आनंद शंकर जयंत चा नृत्याद्वारे कर्क रोगाशी लढा.
-
0:01 - 0:11संगीत
-
0:43 - 0:46संस्कृत
-
0:50 - 0:52हे आहे मातृदेवतेचे स्तवन,
-
0:52 - 0:55जे भारतात बहुतेक बाल वयात शिकतात.
-
0:58 - 1:00मी चार वर्षाची असताना शिकले
-
1:00 - 1:03आईच्या मांडीवर बसून.
-
1:05 - 1:08त्या वर्षी तिने मला नृत्याशी ओळख करून दिली .
-
1:08 - 1:10आणि मग सुरु झाला
-
1:10 - 1:13माझ्या शास्त्रीय संगीताचा प्रवास.
-
1:13 - 1:16त्यानंतर आता चार दशके झाली
-
1:17 - 1:19मी नृत्यातील उत्तम शिक्षण घेतले,
-
1:19 - 1:21सर्व जगभर नृत्याचे कार्यक्रम केले,
-
1:21 - 1:24लहानांना आणि वृद्धांना एकसारखे शिकवले,
-
1:24 - 1:26नवनिर्मिती केली, (प्रसार कार्यात) सहभागी झाले,
-
1:26 - 1:28नृत्य दिग्दर्शन केले.
-
1:28 - 1:30आणि एक मूल्यवान वस्त्र विणले
-
1:30 - 1:33कलाकौशल्याचे, (मिळवलेल्या) उपलाब्ध्यांचे आणि बक्षिसांचे.
-
1:34 - 1:37कर्तृत्वाचे शिखर गाठले २००७ साली,
-
1:37 - 1:39जेह्वा या देशातील सर्वोत्तम चवथा नागरी
-
1:39 - 1:41सन्मान मिळाला —पद्मश्री,
-
1:41 - 1:43.माझ्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल.
-
1:43 - 1:46टाळ्या
-
1:47 - 1:50पण माझी बिलकुल तयारी नव्हती
-
1:50 - 1:53जे मला ऐकावे लागले
-
1:53 - 1:56एक जुलै २००८ या दिवशी त्याची
-
1:56 - 1:59’‘कार्सिनोमा" हा शब्द मी ऐकला.
-
1:59 - 2:02होय , स्तनांचा कर्करोग.
-
2:02 - 2:05मी अवाक होवून डॉक्टरच्या ऑफिस मध्ये बसले असताना,
-
2:07 - 2:09मी दुसरे शब्द ऐकले,
-
2:09 - 2:12‘कॅन्सर ’ , ‘स्टेज ’, ‘ग्रेड'.
-
2:12 - 2:14तोपर्यंत कॅन्सर ही कुंडलीतली
-
2:14 - 2:16माझ्या एका मित्राची रास होती,
-
2:16 - 2:19स्टेज म्हणजे माझा रंगमंच होता,
-
2:19 - 2:22आणि ग्रेड म्हणजे मला शाळेत मिळालेली श्रेणी होती.
-
2:24 - 2:26त्या दिवशी, मला कळले
-
2:26 - 2:29माझ्याजवळ एक नको असलेला, आगंतुक होता,
-
2:29 - 2:32आयुष्यातील नवा जोडीदार.
-
2:32 - 2:34एक नर्तिका असल्याने,
-
2:34 - 2:37मला नउ रस किंवा नवरस माहीत होते:
-
2:37 - 2:39राग , शौर्य,
-
2:39 - 2:41घृणा , हास्य
-
2:41 - 2:43आणि भय .
-
2:43 - 2:45मला वाटत असे कि मला भय माहित आहे
-
2:45 - 2:48त्या दिवशी, मला भय काय आहे ते कळले.
-
2:49 - 2:52त्या सगळ्याच्या उग्र स्वरूपाने ग्रासले
-
2:52 - 2:54आणि संपूर्ण ताबा गमावल्याचे जाणवले.
-
2:54 - 2:56मी खूप अश्रू ढाळले
-
2:56 - 2:59आणि प्रिय नवऱ्याला जयंतला विचारले.
