कसा आंघोळ करताना आर्किमिडीजचा सिद्धांत समोर आला - मार्क सलत
-
0:14 - 0:16कधी कधी शिकण्याची उत्तम संधी
-
0:16 - 0:18ते क्षण असतात जेव्हा आपण गोंधळात असतो.
-
0:18 - 0:21असे क्षण जेव्हा आपण विचार करायला
सुरुवात करतो आणि आपल्या प्रश्न पडतात -
0:21 - 0:23इतिहासात असे क्षण बऱ्याच वेळा आलेले आहे
-
0:23 - 0:25आणि त्यातनं काही विस्मयकारक शोध लागलेत.
-
0:25 - 0:27हीच गोष्ट बघा ना
-
0:27 - 0:29एकदा आर्किमिडीज नावाचा एक व्यक्ती होता.
-
0:29 - 0:32त्याचा जन्म २८७ इ. स. पू. मध्ये
सेरेकिस इथे झाला होता -
0:32 - 0:35तो ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता
-
0:35 - 0:37संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होता.
-
0:37 - 0:40एके दिवशी आर्किमिडीज ला सिसिलीच्या
राजा ने एक काम दिले -
0:40 - 0:43सोनाराने राजा ला फसवले आहे का
ह्याचा शोध लावण्याचे -
0:43 - 0:46राजा ने सांगितले की त्याने सोनारला
नेमके तितकेच सोने दिले होते -
0:46 - 0:48जितके मुकुट बनवण्यासाठी गरजेचे होते.
-
0:48 - 0:52पण, जेव्हा मुकुट तयार झाला तेव्हा राजाला
असे वाटले की सोनाराने आपल्याला फसवून -
0:52 - 0:54मुकुटात थोडे चांदी वापरले आहे
-
0:54 - 0:56आणि तितकेच सोने स्वतः कडे ठेवले आहे .
-
0:56 - 0:59राजाने आर्किमिडीजला ही
समस्या सोडवायला सांगीतले. -
0:59 - 1:04पण राजाची एक अट होती :
त्याने मुकुटाचे काहीच नुकसान करायचे नाही. -
1:04 - 1:06ऐके दिवशी आंघोळ करताना
-
1:06 - 1:09आर्किमिडीजच्या लक्षात आले की
आंघोळीच्या टबमधील पाण्याचीपातळी वाढते -
1:09 - 1:12आणि नंतर पाणी ओतू जातं
जसजसा तो पाण्यात बुडतो -
1:12 - 1:15अचानक त्याचं लक्षात आले की
पाण्याची पातळी किती वाढेल हे -
1:15 - 1:18त्याचं शरीराचा किती भाग पाण्याखाली आहे
ह्या वर अवलंबून होत. -
1:18 - 1:21हा शोध लागल्या वर त्याला इतका आनंद झाला की
तो लगेच टब बाहेर पडला -
1:21 - 1:24आणि "युरेका" म्हणत गल्लीत तसाच पळत सुटला!
-
1:24 - 1:27प्राचीन ग्रीक भाषेत युरेकाचा
अर्थ आहे "मला सापडले". -
1:27 - 1:29त्याला काय सापडले होते?
-
1:29 - 1:32खरेतर त्याला राजाची समस्या
सोडवायचे मार्ग सापडले होते -
1:32 - 1:34हे बघा, आर्किमिडीजला बघायचं होत की
मुकुटाची घनता -
1:34 - 1:37ही शुद्ध सोन्याचे घनते इतकीच होती कि नाही.
-
1:37 - 1:40घनता मोजण्यासाठी एका वस्तूच्या वजनाला
त्याच्या घनफळ ह्याने भागाकार करावे लागते -
1:40 - 1:43शुद्ध सोन्याची घनता ही
चांदीच्या घनते पेक्षा जास्त असते. -
1:43 - 1:48म्हणजेच जर का मुकुटात चांदी असेल तर
त्याची घनता शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल. -
1:48 - 1:51मुकुट काश्यानेही बनवलेले असले
तरीही त्याचा आकार तोच राहील -
1:51 - 1:53म्हणजेच त्याचे घनफळ तेच राहील.
-
1:53 - 1:55म्हणून जर का आर्किमिडीजला
पहिले मुकुटाचे पहिले मोजता आले -
1:55 - 1:57आणि नंतर त्याचे घनफळ मोजता आले
-
1:57 - 1:59तर त्याला मुकुटाची घनता काढता येईल.
-
1:59 - 2:02पण मुकुटाचे घनफळ काढणे सोपे नव्हते
कारण त्याचे आकार अनियमित होते -
2:02 - 2:05जे एका साध्या डब्ब्यापेक्षा
किंवा चेंडूपेक्षा वेगळे होते -
2:05 - 2:08म्हणून आकार मोजण्यासाठी त्याची लांबीरुंदी
मोजून त्यांचा गुणाकार करून चालणार नव्हते -
2:08 - 2:11मग आर्किमिडीजच्या लक्षात आले की
ह्याचे उत्तर होते -
2:11 - 2:13मुकुटाला आंघोळ घालणे.
-
2:13 - 2:16मुकुटाला पाण्यात बुडवून पाण्याची किती
पातळी वाढते हे बघितलं -
2:16 - 2:18की मुकुटाचे घनफळ मोजता येईल,
-
2:18 - 2:21आणि त्यावरून तो मुकुटाची घनता काढू शकेल.
-
2:21 - 2:23जर मुकुटाची घनता हि
शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल तर -
2:23 - 2:26सोनार ने नक्कीच राजाला फसवले!
-
2:26 - 2:29जेव्हा आर्किमिडीज राजा कडे परत गेला
आणि त्याने ही चाचणी करून बघितली -
2:29 - 2:33तेव्हा गोष्टीनुसार सोनाराने
खरच राजाला फसवले होते, -
2:33 - 2:36आणि थोडे चांदी घातले होते. म्हणूनच आजकाल
-
2:36 - 2:39पाण्याची किती पातळी वाढते त्यानुसार
त्याचे घनफळ मोजण्याच्या पद्धतीला -
2:39 - 2:43आर्किमिडीजचा सिद्धांत असे म्हणतात.
पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा आंघोळ करताना -
2:43 - 2:45आर्किमिडीजचा सिद्धांत खरोखर बघणार,
-
2:45 - 2:49तेव्हा कदाचित तुम्हालाही
काहीतरी नवीन युक्ती सुचेल.
- Title:
- कसा आंघोळ करताना आर्किमिडीजचा सिद्धांत समोर आला - मार्क सलत
- Description:
-
पूर्ण धडा इथे बघा: http://ed.ted.com/lessons/mark-salata-how-taking-a-bath-led-to-archimedes-principle
शोध आणि नवीन माहिती च्या गोष्टींची सुरुवात बऱ्याच वेळा एका समस्येचे समाधान शोधताना होते. राजाने सोनाराचा खोटेपणा शोधायला सांगितल्या वर, प्राचीन ग्रीक गणितज्ञ आर्किमिडीजला सिद्धांत सापडला ज्याने तो प्रसिद्ध झाला.
पाठ - अएम्डोन क्न्सल्टिन्ग चे मार्क सलत, अनिमेशन - टेड-एड
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 03:01
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata |