[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:08.48,0:00:11.42,Default,,0000,0000,0000,,सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त\Nगोष्ट म्हणजे Dialogue: 0,0:00:11.78,0:00:18.44,Default,,0000,0000,0000,,सर्किटरी हा एक कलाप्रकार असू शकतो. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. Dialogue: 0,0:00:20.30,0:00:24.70,Default,,0000,0000,0000,,जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही \Nतंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. Dialogue: 0,0:00:26.86,0:00:32.34,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे\Nएक प्रकारची माहितीच असते. Dialogue: 0,0:00:32.34,0:00:37.24,Default,,0000,0000,0000,,ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा Dialogue: 0,0:00:37.24,0:00:39.06,Default,,0000,0000,0000,,एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. Dialogue: 0,0:00:39.40,0:00:46.36,Default,,0000,0000,0000,,इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी,\Nआणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, Dialogue: 0,0:00:46.36,0:00:49.92,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि \Nएकत्र आणावे लागतात. Dialogue: 0,0:00:50.54,0:00:58.52,Default,,0000,0000,0000,,ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. Dialogue: 0,0:01:03.04,0:01:08.46,Default,,0000,0000,0000,,एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. Dialogue: 0,0:01:09.46,0:01:12.28,Default,,0000,0000,0000,,हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. Dialogue: 0,0:01:12.28,0:01:15.82,Default,,0000,0000,0000,,ते ऑन किंवा ऑफ प्रकारचे विद्युत सिग्नल्स घेतं\Nआणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. Dialogue: 0,0:01:15.82,0:01:20.58,Default,,0000,0000,0000,,त्यामुळं जर तुम्ही दिलेला सिग्नल 1 असेल, तर सर्किट तुम्हाला 0 देतं. Dialogue: 0,0:01:20.58,0:01:23.62,Default,,0000,0000,0000,,आणि जर तुम्ही सर्किटला 0 दिलेत, तर ते \Nतुम्हाला 1 देतं. Dialogue: 0,0:01:23.63,0:01:29.68,Default,,0000,0000,0000,,आत जाणारा सिग्नल आणि बाहेर येणारा सिग्नल हे सारखे नसतात, त्यामुळं आपण या सर्किटला 'नॉट' म्हणतो. Dialogue: 0,0:01:30.04,0:01:36.58,Default,,0000,0000,0000,,यापेक्षा गुंतागुंतीची सर्किट्स अनेक सिग्नल्स घेऊन ते एकत्रित करू शकतात, आणि आपल्याला वेगळा रिझल्ट देतात. Dialogue: 0,0:01:36.58,0:01:43.48,Default,,0000,0000,0000,,या उदाहरणात, सर्किट दोन विद्युत सिग्नल्स घेईल, प्रत्येक सिग्नल 1 किंवा 0 असेल. Dialogue: 0,0:01:43.88,0:01:49.58,Default,,0000,0000,0000,,जर येणाऱ्या सिग्नल्सपैकी कोणताही 0 असेल,\Nतर रिझल्टसुद्धा 0 च असेल. Dialogue: 0,0:01:49.58,0:01:52.72,Default,,0000,0000,0000,,जर पहिला आणि दुसरा दोन्ही सिग्नल्स 1 असतील Dialogue: 0,0:01:52.78,0:02:00.76,Default,,0000,0000,0000,,तरच हे सर्किट तुम्हाला 1 देईल, म्हणून याला \Nअँड सर्किट म्हणतात. Dialogue: 0,0:02:01.22,0:02:06.60,Default,,0000,0000,0000,,यासारखी अनेक लहान सर्किट्स असतात. \Nती साधी लॉजिकल कॅलक्युलेशन्स करतात. Dialogue: 0,0:02:06.60,0:02:13.40,Default,,0000,0000,0000,,ही सर्किट्स एकत्र जोडून, आपण अधिक गुंतागुंतीची कॅलक्युलेशन्स करणारी अधिक गुंतागुंतीची सर्किट्स बनवू शकतो. Dialogue: 0,0:02:13.94,0:02:19.76,Default,,0000,0000,0000,,उदाहरणार्थ, तुम्ही 2 बीट्स एकत्र करणारे अॅडर \Nनावाचे सर्किट तयार करू शकता. Dialogue: 0,0:02:19.84,0:02:27.04,Default,,0000,0000,0000,,हे सर्किट 2 बीट्स घेतं, प्रत्येक बीट 1 किंवा 0 असतं,\Nआणि सर्किट बीट्स एकत्र करून बेरीज करतं. Dialogue: 0,0:02:27.35,0:02:29.83,Default,,0000,0000,0000,,बेरीज 