आनंदी असण्याहून अधिक आयुष्यात बरंच काही आहे
-
0:01 - 0:02मी सतत विचार करायची
-
0:02 - 0:06आयुष्याचे प्रमुख ध्येय म्हणजे
आनंदाचा पाठलाग करणे. -
0:07 - 0:10सगळे म्हणतात "आनंदाचा मार्ग म्हणजे यश,"
-
0:10 - 0:13म्हणून मी त्या आदर्श नोकरीचा,
-
0:13 - 0:16आदर्श जोडीदाराचा, सुंदर घराचा शोध घेतला.
-
0:17 - 0:20पण समाधानी वाटण्याऐवजी,
-
0:20 - 0:23मी चिंतीत झाले आणि वाहवत गेले.
-
0:23 - 0:27आणि मी एकटीच नव्हते; माझे मित्र --
तेसुद्धा याबाबतीत झगडले. -
0:29 - 0:33सरतेशेवटी, मी सकारात्मक मानसशास्त्र
शिकवणार्या महाविद्यालयात जायचे ठरवले -
0:33 - 0:36लोक नक्की कशाने आनंदी होतात
हे शिकण्यासाठी. -
0:37 - 0:40पण तिथे मला जो शोध लागला त्याने
माझे आयुष्यच बदलून गेले. -
0:40 - 0:45माहिती सांगते की आनंदाचा
पाठलाग करण्याने लोक दुखीः होऊ शकतात. -
0:46 - 0:48आणि मला जे प्रकर्षाने जाणवलं ते हे:
-
0:49 - 0:52जगभरात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे,
-
0:52 - 0:55आणि अमेरिकेत गेल्या ३० वर्षांतील
उच्चांक त्याने गाठला आहे. -
0:56 - 0:59जरी आयुष्य वस्तुनिष्ठपणे सुधारत असलं
-
0:59 - 1:01जगण्याच्या मान्य निकषानुसार ,
-
1:01 - 1:03तरी ही अधिकाधिक लोकांना निराश,
-
1:03 - 1:06उदासीन आणि एकाकी वाटतं.
-
1:06 - 1:09एक प्रकारची पोकळी लोकांना
कुरतडत आहे -
1:09 - 1:12आणि ती अनुभवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या
तुम्ही निराश असण्याची गरज नाही. -
1:12 - 1:15आज ना उद्या, मला वाटतं आपण
सगळेच अचंबित होतो: -
1:16 - 1:18हे सगळं इतकंच आहे का?
-
1:19 - 1:22आणि संशोधनानुसार, या निराशेचे
अनुमान कशाने लागते तर -
1:22 - 1:24तो आनंदाचा अभाव नव्हे.
-
1:24 - 1:26कुठल्यातरी दुसर्या गोष्टीच्या अभावाने
-
1:27 - 1:30आयुष्यात अर्थाचा अभाव असल्याने.
-
1:31 - 1:33पण माझ्यासाठी त्यामुळे काही
प्रश्न उपस्थित झाले. -
1:34 - 1:36आयुष्यात आनंदी असण्याहूनही अधिक
काही असू शकतं का? -
1:37 - 1:40आणि आनंदी असणे आणि आयुष्यात
अर्थ असणे -
1:40 - 1:42यांत फरक काय?
-
1:43 - 1:47बरेच मानसशास्त्रज्ञ आनंदाची व्याख्या
आरामपूर्ण आणि समाधानी अवस्था, -
1:48 - 1:49त्या क्षणात छान वाटणे अशी करतात.
-
1:50 - 1:52तथापि, अर्थ अधिक गहन आहे.
-
1:52 - 1:55प्रख्यात मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलीगमन
म्हणतात -
1:55 - 2:00अर्थप्राप्ती हि स्वत्वाच्या पलीकडे जाऊन
कशाशीतरी संबंधीत होऊन आणि सेवा करून -
2:00 - 2:02आणि स्वतःतील उत्तमाला घडवून होते.
-
2:04 - 2:06आपल्या संस्कृतीला आनंदाने पछाडलेले आहे,
-
2:06 - 2:10पण मला असं आढळलं कि अर्थाचा
शोध हा अधिक समाधानी मार्ग आहे. -
2:10 - 2:13आणि अभ्यास असं दाखवतात कि ज्या
लोकांच्या आयुष्यात अर्थ आहे, -
2:13 - 2:15ते मनाने अधिक लवचिक असतात,
-
2:15 - 2:17ते शाळांत आणि कामाच्या जागी
अधिक चांगली कामगिरी करतात, -
2:17 - 2:19आणि ते अधिक जगतातसुद्धा.
