0:00:00.904,0:00:02.183 मी सतत विचार करायची 0:00:02.207,0:00:05.941 आयुष्याचे प्रमुख ध्येय म्हणजे [br]आनंदाचा पाठलाग करणे. 0:00:06.680,0:00:10.064 सगळे म्हणतात "आनंदाचा मार्ग म्हणजे यश," 0:00:10.088,0:00:12.586 म्हणून मी त्या आदर्श नोकरीचा, 0:00:12.610,0:00:15.641 आदर्श जोडीदाराचा, सुंदर घराचा शोध घेतला. 0:00:16.998,0:00:19.996 पण समाधानी वाटण्याऐवजी, 0:00:20.020,0:00:22.624 मी चिंतीत झाले आणि वाहवत गेले. 0:00:23.195,0:00:27.204 आणि मी एकटीच नव्हते; माझे मित्र --[br]तेसुद्धा याबाबतीत झगडले. 0:00:28.720,0:00:32.989 सरतेशेवटी, मी सकारात्मक मानसशास्त्र[br]शिकवणार्या महाविद्यालयात जायचे ठरवले 0:00:33.013,0:00:36.233 लोक नक्की कशाने आनंदी होतात[br]हे शिकण्यासाठी. 0:00:36.971,0:00:39.627 पण तिथे मला जो शोध लागला त्याने[br]माझे आयुष्यच बदलून गेले. 0:00:40.452,0:00:45.062 माहिती सांगते की आनंदाचा[br]पाठलाग करण्याने लोक दुखीः होऊ शकतात. 0:00:45.967,0:00:48.224 आणि मला जे प्रकर्षाने जाणवलं ते हे: 0:00:49.058,0:00:51.845 जगभरात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, 0:00:51.869,0:00:54.960 आणि अमेरिकेत गेल्या ३० वर्षांतील[br]उच्चांक त्याने गाठला आहे. 0:00:55.753,0:00:58.516 जरी आयुष्य वस्तुनिष्ठपणे सुधारत असलं 0:00:58.540,0:01:01.230 जगण्याच्या मान्य निकषानुसार , 0:01:01.254,0:01:03.453 तरी ही अधिकाधिक लोकांना निराश, 0:01:03.477,0:01:05.602 उदासीन आणि एकाकी वाटतं. 0:01:06.214,0:01:09.027 एक प्रकारची पोकळी लोकांना[br]कुरतडत आहे 0:01:09.051,0:01:12.321 आणि ती अनुभवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या[br]तुम्ही निराश असण्याची गरज नाही. 0:01:12.345,0:01:15.245 आज ना उद्या, मला वाटतं आपण[br]सगळेच अचंबित होतो: 0:01:15.784,0:01:18.016 हे सगळं इतकंच आहे का? 0:01:19.167,0:01:22.373 आणि संशोधनानुसार, या निराशेचे[br]अनुमान कशाने लागते तर 0:01:22.397,0:01:24.224 तो आनंदाचा अभाव नव्हे. 0:01:24.248,0:01:26.090 कुठल्यातरी दुसर्या गोष्टीच्या अभावाने 0:01:26.817,0:01:29.755 आयुष्यात अर्थाचा अभाव असल्याने. 0:01:30.962,0:01:33.355 पण माझ्यासाठी त्यामुळे काही [br]प्रश्न उपस्थित झाले. 0:01:33.855,0:01:36.454 आयुष्यात आनंदी असण्याहूनही अधिक [br]काही असू शकतं का? 0:01:37.216,0:01:39.639 आणि आनंदी असणे आणि आयुष्यात[br]अर्थ असणे 0:01:39.663,0:01:41.554 यांत फरक काय? 0:01:42.879,0:01:47.479 बरेच मानसशास्त्रज्ञ आनंदाची व्याख्या[br]आरामपूर्ण आणि समाधानी अवस्था, 0:01:47.503,0:01:49.392 त्या क्षणात छान वाटणे अशी करतात. 0:01:50.098,0:01:51.756 तथापि, अर्थ अधिक गहन आहे. 