चांगल्या कामाचं सुखी गुपीत
-
0:00 - 0:04मी जेव्हा सात वर्षांचा होतो आणि
माझी बहिण केवळ पाच वर्षांची होती, -
0:04 - 0:06तेव्हा आम्ही एका दुहेरी
पलंगावर खेळत होतो. -
0:06 - 0:09त्यावेळेस मी माझ्या बहिणीपेक्षा
दोन वर्षांनी मोठा होतो -- -
0:09 - 0:11म्हणजे मी आताही
दोन वर्षांनी मोठा आहे -- -
0:11 - 0:15पण त्यावेळेस म्हणजे मी जे सांगेन
ते करणं तिला भाग होतं, -
0:15 - 0:16आणि मला युद्ध खेळायचं होतं.
-
0:16 - 0:18आम्ही पलंगांवरील वरच्या भागात होतो.
-
0:18 - 0:20पलंगाच्या एका बाजूला,
-
0:20 - 0:23मी माझे सगळे लुटुपुटू सैनिक
आणि शस्त्र ठेवले होते. -
0:23 - 0:26आणि दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणीचे
सगळे ल्हक़्न्गे घोडे होते -
0:26 - 0:27आक्रमणाच्या तयारीत होते ..
-
0:27 - 0:31त्या दुपारी काय घडलं याबद्दल
वेगवेगळ्या कथा आहेत. -
0:31 - 0:33पण माझी बहीण आज येथे नसल्याने,
-
0:33 - 0:35मी तुम्हाला खरं काय ते सांगतो --
-
0:35 - 0:36(हशा)
-
0:36 - 0:38जे माझ्या बहिणीबद्दल आहे
आणि थोड गंमतशीर आहे. -
0:38 - 0:41कसंतरी, तिच्या मोठ्या भावाच्या
मदतीविना आणि धक्क्याविना, -
0:42 - 0:44एमी बंक पलंगावरून गायब झाली
-
0:44 - 0:46आणि जमिनीवर कोसळली.
-
0:46 - 0:48मी चिंतेने पलंगाच्या बाजुवरून पाहिलं
-
0:48 - 0:50खाली पडलेल्या माझ्या बहिणीचं काय झालं ते
-
0:50 - 0:53आणि असं दिसलं कि ती तिच्या हात व
गुडघ्यांवर जोरात आपटली होती -
0:53 - 0:54चतुष्पादासारखी.
-
0:54 - 0:57मी बावरलो कारण माझ्या
पालकांनी जबाबदारी दिली होती. -
0:57 - 0:59खातरजमा करण्याची कि माझी बहिण आणि मी
-
0:59 - 1:01शक्य तितक्या शांतपणे आणि सुरक्षितपणे खेळू.
-
1:01 - 1:05आणि मी एमीचा हात अपघाताने कसा
मोडला होता हे पाहता -
1:05 - 1:06एक आठवड्यापूर्वीच --
-
1:06 - 1:08(हशा)
-
1:10 - 1:11(हशा संपला)
-
1:11 - 1:16शूरवीरासारखं एका काल्पनिक बंदुकीच्या
गोळीच्या मार्गातून तिला बाजूला सारत, -
1:16 - 1:18(हशा)
-
1:18 - 1:22ज्यासाठी माझे आभार अजून मानायचे आहेत,
मी शक्य तितके प्रयत्न करत होतो -- -
1:22 - 1:24तिला ती येताना दिसलीदेखील नव्हती
-
1:24 - 1:26मी खूप प्रयत्न करत होतो चांगलं वागण्याचा.
-
1:26 - 1:27आणि मला
बहिणीचा चेहरा दिसला, -
1:27 - 1:30वेदना आणि यातना आणि आश्चर्याचा आकांत
-
1:30 - 1:32तिच्या तोंडून उसळणार होता आणि
माझ्या पालकांना उठवणार होता -
1:32 - 1:35ते घेत असलेल्या थंडीतल्या
निवांत वामकुक्षीतून. -
1:35 - 1:36मग मी एकच गोष्ट
केली जिचा -
1:36 - 1:40विचार माझा सात वर्षीय घाबरलेला
मेंदू करू शकत होता दुर्घटना टाळण्यासाठी. -
1:40 - 1:42तुमच्याकडे मुलं असतील तर
तुम्ही हे शेकडो वेळा पाहिलं असेल. -
1:42 - 1:45मी म्हणालो "एमी, थांब. रडू नकोस.