-
2:59 - 3:02मी म्हणाले, "ही (माझ्या) वाटचालीची अखेर आहे का?
-
3:02 - 3:05हा माझ्या नृत्यकलेचा शेवट आहे का?"
-
3:05 - 3:08खंबीर आणि विश्वासयुक्त असा तो,
-
3:08 - 3:11म्हणाला “ नाही, हा तर केवळ एक खंड आहे,
-
3:11 - 3:13उपचार चालू असतानाचा मधला एक खंड,
-
3:13 - 3:16आणि तुला जे उत्तम करायचे आहे ते तू परत करू लागशील."
-
3:17 - 3:19तेंव्हा मला उमगले
-
3:19 - 3:22कि माझा जीवनावर पूर्ण ताबा आहे वाटत होते तरी,
-
3:22 - 3:25माझा फक्त तीन गोष्टीवर ताबा आहे:
-
3:25 - 3:28माझे विचार , माझे मन ---
-
3:28 - 3:30या विचारांनी निर्माण केलेल्या प्रतिमा (धारणा) ---
-
3:30 - 3:33आणि त्यातून झालेली कृति.
-
3:33 - 3:35तर इथे मी लोळण घेत होते
-
3:35 - 3:37भावनेच्या कल्लोळात
-
3:37 - 3:39आणि दुखात आणि विमनस्क मनस्थितीत,
-
3:39 - 3:42परिस्थितीच्या प्रचंड विळख्यात,
-
3:42 - 3:45जिथे स्वास्थ्य, आरोग्य आणि समाधान मिळेल तिथे जाण्याची वाट बघत होते.
-
3:46 - 3:48मला इथून जायचे होते
-
3:48 - 3:50जिथे मला जावेसे वाटत होते,
-
3:50 - 3:53त्यासाठी मला काहीतरी हवे होते.
-
3:53 - 3:56मला असे काहीतरी हवे होते जे मला या सर्वातून बाहेर काढेल.
-
3:56 - 3:58म्हणून मी माझे अश्रू पुसले,
-
3:58 - 4:01आणि सर्व जगाला जाहीरपणे सांगितले ....
-
4:01 - 4:04मी म्हणाले ”कर्करोग हे माझ्या आयुष्यातील फक्त एक पान आहे,
-
4:04 - 4:07आणि मी ह्या पानाचा माझ्या उरलेल्या जीवनावर प्रभाव पडू देणार नाही."
-
4:08 - 4:10मी असेही जगाला सांगितले
-
4:10 - 4:12कि मी त्यावर मात करेन,
-
4:12 - 4:14पण कर्करोगाला माझ्यावर वरचढ होवू देणार नाही.
-
4:14 - 4:16पण मला इथून निघून
-
4:16 - 4:18मला जिथे पोहोचायचे होते,
-
4:18 - 4:20त्यासाठी मला काही तरी हवे होते.
-
4:20 - 4:22मला हवा होता एक धीर देणारा, एक प्रतिरूप,
-
4:22 - 4:24एक आधार
-
4:24 - 4:26ही प्रक्रिया धीराने पुढे नेण्यासाठी,
-
4:26 - 4:29ज्यामुळे मी तिथून पुढे जाऊ शकेन.
-
4:29 - 4:32आणि मला समजले कि माझ्या नृत्यात,
-
4:33 - 4:35माझ्या नृत्यात, माझी शक्ती , माझी उर्जा , माझी उत्कट आवड,
-
4:35 - 4:37माझा जगण्याचा श्वास आहे .
-
4:38 - 4:40पण ते सोपे नव्हते .
-
4:40 - 4:43विश्वास ठेवा, ते नक्कीच सोपे नव्हते.
-
4:43 - 4:45तुम्ही आनंदी कसे राहू शकता
-
4:45 - 4:47जेंव्हा तुम्ही सौन्दर्याकडून
-
4:47 - 4:50तीन दिवसात केशरहित होता ?
-
4:50 - 4:53तुम्ही निराश व्हायला नको का
-
4:53 - 4:56जेव्हा, शरीर केमोथेरपीच्या उपचाराने उध्वस्त झाले,
-
4:56 - 4:59केवळ एक जिना चढणे शिक्षा वाटले,
-
4:59 - 5:02ते सुद्धा माझ्यासारखीला, जी तीन तास (सतत) नृत्य करू शकत होती?