0 अधिक 0 बरोबर 0 असू शकेल किंवा, Dialogue: 0,0:02:30.34,0:02:34.34,Default,,0000,0000,0000,,0 अधिक 1 बरोबर 1, किंवा 1 अधिक 1 बरोबर 2 \Nअसू शकेल. Dialogue: 0,0:02:34.36,0:02:39.44,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला बाहेर येणाऱ्या 2 वायर्स लागतील कारण बेरीज दर्शवण्यासाठी 2 बायनरी आकड्यांची गरज असू शकते. Dialogue: 0,0:02:40.06,0:02:44.50,Default,,0000,0000,0000,,एकदा तुमच्याकडे माहितीच्या 2 बीट्स अॅड करणारं एक अॅडर सर्किट असलं की Dialogue: 0,0:02:44.50,0:02:50.34,Default,,0000,0000,0000,,तुम्ही अशी अनेक अॅडर सर्किट्स एकत्र करून बऱ्याच मोठ्या संख्यांची बेरीज करू शकता. Dialogue: 0,0:02:51.17,0:02:56.23,Default,,0000,0000,0000,,उदा., 8-बीट अॅडर 25 आणि 50 या संख्यांची बेरीज\Nकशी करतं ते इथं दाखवलं आहे. Dialogue: 0,0:02:57.26,0:03:03.73,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक संख्या 8 बीट्सने दाखवली आहे, त्यातून 16 वेगवेगळे सिग्नल्स तयार होतात आणि सर्किटमध्ये जातात. Dialogue: 0,0:03:04.92,0:03:10.76,Default,,0000,0000,0000,,8-बीट अॅडरमध्ये अनेक लहान अॅडर्स असतात,\Nते एकत्रितपणे बेरीज करतात. Dialogue: 0,0:03:12.50,0:03:17.34,Default,,0000,0000,0000,,वेगवेगळी विद्युत सर्किट्स वजाबाकी किंवा गुणाकार यासारखी इतर सोपी कॅलक्युलेशन्स करू शकतात. Dialogue: 0,0:03:17.34,0:03:24.72,Default,,0000,0000,0000,,प्रत्यक्षात, आपला कॉम्प्युटर माहितीवर करत असलेली प्रक्रिया म्हणजे खूप लहान सोप्या प्रक्रिया एकत्रितपणे करणे. Dialogue: 0,0:03:24.72,0:03:30.52,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर करत असलेली प्रत्येक क्रिया इतकी सोपी असते की ती माणूससुद्धा करू शकतो. Dialogue: 0,0:03:30.52,0:03:34.10,Default,,0000,0000,0000,,पण कॉम्प्युटरमधली ही सर्किट्स खूपच वेगवान असतात. Dialogue: 0,0:03:34.82,0:03:38.66,Default,,0000,0000,0000,,पूर्वी, ही सर्किट्स मोठी आणि ओबडधोबड होती, Dialogue: 0,0:03:38.66,0:03:44.78,Default,,0000,0000,0000,,आणि 8-बीट अॅडर फ्रीजएवढा मोठासुद्धा असायचा. साधं कॅलक्युलेशन करायला त्याला काही मिनिटं लागायची. Dialogue: 0,0:03:45.10,0:03:50.06,Default,,0000,0000,0000,,आज, कॉम्प्युटर सर्किट्स सूक्ष्म आकाराची आहेत आणि खूपच जास्त वेगवान आहेत. Dialogue: 0,0:03:50.58,0:03:53.20,Default,,0000,0000,0000,,लहान आकाराचे कॉम्प्युटर्ससुद्धा अधिक वेगवान \Nका असतात? Dialogue: 0,0:03:53.20,0:03:58.14,Default,,0000,0000,0000,,कारण, सर्किट जितकं लहान असतं, तितकं कमी\Nअंतर विद्युत सिग्नलला जावं लागतं. Dialogue: 0,0:03:58.36,0:04:04.34,Default,,0000,0000,0000,,वीज जवळजवळ प्रकाशाच्या वेगानं प्रवास करते, त्यामुळे आधुनिक सर्किट्स एका सेकंदाला लक्षावधी कॅलक्युलेशन्स करू शकतात. Dialogue: 0,0:04:05.32,0:04:10.72,Default,,0000,0000,0000,,त्यामुळं तुम्ही गेम खेळत असलात, व्हिडीओ रेकॉर्ड \Nकरत असलात किंवा विश्वाचा वेध घेत असलात तरी, Dialogue: 0,0:04:11.86,0:04:18.02,Default,,0000,0000,0000,,तंत्रज्ञानानं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर माहितीवर अतिशय वेगानं प्रक्रिया करावी लागते. Dialogue: 0,0:04:18.86,0:04:24.90,Default,,0000,0000,0000,,या सगळ्या गुंतागुंतीच्या मुळाशी फक्त अनेक लहान सर्किट्स आहेत, ती बायनरी सिग्नलचं Dialogue: 0,0:04:24.90,0:04:27.72,Default,,0000,0000,0000,,वेबसाईट्स, व्हिडीओ, संगीत आणि गेम्समध्ये\Nरूपांतर करतात. Dialogue: 0,0:04:27.72,0:04:31.96,Default,,0000,0000,0000,,ही सर्किट्स आपल्याला अगदी डीएनएचं डीकोडिंग करून रोगनिदान करण्यासाठी आणि रोग बरा करण्यासाठी मदत करू शकतात. Dialogue: 0,0:04:31.96,0:04:34.92,Default,,0000,0000,0000,,मग, ही सगळी सर्किट्स वापरून तुम्हाला काय करायचंय?