बघितलंस तु कशी पडलीयेस? -
1:45 - 1:47कुठलाही मानव असा चतुष्पादासारखा पडत नाही.
-
1:49 - 1:51एमी, मला वाटतं याचा अर्थ
तु युनिकॉर्न आहेस." -
1:51 - 1:54(हशा)
-
1:54 - 1:56आता, ती फसवणूक होती,
-
1:56 - 1:58कारण तिला अजून काहीही नको होतं
-
1:58 - 2:00एमी एक पाच वर्षाची दुखावलेली
छोटी बहीण नव्हे तर -
2:00 - 2:02एमी एक विशेष युनिकॉर्न.
-
2:02 - 2:04अर्थात हा विकल्प तिच्या मेंदूसाठी
-
2:04 - 2:05पूर्वी कधी उपलब्ध
नव्हता. -
2:05 - 2:08हे दिसत होतं कि कशी माझी भोळी
फसलेली बहीण मतभेदाला सामोरं जात होती -
2:08 - 2:11तिचा छोटासा मेंदू विचारमंथन करत होता
-
2:11 - 2:14वेदना व यातनांचं आणि तिने नुकतंच
अनुभवलेल्या आश्चर्याचं -
2:14 - 2:17किंवा स्वतःची युनिकॉर्न अशा नवीन
ओळखीचं चिंतन करत होता -
2:17 - 2:18आणि दुसरी गोष्ट जिंकली.
-
2:18 - 2:20रडण्याऐवजी किंवा खेळ थांबवण्याऐवजी,
-
2:20 - 2:21आईवडिलांना उठवण्याऐवजी,
-
2:21 - 2:23ज्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले असते
-
2:23 - 2:25तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं
-
2:25 - 2:27आणि ती पलंगावर पुन्हा चढून बसली
-
2:27 - 2:29मारक्या बैलाच्या तोऱ्यात
-
2:29 - 2:32(हशा)
-
2:32 - 2:33एक मोडलेला पाय घेऊन
-
2:33 - 2:35आम्ही जे धडपडलो
-
2:35 - 2:37वयवर्षं पाच आणि सात या कोवळ्या वयात --
-
2:37 - 2:38त्याची आम्हाला कल्पना नव्हती --
-
2:38 - 2:42कि ती गोष्ट एका शास्त्रीय
उत्क्रांतीची प्रणेती ठरेल -
2:42 - 2:45जी आपल्या मानवी मेंदूकडे बघण्याच्या
दृष्टिकोनाबाबत दोन दशकांनंतर घडेल -
2:45 - 2:48आम्ही धडपडलेल्या गोष्टीला सकारात्मक
मानसशास्त्र म्हणतात -
2:48 - 2:50त्यामुळेच मी आज इथे आहे
-
2:50 - 2:52आणि रोज सकाळी मला जाग
येण्याचं ते कारण आहे. -
2:52 - 2:54जेव्हा या संशोधनाबद्दल मी बोलू लागलो
-
2:54 - 2:56शैक्षणिक संस्थांबाहेर, कंपन्या
आणि शाळांसोबत -
2:56 - 2:59पहिली कधीच न करण्याची गोष्ट त्यांनी
सांगितली ती आलेखाने सुरुवात -
2:59 - 3:02पहिली गोष्ट जी मला करायची असते
ती आलेखाने सुरुवात -
3:02 - 3:03हा आलेख कंटाळवाणा दिसतो,
-
3:03 - 3:06पण मी उत्साहित होऊन रोज सकाळी
उठण्याला तोच कारणीभूत आहे -
3:06 - 3:09आणि हा आलेख खरंतर अर्थशून्य आहे;
ती खोटी माहिती आहे -
3:09 - 3:10आम्हाला हे आढळलं --
-
3:10 - 3:13(हशा)
-
3:13 - 3:16जर तुम्ही हि माहिती अभ्यासू लागलात
तर मी उत्तेजीत होईन -
3:16 - 3:18कारण त्याचा एक कल आहे,
-
3:18 - 3:20आणि त्याचाच अर्थ मी तो प्रकाशीत करू शकतो
-
3:20 - 3:22त्यालाच तर खरा अर्थ आहे.