-
2:20 - 2:22मग या सगळ्यामुळे मला प्रश्न पडतो:
-
2:22 - 2:25आपल्यातील प्रत्येकजण
अर्थपूर्ण आयुष्य कसं जगू शकतो? -
2:26 - 2:30याचा शोध घेण्यासाठी, मी शेकडो
लोकांच्या मुलाखती घेण्यात आणि -
2:30 - 2:33मानसशास्त्राची, मज्जासंस्थाशास्त्राची
आणि तत्वज्ञानाची -
2:33 - 2:35हजारो पानं वाचण्यात घालवली.
-
2:35 - 2:37सगळ्याचा सार असा कि,
-
2:37 - 2:43मला असं आढळलं कि अर्थपूर्ण आयुष्याचे
मी ज्याला चार स्तंभ म्हणते असे आहेत. -
2:43 - 2:45आणि आपण प्रत्येकजण अर्थपूर्ण आयुष्य
घडवू शकतो -
2:45 - 2:48आपल्या आयुष्यात यांपैकी काही किंवा
सर्वच स्तंभ उभे करून. -
2:49 - 2:52पहिला स्तंभ आहे तदभविता.
कोणीतरी आपले आहे हि भावना -
2:52 - 2:55तदभविता नातेसंबंध असण्याने येते
-
2:55 - 2:57ज्यात तुमचे वास्तव मूल्यमापन होते .
-
2:57 - 3:00तुम्हीही इतरांबाबतीत तसेच करता.
-
3:00 - 3:05पण काही गट आणि नाती खूपच वरवरची
तदभविता दर्शवतात: -
3:05 - 3:07तुमचे मूल्य हे तुमच्या विश्वासावर,
-
3:07 - 3:08तुमच्या तिरस्कारवर ठरते
-
3:08 - 3:10आणि तुम्ही कोण आहात यावर नाही.
-
3:10 - 3:13तदभविता प्रेमातून निर्माण होते.
-
3:13 - 3:16व्यक्तींतल्या क्षणांत ती वसते,
-
3:16 - 3:20आणि ती वैकल्पिक असते -- इतरांबाबतची
तदभाविता तुम्ही वृद्धिंगत करू शकता. -
3:21 - 3:22हे एक उदाहरण बघा.
-
3:22 - 3:26माझा मित्र जोनाथन रोज सकाळी
वृत्तपत्र विकत घेतो -
3:26 - 3:28न्यू यॉर्क मधील एकाच विक्रेत्याकडून.
-
3:29 - 3:31तथापि, ते केवळ एक व्यवहार करत नाहीत.
-
3:31 - 3:33ते क्षणभर मंदावतात, बोलतात,
-
3:34 - 3:35आणि एकमेकांना माणसासारखे वागवतात.
-
3:36 - 3:39पण एकदा जोनाथन जवळ योग्य तेवढे
सुटे पैसे नव्हते, -
3:39 - 3:41आणि तो विक्रेता म्हणाला,
-
3:41 - 3:42"त्याची चिंता करू नका."
-
3:42 - 3:45पण जोनाथनला पैसे द्यायचेच होते,
-
3:45 - 3:48मग तो एका दुकानात गेला आणि त्याने
काहीतरी नको असलेली गोष्ट विकत घेतली -
3:48 - 3:50पैसे सुटे करण्यासाठी.
-
3:50 - 3:53पण जेव्हा त्याने विक्रेत्याला पैसे दिले,
-
3:53 - 3:54विक्रेत्याने ते घेतले नाहीत.
-
3:55 - 3:56तो दुखावला गेला होता.
-
3:57 - 3:59तो अनुकंपा दाखवायचा प्रयत्न करत होता,
-
3:59 - 4:01पण जोनाथनने ती नाकारली होती.
-
4:02 - 4:06मला वाटतं आपण अजाणतेपणे याप्रमाणे
छोट्या गोष्टींत लोकांना नाकारत असतो. -
4:06 - 4:07मी तसं करते.
-
4:08 - 4:11मी कुणा ओळखीच्या व्यक्तीजवळून जाईन
आणि तिची दखलही घेणार नाही. -
4:11 - 4:13कुणी माझ्याशी बोलत असताना मी माझा
फोन चेक करेन. -
4:14 - 4:16अशा कृती इतरांचे अवमूल्यन करतात.