0:01:52.278,0:01:54.842 प्रख्यात मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलीगमन[br]म्हणतात 0:01:54.866,0:01:59.513 अर्थप्राप्ती हि स्वत्वाच्या पलीकडे जाऊन[br]कशाशीतरी संबंधीत होऊन आणि सेवा करून 0:01:59.537,0:02:02.220 आणि स्वतःतील उत्तमाला घडवून होते. 0:02:03.617,0:02:06.212 आपल्या संस्कृतीला आनंदाने पछाडलेले आहे, 0:02:06.236,0:02:10.343 पण मला असं आढळलं कि अर्थाचा[br]शोध हा अधिक समाधानी मार्ग आहे. 0:02:10.367,0:02:13.296 आणि अभ्यास असं दाखवतात कि ज्या[br]लोकांच्या आयुष्यात अर्थ आहे, 0:02:13.320,0:02:14.730 ते मनाने अधिक लवचिक असतात, 0:02:14.754,0:02:17.311 ते शाळांत आणि कामाच्या जागी[br]अधिक चांगली कामगिरी करतात, 0:02:17.335,0:02:18.942 आणि ते अधिक जगतातसुद्धा. 0:02:19.985,0:02:22.006 मग या सगळ्यामुळे मला प्रश्न पडतो: 0:02:22.030,0:02:24.504 आपल्यातील प्रत्येकजण[br]अर्थपूर्ण आयुष्य कसं जगू शकतो? 0:02:25.980,0:02:29.658 याचा शोध घेण्यासाठी, मी शेकडो[br]लोकांच्या मुलाखती घेण्यात आणि 0:02:29.682,0:02:32.583 मानसशास्त्राची, मज्जासंस्थाशास्त्राची[br]आणि तत्वज्ञानाची 0:02:32.607,0:02:34.708 हजारो पानं वाचण्यात घालवली. 0:02:35.366,0:02:37.155 सगळ्याचा सार असा कि, 0:02:37.179,0:02:42.520 मला असं आढळलं कि अर्थपूर्ण आयुष्याचे[br]मी ज्याला चार स्तंभ म्हणते असे आहेत. 0:02:42.544,0:02:44.978 आणि आपण प्रत्येकजण अर्थपूर्ण आयुष्य[br]घडवू शकतो 0:02:45.002,0:02:48.351 आपल्या आयुष्यात यांपैकी काही किंवा[br]सर्वच स्तंभ उभे करून. 0:02:49.428,0:02:51.616 पहिला स्तंभ आहे तदभविता.[br]कोणीतरी आपले आहे हि भावना 0:02:52.378,0:02:54.685 तदभविता नातेसंबंध असण्याने येते 0:02:54.709,0:02:57.414 ज्यात तुमचे वास्तव मूल्यमापन होते . 0:02:57.438,0:02:59.551 तुम्हीही इतरांबाबतीत तसेच करता. 0:03:00.218,0:03:04.908 पण काही गट आणि नाती खूपच वरवरची[br]तदभविता दर्शवतात: 0:03:04.932,0:03:06.825 तुमचे मूल्य हे तुमच्या विश्वासावर, 0:03:06.849,0:03:08.095 तुमच्या तिरस्कारवर ठरते 0:03:08.119,0:03:09.664 आणि तुम्ही कोण आहात यावर नाही. 0:03:10.420,0:03:13.203 तदभविता प्रेमातून निर्माण होते. 0:03:13.227,0:03:16.212 व्यक्तींतल्या क्षणांत ती वसते, 0:03:16.236,0:03:20.081 आणि ती वैकल्पिक असते -- इतरांबाबतची[br]तदभाविता तुम्ही वृद्धिंगत करू शकता. 0:03:20.661,0:03:22.268 हे एक उदाहरण बघा. 0:03:22.292,0:03:25.847 माझा मित्र जोनाथन रोज सकाळी[br]वृत्तपत्र विकत घेतो 0:03:25.871,0:03:28.089 न्यू यॉर्क मधील एकाच विक्रेत्याकडून. 0:03:28.502,0:03:30.782 तथापि, ते केवळ एक व्यवहार करत नाहीत. 0:03:30.806,0:03:33.489 ते क्षणभर मंदावतात, बोलतात, 0:03:33.513,0:03:35.419 आणि एकमेकांना माणसासारखे वागवतात. 0:03:36.038,0:03:39.432 पण एकदा जोनाथन जवळ योग्य तेवढे[br]सुटे पैसे नव्हते, 0:03:39.456,0:03:40.676 आणि तो विक्रेता म्हणाला, 0:03:40.700,0:03:42.220 "त्याची चिंता करू नका." 