-
3:22 - 3:24वक्ररेषेच्या वर एक विचित्र
लाल ठिपका आहे -
3:24 - 3:27सभागृहात एक विचित्र व्यक्ती आहे --
-
3:27 - 3:30मला माहितीये तु कोण आहेस,
मी आधी तुला पाहिलं आहे -- -
3:30 - 3:31तो प्रश्न नाही.
-
3:31 - 3:35तुमच्यातील बऱ्याचजणांना माहितीये तो प्रश्न
नाही कारण मी तो ठिपका पुसून टाकू शकतो -
3:35 - 3:38मी तो ठिपका पुसून टाकू शकतो कारण
ती मोजमापातील चूक आहे -
3:38 - 3:41आणि आपण जाणतो ती मोजमापातील चूक
आहे कारण माझी माहिती त्यामुळे चुकतीये -
3:42 - 3:43(हशा)
-
3:43 - 3:45म्हणून सर्वप्रथम आम्ही लोकांना हे शिकवतो
-
3:45 - 3:48अर्थशास्त्रात, संख्याशास्त्रात, व्यवसायात
आणि मानसशास्त्रात -
3:48 - 3:51कसं संख्याशास्त्रीय योग्य मार्गाने
विचित्र गोष्टी बाजूला सारायच्या. -
3:51 - 3:54अयोग्य गोष्टी आपण कशा दूर करू
शकतो ज्यामुळे सुयोग्य त्या मिळतील -
3:54 - 3:56हे खूप छान आहे जर मी
शोधायचा प्रयत्न करत असेन -
3:56 - 3:59सरासरी एका व्यक्तीने Advil
किती गोळ्या घ्याव्यात -- दोन -
3:59 - 4:02पण मला जर तुमची क्षमता जाणून घ्यायची असेल
-
4:02 - 4:05किंवा आनंदासाठी, उत्पादनक्षमतेसाठी
वा ऊर्जेसाठी वा सर्जनशीलतेसाठी -
4:05 - 4:08आपण शास्त्राच्या मदतीने सरासरीची
पद्धत तयार करतो आहोत -
4:08 - 4:09मी जर असा प्रश्न विचारला
-
4:09 - 4:12"वर्गात वाचायचं कसं हे एखादं मूल
किती लवकर शिकू शकतं?" -
4:12 - 4:13शास्त्रज्ञ उत्तर असं बदलतात
-
4:13 - 4:17"वर्गात वाचायचं कसं हे साधारण मूल
किती लवकर शिकू शकतं?" -
4:17 - 4:19मग आपण पूर्ण वर्गाला सर्वसामान्यत्वाकडे
झुकवतो -
4:19 - 4:20जर तुम्ही सरासरीपेक्षा कमी असाल
-
4:20 - 4:22तर मानसशास्त्रज्ञ उत्तेजीत होतात
-
4:22 - 4:25कारण त्याचा अर्थ तुम्ही निराश आहात
किंवा आजारी आहात -
4:25 - 4:26किंवा बहुदा दोन्हीही
-
4:26 - 4:28आम्ही दोन्हीची आशा करतो कारण
आमचा व्यवसाय असा आहे -
4:28 - 4:31जर उपचार सत्रात तुम्ही एक समस्या
घेऊन आलात तर जाताना -
4:31 - 4:33दहा समस्यांची जाणीव
झाल्याची खात्री आम्ही करतो -
4:34 - 4:35जेणेकरून तुम्ही
येत राहता -
4:35 - 4:37गरज पडल्यास आम्ही तुमच्या बालपणात डोकावू
-
4:37 - 4:39पण अखेरीस आम्हाला तुम्हाला बरं करायचंय
-
4:39 - 4:41पण बरं म्हणजे सर्वसाधारण असणं.
