जन्म दाखला बाळगणे मानवी हक्क का आहे?
-
0:01 - 0:03जेव्हा मी १४ वर्षांची होते ,
-
0:03 - 0:08माझे कुटुंब यूथोपियाथून माझ्या
लहान भावांना दत्तक घेणार होते. -
0:08 - 0:10एके दिवशी माझ्या आईने विचारले,
-
0:10 - 0:12यांचा जन्मदिवस आपण कोणता दिवस टाकावा ?
-
0:13 - 0:16मुळातच, त्यांचा जन्म
ज्या दिवशी झाला तो दिवस ? -
0:16 - 0:18विचित्र प्रश्न.
-
0:18 - 0:20आणि मग माझी आई म्हणाली,
-
0:20 - 0:21अगं क्रिस्टिन,
-
0:21 - 0:24तुझ्या एकाही लहान भावाकडे जन्मदाखला नाही,
-
0:24 - 0:26मग तू काय सुचवतेस कि
आपण ते कसे जाणून घ्यावे ? -
0:27 - 0:28अतिशय आश्चर्य वाटले.
-
0:28 - 0:31आणि ,२० वर्षांनंतर,
मी आताही त्यावर काम करत आहे, -
0:31 - 0:33फक्त माझ्या भावांच्या
जन्म दाखल्याचे रहस्य -
0:33 - 0:35सोडवण्याचा प्रयत्न सोडून,
-
0:35 - 0:37मी जागतिकस्तरावर प्रयत्नशील आहे.
-
0:37 - 0:41आंतरराष्ट्रीय विकासामध्ये
जन्म दाखल्याचे काय काम ? -
0:41 - 0:45त्याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला
मूळ विकास उद्दिष्टांकडे बघावे लागेल, -
0:45 - 0:46मानवी हक्क उद्दिष्टांकडे.
-
0:46 - 0:50तर १९४८ साली मानवी हक्कांच्या
आंतरराष्ट्रीय घोषणांमध्ये, -
0:50 - 0:52पहिल्यांदा,
-
0:52 - 0:56प्राथमिक मानवी हक्क आणि प्रतिष्ठा
यांच्या सामायिक दृष्टीचा समावेश केला -
0:56 - 0:59जो सगळ्या राष्ट्रांतील लोकांनां लागू होतो:
-
0:59 - 1:03लेख ६ वा, हक्कांना
न्यायापुढे मान्यता मिळावी -
1:03 - 1:05किंवा कायदेशीर ओळख.
-
1:05 - 1:07मुलांसाठी , हे म्हणजे जन्मदाखला .
-
1:07 - 1:10आणि जागतिक मानवी हक्क असूनसुद्धा,
-
1:10 - 1:15आज एक लक्ष लोकांकडे
ते अस्तित्वात आहेत याचे प्रमाण नाही, -
1:15 - 1:18ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी
मानवी हक्कांची उल्लंघना आहे, -
1:19 - 1:21तरीसुद्धा याविषयी
कोणालाच माहित नसल्याचे जाणवते -
1:22 - 1:25ज्या जगात गरिबी आणि उपासमार
या समस्या आहेत तिथे -
1:25 - 1:27प्रत्येकाची कायदेशीर ओळख आहे
याची खात्री बाळगणे -
1:27 - 1:29तितके महत्वाचे वाटत नाही
-
1:29 - 1:31पण प्रत्यक्षात ते महत्वाचे आहे.
-
1:31 - 1:33कारकिर्दीच्या सुरुवातीला,
-
1:33 - 1:37मी एका सामाजिक कार्यकर्तीसोबत मुंबईच्या
झोपडपट्टी समुदायासाठी काम करत होते, -
1:37 - 1:39आम्ही एका घटनेचा मागोवा
घेत होतो ज्यात एका लहान मुलीला -
1:40 - 1:44जन्मतः पोलिओ ची बाधा झाली होती आणि
जिचा कमरेखालचा भाग सुन्न झाला होता. -
1:44 - 1:46जेव्हा आम्ही त्या घरी पोहोचलो,
-
1:46 - 1:48आम्हाला ती जमिनीवर पडलेली दिसली.
-
1:48 - 1:51तिचे पाय वर्णांनी अतिशय बाधित झाले होते,
-
1:51 - 1:53ती कुपोषित होती.
-
1:53 - 1:55ती कधीही शाळेत गेलेली नव्हती
-
1:55 - 2:00आणि तिचे सगळे आयुष्य एका अंध्याऱ्या,
छोट्या खोलीत व्यतीत केले होते. -
2:01 - 2:05जेव्हा आम्ही निघालो मी कार्यकर्त्यांना
विचारले कि या घटनेची योजना काय. -
2:05 - 2:08तेव्हा त्या म्हणाल्या कि आधी तिला
जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल. -
2:08 - 2:09मी थोडी थक्क झाले.