-
5:04 - 5:06तुम्ही आधीन कसे नाही होणार
-
5:06 - 5:09निराशा व दुर्दशा यामुळे ?
-
5:09 - 5:12मी काय तर मुटकुळे करून बसायचे आणि मुसमुसायचे.
-
5:12 - 5:14पण मी स्वताला सांगात राहिले कि रडणे आणि भीती
-
5:14 - 5:17हे पर्याय आपल्याला उपलब्ध नाहीत .
-
5:17 - 5:20म्हणून मी रोज फरफटत माझ्या नृत्य शाळेत जायची
-
5:20 - 5:23शरीर , मन आणि आत्मा घेवून माझ्या नृत्यशाळेत,
-
5:23 - 5:25आणि शिकायची जे पूर्वी मी शिकले होते
-
5:25 - 5:27चार वर्षाची असताना, ते सगळे परत,
-
5:27 - 5:30सराव केला , उजळणी केली, पुन्हा जोडणी केली
-
5:30 - 5:33हे तीव्र वेदना देणारे होते, पण मी ते केले.
-
5:33 - 5:35अवघड .
-
5:36 - 5:39मी लक्ष केंद्रित केले माझ्या मुद्रांवर,
-
5:39 - 5:41नृत्यातील प्रतिमांवर,
-
5:41 - 5:43त्यातील काव्यावर आणि रूपकावर
-
5:43 - 5:45आणि नृत्यातीलच तत्वज्ञानावर.
-
5:45 - 5:47आणि हळू हळू, मी बाहेर पडले
-
5:47 - 5:50त्या दुखी मनस्थितीतून.
-
5:51 - 5:53पण मला आणखी काही (तरी) वेगळे हवे होते.
-
5:53 - 5:56मला काहीतरी हवे होते तो पुढचा टप्पा गाठण्यासाठी
-
5:56 - 5:58आणि मला ते मिळाले त्या रूपकातून
-
5:58 - 6:01जे मला शिकवले होते, माझ्या आईने, मी चार वर्षाची असताना
-
6:01 - 6:04ते रूपक होते महिषासुर मर्दिनी,
-
6:04 - 6:06दुर्गेचे .
-
6:06 - 6:09दुर्गा , देवांची जननी, एक निर्भय (देवी),
-
6:09 - 6:12सर्व हिंदू देवतांनी निर्माण केलेली.
-
6:12 - 6:15दुर्गा, तेजस्वी, सजलेली, सुंदर,
-
6:16 - 6:18तिचे १८ हात
-
6:18 - 6:20युद्धास सज्ज,
-
6:20 - 6:23जशी ती तिच्या सिंहावर आरूढ झाली
-
6:23 - 6:26युद्धभूमीवर महिषासुराचा वध करण्यासाठी.
-
6:27 - 6:29दुर्गा, जे संक्षिप्त (रूप आहे)
-
6:29 - 6:31सर्जनशील स्त्रीउर्जेचे,
-
6:31 - 6:33किंवा (स्त्री)शक्तीचे.
-
6:33 - 6:35दुर्गा, जी एक निर्भय (आहे).
-
6:35 - 6:37मी अशा त्या दुर्गेचे रूप साकारले
-
6:37 - 6:39आणि तिचे प्रत्येक गुणविशेष , प्रत्येक बारकावे,
-
6:39 - 6:41माझ्या स्वतःत अंगिकारले.
-
6:41 - 6:44तिच्या पौराणिक प्रतिमांनी ताकदवान झाले
-
6:44 - 6:47आणि माझ्या प्रशिक्षणाच्या उत्कटतेने,
-
6:47 - 6:50मी प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण (लक्ष) माझ्या नृत्यात केंद्रित केले.
-
6:50 - 6:52प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण लक्ष केंद्रित केले, इतक्या मर्यादेपर्यंत कि
-
6:52 - 6:55मी शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यातच नाचले.