-
4:41 - 4:44आणि सकारात्मक मानसशास्त्र मानतं कि
आपण सामान्याचा अभ्यास केला -
4:44 - 4:46तर आपण सामान्यच राहू.
-
4:46 - 4:49मग सकारात्मक अयोग्य गोष्टींना
वगळायच्या ऐवजी -
4:49 - 4:52मी मुद्दाम अशासारख्या समूहात येतो
-
4:52 - 4:53आणि विचारतो, का?
-
4:53 - 4:55तुमच्यातील काही जण वरचढ का आहात
-
4:55 - 4:57बुद्धीने, शारीरिक क्षमतेने, संगीतक्षेत्रात
-
4:57 - 4:59सर्जनशीलतेत, ऊर्जास्तरात
-
4:59 - 5:01आव्हानांना सामोरं जाण्यात, विनोद्बुद्धीत?
-
5:01 - 5:05ते काहीही असो, तुम्हाला वगळण्याऐवजी,
मला तुम्हाला समजून घ्यायचंय -
5:05 - 5:07कारण कदाचित आम्ही माहिती गोळा करू शकतो
-
5:07 - 5:09केवळ लोकांना सरासरीपाशी कसं
आणायचं याचीच नव्हे -
5:09 - 5:12तर जगभरातील कंपन्या आणि शाळांतील
सरासरीची पातळीच कशी उंचावता येईल याचीही -
5:12 - 5:14हा आलेख माझ्यासाठी महत्वाचा
असण्याचं कारण -
5:14 - 5:17म्हणजे बातम्यांमध्ये बरीचशी
माहिती सकारात्मक नसते -
5:17 - 5:18ती नकारात्मक असते
-
5:18 - 5:22बहुतांशी ती खून, भ्रष्टाचार, रोगराई,
नैसर्गिक आपत्तीबद्दल असते. -
5:22 - 5:24आणि तत्परतेने माझा मेंदू विचार
करायला लागतो -
5:24 - 5:27जगातल्या नकारात्मकतेचं साकारात्मकतेशी
असलेलं योग्य गुणोत्तर आहे -
5:27 - 5:29यामुळे "वैद्यकीय महाविद्यालयाचा आजार" होतो
-
5:29 - 5:32वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात
-
5:32 - 5:35जशी तुम्ही लक्षणं आणि आजारांची यादी वाचता
-
5:35 - 5:37अचानक तुम्हाला जाणवतं कि
तुम्हाला ते सगळं आहे. -
5:37 - 5:38(हशा)
-
5:38 - 5:41माझा बोबो नावाचा मेहुणा आहे,
जी एक वेगळीच कथा आहे -
5:41 - 5:43बोबोने युनिकॉर्न एमीशी
लग्न केलं. -
5:43 - 5:45बोबोने मला फोन केला --
-
5:45 - 5:47(हशा)
-
5:47 - 5:49येल वैद्यकीय महाविद्यालयातून,
-
5:49 - 5:51आणि बोबो म्हणाला "शॉन, मला कुष्ठरोग झालाय"
-
5:51 - 5:53(हशा)
-
5:53 - 5:56जे येलमध्येसुद्धा खूपच विरळ आहे
-
5:56 - 5:58मला कळत नव्हतं बिचाऱ्या
बोबोचं सांत्वन कसं करावं -
5:58 - 6:01कारण तो नुकताच आठवडाभराच्या
रजोनिवृत्तीतून उठला होता -
6:01 - 6:02(हशा)
-
6:02 - 6:05आम्हाला असं जाणवतंय कि वास्तविकता
आपल्याला घडवते हे जरुरी नाही -
6:05 - 6:09पण ज्या भिंगातून तुमचा मेंदू जगाकडे
पाहतो त्यातून वास्तविकता घडते -
6:09 - 6:12आणि जर आम्हाला भिंग बदलता आलं, आम्ही