-
2:09 - 2:13म्हणाले कि,"तुम्हाला असे वाटत नाही कि
आपल्याला तिला थोडे सामाजिक सहकार्य -
2:13 - 2:15घर आणि शाळेचा बंदोबस्त करायला हवा ?
-
2:15 - 2:19त्या उतरल्या कि," तेच तर , त्याचसाठी तिला
जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल". -
2:19 - 2:21बघ , न्यायालयीन ओळख असल्याशिवाय
-
2:21 - 2:23तुमची एक व्यक्ती म्हणून
सरकारमार्फत मान्यता होत नाही -
2:23 - 2:28आणि ज्या व्यक्तीचे अधिकृत अस्तित्व नाही
त्याला सरकारी सेवांचा लाभ घेता येत नाही, -
2:28 - 2:30आणि सरकार फक्त ज्या व्यक्तींची ओळख आहे
-
2:30 - 2:32त्यांनाच सेवांचा पुरवठा करू शकते.
-
2:32 - 2:37त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष होते.
उदा. साधारण लसीकरण सेवा. -
2:38 - 2:43कायदेशीर ओळख नसलेले लोक गणनेत वगळले जातात
आणि असुरक्षित राहतात -
2:43 - 2:45ते समाजाच्या
अत्यंत गरीब सदस्यांपैकी असतात. -
2:45 - 2:48समाजाचा जो अत्यंत उपेक्षित गट आहे.
-
2:48 - 2:50ते तस्करीला बळी पडतात
-
2:50 - 2:54मानव तस्कर्त्यांना माहित असते कि
ज्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नोंदच नाही , -
2:54 - 2:57त्या व्यक्तीला शोधून काढणे अशक्य आहे.
-
2:57 - 3:01अशा व्यक्ती शोषणाला बळी पडतात
जसे कि बालविवाह आणि बालमजुरी -
3:01 - 3:05जन्मदाखला असल्याशिवाय कसे सिद्ध कराल
कि एखादा बालक आताही बाल्यावस्थेतच आहे ? -
3:06 - 3:07ते नागरिकत्व विरहित मध्ये आहेत .
-
3:07 - 3:10जन्मदाखला तुमचे पालक कोण आहेत
याचा पुरावा देतो -
3:10 - 3:11तुमचे जन्मस्थान याचाही
-
3:11 - 3:14जे दोन महत्वाचे घटक आहेत
नागरिकत्व मिळवण्यासाठी -
3:15 - 3:18या जगातील कायदेशीर ओळख नसलेल्या
एक दशलक्ष लोकांमध्ये -
3:18 - 3:22बहुतांश मुलांचा समावेश आहे
ज्यांची जन्मनोंदणी करण्यात आली नव्हती. -
3:22 - 3:24कमीतकमी विकास झालेल्या देशांमध्ये
-
3:24 - 3:28६० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांची जन्मनोंद
केलेली कधीही आढळत नाही -
3:28 - 3:32सब सहारा आफ्रिकेच्या १७ देशांमध्ये
केलेल्या अभ्यासानुसार -
3:32 - 3:35असे आढळून आले कि ८० टक्के मुलांकडे
जन्मदाखला नाही -
3:36 - 3:38ज्या देशांमध्ये जागतिक जन्म नोंदणी दर
-
3:38 - 3:41साधल्या गेला नाही तिथे ,
-
3:41 - 3:45२६ देशांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास
जन्म दाखल्याची गरज पडते, -
3:45 - 3:47त्यात लसीकरणचाही समावेश होतो.
-
3:48 - 3:51३७ देशांमध्ये सहकार्य जे लोकांना
गरिबीमुक्त करण्यास प्रयत्नशील आहे -
3:51 - 3:53त्याकरिता जन्मदाखल्याची गरज पडते
-
3:55 - 3:59आणि ५९ देशांमध्ये शाळेत प्रवेशनोंदणी
साठी तसेच पूर्ण शिक्षणासाठी -
3:59 - 4:02जन्म दाखल्याची गरज पडते.