-
4:16 - 4:18त्यामुळे त्यांना अदखलपात्र आणि अनुचित
असल्यासारखे वाटते. -
4:19 - 4:22पण जेव्हा तुम्ही प्रेमाने पुढाकार घेता
तुम्ही एक बंध तयार -
4:22 - 4:24करता तुम्हा दोघांनाही उभारी देतो.
-
4:25 - 4:29बर्याच लोकांसाठी, तदभाविता हा अर्थाचा
सर्वात आवश्यक स्त्रोत असतो, -
4:29 - 4:31ते कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत
असलेले बंध. -
4:31 - 4:35इतरांसाठी, अर्थसाठी महत्वाचा दुसरा
स्तंभ असतो: हेतु. -
4:36 - 4:39आता, तुमचा हेतु शोधणे म्हणजे तुम्हाला
आनंदी ठेवणार्या त्या -
4:39 - 4:41नोकरीचा शोध घेण्यासारखे नव्हे.
-
4:42 - 4:45हेतु हा तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा
तुम्ही काय देता याबद्दल अधिक आहे. -
4:45 - 4:49इस्पितळातील परिरक्षक मला म्हणाली
तिचा हेतु आजारी लोकांना बरं करणं हा आहे. -
4:50 - 4:51बरेच पालक मला सांगतात,
-
4:51 - 4:53"माझा हेतु म्हणजे माझ्या मुलांचे संगोपन"
-
4:54 - 4:58हेतुसाठी महत्वाची बाब म्हणजे इतरांच्या
सेवेसाठी तुमचा कस लावणे. -
4:58 - 5:02अर्थात, आपल्यातील बर्याचजणांच्या
बाबतीत ते कामातूनच होते. -
5:02 - 5:05याप्रमाणेच आपण योगदान देतो आणि
हवेहवेसे वाटतो. -
5:05 - 5:09पण याचाच अर्थ हाही आहे कि
कामातील दुर्बलता, -
5:09 - 5:10बेरोजगारी,
-
5:10 - 5:12कामगारांचा अल्प सहभाग हे केवळ
-
5:12 - 5:16आर्थिक प्रश्न नसून ते
अस्तित्वासंबंधीचेदेखील प्रश्न आहेत. -
5:17 - 5:19काही फायदेशीर करण्यायोग्य नसेल तर
-
5:19 - 5:20लोक अडखळतात.
-
5:21 - 5:24अर्थात, कामाच्या जागी तुम्हाला हेतु
शोधायचा नसतो -
5:24 - 5:27पण त्यामुळे जगण्याचे एक साधन मिळते,
-
5:27 - 5:29कुठलातरी "का" पुढे जाण्याची चालना देतो.
-
5:31 - 5:34अर्थाचा तिसरा स्तंभदेखील स्वतःच्या पलीकडे
बघण्याचा आहे, -
5:34 - 5:36पण पूर्णतः वेगळ्या मार्गाने:
-
5:36 - 5:38अनुभवातीत.
-
5:38 - 5:40अनुभवातीत अवस्था म्हणजे ते
दुर्मिळ क्षण असतात -
5:40 - 5:44जेव्हा तुम्ही दैनंदिन आयुष्याच्या
धावपळीतून वर येता, -
5:44 - 5:45तुमची स्वत्वाची भावना लोप पावते,
-
5:46 - 5:48आणि तुम्हाला उच्चतम वास्तवाशी जोडल्या
गेल्यासारखे वाटते. -
5:49 - 5:53मी बोललेल्या एका माणसासाठी अनुभवातीत
अवस्था कला पाहण्यातून येत असे. -
5:53 - 5:55दुसर्या एकासाठी ती चर्चमध्ये येत असे.
-
5:55 - 5:59माझ्यासाठी, मी एक लेखिका आहे, ती
लिहिण्यातून येते. -
5:59 - 6:04कधीकधी मी त्यात इतकी मग्न होते कि
मला वेळेचे आणि जागेचे भान राहात नाही. -
6:05 - 6:08हे अनुभवातीत क्षण तुम्हाला
बदलवू शकतात. -
6:08 - 6:12एका अभ्यासात विद्यार्थ्यांना २०० फिट
उंच निलगिरीच्या झाडांकडे पाहायचे होते -
6:12 - 6:14एक मिनीटासाठी.