केवळ आपले सुखच बदलू शकत नाही -
6:12 - 6:16तर त्याचवेळी प्रत्येक शैक्षणिक आणि
व्यावसायिक उपलब्धी बदलू शकतो -
6:16 - 6:17मी धाडसाने हार्वर्डचा अर्ज भरला
-
6:17 - 6:20मला प्रवेशाची खात्री नव्हती आणि
कुटुंबाकडे कॉलेजसाठी पैसे नव्हते -
6:20 - 6:24दोन आठवडयांनी जेव्हा मिलिटरी शिष्यवृत्ती
मिळाली त्यांनी मला जाऊ दिलं -
6:24 - 6:26ज्या गोष्टीची तिळमात्र
शक्यता नव्हती ती वस्तुस्थिती झाली -
6:26 - 6:29मला वाटलं तिथे असलेल्या
प्रत्येकाला ते अहोभाग्य -
6:30 - 6:31वाटत असेल,
ते तिथे उत्तेजीत असतील -
6:31 - 6:34तुमच्यापेक्षा हुशार असलेल्या
लोकांच्या वर्गातसुद्धा -
6:34 - 6:36मला वाटलं तुम्ही खुश असाल
केवळ त्या वर्गात असल्याने -
6:36 - 6:39मला असं आढळलं, जरी काही
लोकांचा तो अनुभव असला, -
6:39 - 6:41चार वर्षांनी मी जेव्हा पदवीधारक झालो
-
6:41 - 6:44आणि पुढची आठ वर्ष विद्यार्थ्यांसोबत
वसतीगृहात राहिलो -- हार्वर्डच्या -
6:44 - 6:46सांगण्यावरून; तरी
मी त्यांपैकी नव्हतो -
6:46 - 6:48(हशा)
-
6:48 - 6:51विद्यार्थ्यांच्या क्लिष्ट चार वर्षांत
समुपदेशन करणारा मी अधिकारी होतो -
6:51 - 6:53आणि माझ्या संशोधन आणि शिकवण्यात,
-
6:53 - 6:56असं आढळलं कि हे विद्यार्थी
कितीही आनंदी असले -
6:56 - 6:59विद्यालयात मिळालेल्या प्रवेशाच्या
त्यांच्या मूळ यशाने -
6:59 - 7:02दोन आठवडयांनी त्यांचे मेंदू त्या
अहोभाग्यचा विचार करत नव्हते -
7:02 - 7:04तत्त्वज्ञान किंवा भौतिकशास्त्राचा
-
7:04 - 7:06नव्हते तर स्पर्धा आणि कामाचा व्याप
-
7:06 - 7:08अडथळे, ताण, तक्रारी यांचा करत होते.
-
7:08 - 7:11मी प्रथम जेव्हा तिथे गेलो मी
नवोदितांच्या भोजनगृहात गेलो -
7:11 - 7:14जिथे माझे वॅको, टेक्सासचे, जिथे
मी मोठा झालो, मित्र -- मला माहितीये -
7:14 - 7:16तुमच्यापैकी
काहींना हे माहीत आहे -
7:16 - 7:18जेव्हा ते येत, तेव्हा सगळीकडे पाहात असत
-
7:18 - 7:21आणि म्हणत "हे भोजनगृह हॉग्वार्टमधे
असल्यासारखं आहे" -
7:21 - 7:23ते होतं कारण ते हॉग्वार्ट होतं आणि
हार्वर्ड असंच आहे -
7:24 - 7:25आणि ते जेव्हा हे पाहायचे
-
7:25 - 7:28ते म्हणायचे "तुम्ही सुखाच्या अभ्यासासाठी
हार्वर्डमध्ये वेळ का दवडता? -
7:28 - 7:31हार्वर्डचा विद्यार्थी कशाबद्दल
नाराज असू शकतो?" -
7:31 - 7:33या प्रश्नातच दडलेली आहे ती
-
7:33 - 7:35सुखाचे शास्त्र समजून घेण्याची किल्ली.