-
4:03 - 4:07तसेच जन्मदाखला इतर कायदेशीर ओळखपत्रांसाठी
आवश्यक ठरतो. -
4:07 - 4:09जसे कि राष्ट्रीय ओळख ,
परदेश प्रवासाचा परवाना. -
4:09 - 4:13आणि कुठल्याही प्रकारची कायदेशीर ओळख
हि प्रत्येक देशामध्ये गरजेची असते. -
4:13 - 4:16मतदान करण्यासाठी, सिमकार्ड घेण्याकरिता
किंवा बँकेत खाते उघडण्याकरिता -
4:16 - 4:20खरं तर या जगातील १.७ दशलक्ष लोक
ज्यांचे बँकेचे व्यवहार नाहीत -
4:20 - 4:23त्यातील २० टक्के लोकांकडे कायदेशीर
ओळखपत्र नसल्याने त्यांचे काम अडले आहे -
4:24 - 4:28हे समजून घेण्याकरिता तुम्ही
या क्षेत्रात तज्ञ् असणे गरजेचे नाही -
4:28 - 4:29हि मोठी समस्या आहे.
-
4:30 - 4:32आश्चर्यजनक नाही कि पुरावे दाखवतात
-
4:32 - 4:35कि सुधारित जन्मनोंदणी क्षेत्र आणि
सुधारित विकास परिणाम -
4:35 - 4:37यांचा नजीकचा संबंध आहे.
-
4:37 - 4:38गरिबी उन्मूलन पासून
-
4:38 - 4:41चांगल्या आरोग्य, पोषण आणि शिक्षण
-
4:41 - 4:42आर्थिक सुधारणा,
-
4:43 - 4:45आणि सुरक्षित क्रमशः स्थलांतर.
-
4:47 - 4:51२०१५ मध्ये जेव्हा जागतिक नेते एकत्र आले
-
4:51 - 4:55आणि त्यांनी मानवी हक्कांचे
समर्थन करण्याचे वचन दिले -
4:55 - 4:57ज्यायोगे गरिबी, उपासमार
-
4:57 - 4:59आणि विषमता कमी करण्यास
-
4:59 - 5:00प्रयत्नशील असताना
-
5:00 - 5:01कुणीही यातून वंचित राहणार नाही
-
5:01 - 5:04पण ते मानवी हक्कांचे समर्थन कसे करणार ?
-
5:04 - 5:06आणि कसे कळणार कि
कुणी यातून वंचित राहिले आहे ? -
5:06 - 5:09जर त्यांना हेच माहिती नाही कि
सगळयात आधी ते कोण आहेत -
5:09 - 5:11किंवा कुठे आहेत?
-
5:14 - 5:16तर याविषयी राष्ट्रे काय करू शकतात ?
-
5:16 - 5:18सगळ्यांना लागू होईल
असा एकच पर्याय नाही -
5:18 - 5:20कारण प्रत्येक राष्ट्राचा संदर्भ
अद्वितीय आहे. -
5:20 - 5:24५ सिद्धे झालेले हस्तक्षेप अस्तित्वात आहेत
जे कुठल्याही प्रणालीला लागू होतात. -
5:25 - 5:27क्रमांक १, अंतर कमी करा
-
5:27 - 5:29क्रमांक २ , किंमत वगळा.
-
5:29 - 5:31क्रमांक ३ , पद्धत सुलभ करा.
-
5:31 - 5:33क्रमांक ४ भेदभाव वगळा.
-
5:33 - 5:35क्रमांक ५ मागणी वाढवा.
-
5:35 - 5:38लिंगभेद हि एक लपलेली समस्या आहे.
-
5:39 - 5:41कारण आकडेवारीनुसार मुलगा आणि मुलगी
-
5:41 - 5:43यांच्या नोंदणी दरात काही फरक नाही.
-
5:43 - 5:46पण भेदभाव हा बाल्यविषयी नसून
-
5:46 - 5:47आईविषयी आहे
-
5:47 - 5:51अंगोला त्या ३५ देशांपैकी एक आहे
जिथे बालकाची जन्म नोंदणी होण्याकरिता -
5:51 - 5:54वडिलांचे नाव किंवा उपस्थिती ची गरज भासते.
-
5:54 - 5:58तर काही परिस्थितीमधे जिथे वडील
अनोळखी, अनइच्छुक -
5:58 - 6:00किंवा पितृत्व बजावण्यास असमर्थ आहेत
-
6:00 - 6:03तिथे आईला त्यांच्या स्वतःच्या बालकाची
जन्मनोंदणी करण्यापासून -
6:03 - 6:05कायदेशीर अडवले जाते.
-
6:05 - 6:08यावर उपाययोजना करण्यास
अंगोला येथे धोरण ठरवण्यात आले -
6:08 - 6:11कि आयांना त्यांच्या बाळाची एकल पालक
म्हणून नोंदणी करता यावी. -
6:12 - 6:14टांझानिया येथे २०१२ साली,
-
6:14 - 6:17फक्त १३ टक्के मुलांकडे जन्म दाखल होता.