-
6:14 - 6:16पण नंतर त्यांच्यातील स्वकेंद्रितपणा
कमी झाला, -
6:16 - 6:18आणि ते अधिक औदार्याने वागू लागले
-
6:18 - 6:20जेव्हा कुणाची मदत करण्याची
संधी दिली तेव्हा. -
6:22 - 6:25तदभाविता, हेतु, अनुभवातीत अवस्था.
-
6:26 - 6:29आता, मला सापडलेल्या
अर्थाच्या चौथ्या स्तंभाने, -
6:29 - 6:31लोक अचंबित होतात.
-
6:31 - 6:34चौथा स्तंभ आहे कथाकथनाचा,
-
6:34 - 6:37तुम्ही तुमची स्वतःची स्वतःला जी
सांगता ती कथा. -
6:38 - 6:42तुमच्या आयुष्यातील घटनांपासून गोष्ट
तयार करण्याने स्पष्टता येते. -
6:42 - 6:45तुम्ही कसे घडलात हे समजण्यास
ती मदत करते. -
6:46 - 6:49पण बहुदा आपल्या हे लक्षात येत नाही कि
आपल्या कथांचे आपणच लेखक असतो -
6:49 - 6:51आणि आपण त्यांच्या कथनाचे मार्ग बदलू शकतो.
-
6:51 - 6:53तुमचे आयुष्य ही केवळ एक घटनांची
यादी नव्हे. -
6:53 - 6:57तुम्ही तुमची कथा संपादित करून,
अर्थ लावून पुन्हा सांगू शकता, -
6:57 - 6:59जर तुमच्याकडे तथ्याची कमतरता
असली तरी. -
7:00 - 7:04मी एमेका नावाच्या एका तरुणाला भेटले ज्याला
फुटबॉल खेळताना अर्धांगवायू झाला होता. -
7:05 - 7:07त्याच्या या हानीनंतर, एमेकाने
स्वतःला संगितले, -
7:07 - 7:10"फुटबॉल खेळताना माझं
आयुष्य छान होतं, -
7:10 - 7:12पण आता माझ्याकडे बघ."
-
7:14 - 7:16जे लोक अशा कथा सांगतात --
-
7:16 - 7:19"माझं आयुष्य चांगलं होतं. आता ते
वाईट आहे." -- -
7:19 - 7:22ते अधिक चिंतातुर आणि निराश असतात.
-
7:22 - 7:24आणि काही काळ एमेका तसाच होता.
-
7:25 - 7:28पण कालपरत्वे, त्याने एक वेगळीच
कथा गुंफायला सुरुवात केली. -
7:28 - 7:30त्याची नवीन कथा अशी होती,
-
7:30 - 7:33"माझ्या आजारापूर्वी,
माझे आयुष्य उद्देशहीन होते. -
7:33 - 7:37मी खूप मौजमस्ती केली आणि
एक खूप स्वार्थी माणूस होतो. -
7:37 - 7:40पण माझ्या आजाराने मला जाणीव करून
दिली कि मी एक चांगला माणूस होऊ शकतो." -
7:41 - 7:45त्याच्या कथेच्या त्या संपादनाने एमेकाचे
आयुष्य बदलून गेले. -
7:45 - 7:47स्वतःला नवीन कथा ऐकवल्यानंतर,
-
7:48 - 7:49एमेकाने मुलांना मार्गदर्शन
करणे सुरू केले -
7:49 - 7:52आणि त्याला त्याच्या हेतूचा शोध लागला:
-
7:52 - 7:53दुसर्यांची सेवा.
-
7:54 - 7:57मानसशास्त्रज्ञ डॅन मॅकअॅडम्स याला
"विमोचक कथा" म्हणतात, -
7:58 - 8:00जिच्यात वाईटाचे विमोचन चांगल्याने होते.
-
8:01 - 8:03त्यांना आढळलं, जे लोक अर्थपूर्ण आयुष्य
जगतात, -
8:03 - 8:05ते त्यांची जीवनगाथा विमोचन,
-
8:05 - 8:08वाढ आणि प्रेमाने परिभाषित करून सांगतात.
-
8:09 - 8:11पण लोक त्यांची कथा कशाने बदलतात?
-
8:12 - 8:14काही लोक सल्लागाराची मदत घेतात,
-
8:14 - 8:15पण तुम्ही हे स्वतःदेखील करू शकता,
-
8:16 - 8:18निव्वळ तुमच्या आयुष्याला विचारपूर्वकपणे
प्रतिबिंबीत करून, -
8:18 - 8:20तुम्हाला परिभाषित करणार्या अनुभवांनी
-
8:20 - 8:22तुम्हाला कसे घडवले तुम्ही काय
गमावले -
8:23 - 8:24आणि काय कमावले.
