0:00:01.000,0:00:11.000 संगीत 0:00:43.000,0:00:46.000 संस्कृत 0:00:50.000,0:00:52.000 हे आहे मातृदेवतेचे स्तवन, 0:00:52.000,0:00:55.000 जे भारतात बहुतेक बाल वयात शिकतात. 0:00:58.000,0:01:00.000 मी चार वर्षाची असताना शिकले 0:01:00.000,0:01:03.000 आईच्या मांडीवर बसून. 0:01:05.000,0:01:08.000 त्या वर्षी तिने मला नृत्याशी ओळख करून दिली . 0:01:08.000,0:01:10.000 आणि मग सुरु झाला 0:01:10.000,0:01:13.000 माझ्या शास्त्रीय संगीताचा प्रवास. 0:01:13.000,0:01:16.000 त्यानंतर आता चार दशके झाली 0:01:17.000,0:01:19.000 मी नृत्यातील उत्तम शिक्षण घेतले, 0:01:19.000,0:01:21.000 सर्व जगभर नृत्याचे कार्यक्रम केले, 0:01:21.000,0:01:24.000 लहानांना आणि वृद्धांना एकसारखे शिकवले, 0:01:24.000,0:01:26.000 नवनिर्मिती केली, (प्रसार कार्यात) सहभागी झाले, 0:01:26.000,0:01:28.000 नृत्य दिग्दर्शन केले. 0:01:28.000,0:01:30.000 आणि एक मूल्यवान वस्त्र विणले 0:01:30.000,0:01:33.000 कलाकौशल्याचे, (मिळवलेल्या) उपलाब्ध्यांचे आणि बक्षिसांचे. 0:01:34.000,0:01:37.000 कर्तृत्वाचे शिखर गाठले २००७ साली, 0:01:37.000,0:01:39.000 जेह्वा या देशातील सर्वोत्तम चवथा नागरी 0:01:39.000,0:01:41.000 सन्मान मिळाला —पद्मश्री, 0:01:41.000,0:01:43.000 .माझ्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल. 0:01:43.000,0:01:46.000 टाळ्या 0:01:47.000,0:01:50.000 पण माझी बिलकुल तयारी नव्हती 0:01:50.000,0:01:53.000 जे मला ऐकावे लागले 0:01:53.000,0:01:56.000 एक जुलै २००८ या दिवशी त्याची 0:01:56.000,0:01:59.000 ’‘कार्सिनोमा" हा शब्द मी ऐकला. 0:01:59.000,0:02:02.000 होय , स्तनांचा कर्करोग. 0:02:02.000,0:02:05.000 मी अवाक होवून डॉक्टरच्या ऑफिस मध्ये बसले असताना, 0:02:07.000,0:02:09.000 मी दुसरे शब्द ऐकले, 0:02:09.000,0:02:12.000 ‘कॅन्सर ’ , ‘स्टेज ’, ‘ग्रेड'. 0:02:12.000,0:02:14.000 तोपर्यंत कॅन्सर ही कुंडलीतली 0:02:14.000,0:02:16.000 माझ्या एका मित्राची रास होती, 0:02:16.000,0:02:19.000 स्टेज म्हणजे माझा रंगमंच होता, 0:02:19.000,0:02:22.000 आणि ग्रेड म्हणजे मला शाळेत मिळालेली श्रेणी होती. 0:02:24.000,0:02:26.000 त्या दिवशी, मला कळले 0:02:26.000,0:02:29.000 माझ्याजवळ एक नको असलेला, आगंतुक होता, 0:02:29.000,0:02:32.000 आयुष्यातील नवा जोडीदार. 0:02:32.000,0:02:34.000 एक नर्तिका असल्याने, 0:02:34.000,0:02:37.000 मला नउ रस किंवा नवरस माहीत होते: 0:02:37.000,0:02:39.000 राग , शौर्य, 0:02:39.000,0:02:41.000 घृणा , हास्य 0:02:41.000,0:02:43.000 आणि भय . 0:02:43.000,0:02:45.000 मला वाटत असे कि मला भय माहित आहे 0:02:45.000,0:02:48.000 त्या दिवशी, मला भय काय आहे ते कळले. 0:02:49.000,0:02:52.000 त्या सगळ्याच्या उग्र स्वरूपाने ग्रासले 0:02:52.000,0:02:54.000 आणि संपूर्ण ताबा गमावल्याचे जाणवले. 0:02:54.000,0:02:56.000 मी खूप अश्रू ढाळले 0:02:56.000,0:02:59.000 आणि प्रिय नवऱ्याला जयंतला विचारले. 