शक्तीबद्दल.
  • 8:13 - 8:18
    कृत्रिम अवयव उणीव पूर्ण करण्यासाठी राहिले नव्हते
  • 8:18 - 8:21
    ते प्रतीक आहेत
  • 8:21 - 8:24
    वापरणाऱ्यांच्या त्या जागेत जे हवे ते निर्माण करू शकण्याच्या
  • 8:24 - 8:26
    शक्तीचे.
  • 8:26 - 8:29
    म्हणून समजात अपंग समजले जाणारे लोक
  • 8:29 - 8:34
    आता त्यांच्या अस्तित्वाचे निर्माते होऊ शकतात
  • 8:34 - 8:36
    आणि खऱ्या अर्थाने ते अस्तित्व कायम बदलू ही शकतात.
  • 8:36 - 8:38
    त्यांच्या देहाची रचना करून.
  • 8:38 - 8:41
    एका सबळ करण्याच्या जागेतून.
  • 8:41 - 8:46
    आणि मला आज ह्या गोष्टीतून अतिशय प्रेरणा मिळत आहे
  • 8:46 - 8:50
    की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या --
  • 8:50 - 8:52
    रोबोटिक्सच्या, बायोनिक्सच्या --
  • 8:52 - 8:54
    आणि जुन्या-पुराण्या कवितेच्या संगमातून
  • 8:54 - 9:00
    आपण आपल्या सामुदायिक माणुसकीच्या अर्थाच्या जवळ जात आहोत.
  • 9:00 - 9:05
    आणि जर आपल्याला आपल्या माणुसकीच्या सामर्थ्याचा
  • 9:05 - 9:07
    पूर्ण अविष्कार करायचा असेल,
  • 9:07 - 9:11
    तर आपण हृदयभंग करणारी ताकद आणि आपल्या सर्वांच्यात असलेले
  • 9:11 - 9:14
    तेजोमय पंगुत्व दोन्ही साजरे केले पाहिजेत - .
  • 9:14 - 9:17
    मला शेकस्पियरच्या शायलॉकची आठवण येत आहे:
  • 9:17 - 9:21
    "तुम्ही जर आम्हाला बोचले, तर आम्हाला रक्त येत नाही काय
  • 9:21 - 9:24
    आणि जर तुम्ही आम्हाला गुदगुल्या केल्या, तर आम्ही हसत नाही काय?"
  • 9:24 - 9:27
    आपली माणुसकीच आहे,
  • 9:27 - 9:29
    आणि त्यातील सर्व सामर्थ्य,
  • 9:29 - 9:32
    जी आपल्याला सुंदर बनवते.
  • 9:32 - 9:33
    धन्यवाद.
  • 9:33 - 9:40
    (टाळ्यांचा गजर)
Title:
एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पाय
Speaker:
Aimee Mullins
Description:

खेळाडू, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एमी मुल्लीन्स तिच्या खोट्या पायांबद्दल सांगत आहे. खोट्या पायांमुळे त्यांना अनेक उत्कृष्ट ताकदी अवगत आहेत - वेग, सौंदर्य आणि ६ इंच जास्त उंची. थोडक्यात शरीर कसे असावे ह्याची व्याख्या त्यांनी बदलली आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
09:46
Tilottama Gaat added a translation

Marathi subtitles

Revisions