-
7:35 - 7:37कारण तो प्रश्न असं गृहीत धरतो कि
-
7:37 - 7:40आपलं बाह्यविश्व आपल्या सुखाच्या
पातळीचं सूचक असतं -
7:40 - 7:43वास्तविकता, जर मला तुमच्या बाह्यविश्वाची
पूर्ण माहिती असेल -
7:43 - 7:46मी तुमच्या दूरदर्शी सुखाचा
१०% च अंदाज बांधू शकतो -
7:46 - 7:49तुमच्या दूरदर्शी सुखाचा ९०% अंदाज हा
बाह्यविश्वावरुन लावता येत नाही -
7:49 - 7:52तर तुमचा मेंदू जगाचा कसा विचार
करतो यावरून. -
7:52 - 7:53आणि जर आपण तो बदलला,
-
7:53 - 7:55जर आपण आपल्या सुखाचं आणि यशाचं सूत्र बदललं
-
7:55 - 7:58आपण मार्ग असा बदलू शकतो कि
ज्याने वस्तुस्थितीवर परिणाम होईल -
7:58 - 8:02आम्हाला असं आढळलं बुद्ध्यांकाने केवळ २५%
लोकांच्या नोकरीतील यशाचं भाकित करता येतं. -
8:02 - 8:04नोकरीतील ७५% यशाचं
-
8:04 - 8:07भाकित हे तुमचा आशावाद, समाजाचा आधार
आणि तणावाकडे -
8:07 - 8:10धोका म्हणून न पाहता आव्हान
म्हणून पाहायची तुमची क्षमता यावर ठरतं -
8:10 - 8:14मी न्यू इंग्लंडमधील एका बोर्डिंग शाळेशी
बोललो, बहुदा सर्वांत प्रतिष्ठित अशी -
8:14 - 8:16आणि ते म्हणाले "आम्हाला ते ठाऊक आहे.
-
8:16 - 8:19म्हणून दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांसाठी
नुसतंच न शिकवता आरोग्य सप्ताह असतो. -
8:20 - 8:23आणि आम्ही खूप उत्साहित आहोत.
सोमवारी रात्री जागतिक किर्तीचा तज्ज्ञ -
8:23 - 8:25किशोरवयीन नैराश्याबद्दल बोलेल.
-
8:25 - 8:27मंगळवारी रात्री शाळेतील
हिंसा आणि छळवणूकीबद्दल. -
8:27 - 8:29बुधवारी रात्री खाण्याच्या सवयींबद्दल
-
8:29 - 8:30गुरुवारी ड्रग्सचा बेकायदेशीर वापर.
-
8:30 - 8:34शुक्रवारसाठी आम्ही असुरक्षित संभोग
व सुख यांपैकी ठरवण्याचा प्रयत्न करतोय. -
8:34 - 8:35(हशा)
-
8:35 - 8:38मी म्हणलं "तसं बहुतांशी
लोकांच्या शुक्रवार रात्रीबद्दल असतं." -
8:38 - 8:40(हशा)
-
8:40 - 8:43(टाळ्या)
-
8:43 - 8:46मला आनंद आहे तुम्हाला हे आवडलं
पण त्यांना ते मुळीच आवडलं नाही -
8:46 - 8:47फोनवर शांतता.
-
8:47 - 8:50आणि त्यातच मी म्हणलं "मला तुमच्या
शाळेत बोलायला आवडेल, -
8:50 - 8:53पण तो आरोग्य सप्ताह नव्हे,
तो अनारोग्य सप्ताह आहे. -
8:53 - 8:56तुम्ही घडू शकणाऱ्या सर्व नकारात्मक
गोष्टींचं वर्णन केलंत -
8:56 - 8:57सकारात्मक गोष्टीबद्दल बोलला नाहीत."
-
8:57 - 8:59आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे.
-
8:59 - 9:01आम्ही आरोग्याकडे असं पाहतो:
-
9:01 - 9:03सुख आणि यशाचं सूत्र आपल्याला
उलटं करायला हवं. -
9:03 - 9:06गेल्या तीन वर्षांत मी ४५ देश फिरलो आहे,
-
9:06 - 9:10आर्थिक घसरणीच्या मध्यात शाळा आणि
कंपन्यांसोबत काम करतोय -
9:10 - 9:12आणि मला असं दिसलं
बऱ्याचशा कंपन्या आणि शाळा -
9:12 - 9:14यशाच्या एका सूत्राचं अनुकरण
करतात जे हे आहे -
9:14 - 9:16जर मी अधिक काम केलं तर मी अधिक
यशस्वी होईन. -
9:16 - 9:18आणि जर मी अधिक यशस्वी असेन तर मी
अधिक आनंदी असेन. -
9:18 - 9:21यामुळे आपल्या बऱ्याचशा पालकत्वाच्या
आणि व्यवस्थापकीय पद्धती -
9:21 - 9:23वर्तन प्रोत्साहनाचा मार्ग घट्ट रोवलेत.
