मी सतत विचार करायची आयुष्याचे प्रमुख ध्येय म्हणजे आनंदाचा पाठलाग करणे. सगळे म्हणतात "आनंदाचा मार्ग म्हणजे यश," म्हणून मी त्या आदर्श नोकरीचा, आदर्श जोडीदाराचा, सुंदर घराचा शोध घेतला. पण समाधानी वाटण्याऐवजी, मी चिंतीत झाले आणि वाहवत गेले. आणि मी एकटीच नव्हते; माझे मित्र -- तेसुद्धा याबाबतीत झगडले. सरतेशेवटी, मी सकारात्मक मानसशास्त्र शिकवणार्या महाविद्यालयात जायचे ठरवले लोक नक्की कशाने आनंदी होतात हे शिकण्यासाठी. पण तिथे मला जो शोध लागला त्याने माझे आयुष्यच बदलून गेले. माहिती सांगते की आनंदाचा पाठलाग करण्याने लोक दुखीः होऊ शकतात. आणि मला जे प्रकर्षाने जाणवलं ते हे: जगभरात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, आणि अमेरिकेत गेल्या ३० वर्षांतील उच्चांक त्याने गाठला आहे. जरी आयुष्य वस्तुनिष्ठपणे सुधारत असलं जगण्याच्या मान्य निकषानुसार , तरी ही अधिकाधिक लोकांना निराश, उदासीन आणि एकाकी वाटतं. एक प्रकारची पोकळी लोकांना कुरतडत आहे आणि ती अनुभवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तुम्ही निराश असण्याची गरज नाही. आज ना उद्या, मला वाटतं आपण सगळेच अचंबित होतो: हे सगळं इतकंच आहे का? आणि संशोधनानुसार, या निराशेचे अनुमान कशाने लागते तर तो आनंदाचा अभाव नव्हे. कुठल्यातरी दुसर्या गोष्टीच्या अभावाने आयुष्यात अर्थाचा अभाव असल्याने. पण माझ्यासाठी त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले. आयुष्यात आनंदी असण्याहूनही अधिक काही असू शकतं का? आणि आनंदी असणे आणि आयुष्यात अर्थ असणे यांत फरक काय? बरेच मानसशास्त्रज्ञ आनंदाची व्याख्या आरामपूर्ण आणि समाधानी अवस्था, त्या क्षणात छान वाटणे अशी करतात. तथापि, अर्थ अधिक गहन आहे. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलीगमन म्हणतात अर्थप्राप्ती हि स्वत्वाच्या पलीकडे जाऊन कशाशीतरी संबंधीत होऊन आणि सेवा करून आणि स्वतःतील उत्तमाला घडवून होते. आपल्या संस्कृतीला आनंदाने पछाडलेले आहे, पण मला असं आढळलं कि अर्थाचा शोध हा अधिक समाधानी मार्ग आहे. आणि अभ्यास असं दाखवतात कि ज्या लोकांच्या आयुष्यात अर्थ आहे, ते मनाने अधिक लवचिक असतात, ते शाळांत आणि कामाच्या जागी अधिक चांगली कामगिरी करतात, आणि ते अधिक जगतातसुद्धा. मग या सगळ्यामुळे मला प्रश्न पडतो: आपल्यातील प्रत्येकजण अर्थपूर्ण आयुष्य कसं जगू शकतो? याचा शोध घेण्यासाठी, मी शेकडो लोकांच्या मुलाखती घेण्यात आणि मानसशास्त्राची, मज्जासंस्थाशास्त्राची आणि तत्वज्ञानाची हजारो पानं वाचण्यात घालवली. सगळ्याचा सार असा कि, मला असं आढळलं कि अर्थपूर्ण आयुष्याचे मी ज्याला चार स्तंभ म्हणते असे आहेत. आणि आपण प्रत्येकजण अर्थपूर्ण आयुष्य घडवू शकतो आपल्या आयुष्यात यांपैकी काही किंवा सर्वच स्तंभ उभे करून. पहिला स्तंभ आहे तदभविता. कोणीतरी आपले आहे हि भावना तदभविता नातेसंबंध असण्याने येते ज्यात तुमचे वास्तव मूल्यमापन होते . तुम्हीही इतरांबाबतीत तसेच करता. पण काही गट आणि नाती खूपच वरवरची तदभविता दर्शवतात: तुमचे मूल्य हे तुमच्या विश्वासावर, तुमच्या तिरस्कारवर ठरते आणि तुम्ही कोण आहात यावर