0:03:42.244,0:03:44.731 पण जोनाथनला पैसे द्यायचेच होते, 0:03:44.755,0:03:47.977 मग तो एका दुकानात गेला आणि त्याने[br]काहीतरी नको असलेली गोष्ट विकत घेतली 0:03:47.977,0:03:49.522 पैसे सुटे करण्यासाठी. 0:03:49.992,0:03:52.615 पण जेव्हा त्याने विक्रेत्याला पैसे दिले, 0:03:52.639,0:03:54.161 विक्रेत्याने ते घेतले नाहीत. 0:03:54.820,0:03:56.098 तो दुखावला गेला होता. 0:03:56.715,0:03:58.564 तो अनुकंपा दाखवायचा प्रयत्न करत होता, 0:03:58.588,0:04:00.835 पण जोनाथनने ती नाकारली होती. 0:04:02.113,0:04:06.264 मला वाटतं आपण अजाणतेपणे याप्रमाणे[br]छोट्या गोष्टींत लोकांना नाकारत असतो. 0:04:06.288,0:04:07.486 मी तसं करते. 0:04:07.510,0:04:10.573 मी कुणा ओळखीच्या व्यक्तीजवळून जाईन[br]आणि तिची दखलही घेणार नाही. 0:04:10.597,0:04:13.244 कुणी माझ्याशी बोलत असताना मी माझा[br]फोन चेक करेन. 0:04:13.678,0:04:15.607 अशा कृती इतरांचे अवमूल्यन करतात. 0:04:15.631,0:04:18.384 त्यामुळे त्यांना अदखलपात्र आणि अनुचित[br]असल्यासारखे वाटते. 0:04:19.130,0:04:21.882 पण जेव्हा तुम्ही प्रेमाने पुढाकार घेता[br]तुम्ही एक बंध तयार 0:04:21.906,0:04:23.578 करता तुम्हा दोघांनाही उभारी देतो. 0:04:25.030,0:04:28.658 बर्याच लोकांसाठी, तदभाविता हा अर्थाचा[br]सर्वात आवश्यक स्त्रोत असतो, 0:04:28.682,0:04:30.680 ते कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत[br]असलेले बंध. 0:04:31.176,0:04:35.181 इतरांसाठी, अर्थसाठी महत्वाचा दुसरा[br]स्तंभ असतो: हेतु. 0:04:35.844,0:04:38.759 आता, तुमचा हेतु शोधणे म्हणजे तुम्हाला[br]आनंदी ठेवणार्या त्या 0:04:38.783,0:04:41.031 नोकरीचा शोध घेण्यासारखे नव्हे. 0:04:41.520,0:04:44.979 हेतु हा तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा[br]तुम्ही काय देता याबद्दल अधिक आहे. 0:04:45.003,0:04:49.491 इस्पितळातील परिरक्षक मला म्हणाली[br]तिचा हेतु आजारी लोकांना बरं करणं हा आहे. 0:04:49.515,0:04:51.226 बरेच पालक मला सांगतात, 0:04:51.250,0:04:53.186 "माझा हेतु म्हणजे माझ्या मुलांचे संगोपन" 0:04:53.527,0:04:57.571 हेतुसाठी महत्वाची बाब म्हणजे इतरांच्या[br]सेवेसाठी तुमचा कस लावणे. 0:04:58.381,0:05:01.889 अर्थात, आपल्यातील बर्याचजणांच्या [br]बाबतीत ते कामातूनच होते. 0:05:01.913,0:05:04.892 याप्रमाणेच आपण योगदान देतो आणि[br]हवेहवेसे वाटतो. 