0:02:59.000,0:03:02.000 मी म्हणाले, "ही (माझ्या) वाटचालीची अखेर आहे का? 0:03:02.000,0:03:05.000 हा माझ्या नृत्यकलेचा शेवट आहे का?" 0:03:05.000,0:03:08.000 खंबीर आणि विश्वासयुक्त असा तो, 0:03:08.000,0:03:11.000 म्हणाला “ नाही, हा तर केवळ एक खंड आहे, 0:03:11.000,0:03:13.000 उपचार चालू असतानाचा मधला एक खंड, 0:03:13.000,0:03:16.000 आणि तुला जे उत्तम करायचे आहे ते तू परत करू लागशील." 0:03:17.000,0:03:19.000 तेंव्हा मला उमगले 0:03:19.000,0:03:22.000 कि माझा जीवनावर पूर्ण ताबा आहे वाटत होते तरी, 0:03:22.000,0:03:25.000 माझा फक्त तीन गोष्टीवर ताबा आहे: 0:03:25.000,0:03:28.000 माझे विचार , माझे मन --- 0:03:28.000,0:03:30.000 या विचारांनी निर्माण केलेल्या प्रतिमा (धारणा) --- 0:03:30.000,0:03:33.000 आणि त्यातून झालेली कृति. 0:03:33.000,0:03:35.000 तर इथे मी लोळण घेत होते 0:03:35.000,0:03:37.000 भावनेच्या कल्लोळात 0:03:37.000,0:03:39.000 आणि दुखात आणि विमनस्क मनस्थितीत, 0:03:39.000,0:03:42.000 परिस्थितीच्या प्रचंड विळख्यात, 0:03:42.000,0:03:45.000 जिथे स्वास्थ्य, आरोग्य आणि समाधान मिळेल तिथे जाण्याची वाट बघत होते. 0:03:46.000,0:03:48.000 मला इथून जायचे होते 0:03:48.000,0:03:50.000 जिथे मला जावेसे वाटत होते, 0:03:50.000,0:03:53.000 त्यासाठी मला काहीतरी हवे होते. 0:03:53.000,0:03:56.000 मला असे काहीतरी हवे होते जे मला या सर्वातून बाहेर काढेल. 0:03:56.000,0:03:58.000 म्हणून मी माझे अश्रू पुसले, 0:03:58.000,0:04:01.000 आणि सर्व जगाला जाहीरपणे सांगितले .... 0:04:01.000,0:04:04.000 मी म्हणाले ”कर्करोग हे माझ्या आयुष्यातील फक्त एक पान आहे, 0:04:04.000,0:04:07.000 आणि मी ह्या पानाचा माझ्या उरलेल्या जीवनावर प्रभाव पडू देणार नाही." 0:04:08.000,0:04:10.000 मी असेही जगाला सांगितले 0:04:10.000,0:04:12.000 कि मी त्यावर मात करेन, 0:04:12.000,0:04:14.000 पण कर्करोगाला माझ्यावर वरचढ होवू देणार नाही. 0:04:14.000,0:04:16.000 पण मला इथून निघून 0:04:16.000,0:04:18.000 मला जिथे पोहोचायचे होते, 0:04:18.000,0:04:20.000 त्यासाठी मला काही तरी हवे होते. 0:04:20.000,0:04:22.000 मला हवा होता एक धीर देणारा, एक प्रतिरूप, 0:04:22.000,0:04:24.000 एक आधार 0:04:24.000,0:04:26.000 ही प्रक्रिया धीराने पुढे नेण्यासाठी, 0:04:26.000,0:04:29.000 ज्यामुळे मी तिथून पुढे जाऊ शकेन. 0:04:29.000,0:04:32.000 आणि मला समजले कि माझ्या नृत्यात, 0:04:33.000,0:04:35.000 माझ्या नृत्यात, माझी शक्ती , माझी उर्जा , माझी उत्कट आवड, 0:04:35.000,0:04:37.000 माझा जगण्याचा श्वास आहे . 0:04:38.000,0:04:40.000 पण ते सोपे नव्हते . 0:04:40.000,0:04:43.000 विश्वास ठेवा, ते नक्कीच सोपे नव्हते. 0:04:43.000,0:04:45.000 तुम्ही आनंदी कसे राहू शकता 0:04:45.000,0:04:47.000 जेंव्हा तुम्ही सौन्दर्याकडून 0:04:47.000,0:04:50.000 तीन दिवसात केशरहित होता ? 