WEBVTT 00:00:08.480 --> 00:00:11.420 सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त गोष्ट म्हणजे 00:00:11.780 --> 00:00:18.440 सर्किटरी हा एक कलाप्रकार असू शकतो. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. 00:00:20.300 --> 00:00:24.700 जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. 00:00:26.860 --> 00:00:32.340 कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे एक प्रकारची माहितीच असते. 00:00:32.340 --> 00:00:37.240 ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा 00:00:37.240 --> 00:00:39.060 एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. 00:00:39.400 --> 00:00:46.360 इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, 00:00:46.360 --> 00:00:49.920 कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि एकत्र आणावे लागतात. 00:00:50.540 --> 00:00:58.520 ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. 00:01:03.040 --> 00:01:08.460 एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. 00:01:09.460 --> 00:01:12.280 हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. 00:01:12.280 --> 00:01:15.820 ते ऑन किंवा ऑफ प्रकारचे विद्युत सिग्नल्स घेतं आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. 00:01:15.820 --> 00:01:20.580 त्यामुळं जर तुम्ही दिलेला सिग्नल 1 असेल, तर सर्किट तुम्हाला 0 देतं. 00:01:20.580 --> 00:01:23.620 आणि जर तुम्ही सर्किटला 0 दिलेत, तर ते तुम्हाला 1 देतं. 00:01:23.630 --> 00:01:29.680 आत जाणारा सिग्नल आणि बाहेर येणारा सिग्नल हे सारखे नसतात, त्यामुळं आपण या सर्किटला 'नॉट' म्हणतो. 00:01:30.040 --> 00:01:36.580 यापेक्षा गुंतागुंतीची सर्किट्स अनेक सिग्नल्स घेऊन ते एकत्रित करू शकतात, आणि आपल्याला वेगळा रिझल्ट देतात. 00:01:36.580 --> 00:01:43.480 या उदाहरणात, सर्किट दोन विद्युत सिग्नल्स घेईल, प्रत्येक सिग्नल 1 किंवा 0 असेल. 00:01:43.880 --> 00:01:49.580 जर येणाऱ्या सिग्नल्सपैकी कोणताही 0 असेल, तर रिझल्टसुद्धा 0 च असेल. 00:01:49.580 --> 00:01:52.720 जर पहिला आणि दुसरा दोन्ही सिग्नल्स 1 असतील 00:01:52.780 --> 00:02:00.760 तरच हे सर्किट तुम्हाला 1 देईल, म्हणून याला अँड सर्किट म्हणतात. 00:02:01.220 --> 00:02:06.600 यासारखी अनेक लहान सर्किट्स असतात. ती साधी लॉजिकल कॅलक्युलेशन्स करतात. 00:02:06.600 --> 00:02:13.400 ही सर्किट्स एकत्र जोडून, आपण अधिक गुंतागुंतीची कॅलक्युलेशन्स करणारी अधिक गुंतागुंतीची सर्किट्स बनवू शकतो. 00:02:13.940 --> 00:02:19.760 उदाहरणार्थ, तुम्ही 2 बीट्स एकत्र करणारे अॅडर नावाचे सर्किट तयार करू शकता. 00:02:19.840 --> 00:02:27.040 हे सर्किट 2 बीट्स घेतं, प्रत्येक बीट 1 किंवा 0 असतं, आणि सर्किट बीट्स एकत्र करून बेरीज करतं. 