-
6:55 - 6:58केमो आणि रेडियेशनचे चक्र चालू असताना मी नाचले,
-
6:58 - 7:01माझ्या कर्करोगावरील वैद्यांना बऱ्यापैकी निराश करीत.
-
7:01 - 7:03मी नाचले, केमो आणि रेडियेशनच्या (दोन) आवर्तनादरम्यान
-
7:03 - 7:05आणि त्यांच्यामागे भुणभुण लावली ते जुळवण्यासाठी
-
7:05 - 7:08माझ्या नृत्य प्रयोगाच्या वेळापत्रकात .
-
7:10 - 7:12काय केले होते मी
-
7:12 - 7:14मी कर्करोगाच्या छायेतून बाहेर पडले
-
7:14 - 7:17आणि माझ्या नृत्यामध्ये सूर मिळवला.
-
7:18 - 7:21होय . कर्करोग हे माझ्या जीवनातील फक्त एक पान होते.
-
7:23 - 7:25माझी कथा
-
7:25 - 7:27ही कथा आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी,
-
7:27 - 7:29अडथळे आणि आव्हाने
-
7:29 - 7:31जे (प्रसंग) जीवन तुमच्यावर उधळतात.
-
7:31 - 7:34माझी कथा आहे विचारांच्या शक्तीची.
-
7:34 - 7:37माझी कथा आहे निवडीच्या शक्तीची.
-
7:37 - 7:39ती आहे लक्ष केंद्रित करण्याऱ्या शक्तीची.
-
7:39 - 7:42ती (अशी) शक्ती आहे (जी) आपल्याला
-
7:42 - 7:45अश्या (गोष्टी) कडे लक्ष केंद्रित करवते, जी तुम्हाला सजीव करते,
-
7:45 - 7:47इतकी हेलावते,
-
7:47 - 7:50कि कर्करोगासारखे देखील काहीही नगण्य वाटते.
-
7:50 - 7:52माझी कथा आहे रूपकाच्या शक्तीची.
-
7:52 - 7:54ती आहे एका प्रतिमेच्या शक्तीची.
-
7:54 - 7:56माझी कथा आहे दुर्गेची,
-
7:56 - 7:59दुर्गा, एक निर्भय.
-
7:59 - 8:01तिला सिंहनंदिनी असेही म्हणतात,
-
8:01 - 8:03जी सिंहावर आरूढ झाली होती,
-
8:05 - 8:07जशी मी आरूढ होते,
-
8:07 - 8:09मी जशी आरूढ होते - माझ्या अंतर्बलावर,
-
8:09 - 8:11माझ्या स्वत:मधील प्रतिकारशक्तीवर,
-
8:11 - 8:14मी शस्त्रधारी आहे जशी औषधांमुळे शक्य झाली असती
-
8:14 - 8:16आणि सततच्या उपचारांनी (शक्य झाली असती),
-
8:16 - 8:18मी जेव्हा कर्करोगाच्या रणांगणावर स्वार होते,
-
8:18 - 8:21माझ्या अनियंत्रित पेशींना शिस्त लावते,
-
8:23 - 8:26माझी ओळख कर्करोगातून वाचलेली अशी होण्यापेक्षा,
-
8:26 - 8:28कर्करोग जिंकलेली अशी व्हावी असे वाटते.
-
8:28 - 8:30मी आता तुमच्यापुढे त्या कामातील एक तुकडा सादर करते
-
8:30 - 8:33"सिंहनंदिनी."
-
8:33 - 8:36(टाळ्या )
-
8:36 - 8:45संगीत
-
15:09 - 15:44(टाळ्या )
- Title:
- आनंद शंकर जयंत चा नृत्याद्वारे कर्क रोगाशी लढा.
- Speaker:
- Ananda Shankar Jayant
- Description:
-
प्रसिध्ध भारतीय शास्त्रीय नर्तिका आनंद शंकर जयंत हिला कर्क रोग झाल्याचे निदान २००८ साली झाले . तिच्या आत्मकथनात ती सांगते कि तिने नृत्याच्या माध्यमातून रोगाशी कसा सामना केला आणि ज्यातून तिला बळ मिळाले त्या नृत्याचा आविष्कार .
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 15:46