-
6:18 - 6:20तर सरकारने एक नवी प्रणाली काढली.
-
6:21 - 6:26त्यांनी विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये
नोंदणी केंद्रांचा समावेश केला. -
6:26 - 6:28जसे कि सामुदायिक विभाग
-
6:28 - 6:30आणि आरोग्य सुविधा.
-
6:30 - 6:33त्यांनी या सेवांची ज्या लोकांना
गरज आहे त्यांच्या जवळ नेल्या. -
6:33 - 6:34त्यांनी शुल्क वगळले.
-
6:35 - 6:38त्यांनी प्रणाली स्वयंचलित आणि सुलभ केली.
-
6:38 - 6:40जेणेकरून जन्मदाखला जागेवरच देता येईल.
-
6:41 - 6:44मागणी वाढवण्याकरिता त्यांनी
एक सामाजिक जागरूकता मोहीम चालवली. -
6:44 - 6:46लोकांना कळवण्यात आले कि
एक नवीन प्रणाली आहे -
6:46 - 6:49आणि मुलांची जन्म नोंदणी करणे
का आवश्यक आहे ते. -
6:51 - 6:54फक्त काही वर्षांत ज्या जिल्ह्यांत
नवीन प्रणाली मांडली होती -
6:54 - 6:57तिथे ८३ टक्के बालकांकडे
आता जन्मदाखला आहे, -
6:57 - 7:00व ते हे देशभर आणण्याच्या
प्रक्रियेत आहेत. -
7:01 - 7:03तर तुम्ही काय करू शकता ?
-
7:04 - 7:07बघा मला वाटते कि आपण मानवतेने एकजूट आहोत
-
7:07 - 7:10आपण सारख्या जमिनीवर राहतो,
सारख्या प्राणवायू चा श्वास घेतो -
7:10 - 7:14आपण कोणीही जन्म घेण्याची किंवा
विशिष्ट्य परिस्थितीची निवड करत नाही -
7:14 - 7:16मात्र आपण कसे जगतो याची निवड करू शकतो.
-
7:17 - 7:20बदल तेव्हा होतो जेव्हा एखादा जागरूकतेचा
-
7:20 - 7:22किंवा करुणेचा क्षण,
-
7:22 - 7:24एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देतो.
-
7:24 - 7:25आणि आपल्या सामुदायिक कृतींमुळे ,
-
7:25 - 7:29आपण बदलाचे सगळ्यात शक्तिशाली घटक ठरतो.
-
7:29 - 7:33जेव्हा निष्क्रियपणामुळे निष्पाप बालक
असुरक्षित राहतात -
7:33 - 7:36लसीकरणाचा अभाव असलेले,
शाळेत जाणे शक्य नसलेले, -
7:36 - 7:40जे मोठे होऊन चांगला कामधंदा शोधण्यात
किंवा मतदान करण्यास असमर्थ आहेत. -
7:40 - 7:45ते अखंड गरिबी, अपवर्जन व
अदृश्यता यांच्या चक्रात अडकतात -
7:45 - 7:46ते आपल्यावर येते कि
-
7:46 - 7:49हा मुद्दा आपण
-
7:49 - 7:50प्रकाशझोतात आणू शकतो.
-
7:51 - 7:54कारण तुम्हाला जग बदलण्याची संधी
रोज मिळत नाही, -
7:54 - 7:56पण आज ,
-
7:56 - 7:57आहे.
-
7:58 - 7:59धन्यवाद.
-
7:59 - 8:01( टाळ्या )
- Title:
- जन्म दाखला बाळगणे मानवी हक्क का आहे?
- Speaker:
- क्रिस्टिन वेन्झ
- Description:
-
जगभरात १ दशलक्ष लोकांकडे , बहुतांश बालकांकडे जन्मदाखला नाही. याचा अर्थ अनेक देशांमध्ये, ते आवश्यक सेवा जसे कि आरोग्यसेवा आणि शिक्षण यांचा लाभ घेऊ शकत नाही, असे कायदेशीर ओळख तज्ञ् क्रिस्टिन वेन्झ म्हणतात. त्या चर्चा करतात कि हि समस्या आजच्या काळातील मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन का आहे - आणि ५ सूत्रे देतात जे प्रत्येकजण नोंदणीकृत आणि सुरक्षित आहे याची खात्री बाळगतील.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 08:14
![]() |
Arvind Patil approved Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Pranoti Gaikwad edited Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Pranoti Gaikwad edited Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Pranoti Gaikwad edited Marathi subtitles for What if a single human right could change the world? | |
![]() |
Pranoti Gaikwad edited Marathi subtitles for What if a single human right could change the world? |