नाही. तदभविता प्रेमातून निर्माण होते. व्यक्तींतल्या क्षणांत ती वसते, आणि ती वैकल्पिक असते -- इतरांबाबतची तदभाविता तुम्ही वृद्धिंगत करू शकता. हे एक उदाहरण बघा. माझा मित्र जोनाथन रोज सकाळी वृत्तपत्र विकत घेतो न्यू यॉर्क मधील एकाच विक्रेत्याकडून. तथापि, ते केवळ एक व्यवहार करत नाहीत. ते क्षणभर मंदावतात, बोलतात, आणि एकमेकांना माणसासारखे वागवतात. पण एकदा जोनाथन जवळ योग्य तेवढे सुटे पैसे नव्हते, आणि तो विक्रेता म्हणाला, "त्याची चिंता करू नका." पण जोनाथनला पैसे द्यायचेच होते, मग तो एका दुकानात गेला आणि त्याने काहीतरी नको असलेली गोष्ट विकत घेतली पैसे सुटे करण्यासाठी. पण जेव्हा त्याने विक्रेत्याला पैसे दिले, विक्रेत्याने ते घेतले नाहीत. तो दुखावला गेला होता. तो अनुकंपा दाखवायचा प्रयत्न करत होता, पण जोनाथनने ती नाकारली होती. मला वाटतं आपण अजाणतेपणे याप्रमाणे छोट्या गोष्टींत लोकांना नाकारत असतो. मी तसं करते. मी कुणा ओळखीच्या व्यक्तीजवळून जाईन आणि तिची दखलही घेणार नाही. कुणी माझ्याशी बोलत असताना मी माझा फोन चेक करेन. अशा कृती इतरांचे अवमूल्यन करतात. त्यामुळे त्यांना अदखलपात्र आणि अनुचित असल्यासारखे वाटते. पण जेव्हा तुम्ही प्रेमाने पुढाकार घेता तुम्ही एक बंध तयार करता तुम्हा दोघांनाही उभारी देतो. बर्याच लोकांसाठी, तदभाविता हा अर्थाचा सर्वात आवश्यक स्त्रोत असतो, ते कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत असलेले बंध. इतरांसाठी, अर्थसाठी महत्वाचा दुसरा स्तंभ असतो: हेतु. आता, तुमचा हेतु शोधणे म्हणजे तुम्हाला आनंदी ठेवणार्या त्या नोकरीचा शोध घेण्यासारखे नव्हे. हेतु हा तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा तुम्ही काय देता याबद्दल अधिक आहे. इस्पितळातील परिरक्षक मला म्हणाली तिचा हेतु आजारी लोकांना बरं करणं हा आहे. बरेच पालक मला सांगतात, "माझा हेतु म्हणजे माझ्या मुलांचे संगोपन" हेतुसाठी महत्वाची बाब म्हणजे इतरांच्या सेवेसाठी तुमचा कस लावणे. अर्थात, आपल्यातील बर्याचजणांच्या बाबतीत ते कामातूनच होते. याप्रमाणेच आपण योगदान देतो आणि हवेहवेसे वाटतो. पण याचाच अर्थ हाही आहे कि कामातील दुर्बलता, बेरोजगारी, कामगारांचा अल्प सहभाग हे केवळ आर्थिक प्रश्न नसून ते अस्तित्वासंबंधीचेदेखील प्रश्न आहेत. काही फायदेशीर करण्यायोग्य नसेल तर लोक अडखळतात. अर्थात, कामाच्या जागी तुम्हाला हेतु शोधायचा नसतो पण त्यामुळे जगण्याचे एक साधन मिळते, कुठलातरी "का" पुढे जाण्याची चालना देतो. अर्थाचा तिसरा स्तंभदेखील स्वतःच्या पलीकडे बघण्याचा आहे, पण पूर्णतः वेगळ्या मार्गाने: अनुभवातीत. अनुभवातीत अवस्था म्हणजे ते दुर्मिळ क्षण असतात जेव्हा तुम्ही दैनंदिन आयुष्याच्या धावपळीतून वर येता, तुमची स्वत्वाची भावना लोप पावते, आणि तुम्हाला उच्चतम वास्तवाशी जोडल्या गेल्यासारखे वाटते. मी बोललेल्या एका माणसासाठी अनुभवातीत अवस्था कला पाहण्यातून येत असे. दुसर्या एकासाठी ती चर्चमध्ये येत असे. माझ्यासाठी, मी एक लेखिका आहे, ती लिहिण्यातून येते. कधीकधी मी त्यात इतकी मग्न होते कि मला वेळेचे आणि जागेचे भान राहात