0:05:04.916,0:05:08.776 पण याचाच अर्थ हाही आहे कि[br]कामातील दुर्बलता, 0:05:08.800,0:05:10.213 बेरोजगारी, 0:05:10.237,0:05:12.464 कामगारांचा अल्प सहभाग हे केवळ 0:05:12.488,0:05:16.179 आर्थिक प्रश्न नसून ते [br]अस्तित्वासंबंधीचेदेखील प्रश्न आहेत. 0:05:16.821,0:05:19.034 काही फायदेशीर करण्यायोग्य नसेल तर 0:05:19.058,0:05:20.359 लोक अडखळतात. 0:05:21.493,0:05:24.109 अर्थात, कामाच्या जागी तुम्हाला हेतु[br]शोधायचा नसतो 0:05:24.133,0:05:26.862 पण त्यामुळे जगण्याचे एक साधन मिळते, 0:05:26.886,0:05:28.966 कुठलातरी "का" पुढे जाण्याची चालना देतो. 0:05:31.147,0:05:34.447 अर्थाचा तिसरा स्तंभदेखील स्वतःच्या पलीकडे[br]बघण्याचा आहे, 0:05:34.471,0:05:36.313 पण पूर्णतः वेगळ्या मार्गाने: 0:05:36.337,0:05:37.924 अनुभवातीत. 0:05:37.948,0:05:40.325 अनुभवातीत अवस्था म्हणजे ते [br]दुर्मिळ क्षण असतात 0:05:40.349,0:05:43.761 जेव्हा तुम्ही दैनंदिन आयुष्याच्या [br]धावपळीतून वर येता, 0:05:43.785,0:05:45.490 तुमची स्वत्वाची भावना लोप पावते, 0:05:45.514,0:05:48.288 आणि तुम्हाला उच्चतम वास्तवाशी जोडल्या[br]गेल्यासारखे वाटते. 0:05:49.214,0:05:52.904 मी बोललेल्या एका माणसासाठी अनुभवातीत[br]अवस्था कला पाहण्यातून येत असे. 0:05:52.928,0:05:55.458 दुसर्या एकासाठी ती चर्चमध्ये येत असे. 0:05:55.482,0:05:59.036 माझ्यासाठी, मी एक लेखिका आहे, ती[br]लिहिण्यातून येते. 0:05:59.060,0:06:04.130 कधीकधी मी त्यात इतकी मग्न होते कि[br]मला वेळेचे आणि जागेचे भान राहात नाही. 0:06:04.757,0:06:07.903 हे अनुभवातीत क्षण तुम्हाला[br]बदलवू शकतात. 0:06:07.927,0:06:12.451 एका अभ्यासात विद्यार्थ्यांना २०० फिट[br]उंच निलगिरीच्या झाडांकडे पाहायचे होते 0:06:12.475,0:06:13.676 एक मिनीटासाठी. 0:06:14.263,0:06:16.417 पण नंतर त्यांच्यातील स्वकेंद्रितपणा[br]कमी झाला, 0:06:16.441,0:06:18.385 आणि ते अधिक औदार्याने वागू लागले 0:06:18.409,0:06:20.479 जेव्हा कुणाची मदत करण्याची[br]संधी दिली तेव्हा. 0:06:21.582,0:06:25.302 तदभाविता, हेतु, अनुभवातीत अवस्था. 0:06:26.374,0:06:29.097 आता, मला सापडलेल्या[br]अर्थाच्या चौथ्या स्तंभाने, 0:06:29.121,0:06:30.876 लोक अचंबित होतात. 0:06:31.366,0:06:34.100 चौथा स्तंभ आहे कथाकथनाचा, 0:06:34.124,0:06:36.989 तुम्ही तुमची स्वतःची स्वतःला जी[br]सांगता ती कथा. 0:06:37.616,0:06:41.760 तुमच्या आयुष्यातील घटनांपासून गोष्ट[br]तयार करण्याने स्पष्टता येते. 0:06:41.784,0:06:44.820 तुम्ही कसे घडलात हे समजण्यास[br]ती मदत करते. 0:06:45.669,0:06:48.765 पण बहुदा आपल्या हे लक्षात येत नाही कि[br]आपल्या कथांचे आपणच लेखक असतो 0:06:48.789,0:06:50.952 आणि आपण त्यांच्या कथनाचे मार्ग बदलू शकतो. 0:06:50.976,0:06:53.467 तुमचे आयुष्य ही केवळ एक घटनांची[br]यादी नव्हे. 0:06:53.491,0:06:56.707 तुम्ही तुमची कथा संपादित करून,[br]अर्थ लावून पुन्हा सांगू शकता, 0:06:56.731,0:06:58.951 जर तुमच्याकडे तथ्याची कमतरता[br]असली तरी. 