0:04:50.000,0:04:53.000 तुम्ही निराश व्हायला नको का 0:04:53.000,0:04:56.000 जेव्हा, शरीर केमोथेरपीच्या उपचाराने उध्वस्त झाले, 0:04:56.000,0:04:59.000 केवळ एक जिना चढणे शिक्षा वाटले, 0:04:59.000,0:05:02.000 ते सुद्धा माझ्यासारखीला, जी तीन तास (सतत) नृत्य करू शकत होती? 0:05:04.000,0:05:06.000 तुम्ही आधीन कसे नाही होणार 0:05:06.000,0:05:09.000 निराशा व दुर्दशा यामुळे ? 0:05:09.000,0:05:12.000 मी काय तर मुटकुळे करून बसायचे आणि मुसमुसायचे. 0:05:12.000,0:05:14.000 पण मी स्वताला सांगात राहिले कि रडणे आणि भीती 0:05:14.000,0:05:17.000 हे पर्याय आपल्याला उपलब्ध नाहीत . 0:05:17.000,0:05:20.000 म्हणून मी रोज फरफटत माझ्या नृत्य शाळेत जायची 0:05:20.000,0:05:23.000 शरीर , मन आणि आत्मा घेवून माझ्या नृत्यशाळेत, 0:05:23.000,0:05:25.000 आणि शिकायची जे पूर्वी मी शिकले होते 0:05:25.000,0:05:27.000 चार वर्षाची असताना, ते सगळे परत, 0:05:27.000,0:05:30.000 सराव केला , उजळणी केली, पुन्हा जोडणी केली 0:05:30.000,0:05:33.000 हे तीव्र वेदना देणारे होते, पण मी ते केले. 0:05:33.000,0:05:35.000 अवघड . 0:05:36.000,0:05:39.000 मी लक्ष केंद्रित केले माझ्या मुद्रांवर, 0:05:39.000,0:05:41.000 नृत्यातील प्रतिमांवर, 0:05:41.000,0:05:43.000 त्यातील काव्यावर आणि रूपकावर 0:05:43.000,0:05:45.000 आणि नृत्यातीलच तत्वज्ञानावर. 0:05:45.000,0:05:47.000 आणि हळू हळू, मी बाहेर पडले 0:05:47.000,0:05:50.000 त्या दुखी मनस्थितीतून. 0:05:51.000,0:05:53.000 पण मला आणखी काही (तरी) वेगळे हवे होते. 0:05:53.000,0:05:56.000 मला काहीतरी हवे होते तो पुढचा टप्पा गाठण्यासाठी 0:05:56.000,0:05:58.000 आणि मला ते मिळाले त्या रूपकातून 0:05:58.000,0:06:01.000 जे मला शिकवले होते, माझ्या आईने, मी चार वर्षाची असताना 0:06:01.000,0:06:04.000 ते रूपक होते महिषासुर मर्दिनी, 0:06:04.000,0:06:06.000 दुर्गेचे . 0:06:06.000,0:06:09.000 दुर्गा , देवांची जननी, एक निर्भय (देवी), 0:06:09.000,0:06:12.000 सर्व हिंदू देवतांनी निर्माण केलेली. 0:06:12.000,0:06:15.000 दुर्गा, तेजस्वी, सजलेली, सुंदर, 0:06:16.000,0:06:18.000 तिचे १८ हात 0:06:18.000,0:06:20.000 युद्धास सज्ज, 0:06:20.000,0:06:23.000 जशी ती तिच्या सिंहावर आरूढ झाली 0:06:23.000,0:06:26.000 युद्धभूमीवर महिषासुराचा वध करण्यासाठी. 0:06:27.000,0:06:29.000 दुर्गा, जे संक्षिप्त (रूप आहे) 0:06:29.000,0:06:31.000 सर्जनशील स्त्रीउर्जेचे, 0:06:31.000,0:06:33.000 किंवा (स्त्री)शक्तीचे. 0:06:33.000,0:06:35.000 दुर्गा, जी एक निर्भय (आहे). 0:06:35.000,0:06:37.000 मी अशा त्या दुर्गेचे रूप साकारले 0:06:37.000,0:06:39.000 आणि तिचे प्रत्येक गुणविशेष , प्रत्येक बारकावे, 0:06:39.000,0:06:41.000 माझ्या स्वतःत अंगिकारले. 0:06:41.000,0:06:44.000 तिच्या पौराणिक प्रतिमांनी ताकदवान झाले 0:06:44.000,0:06:47.000 आणि माझ्या प्रशिक्षणाच्या उत्कटतेने, 0:06:47.000,0:06:50.000 मी प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण (लक्ष) माझ्या नृत्यात केंद्रित केले. 