-
9:23 - 9:27आणि समस्या हि आहे कि ते शास्त्रानुसार दोन
कारणांनी भंगलेलं आणि प्रतिगामी आहे -
9:27 - 9:28जेव्हा तुमच् मेंदूला यश मिळतं
-
9:28 - 9:31तुम्ही यशाच्या रूपाचा ध्येयस्तंभ बदलता.
तुम्हाला चांगले -
9:31 - 9:34मार्क्स मिळाले आता
अधिक चांगले मार्क्स मिळायला हवेत, -
9:34 - 9:37तुम्ही चांगल्या शाळेत गेलात, मग अजून
चांगल्या शाळेत जायला हवं -
9:37 - 9:39चांगली नोकरी मिळाली,
अजून चांगली नोकरी मिळायला हवी -
9:39 - 9:42तुम्ही विक्रीचं ध्येय पूर्ण केलं,
आम्ही मग ते बदलणार -
9:42 - 9:46आणि आनंद जर यशाच्या विरुद्ध दिशेला असेल
तर तुमचा मेंदू तिथे कधीच पोचत नाही. -
9:46 - 9:49एक समाज म्हणून आपण सुखाला
अनाकलनीय करून टाकलं आहे. -
9:49 - 9:52आणि याचं कारण आपल्याला वाटतं
आपण यशस्वी व्हायलाच हवं -
9:52 - 9:53तरच आपण आनंदी होऊ.
-
9:53 - 9:55पण आपले मेंदू उलट विचार करतात.
-
9:55 - 9:58वर्तमानात जर तुम्ही कुणाच्या
सकारात्मकतेची पातळी उंचावू शकलात -
9:58 - 10:01तर त्यांचा मेंदू आपण ज्याला सुखप्राप्ती
म्हणतो ते अनुभवतो -
10:01 - 10:04म्हणजेच तुमचा सकारात्मक मेंदू
अधिक चांगलं काम करतो नकारात्मक -
10:04 - 10:06तटस्थ किंवा तणावाखाली असल्यापेक्षा.
-
10:06 - 10:09तुमची बुद्धिमत्ता वाढते, सर्जनशीलता
वाढते, ऊर्जेची पातळी वाढते. -
10:09 - 10:13वस्तुस्थितीत आम्हाला आढळलं
व्यवसायातील प्रत्येक निष्पत्ती सुधारते -
10:13 - 10:15तुमचा सकारात्मक मेंदू ३१% अधिक
उत्पादक असतो -
10:15 - 10:17नकारात्मक, तटस्थ वा
तणावाखाली असण्याच्या तुलनेत -
10:17 - 10:18तुम्ही विक्रीत ३७% अधिक
-
10:18 - 10:21चांगले असता.
डॉक्टर्स १९% अधिक वेगाने -
10:21 - 10:23व अचूकतेने योग्य निदान करतात जेव्हा तटस्थ,
-
10:23 - 10:25नकारात्मक, किंवा तणावाखाली
असण्याऐवजी सकारात्मक असतात -
10:25 - 10:27याचाच अर्थ आपण सूत्र उलटं करू शकतो.
-
10:27 - 10:30वर्तमानात सकारात्मक राहण्याचा
जर आपण मार्ग शोधला, -
10:30 - 10:32तर आपले मेंदू अधिक यशस्वीरित्या काम करतात
-
10:32 - 10:35कारण आपण अधिक वेगाने,
बुद्धीने काम करू शकतो. -
10:35 - 10:37हे सूत्र उलटं करायला जमणं गरजेचं आहे
-
10:37 - 10:40जेणेकरून आपल्याला आपल्या मेंदूची
खरी क्षमता कळू शकेल. -
10:40 - 10:43कारण डोपामाईनची, जे तुम्ही
सकारात्मक असताना शरीरात वाहतं, -
10:43 - 10:44दोन कार्य आहेत.