00:02:27.350 --> 00:02:29.829 बेरीज 0 अधिक 0 बरोबर 0 असू शकेल किंवा, 00:02:30.340 --> 00:02:34.340 0 अधिक 1 बरोबर 1, किंवा 1 अधिक 1 बरोबर 2 असू शकेल. 00:02:34.360 --> 00:02:39.440 तुम्हाला बाहेर येणाऱ्या 2 वायर्स लागतील कारण बेरीज दर्शवण्यासाठी 2 बायनरी आकड्यांची गरज असू शकते. 00:02:40.060 --> 00:02:44.500 एकदा तुमच्याकडे माहितीच्या 2 बीट्स अॅड करणारं एक अॅडर सर्किट असलं की 00:02:44.500 --> 00:02:50.340 तुम्ही अशी अनेक अॅडर सर्किट्स एकत्र करून बऱ्याच मोठ्या संख्यांची बेरीज करू शकता. 00:02:51.170 --> 00:02:56.229 उदा., 8-बीट अॅडर 25 आणि 50 या संख्यांची बेरीज कशी करतं ते इथं दाखवलं आहे. 00:02:57.260 --> 00:03:03.730 प्रत्येक संख्या 8 बीट्सने दाखवली आहे, त्यातून 16 वेगवेगळे सिग्नल्स तयार होतात आणि सर्किटमध्ये जातात. 00:03:04.920 --> 00:03:10.760 8-बीट अॅडरमध्ये अनेक लहान अॅडर्स असतात, ते एकत्रितपणे बेरीज करतात. 00:03:12.500 --> 00:03:17.340 वेगवेगळी विद्युत सर्किट्स वजाबाकी किंवा गुणाकार यासारखी इतर सोपी कॅलक्युलेशन्स करू शकतात. 00:03:17.340 --> 00:03:24.720 प्रत्यक्षात, आपला कॉम्प्युटर माहितीवर करत असलेली प्रक्रिया म्हणजे खूप लहान सोप्या प्रक्रिया एकत्रितपणे करणे. 00:03:24.720 --> 00:03:30.520 कॉम्प्युटर करत असलेली प्रत्येक क्रिया इतकी सोपी असते की ती माणूससुद्धा करू शकतो. 00:03:30.520 --> 00:03:34.100 पण कॉम्प्युटरमधली ही सर्किट्स खूपच वेगवान असतात. 00:03:34.820 --> 00:03:38.660 पूर्वी, ही सर्किट्स मोठी आणि ओबडधोबड होती, 00:03:38.660 --> 00:03:44.780 आणि 8-बीट अॅडर फ्रीजएवढा मोठासुद्धा असायचा. साधं कॅलक्युलेशन करायला त्याला काही मिनिटं लागायची. 00:03:45.100 --> 00:03:50.060 आज, कॉम्प्युटर सर्किट्स सूक्ष्म आकाराची आहेत आणि खूपच जास्त वेगवान आहेत. 00:03:50.580 --> 00:03:53.200 लहान आकाराचे कॉम्प्युटर्ससुद्धा अधिक वेगवान का असतात? 00:03:53.200 --> 00:03:58.140 कारण, सर्किट जितकं लहान असतं, तितकं कमी अंतर विद्युत सिग्नलला जावं लागतं. 00:03:58.360 --> 00:04:04.340 वीज जवळजवळ प्रकाशाच्या वेगानं प्रवास करते, त्यामुळे आधुनिक सर्किट्स एका सेकंदाला लक्षावधी कॅलक्युलेशन्स करू शकतात. 00:04:05.320 --> 00:04:10.720 त्यामुळं तुम्ही गेम खेळत असलात, व्हिडीओ रेकॉर्ड करत असलात किंवा विश्वाचा वेध घेत असलात तरी, 00:04:11.860 --> 00:04:18.019 तंत्रज्ञानानं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर माहितीवर अतिशय वेगानं प्रक्रिया करावी लागते. 00:04:18.860 --> 00:04:24.900 या सगळ्या गुंतागुंतीच्या मुळाशी फक्त अनेक लहान सर्किट्स आहेत, ती बायनरी सिग्नलचं 00:04:24.900 --> 00:04:27.720 वेबसाईट्स, व्हिडीओ, संगीत आणि गेम्समध्ये रूपांतर करतात. 00:04:27.720 --> 00:04:31.960 ही सर्किट्स आपल्याला अगदी डीएनएचं डीकोडिंग करून रोगनिदान करण्यासाठी आणि रोग बरा करण्यासाठी मदत करू शकतात. 00:04:31.960 --> 00:04:34.920 मग, ही सगळी सर्किट्स वापरून तुम्हाला काय करायचंय?