< Return to Video

नृत्य पार्टी - गुणधर्म

  • 0:02 - 0:07
    अवर ऑफ कोड | नृत्य पार्टी: गुणधर्म
  • 0:09 - 0:10
    माझं नाव मारिया आहे.
  • 0:10 - 0:13
    मी वॉशिंग्टन विद्यापीठात तिसऱ्या वर्षाला आहे.
  • 0:13 - 0:15
    आणि मी अमेझॉनची फ्युचर इंजिनिअर आहे.
  • 0:17 - 0:19
    मला कॉम्प्युटर सायन्स खूप आवडतं कारण
  • 0:19 - 0:22
    ते समस्यांचं निराकरण करतं आणि
    मूलभूत विचारांना चालना देतं.
  • 0:22 - 0:25
    आणि कित्येक तासांच्या मेहनतीनंतर
  • 0:25 - 0:29
    त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं आणि
    समाधानकारक केल्याची जाणीव होते.
  • 0:33 - 0:37
    आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या
    नर्तकांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे.
  • 0:37 - 0:41
    आणि तुम्ही त्यांना विविध प्रकारचे नृत्याविष्कार करण्यासाठी 'प्रोग्रॅम' केलं आहे.
  • 0:41 - 0:45
    पण हे नृत्याविष्कार प्रत्यक्षात कसं काम
    करत असतील?
  • 0:45 - 0:49
    प्रत्येक नृत्याविष्कार, अनेक फोटोंच्या मालिकांचा
    बनलेला असतो. त्यांना 'फ्रेम्स' असे म्हणतात.
  • 0:49 - 0:53
    प्रत्येक फ्रेम तिच्या आधीच्या फ्रेमपेक्षा
    थोडीशी वेगळी असते.
  • 0:53 - 0:57
    तुमचा प्रोग्रॅम रन झाला की संगणक एकामागून एक
    फ्रेम दाखवत जातो.
  • 0:57 - 1:00
    त्या इतक्या वेगाने दाखवल्या जातात की त्यामुळं
    नर्तक हलत आहे असं वाटतं.
  • 1:00 - 1:04
    प्रत्येक अॅनिमेशनमागे हेच रहस्य असते.
  • 1:04 - 1:06
    तुम्ही केवळ तुमच्या नर्तकांचे नृत्याविष्कारच नव्हे
    तर
  • 1:06 - 1:09
    तुम्ही तुमच्या नर्तकांचे गुणधर्मसुद्धा बदलू शकता.
  • 1:09 - 1:14
    विविध गुणधर्म म्हणजे नर्तकांची पडद्यावरील
    स्थिती,
  • 1:14 - 1:16
    नर्तकाचा आकार,
  • 1:16 - 1:18
    आणि नर्तकाचा रंग वगैरे.
  • 1:20 - 1:25
    नर्तकाचे गुणधर्म बदलण्यासाठी तुम्ही "सेट"
    ब्लॉकचा वापर करा.
  • 1:25 - 1:29
    चला तर मग, "सेट" ब्लॉक वापरून आपल्या
    नर्तकांचा आकार कमी करूया.
  • 1:29 - 1:32
    सर्वांत आधी, तुमच्या प्रोग्रॅममध्ये सेट ब्लॉक
    ओढून आणा.
  • 1:32 - 1:36
    मग, ज्या नर्तकाला तुम्हाला बदलायचे आहे
    त्याची निवड करा.
  • 1:36 - 1:39
    आणि येथे आकार टाईप करा, तो तुम्हाला पडद्यावर दिसून येईल.
  • 1:51 - 1:53
    संपूर्ण आकार 100 आहे.
  • 1:53 - 1:58
    जर तुम्ही एक छोटी संख्या निवडलीत तर
    नर्तक अधिक छोटा दिसेल.
  • 1:58 - 2:01
    नर्तक जितका छोटा असेल, तितका दूर दिसेल.
  • 2:01 - 2:04
    बॅकअप नर्तक बनवायचा हा एक चांगला मार्ग आहे.
  • 2:10 - 2:16
    सेट ब्लॉक वापरून, तुम्ही नर्तकाच्या मितीसुद्धा
    बदलू शकता.
  • 2:16 - 2:17
    उदा. गोल फिरणे,
  • 2:18 - 2:19
    स्थान,
  • 2:20 - 2:22
    आणि रंग.
  • 2:22 - 2:24
    या गुणधर्मांमध्ये थोडेसे बदल केल्याने,
  • 2:24 - 2:28
    तुम्ही सर्व प्रकारचे बदल करण्यासाठी सक्षम व्हाल आणि त्यांना गाण्याच्या विविध भागांशी जोडू शकाल.
  • 2:29 - 2:35
    लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आधीपासूनच अस्तित्वात
    असलेल्या नर्तकाचेच गुणधर्म निश्चित करू शकता.
  • 2:35 - 2:39
    तुमचा सेट ब्लॉक हा "Make a new dancer" ब्लॉकच्या नंतर येत असल्याचे सुनिश्चित करा.
  • 2:39 - 2:41
    प्रयोग करण्यास अजिबात संकोच करू नका, सर्जनशील व्हा.
  • 2:41 - 2:42
    आणि मजा करा.
Title:
नृत्य पार्टी - गुणधर्म
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
02:52

Marathi subtitles

Revisions