0:00:08.480,0:00:11.420 सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त[br]गोष्ट म्हणजे 0:00:11.780,0:00:18.440 सर्किटरी हा एक कलाप्रकार असू शकतो. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. 0:00:20.300,0:00:24.700 जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही [br]तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. 0:00:26.860,0:00:32.340 कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे[br]एक प्रकारची माहितीच असते. 0:00:32.340,0:00:37.240 ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा 0:00:37.240,0:00:39.060 एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. 0:00:39.400,0:00:46.360 इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी,[br]आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, 0:00:46.360,0:00:49.920 कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि [br]एकत्र आणावे लागतात. 0:00:50.540,0:00:58.520 ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. 0:01:03.040,0:01:08.460 एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. 0:01:09.460,0:01:12.280 हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. 0:01:12.280,0:01:15.820 ते ऑन किंवा ऑफ प्रकारचे विद्युत सिग्नल्स घेतं[br]आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. 0:01:15.820,0:01:20.580 त्यामुळं जर तुम्ही दिलेला सिग्नल 1 असेल, तर सर्किट तुम्हाला 0 देतं. 0:01:20.580,0:01:23.620 आणि जर तुम्ही सर्किटला 0 दिलेत, तर ते [br]तुम्हाला 1 देतं. 0:01:23.630,0:01:29.680 आत जाणारा सिग्नल आणि बाहेर येणारा सिग्नल हे सारखे नसतात, त्यामुळं आपण या सर्किटला 'नॉट' म्हणतो. 0:01:30.040,0:01:36.580 यापेक्षा गुंतागुंतीची सर्किट्स अनेक सिग्नल्स घेऊन ते एकत्रित करू शकतात, आणि आपल्याला वेगळा रिझल्ट देतात. 0:01:36.580,0:01:43.480 या उदाहरणात, सर्किट दोन विद्युत सिग्नल्स घेईल, प्रत्येक सिग्नल 1 किंवा 0 असेल. 0:01:43.880,0:01:49.580 जर येणाऱ्या सिग्नल्सपैकी कोणताही 0 असेल,[br]तर रिझल्टसुद्धा 0 च असेल. 0:01:49.580,0:01:52.720 जर पहिला आणि दुसरा दोन्ही सिग्नल्स 1 असतील 0:01:52.780,0:02:00.760 तरच हे सर्किट तुम्हाला 1 देईल, म्हणून याला [br]अँड सर्किट म्हणतात. 0:02:01.220,0:02:06.600 यासारखी अनेक लहान सर्किट्स असतात. [br]ती साधी लॉजिकल कॅलक्युलेशन्स करतात. 0:02:06.600,0:02:13.400 ही सर्किट्स एकत्र जोडून, आपण अधिक गुंतागुंतीची कॅलक्युलेशन्स करणारी अधिक गुंतागुंतीची सर्किट्स बनवू शकतो. 0:02:13.940,0:02:19.760 उदाहरणार्थ, तुम्ही 2 बीट्स एकत्र करणारे अॅडर [br]नावाचे सर्किट तयार करू शकता. 0:02:19.840,0:02:27.040 हे सर्किट 2 बीट्स घेतं, प्रत्येक बीट 1 किंवा 0 असतं,[br]आणि सर्किट बीट्स एकत्र करून बेरीज करतं. 0:02:27.350,0:02:29.829 बेरीज 0 अधिक 0 बरोबर 0 असू शकेल किंवा, 0:02:30.340,0:02:34.340 0 अधिक 1 बरोबर 1, किंवा 1 अधिक 1 बरोबर 2 [br]असू शकेल. 0:02:34.360,0:02:39.440 तुम्हाला बाहेर येणाऱ्या 2 वायर्स लागतील कारण बेरीज दर्शवण्यासाठी 2 बायनरी आकड्यांची गरज असू शकते. 0:02:40.060,0:02:44.500 एकदा तुमच्याकडे माहितीच्या 2 बीट्स अॅड करणारं एक अॅडर सर्किट असलं की 0:02:44.500,0:02:50.340 तुम्ही अशी अनेक अॅडर सर्किट्स एकत्र करून बऱ्याच मोठ्या संख्यांची बेरीज करू शकता. 0:02:51.170,0:02:56.229 उदा., 8-बीट अॅडर 25 आणि 50 या संख्यांची बेरीज[br]कशी करतं ते इथं दाखवलं आहे. 0:02:57.260,0:03:03.730 प्रत्येक संख्या 8 बीट्सने दाखवली आहे, त्यातून 16 वेगवेगळे सिग्नल्स तयार होतात आणि सर्किटमध्ये जातात. 0:03:04.920,0:03:10.760 8-बीट अॅडरमध्ये अनेक लहान अॅडर्स असतात,[br]ते एकत्रितपणे बेरीज करतात. 0:03:12.500,0:03:17.340 वेगवेगळी विद्युत सर्किट्स वजाबाकी किंवा गुणाकार यासारखी इतर सोपी कॅलक्युलेशन्स करू शकतात. 0:03:17.340,0:03:24.720 प्रत्यक्षात, आपला कॉम्प्युटर माहितीवर करत असलेली प्रक्रिया म्हणजे खूप लहान सोप्या प्रक्रिया एकत्रितपणे करणे. 0:03:24.720,0:03:30.520 कॉम्प्युटर करत असलेली प्रत्येक क्रिया इतकी सोपी असते की ती माणूससुद्धा करू शकतो. 0:03:30.520,0:03:34.100 पण कॉम्प्युटरमधली ही सर्किट्स खूपच वेगवान असतात. 0:03:34.820,0:03:38.660 पूर्वी, ही सर्किट्स मोठी आणि ओबडधोबड होती, 0:03:38.660,0:03:44.780 आणि 8-बीट अॅडर फ्रीजएवढा मोठासुद्धा असायचा. साधं कॅलक्युलेशन करायला त्याला काही मिनिटं लागायची. 0:03:45.100,0:03:50.060 आज, कॉम्प्युटर सर्किट्स सूक्ष्म आकाराची आहेत आणि खूपच जास्त वेगवान आहेत. 0:03:50.580,0:03:53.200 लहान आकाराचे कॉम्प्युटर्ससुद्धा अधिक वेगवान [br]का असतात? 0:03:53.200,0:03:58.140 कारण, सर्किट जितकं लहान असतं, तितकं कमी[br]अंतर विद्युत सिग्नलला जावं लागतं. 0:03:58.360,0:04:04.340 वीज जवळजवळ प्रकाशाच्या वेगानं प्रवास करते, त्यामुळे आधुनिक सर्किट्स एका सेकंदाला लक्षावधी कॅलक्युलेशन्स करू शकतात. 0:04:05.320,0:04:10.720 त्यामुळं तुम्ही गेम खेळत असलात, व्हिडीओ रेकॉर्ड [br]करत असलात किंवा विश्वाचा वेध घेत असलात तरी, 0:04:11.860,0:04:18.019 तंत्रज्ञानानं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर माहितीवर अतिशय वेगानं प्रक्रिया करावी लागते. 0:04:18.860,0:04:24.900 या सगळ्या गुंतागुंतीच्या मुळाशी फक्त अनेक लहान सर्किट्स आहेत, ती बायनरी सिग्नलचं 0:04:24.900,0:04:27.720 वेबसाईट्स, व्हिडीओ, संगीत आणि गेम्समध्ये[br]रूपांतर करतात. 0:04:27.720,0:04:31.960 ही सर्किट्स आपल्याला अगदी डीएनएचं डीकोडिंग करून रोगनिदान करण्यासाठी आणि रोग बरा करण्यासाठी मदत करू शकतात. 0:04:31.960,0:04:34.920 मग, ही सगळी सर्किट्स वापरून तुम्हाला काय करायचंय?