0:06:59.681,0:07:04.309 मी एमेका नावाच्या एका तरुणाला भेटले ज्याला[br]फुटबॉल खेळताना अर्धांगवायू झाला होता. 0:07:04.920,0:07:07.379 त्याच्या या हानीनंतर, एमेकाने[br]स्वतःला संगितले, 0:07:07.403,0:07:10.108 "फुटबॉल खेळताना माझं[br]आयुष्य छान होतं, 0:07:10.132,0:07:12.256 पण आता माझ्याकडे बघ." 0:07:14.002,0:07:16.294 जे लोक अशा कथा सांगतात -- 0:07:16.318,0:07:18.842 "माझं आयुष्य चांगलं होतं. आता ते[br]वाईट आहे." -- 0:07:18.866,0:07:21.688 ते अधिक चिंतातुर आणि निराश असतात. 0:07:21.712,0:07:24.041 आणि काही काळ एमेका तसाच होता. 0:07:24.573,0:07:27.964 पण कालपरत्वे, त्याने एक वेगळीच[br]कथा गुंफायला सुरुवात केली. 0:07:28.415,0:07:30.148 त्याची नवीन कथा अशी होती, 0:07:30.172,0:07:33.439 "माझ्या आजारापूर्वी,[br]माझे आयुष्य उद्देशहीन होते. 0:07:33.463,0:07:36.716 मी खूप मौजमस्ती केली आणि[br]एक खूप स्वार्थी माणूस होतो. 0:07:36.740,0:07:40.448 पण माझ्या आजाराने मला जाणीव करून[br]दिली कि मी एक चांगला माणूस होऊ शकतो." 0:07:41.488,0:07:45.029 त्याच्या कथेच्या त्या संपादनाने एमेकाचे[br]आयुष्य बदलून गेले. 0:07:45.053,0:07:47.484 स्वतःला नवीन कथा ऐकवल्यानंतर, 0:07:47.508,0:07:49.430 एमेकाने मुलांना मार्गदर्शन[br]करणे सुरू केले 0:07:49.454,0:07:51.820 आणि त्याला त्याच्या हेतूचा शोध लागला: 0:07:51.844,0:07:53.234 दुसर्यांची सेवा. 0:07:54.101,0:07:57.479 मानसशास्त्रज्ञ डॅन मॅकअॅडम्स याला[br]"विमोचक कथा" म्हणतात, 0:07:57.503,0:07:59.786 जिच्यात वाईटाचे विमोचन चांगल्याने होते. 0:08:00.627,0:08:02.810 त्यांना आढळलं, जे लोक अर्थपूर्ण आयुष्य[br]जगतात, 0:08:02.834,0:08:04.765 ते त्यांची जीवनगाथा विमोचन, 0:08:04.789,0:08:07.811 वाढ आणि प्रेमाने परिभाषित करून सांगतात. 0:08:08.723,0:08:11.185 पण लोक त्यांची कथा कशाने बदलतात? 0:08:11.725,0:08:13.653 काही लोक सल्लागाराची मदत घेतात, 0:08:13.677,0:08:15.487 पण तुम्ही हे स्वतःदेखील करू शकता, 0:08:15.511,0:08:18.271 निव्वळ तुमच्या आयुष्याला विचारपूर्वकपणे[br]प्रतिबिंबीत करून, 0:08:18.295,0:08:20.382 तुम्हाला परिभाषित करणार्या अनुभवांनी 0:08:20.406,0:08:22.143 तुम्हाला कसे घडवले तुम्ही काय[br]गमावले 0:08:22.589,0:08:24.123 आणि काय कमावले.[br]तेच एमेकाने केले. 0:08:25.012,0:08:27.058 तुम्ही तुमची कथा एका रात्रीत[br]बदलू शकत नाही; 0:08:27.082,0:08:29.427 त्याला कैक वर्ष लागू शकतात[br]व ते वेदनादायक असू शकते 0:08:29.451,0:08:32.385 आपल्या सगळ्यांनाच त्रास झालेला[br]असतो व आपण सारेच संघर्ष करतो. 0:08:32.957,0:08:37.296 पण त्या वेदनादायी स्मृतींना कवटाळल्याने[br]नवीन दृष्टीकोन आणि ज्ञान मिळू शकते, 0:08:37.320,0:08:40.385 तुम्हाला तारणार्या त्या[br]चांगल्या गोष्टींचे. 