तेच एमेकाने केले. -
8:25 - 8:27तुम्ही तुमची कथा एका रात्रीत
बदलू शकत नाही; -
8:27 - 8:29त्याला कैक वर्ष लागू शकतात
व ते वेदनादायक असू शकते -
8:29 - 8:32आपल्या सगळ्यांनाच त्रास झालेला
असतो व आपण सारेच संघर्ष करतो. -
8:33 - 8:37पण त्या वेदनादायी स्मृतींना कवटाळल्याने
नवीन दृष्टीकोन आणि ज्ञान मिळू शकते, -
8:37 - 8:40तुम्हाला तारणार्या त्या
चांगल्या गोष्टींचे. -
8:43 - 8:47तदभाविता, हेतु,
अनुभवतीतता, कथाकथन: -
8:48 - 8:51हे अर्थाचे ते चार स्तंभ आहेत.
-
8:52 - 8:53मी जेव्हा लहान होते,
-
8:53 - 8:57तेव्हा माझ्याभोवती सगळे स्तंभ असल्याचे
भाग्य मला लाभले. -
8:57 - 9:02मोंट्रीआल मधील आमच्या घरातून माझे पालक
एक सुफी बैठकगृह चालवायचे. -
9:03 - 9:07सुफीजम हा व्हर्लिंग देरविशेस आणि
कवी रूमिशी संबंधित -
9:07 - 9:09एक आध्यात्मिक सराव आहे.
-
9:09 - 9:12आठवड्यातून दोनदा, सुफी लोक आमच्याकडे
येत असत -
9:12 - 9:16चिंतन करण्यासाठी, पर्शियन चहा पिण्यासाठी
आणि कथा सांगण्यासाठी. -
9:16 - 9:19निर्मिलेल्या सगळ्यांची सेवा हादेखील
त्यांच्या सरावाचा भाग होता -
9:19 - 9:21छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम देऊन,
-
9:21 - 9:24म्हणजेच जरी लोक तुमच्याशी वाईट वागले
असले तरी त्यांच्याप्रती दयाळू असणे -
9:24 - 9:28पण त्यामुळे त्यांना हेतु मिळाला:
अहंकाराला लगाम घालणे. -
9:29 - 9:32अखेरीस, मी कॉलेजला जाण्यासाठी घर सोडलं
-
9:32 - 9:35आणि माझ्या आयुष्यातील दैनंदिन
सुफी प्रशिक्षणाविना -
9:35 - 9:37माझे बंध तुटल्यासारखे वाटू लागलं.
-
9:37 - 9:40आणि आयुष्य जगण्यालायक करणार्या
त्या गोष्टींचा शोध घ्यायला मी सुरुवात केली -
9:41 - 9:43त्यामुळेच मी या प्रवासाला निघाले.
-
9:43 - 9:45मागे वळून पाहता, मला जाणवतं कि
-
9:45 - 9:48सुफी बैठक्गृहाला अर्थाची
खरी संस्कृती होती. -
9:48 - 9:51स्तंभ हे स्थापत्यशास्त्राचा भाग होते
आणि त्या -
9:51 - 9:54स्तंभांच्या अस्तित्वानेच आम्हाला
अधिक तीव्रतेने जगण्यास मदत केली. -
9:54 - 9:57अर्थात, हीच तत्व लागू होतात
-
9:57 - 9:59इतर प्रबळ समाजातदेखील --
-
9:59 - 10:01चांगली आणि वाईट.
-
10:02 - 10:04टोळ्या, पंथ:
-
10:04 - 10:07या स्तंभांचा वापर करणार्या
अर्थाच्या संस्कृती आहेत -
10:07 - 10:10आणि ज्या लोकांना जगण्याचे आणि
मरण्याचे कारण देतात. -
10:10 - 10:13पण त्यासाठी म्हणूनच आपण एक
समाज म्हणून -
10:13 - 10:15अधिक चांगले विकल्प द्यायला हवेत.
-
10:15 - 10:19आपल्या कुटुंबांत आणि संस्थांत आपण
हे स्तंभ उभारणे गरजेचे आहे -
10:19 - 10:21लोकांना त्यांचे उत्तम रूप धरण करण्यास
मदत करण्यासाठी. -
10:23 - 10:25पण अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास मेहनत
घ्यावी लागते. -
10:25 - 10:27ती सतत चालणारी प्रक्रिया आहे.
