03 सर्किट्स v6
-
0:08 - 0:11सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त
गोष्ट म्हणजे -
0:12 - 0:18सर्किटरी हा एक कलाप्रकार असू शकतो. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते.
-
0:20 - 0:25जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही
तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. -
0:27 - 0:32कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे
एक प्रकारची माहितीच असते. -
0:32 - 0:37ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा
-
0:37 - 0:39एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते.
-
0:39 - 0:46इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी,
आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, -
0:46 - 0:50कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि
एकत्र आणावे लागतात. -
0:51 - 0:59ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं.
-
1:03 - 1:08एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया.
-
1:09 - 1:12हे एक अतिशय सोपं सर्किट आहे.
-
1:12 - 1:16ते ऑन किंवा ऑफ प्रकारचे विद्युत सिग्नल्स घेतं
आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. -
1:16 - 1:21त्यामुळं जर तुम्ही दिलेला सिग्नल 1 असेल, तर सर्किट तुम्हाला 0 देतं.
-
1:21 - 1:24आणि जर तुम्ही सर्किटला 0 दिलेत, तर ते
तुम्हाला 1 देतं. -
1:24 - 1:30आत जाणारा सिग्नल आणि बाहेर येणारा सिग्नल हे सारखे नसतात, त्यामुळं आपण या सर्किटला 'नॉट' म्हणतो.
-
1:30 - 1:37यापेक्षा गुंतागुंतीची सर्किट्स अनेक सिग्नल्स घेऊन ते एकत्रित करू शकतात, आणि आपल्याला वेगळा रिझल्ट देतात.
-
1:37 - 1:43या उदाहरणात, सर्किट दोन विद्युत सिग्नल्स घेईल, प्रत्येक सिग्नल 1 किंवा 0 असेल.
-
1:44 - 1:50जर येणाऱ्या सिग्नल्सपैकी कोणताही 0 असेल,
तर रिझल्टसुद्धा 0 च असेल. -
1:50 - 1:53जर पहिला आणि दुसरा दोन्ही सिग्नल्स 1 असतील
-
1:53 - 2:01तरच हे सर्किट तुम्हाला 1 देईल, म्हणून याला
अँड सर्किट म्हणतात. -
2:01 - 2:07यासारखी अनेक लहान सर्किट्स असतात.
ती साधी लॉजिकल कॅलक्युलेशन्स करतात. -
2:07 - 2:13ही सर्किट्स एकत्र जोडून, आपण अधिक गुंतागुंतीची कॅलक्युलेशन्स करणारी अधिक गुंतागुंतीची सर्किट्स बनवू शकतो.
-
2:14 - 2:20उदाहरणार्थ, तुम्ही 2 बीट्स एकत्र करणारे अॅडर
नावाचे सर्किट तयार करू शकता. -
2:20 - 2:27हे सर्किट 2 बीट्स घेतं, प्रत्येक बीट 1 किंवा 0 असतं,
आणि सर्किट बीट्स एकत्र करून बेरीज करतं. -
2:27 - 2:30बेरीज 0 अधिक 0 बरोबर 0 असू शकेल किंवा,
-
2:30 - 2:340 अधिक 1 बरोबर 1, किंवा 1 अधिक 1 बरोबर 2
असू शकेल. -
2:34 - 2:39तुम्हाला बाहेर येणाऱ्या 2 वायर्स लागतील कारण बेरीज दर्शवण्यासाठी 2 बायनरी आकड्यांची गरज असू शकते.
-
2:40 - 2:44एकदा तुमच्याकडे माहितीच्या 2 बीट्स अॅड करणारं एक अॅडर सर्किट असलं की
-
2:44 - 2:50तुम्ही अशी अनेक अॅडर सर्किट्स एकत्र करून बऱ्याच मोठ्या संख्यांची बेरीज करू शकता.
-
2:51 - 2:56उदा., 8-बीट अॅडर 25 आणि 50 या संख्यांची बेरीज
कशी करतं ते इथं दाखवलं आहे. -
2:57 - 3:04प्रत्येक संख्या 8 बीट्सने दाखवली आहे, त्यातून 16 वेगवेगळे सिग्नल्स तयार होतात आणि सर्किटमध्ये जातात.
-
3:05 - 3:118-बीट अॅडरमध्ये अनेक लहान अॅडर्स असतात,
ते एकत्रितपणे बेरीज करतात. -
3:12 - 3:17वेगवेगळी विद्युत सर्किट्स वजाबाकी किंवा गुणाकार यासारखी इतर सोपी कॅलक्युलेशन्स करू शकतात.
-
3:17 - 3:25प्रत्यक्षात, आपला कॉम्प्युटर माहितीवर करत असलेली प्रक्रिया म्हणजे खूप लहान सोप्या प्रक्रिया एकत्रितपणे करणे.
-
3:25 - 3:31कॉम्प्युटर करत असलेली प्रत्येक क्रिया इतकी सोपी असते की ती माणूससुद्धा करू शकतो.
-
3:31 - 3:34पण कॉम्प्युटरमधली ही सर्किट्स खूपच वेगवान असतात.
-
3:35 - 3:39पूर्वी, ही सर्किट्स मोठी आणि ओबडधोबड होती,
-
3:39 - 3:45आणि 8-बीट अॅडर फ्रीजएवढा मोठासुद्धा असायचा. साधं कॅलक्युलेशन करायला त्याला काही मिनिटं लागायची.
-
3:45 - 3:50आज, कॉम्प्युटर सर्किट्स सूक्ष्म आकाराची आहेत आणि खूपच जास्त वेगवान आहेत.
-
3:51 - 3:53लहान आकाराचे कॉम्प्युटर्ससुद्धा अधिक वेगवान
का असतात? -
3:53 - 3:58कारण, सर्किट जितकं लहान असतं, तितकं कमी
अंतर विद्युत सिग्नलला जावं लागतं. -
3:58 - 4:04वीज जवळजवळ प्रकाशाच्या वेगानं प्रवास करते, त्यामुळे आधुनिक सर्किट्स एका सेकंदाला लक्षावधी कॅलक्युलेशन्स करू शकतात.
-
4:05 - 4:11त्यामुळं तुम्ही गेम खेळत असलात, व्हिडीओ रेकॉर्ड
करत असलात किंवा विश्वाचा वेध घेत असलात तरी, -
4:12 - 4:18तंत्रज्ञानानं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर माहितीवर अतिशय वेगानं प्रक्रिया करावी लागते.
-
4:19 - 4:25या सगळ्या गुंतागुंतीच्या मुळाशी फक्त अनेक लहान सर्किट्स आहेत, ती बायनरी सिग्नलचं
-
4:25 - 4:28वेबसाईट्स, व्हिडीओ, संगीत आणि गेम्समध्ये
रूपांतर करतात. -
4:28 - 4:32ही सर्किट्स आपल्याला अगदी डीएनएचं डीकोडिंग करून रोगनिदान करण्यासाठी आणि रोग बरा करण्यासाठी मदत करू शकतात.
-
4:32 - 4:35मग, ही सगळी सर्किट्स वापरून तुम्हाला काय करायचंय?
- Title:
- 03 सर्किट्स v6
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- How Computers Work
- Duration:
- 04:45
Tomedes edited Marathi subtitles for 03 Circuits v6 | ||
Tomedes edited Marathi subtitles for 03 Circuits v6 |