0:08:42.584,0:08:47.117 तदभाविता, हेतु,[br]अनुभवतीतता, कथाकथन: 0:08:47.863,0:08:50.594 हे अर्थाचे ते चार स्तंभ आहेत. 0:08:51.626,0:08:53.232 मी जेव्हा लहान होते, 0:08:53.256,0:08:56.894 तेव्हा माझ्याभोवती सगळे स्तंभ असल्याचे[br]भाग्य मला लाभले. 0:08:57.381,0:09:01.921 मोंट्रीआल मधील आमच्या घरातून माझे पालक[br]एक सुफी बैठकगृह चालवायचे. 0:09:02.686,0:09:07.169 सुफीजम हा व्हर्लिंग देरविशेस आणि[br]कवी रूमिशी संबंधित 0:09:07.193,0:09:08.586 एक आध्यात्मिक सराव आहे. 0:09:09.430,0:09:12.005 आठवड्यातून दोनदा, सुफी लोक आमच्याकडे[br]येत असत 0:09:12.029,0:09:15.789 चिंतन करण्यासाठी, पर्शियन चहा पिण्यासाठी[br]आणि कथा सांगण्यासाठी. 0:09:16.209,0:09:19.166 निर्मिलेल्या सगळ्यांची सेवा हादेखील[br]त्यांच्या सरावाचा भाग होता 0:09:19.190,0:09:21.000 छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम देऊन, 0:09:21.024,0:09:24.365 म्हणजेच जरी लोक तुमच्याशी वाईट वागले[br]असले तरी त्यांच्याप्रती दयाळू असणे 0:09:24.389,0:09:27.543 पण त्यामुळे त्यांना हेतु मिळाला:[br]अहंकाराला लगाम घालणे. 0:09:28.912,0:09:31.528 अखेरीस, मी कॉलेजला जाण्यासाठी घर सोडलं 0:09:31.552,0:09:35.254 आणि माझ्या आयुष्यातील दैनंदिन[br]सुफी प्रशिक्षणाविना 0:09:35.278,0:09:36.866 माझे बंध तुटल्यासारखे वाटू लागलं. 0:09:36.890,0:09:40.478 आणि आयुष्य जगण्यालायक करणार्या[br]त्या गोष्टींचा शोध घ्यायला मी सुरुवात केली 0:09:40.502,0:09:42.615 त्यामुळेच मी या प्रवासाला निघाले. 0:09:43.012,0:09:44.769 मागे वळून पाहता, मला जाणवतं कि 0:09:44.793,0:09:48.035 सुफी बैठक्गृहाला अर्थाची[br]खरी संस्कृती होती. 0:09:48.059,0:09:50.565 स्तंभ हे स्थापत्यशास्त्राचा भाग होते[br]आणि त्या 0:09:50.589,0:09:53.815 स्तंभांच्या अस्तित्वानेच आम्हाला[br]अधिक तीव्रतेने जगण्यास मदत केली. 0:09:54.414,0:09:56.735 अर्थात, हीच तत्व लागू होतात 0:09:56.759,0:09:58.960 इतर प्रबळ समाजातदेखील -- 0:09:58.984,0:10:01.006 चांगली आणि वाईट. 0:10:01.556,0:10:03.585 टोळ्या, पंथ: 0:10:03.609,0:10:06.622 या स्तंभांचा वापर करणार्या[br]अर्थाच्या संस्कृती आहेत 0:10:06.646,0:10:10.024 आणि ज्या लोकांना जगण्याचे आणि[br]मरण्याचे कारण देतात. 0:10:10.048,0:10:12.915 पण त्यासाठी म्हणूनच आपण एक[br]समाज म्हणून 0:10:12.939,0:10:15.048 अधिक चांगले विकल्प द्यायला हवेत. 0:10:15.072,0:10:18.823 आपल्या कुटुंबांत आणि संस्थांत आपण[br]हे स्तंभ उभारणे गरजेचे आहे 0:10:18.847,0:10:21.429 लोकांना त्यांचे उत्तम रूप धरण करण्यास[br]मदत करण्यासाठी. 