नाही. हे अनुभवातीत क्षण तुम्हाला बदलवू शकतात. एका अभ्यासात विद्यार्थ्यांना २०० फिट उंच निलगिरीच्या झाडांकडे पाहायचे होते एक मिनीटासाठी. पण नंतर त्यांच्यातील स्वकेंद्रितपणा कमी झाला, आणि ते अधिक औदार्याने वागू लागले जेव्हा कुणाची मदत करण्याची संधी दिली तेव्हा. तदभाविता, हेतु, अनुभवातीत अवस्था. आता, मला सापडलेल्या अर्थाच्या चौथ्या स्तंभाने, लोक अचंबित होतात. चौथा स्तंभ आहे कथाकथनाचा, तुम्ही तुमची स्वतःची स्वतःला जी सांगता ती कथा. तुमच्या आयुष्यातील घटनांपासून गोष्ट तयार करण्याने स्पष्टता येते. तुम्ही कसे घडलात हे समजण्यास ती मदत करते. पण बहुदा आपल्या हे लक्षात येत नाही कि आपल्या कथांचे आपणच लेखक असतो आणि आपण त्यांच्या कथनाचे मार्ग बदलू शकतो. तुमचे आयुष्य ही केवळ एक घटनांची यादी नव्हे. तुम्ही तुमची कथा संपादित करून, अर्थ लावून पुन्हा सांगू शकता, जर तुमच्याकडे तथ्याची कमतरता असली तरी. मी एमेका नावाच्या एका तरुणाला भेटले ज्याला फुटबॉल खेळताना अर्धांगवायू झाला होता. त्याच्या या हानीनंतर, एमेकाने स्वतःला संगितले, "फुटबॉल खेळताना माझं आयुष्य छान होतं, पण आता माझ्याकडे बघ." जे लोक अशा कथा सांगतात -- "माझं आयुष्य चांगलं होतं. आता ते वाईट आहे." -- ते अधिक चिंतातुर आणि निराश असतात. आणि काही काळ एमेका तसाच होता. पण कालपरत्वे, त्याने एक वेगळीच कथा गुंफायला सुरुवात केली. त्याची नवीन कथा अशी होती, "माझ्या आजारापूर्वी, माझे आयुष्य उद्देशहीन होते. मी खूप मौजमस्ती केली आणि एक खूप स्वार्थी माणूस होतो. पण माझ्या आजाराने मला जाणीव करून दिली कि मी एक चांगला माणूस होऊ शकतो." त्याच्या कथेच्या त्या संपादनाने एमेकाचे आयुष्य बदलून गेले. स्वतःला नवीन कथा ऐकवल्यानंतर, एमेकाने मुलांना मार्गदर्शन करणे सुरू केले आणि त्याला त्याच्या हेतूचा शोध लागला: दुसर्यांची सेवा. मानसशास्त्रज्ञ डॅन मॅकअॅडम्स याला "विमोचक कथा" म्हणतात, जिच्यात वाईटाचे विमोचन चांगल्याने होते. त्यांना आढळलं, जे लोक अर्थपूर्ण आयुष्य जगतात, ते त्यांची जीवनगाथा विमोचन, वाढ आणि प्रेमाने परिभाषित करून सांगतात. पण लोक त्यांची कथा कशाने बदलतात? काही लोक सल्लागाराची मदत घेतात, पण तुम्ही हे स्वतःदेखील करू शकता, निव्वळ तुमच्या आयुष्याला विचारपूर्वकपणे प्रतिबिंबीत करून, तुम्हाला परिभाषित करणार्या अनुभवांनी तुम्हाला कसे घडवले तुम्ही काय गमावले आणि काय कमावले. तेच एमेकाने केले. तुम्ही तुमची कथा एका रात्रीत बदलू शकत नाही; त्याला कैक वर्ष लागू शकतात व ते वेदनादायक असू शकते आपल्या सगळ्यांनाच त्रास झालेला असतो व आपण सारेच संघर्ष करतो. पण त्या वेदनादायी स्मृतींना कवटाळल्याने नवीन दृष्टीकोन आणि ज्ञान मिळू शकते, तुम्हाला तारणार्या त्या चांगल्या गोष्टींचे. तदभाविता, हेतु, अनुभवतीतता, कथाकथन: हे अर्थाचे ते चार स्तंभ आहेत. मी जेव्हा लहान होते, तेव्हा माझ्याभोवती सगळे स्तंभ असल्याचे भाग्य मला लाभले. मोंट्रीआल मधील आमच्या घरातून माझे पालक एक सुफी बैठकगृह चालवायचे. सुफीजम हा व्हर्लिंग देरविशेस आणि कवी रूमिशी संबंधित एक आध्यात्मिक सराव आहे. आठवड्यातून दोनदा, सुफी लोक आमच्याकडे येत असत चिंतन करण्यासाठी, पर्शियन चहा पिण्यासाठी आणि कथा सांगण्यासाठी. निर्मिलेल्या सगळ्यांची सेवा हादेखील त्यांच्या सरावाचा भाग होता छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम देऊन, म्हणजेच जरी लोक तुमच्याशी वाईट वागले असले तरी त्यांच्याप्रती दयाळू असणे पण त्यामुळे त्यांना हेतु मिळाला: अहंकाराला लगाम घालणे. अखेरीस, मी कॉलेजला जाण्यासाठी घर सोडलं आणि माझ्या आयुष्यातील दैनंदिन सुफी प्रशिक्षणाविना माझे बंध तुटल्यासारखे वाटू लागलं. आणि आयुष्य जगण्यालायक करणार्या त्या गोष्टींचा शोध घ्यायला मी सुरुवात केली त्यामुळेच मी या प्रवासाला निघाले. मागे वळून पाहता, मला जाणवतं कि सुफी बैठक्गृहाला अर्थाची खरी संस्कृती होती. स्तंभ हे स्थापत्यशास्त्राचा भाग होते आणि त्या स्तंभांच्या अस्तित्वानेच आम्हाला अधिक तीव्रतेने जगण्यास मदत केली. अर्थात, हीच तत्व लागू होतात इतर प्रबळ समाजातदेखील -- चांगली आणि वाईट. टोळ्या, पंथ: या स्तंभांचा वापर करणार्या अर्थाच्या संस्कृती आहेत आणि ज्या लोकांना जगण्याचे आणि मरण्याचे कारण देतात. पण त्यासाठी म्हणूनच आपण एक समाज म्हणून अधिक चांगले विकल्प द्यायला हवेत. आपल्या कुटुंबांत आणि संस्थांत आपण हे स्तंभ उभारणे गरजेचे आहे लोकांना त्यांचे उत्तम रूप धरण करण्यास मदत करण्यासाठी. पण अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास मेहनत घ्यावी लागते. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. जसा प्रत्येक दिवस जातो, आपण सतत आपलं जीवन घडवत असतो, आपल्या कथेत भर घालत असतो. आणि कधीकधी आपण मार्ग सोडू शकतो. माझ्याबाबतीत तसं जेव्हा घडतं, मला माझ्या वडिलांसोबत आलेला एक प्रभावी प्रसंग आठवतो. मी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर अनेक महिन्यांनी माझ्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता ज्याने त्यांचे प्राण घेतले असते. ते वाचले आणि जेव्हा मी त्यांना विचारलं त्यांच्या मनात काय चाललं होतं मृत्युशी सामना करत असताना, ते म्हणाले केवळ एकच विचार होता जगणे जरूरी आहे जेणेकरून ते माझ्या भावाची व माझी काळजी घेऊ शकतील आणि आयुष्यासाठी लढण्याची इच्छा याने त्यांना दिली. तत्कालिक शल्यक्रियेसाठी दिलेल्या भुलीचा जेव्हा अंमल चढला तेव्हा १० पासून उलट गणना करण्याऐवजी, ते आमची नावं मंत्रासारखी वारंवार घेत होते. या भूतलावर उच्चारलेले शेवटचे शब्द म्हणजे आमची नावं असतील अशी त्यांची इच्छा होती ते गतप्राण झाले असते तर. माझे वडील एक सुतार आणि सुफी आहेत. ते एक विनम्र आयुष्य आहे, पण चांगलं आयुष्य आहे. मृत्युशी सामना करत पडलेले असताना त्यांना जगण्याचे एक कारण होते: प्रेम. त्यांची कुटुंबाप्रती असलेली तदभाविता, एक वडील म्हणून त्यांचा हेतु, आमच्या नावांचा पुनरुच्चार करीत केलेले अनुभवातीत चिंतन -- ते म्हणतात, या कारणांमुळे ते वाचले. ती कथा ते स्वतःला सांगतात. अर्थाची शक्ती ती आहे. आनंद येतो आणि जातो. पण जेव्हा आयुष्य खरंच चांगलं असतं आणि जेव्हा वाईट घडत असतं, अर्थ तुम्हाला तग धरून राहण्यास काहीतरी देतो. धन्यवाद. (टाळ्या)