-
10:44 - 10:46ते केवळ तुम्हाला आनंदी करत नाही तर,
-
10:46 - 10:49तुमच्या मेंदूतील सर्व आकलन
केंद्र खुली करतं -
10:49 - 10:52ज्यायोगे तुम्ही जगाशी एका वेगळ्या
मार्गाने जोडले जाता. -
10:52 - 10:54आम्हाला आढळलं तुम्ही तुमच्या मेंदूला
शिकवण्याचे मार्ग -
10:54 - 10:56आहेत अधिक सकारात्मक होण्यासाठी.
-
10:56 - 10:59केवळ दोन मिनीटे सलग २१ दिवस करून आम्ही,
-
10:59 - 11:01तुमच्या मेंदूची प्रणाली बदलू शकतो
-
11:01 - 11:05तुमच्या मेंदूला खरंच आशावादी आणि
यशस्वीरीत्या काम करण्याची अनुमती देऊन -
11:05 - 11:06आम्ही या गोष्टी संशोधनात केल्या आहेत
-
11:06 - 11:08आता मी काम केलेल्या प्रत्येक कंपनीसोबत,
-
11:08 - 11:12ते कृतज्ञ असलेल्या तीन नवीन गोष्टी
त्यांना लिहायला लावून -
11:12 - 11:14सलग २१ दिवस तीन नवीन गोष्टी दररोज.
-
11:14 - 11:15आणि त्याच्या शेवटाला,
-
11:15 - 11:17त्यांचा मेंदू तोच नमुना कायम ठेवतो
-
11:17 - 11:21जगातल्या नकारात्मक नव्हे तर
सकारात्मक गोष्टी शोधण्याचा -
11:21 - 11:24गेल्या २४ तासांत आलेला एक
सकारात्मक अनुभव लिहिण्याने -
11:24 - 11:26तुमचा मेंदू तो पुन्हा जगतो.
-
11:26 - 11:29सराव तुमच्या मेंदूला तुमचं वर्तन
महत्वाचं आहे हि शिकवतो -
11:29 - 11:31आम्हाला आढळलं ध्यानामुळे
तुमच्या मेंदूला -
11:31 - 11:33अनुमती मिळते ADHD आजाराला काबूत
ठेवण्याची जो आपण तयार -
11:33 - 11:35करतो आहोत अनेक कामं एकाचवेळी करून
-
11:35 - 11:38आणि आपल्या मेंदूला हातातल्या
कामावर लक्ष केंद्रित -
11:38 - 11:41करता येतं. शेवटी सहज घडणारी
दयाळूपणाची कृत्य जाणिवेने केलेली असतात. -
11:41 - 11:43लोक जेव्हा त्यांचा Inbox उघडतात
आम्ही सांगतो -
11:43 - 11:44एक सकारात्मक ई-मेल लिहायला
-
11:44 - 11:47त्यांच्या ओळखीतल्या कुणाचं कौतुक
करणारा वा आभार मानणारा -
11:47 - 11:49आणि असं करण्याने
-
11:49 - 11:51जसं आपण शरीराला शिकवतो
त्याप्रमाणे मेंदूला शिकवल्याने -
11:51 - 11:55आम्हाला असं आढळलं कि आपण यशाचं
व आनंदाचं सूत्र उलटं करू शकतो -
11:55 - 11:58आणि ते करताना केवळ साकारात्मकतेचे
तरंग निर्माण करत नाही तर -
11:58 - 11:59एक अमूलाग्र बदल घडवतो.
-
11:59 - 11:59धन्यवाद.
-
11:59 - 12:01(टाळ्या)
- Title:
- चांगल्या कामाचं सुखी गुपीत
- Speaker:
- शॉन एकोर
- Description:
-
आपण असं मानतो कि आनंदी राहण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, पण हे उलटं असू शकतं का? TEDx ब्लूमिंग्टन मधील या वेगवान आणि करमणूकप्रधान व्याख्यानात मानसशास्त्रज्ञ शॉन एकोर म्हणतात कि खरंतर आनंदानेच उत्पादकता प्रेरित होते.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 12:00
Abhinav Garule approved Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for The happy secret to better work | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for The happy secret to better work |