1 00:00:01,520 --> 00:00:07,300 अवर ऑफ कोड | नृत्य पार्टी: गुणधर्म 2 00:00:08,700 --> 00:00:10,300 माझं नाव मारिया आहे. 3 00:00:10,300 --> 00:00:12,760 मी वॉशिंग्टन विद्यापीठात तिसऱ्या वर्षाला आहे. 4 00:00:12,760 --> 00:00:15,020 आणि मी अमेझॉनची फ्युचर इंजिनिअर आहे. 5 00:00:16,760 --> 00:00:18,580 मला कॉम्प्युटर सायन्स खूप आवडतं कारण 6 00:00:18,580 --> 00:00:21,820 ते समस्यांचं निराकरण करतं आणि मूलभूत विचारांना चालना देतं. 7 00:00:21,920 --> 00:00:24,580 आणि कित्येक तासांच्या मेहनतीनंतर 8 00:00:24,580 --> 00:00:28,540 त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं आणि समाधानकारक केल्याची जाणीव होते. 9 00:00:32,800 --> 00:00:37,220 आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नर्तकांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. 10 00:00:37,220 --> 00:00:41,440 आणि तुम्ही त्यांना विविध प्रकारचे नृत्याविष्कार करण्यासाठी 'प्रोग्रॅम' केलं आहे. 11 00:00:41,440 --> 00:00:44,620 पण हे नृत्याविष्कार प्रत्यक्षात कसं काम करत असतील? 12 00:00:44,620 --> 00:00:49,010 प्रत्येक नृत्याविष्कार, अनेक फोटोंच्या मालिकांचा बनलेला असतो. त्यांना 'फ्रेम्स' असे म्हणतात. 13 00:00:49,010 --> 00:00:52,660 प्रत्येक फ्रेम तिच्या आधीच्या फ्रेमपेक्षा थोडीशी वेगळी असते. 14 00:00:52,660 --> 00:00:56,530 तुमचा प्रोग्रॅम रन झाला की संगणक एकामागून एक फ्रेम दाखवत जातो. 15 00:00:56,530 --> 00:01:00,270 त्या इतक्या वेगाने दाखवल्या जातात की त्यामुळं नर्तक हलत आहे असं वाटतं. 16 00:01:00,270 --> 00:01:03,870 प्रत्येक अॅनिमेशनमागे हेच रहस्य असते. 17 00:01:03,870 --> 00:01:06,280 तुम्ही केवळ तुमच्या नर्तकांचे नृत्याविष्कारच नव्हे तर 18 00:01:06,280 --> 00:01:09,340 तुम्ही तुमच्या नर्तकांचे गुणधर्मसुद्धा बदलू शकता. 19 00:01:09,340 --> 00:01:13,780 विविध गुणधर्म म्हणजे नर्तकांची पडद्यावरील स्थिती, 20 00:01:13,780 --> 00:01:15,960 नर्तकाचा आकार, 21 00:01:15,960 --> 00:01:18,300 आणि नर्तकाचा रंग वगैरे. 22 00:01:20,420 --> 00:01:24,700 नर्तकाचे गुणधर्म बदलण्यासाठी तुम्ही "सेट" ब्लॉकचा वापर करा. 23 00:01:24,700 --> 00:01:29,040 चला तर मग, "सेट" ब्लॉक वापरून आपल्या नर्तकांचा आकार कमी करूया. 24 00:01:29,040 --> 00:01:32,220 सर्वांत आधी, तुमच्या प्रोग्रॅममध्ये सेट ब्लॉक ओढून आणा. 25 00:01:32,220 --> 00:01:35,860 मग, ज्या नर्तकाला तुम्हाला बदलायचे आहे त्याची निवड करा. 26 00:01:35,860 --> 00:01:39,300 आणि येथे आकार टाईप करा, तो तुम्हाला पडद्यावर दिसून येईल. 27 00:01:50,640 --> 00:01:52,640 संपूर्ण आकार 100 आहे. 28 00:01:52,649 --> 00:01:57,539 जर तुम्ही एक छोटी संख्या निवडलीत तर नर्तक अधिक छोटा दिसेल. 29 00:01:57,540 --> 00:02:00,760 नर्तक जितका छोटा असेल, तितका दूर दिसेल. 30 00:02:00,760 --> 00:02:03,720 बॅकअप नर्तक बनवायचा हा एक चांगला मार्ग आहे. 31 00:02:10,360 --> 00:02:15,680 सेट ब्लॉक वापरून, तुम्ही नर्तकाच्या मितीसुद्धा बदलू शकता. 32 00:02:15,680 --> 00:02:17,080 उदा. गोल फिरणे, 33 00:02:17,820 --> 00:02:18,980 स्थान, 34 00:02:20,240 --> 00:02:21,840 आणि रंग. 35 00:02:22,000 --> 00:02:23,960 या गुणधर्मांमध्ये थोडेसे बदल केल्याने, 36 00:02:23,960 --> 00:02:28,140 तुम्ही सर्व प्रकारचे बदल करण्यासाठी सक्षम व्हाल आणि त्यांना गाण्याच्या विविध भागांशी जोडू शकाल. 37 00:02:28,960 --> 00:02:34,900 लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या नर्तकाचेच गुणधर्म निश्चित करू शकता. 38 00:02:34,900 --> 00:02:39,320 तुमचा सेट ब्लॉक हा "Make a new dancer" ब्लॉकच्या नंतर येत असल्याचे सुनिश्चित करा. 39 00:02:39,330 --> 00:02:41,189 प्रयोग करण्यास अजिबात संकोच करू नका, सर्जनशील व्हा. 40 00:02:41,189 --> 00:02:42,480 आणि मजा करा.