0:10:22.524,0:10:25.110 पण अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास मेहनत[br]घ्यावी लागते. 0:10:25.134,0:10:27.009 ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. 0:10:27.033,0:10:30.762 जसा प्रत्येक दिवस जातो,[br]आपण सतत आपलं जीवन घडवत असतो, 0:10:30.786,0:10:32.355 आपल्या कथेत भर घालत असतो. 0:10:32.831,0:10:35.580 आणि कधीकधी आपण मार्ग सोडू शकतो. 0:10:36.362,0:10:38.273 माझ्याबाबतीत तसं जेव्हा घडतं, 0:10:38.297,0:10:41.686 मला माझ्या वडिलांसोबत आलेला एक[br]प्रभावी प्रसंग आठवतो. 0:10:43.821,0:10:46.468 मी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण[br]केल्यावर अनेक महिन्यांनी 0:10:46.492,0:10:50.350 माझ्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका[br]आला होता ज्याने त्यांचे प्राण घेतले असते. 0:10:51.033,0:10:54.247 ते वाचले आणि जेव्हा मी त्यांना विचारलं[br]त्यांच्या मनात काय चाललं होतं 0:10:54.271,0:10:55.893 मृत्युशी सामना करत असताना, 0:10:55.917,0:10:58.600 ते म्हणाले केवळ एकच विचार होता[br]जगणे जरूरी आहे 0:10:58.624,0:11:00.762 जेणेकरून ते माझ्या भावाची व माझी[br]काळजी घेऊ 0:11:00.786,0:11:03.375 शकतील आणि आयुष्यासाठी लढण्याची[br]इच्छा याने त्यांना दिली. 0:11:04.063,0:11:07.361 तत्कालिक शल्यक्रियेसाठी दिलेल्या[br]भुलीचा जेव्हा अंमल चढला 0:11:07.385,0:11:09.715 तेव्हा १० पासून उलट गणना करण्याऐवजी, 0:11:09.739,0:11:12.909 ते आमची नावं मंत्रासारखी वारंवार घेत होते. 0:11:13.790,0:11:17.601 या भूतलावर उच्चारलेले शेवटचे शब्द म्हणजे[br]आमची नावं असतील अशी त्यांची इच्छा होती 0:11:17.625,0:11:18.850 ते गतप्राण झाले असते तर. 0:11:21.033,0:11:24.645 माझे वडील एक सुतार आणि सुफी आहेत. 0:11:25.185,0:11:26.732 ते एक विनम्र आयुष्य आहे, 0:11:26.756,0:11:28.025 पण चांगलं आयुष्य आहे. 0:11:28.564,0:11:32.476 मृत्युशी सामना करत पडलेले असताना[br]त्यांना जगण्याचे एक कारण होते: 0:11:32.500,0:11:33.908 प्रेम. 0:11:33.932,0:11:36.383 त्यांची कुटुंबाप्रती असलेली तदभाविता, 0:11:36.407,0:11:38.136 एक वडील म्हणून त्यांचा हेतु, 0:11:38.160,0:11:41.174 आमच्या नावांचा पुनरुच्चार करीत[br]केलेले अनुभवातीत चिंतन -- 0:11:41.198,0:11:43.979 ते म्हणतात, या कारणांमुळे ते वाचले. 0:11:44.003,0:11:46.442 ती कथा ते स्वतःला सांगतात. 0:11:47.747,0:11:49.897 अर्थाची शक्ती ती आहे. 0:11:50.643,0:11:53.435 आनंद येतो आणि जातो. 0:11:53.459,0:11:55.308 पण जेव्हा आयुष्य खरंच चांगलं असतं 0:11:55.332,0:11:57.221 आणि जेव्हा वाईट घडत असतं, 0:11:57.241,0:12:00.294 अर्थ तुम्हाला तग धरून [br]राहण्यास काहीतरी देतो. 0:12:00.322,0:12:01.546 धन्यवाद. 0:12:01.570,0:12:05.152 (टाळ्या)