-
10:27 - 10:31जसा प्रत्येक दिवस जातो,
आपण सतत आपलं जीवन घडवत असतो, -
10:31 - 10:32आपल्या कथेत भर घालत असतो.
-
10:33 - 10:36आणि कधीकधी आपण मार्ग सोडू शकतो.
-
10:36 - 10:38माझ्याबाबतीत तसं जेव्हा घडतं,
-
10:38 - 10:42मला माझ्या वडिलांसोबत आलेला एक
प्रभावी प्रसंग आठवतो. -
10:44 - 10:46मी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण
केल्यावर अनेक महिन्यांनी -
10:46 - 10:50माझ्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका
आला होता ज्याने त्यांचे प्राण घेतले असते. -
10:51 - 10:54ते वाचले आणि जेव्हा मी त्यांना विचारलं
त्यांच्या मनात काय चाललं होतं -
10:54 - 10:56मृत्युशी सामना करत असताना,
-
10:56 - 10:59ते म्हणाले केवळ एकच विचार होता
जगणे जरूरी आहे -
10:59 - 11:01जेणेकरून ते माझ्या भावाची व माझी
काळजी घेऊ -
11:01 - 11:03शकतील आणि आयुष्यासाठी लढण्याची
इच्छा याने त्यांना दिली. -
11:04 - 11:07तत्कालिक शल्यक्रियेसाठी दिलेल्या
भुलीचा जेव्हा अंमल चढला -
11:07 - 11:10तेव्हा १० पासून उलट गणना करण्याऐवजी,
-
11:10 - 11:13ते आमची नावं मंत्रासारखी वारंवार घेत होते.
-
11:14 - 11:18या भूतलावर उच्चारलेले शेवटचे शब्द म्हणजे
आमची नावं असतील अशी त्यांची इच्छा होती -
11:18 - 11:19ते गतप्राण झाले असते तर.
-
11:21 - 11:25माझे वडील एक सुतार आणि सुफी आहेत.
-
11:25 - 11:27ते एक विनम्र आयुष्य आहे,
-
11:27 - 11:28पण चांगलं आयुष्य आहे.
-
11:29 - 11:32मृत्युशी सामना करत पडलेले असताना
त्यांना जगण्याचे एक कारण होते: -
11:32 - 11:34प्रेम.
-
11:34 - 11:36त्यांची कुटुंबाप्रती असलेली तदभाविता,
-
11:36 - 11:38एक वडील म्हणून त्यांचा हेतु,
-
11:38 - 11:41आमच्या नावांचा पुनरुच्चार करीत
केलेले अनुभवातीत चिंतन -- -
11:41 - 11:44ते म्हणतात, या कारणांमुळे ते वाचले.
-
11:44 - 11:46ती कथा ते स्वतःला सांगतात.
-
11:48 - 11:50अर्थाची शक्ती ती आहे.
-
11:51 - 11:53आनंद येतो आणि जातो.
-
11:53 - 11:55पण जेव्हा आयुष्य खरंच चांगलं असतं
-
11:55 - 11:57आणि जेव्हा वाईट घडत असतं,
-
11:57 - 12:00अर्थ तुम्हाला तग धरून
राहण्यास काहीतरी देतो. -
12:00 - 12:02धन्यवाद.
-
12:02 - 12:05(टाळ्या)
- Title:
- आनंदी असण्याहून अधिक आयुष्यात बरंच काही आहे
- Speaker:
- एमिली एसफहानी स्मिथ
- Description:
-
आपल्या संकृतीला आनंदाने पछाडलेलं आहे, पण अधिक समाधान देणारा दुसरा मार्ग असला तर? लेखिका एमिली एसफहानी स्मिथ म्हणतात कि आनंद येतो आणि जातो, पण अर्थपूर्ण आयुष्य -- स्वत्वाच्या पलीकडील कशाचीतरी सेवा करणे आणि स्वतःतील उत्तमाला घडवणे -- काहीतरी तग धरून राहण्यासाठी देतं. एसफहानी स्मिथ अर्थपूर्ण आयुष्याच्या चार स्तंभांबद्दल सांगत असताना आनंदी असणे आणि अर्थ असणे यांतील फरक जाणून घ्या.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 12:18
Abhinav Garule approved Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for There's more to life than being happy | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for There's more to life than being happy |