0:06:50.000,0:06:52.000 प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण लक्ष केंद्रित केले, इतक्या मर्यादेपर्यंत कि 0:06:52.000,0:06:55.000 मी शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यातच नाचले. 0:06:55.000,0:06:58.000 केमो आणि रेडियेशनचे चक्र चालू असताना मी नाचले, 0:06:58.000,0:07:01.000 माझ्या कर्करोगावरील वैद्यांना बऱ्यापैकी निराश करीत. 0:07:01.000,0:07:03.000 मी नाचले, केमो आणि रेडियेशनच्या (दोन) आवर्तनादरम्यान 0:07:03.000,0:07:05.000 आणि त्यांच्यामागे भुणभुण लावली ते जुळवण्यासाठी 0:07:05.000,0:07:08.000 माझ्या नृत्य प्रयोगाच्या वेळापत्रकात . 0:07:10.000,0:07:12.000 काय केले होते मी 0:07:12.000,0:07:14.000 मी कर्करोगाच्या छायेतून बाहेर पडले 0:07:14.000,0:07:17.000 आणि माझ्या नृत्यामध्ये सूर मिळवला. 0:07:18.000,0:07:21.000 होय . कर्करोग हे माझ्या जीवनातील फक्त एक पान होते. 0:07:23.000,0:07:25.000 माझी कथा 0:07:25.000,0:07:27.000 ही कथा आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी, 0:07:27.000,0:07:29.000 अडथळे आणि आव्हाने 0:07:29.000,0:07:31.000 जे (प्रसंग) जीवन तुमच्यावर उधळतात. 0:07:31.000,0:07:34.000 माझी कथा आहे विचारांच्या शक्तीची. 0:07:34.000,0:07:37.000 माझी कथा आहे निवडीच्या शक्तीची. 0:07:37.000,0:07:39.000 ती आहे लक्ष केंद्रित करण्याऱ्या शक्तीची. 0:07:39.000,0:07:42.000 ती (अशी) शक्ती आहे (जी) आपल्याला 0:07:42.000,0:07:45.000 अश्या (गोष्टी) कडे लक्ष केंद्रित करवते, जी तुम्हाला सजीव करते, 0:07:45.000,0:07:47.000 इतकी हेलावते, 0:07:47.000,0:07:50.000 कि कर्करोगासारखे देखील काहीही नगण्य वाटते. 0:07:50.000,0:07:52.000 माझी कथा आहे रूपकाच्या शक्तीची. 0:07:52.000,0:07:54.000 ती आहे एका प्रतिमेच्या शक्तीची. 0:07:54.000,0:07:56.000 माझी कथा आहे दुर्गेची, 0:07:56.000,0:07:59.000 दुर्गा, एक निर्भय. 0:07:59.000,0:08:01.000 तिला सिंहनंदिनी असेही म्हणतात, 0:08:01.000,0:08:03.000 जी सिंहावर आरूढ झाली होती, 0:08:05.000,0:08:07.000 जशी मी आरूढ होते, 0:08:07.000,0:08:09.000 मी जशी आरूढ होते - माझ्या अंतर्बलावर, 0:08:09.000,0:08:11.000 माझ्या स्वत:मधील प्रतिकारशक्तीवर, 0:08:11.000,0:08:14.000 मी शस्त्रधारी आहे जशी औषधांमुळे शक्य झाली असती 0:08:14.000,0:08:16.000 आणि सततच्या उपचारांनी (शक्य झाली असती), 0:08:16.000,0:08:18.000 मी जेव्हा कर्करोगाच्या रणांगणावर स्वार होते, 0:08:18.000,0:08:21.000 माझ्या अनियंत्रित पेशींना शिस्त लावते, 0:08:23.000,0:08:26.000 माझी ओळख कर्करोगातून वाचलेली अशी होण्यापेक्षा, 0:08:26.000,0:08:28.000 कर्करोग जिंकलेली अशी व्हावी असे वाटते. 0:08:28.000,0:08:30.000 मी आता तुमच्यापुढे त्या कामातील एक तुकडा सादर करते 0:08:30.000,0:08:33.000 "सिंहनंदिनी." 0:08:33.000,0:08:36.000 (टाळ्या ) 0:08:36.000,0:08:45.000 संगीत 0:15:09.000,0:15:44.000 (टाळ्या )