एन्डी पुडडीकोम्बे : त्यासाठी फक्त सजग १० मिनिटे लागतात.
-
0:00 - 0:03आपण एका अविश्वसनीय व्यस्त, धकाधकीच्या जगात जगत आहोत.
-
0:03 - 0:07बऱ्याच वेळा जीवनाचा वेग पिसाटलेला असतो आणि आपली मने नेहमी व्यस्त असतात
-
0:07 - 0:09आणि आपण सतत काही ना काही तरी करत असतो
-
0:09 - 0:12हे लक्षात ठेऊन, "काहीही न करण्यासाठी" तुम्ही शेवटचा वेळ कधी काढला होता?
-
0:12 - 0:17याचा विचार करण्यासाठी तुम्ही एक क्षण काढलात तर मला ते आवडेल.
-
0:17 - 0:19फक्त दहा मिनिटे कोणताही अडथळा न येता,
-
0:19 - 0:21आणि जेव्हा मी "काहीही न करण्यासाठी" असे म्हणतो तेव्हा मला खरच काहीही न करणे असे म्हणायचे आहे.
-
0:21 - 0:24ई-मेल्स करणे नाही, एसएमएस, इंटरनेट नाही,
-
0:24 - 0:28टीव्ही बघणे नाही, गप्पा नाहीत , खाणे नाही, वाचन नाही
-
0:28 - 0:30अगदी भूतकाळातल्या आठवणी काढत बसणे किंवा भविष्यकाळाचे
-
0:30 - 0:32मनसुबेसुद्धा करत बसणे नाही.
-
0:32 - 0:36निव्वळ काहीही न करणे.
-
0:36 - 0:39मला इथे बरेच निर्विकार चेहरे दिसत आहेत. (हशा)
-
0:39 - 0:41माझ्या मते कदाचित तुम्हाला खूपच मागे जावे लागेल.
-
0:41 - 0:42आणि ही एक अत्यंत विलक्षण गोष्ट आहे. बरोबर?
-
0:42 - 0:45आपण आपल्या मनाविषयी बोलत आहोत.
-
0:45 - 0:48मन आपला सर्वात अमूल्य आणि अनमोल स्त्रोत,
-
0:48 - 0:52ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण न् क्षण अनुभवतो,
-
0:52 - 0:55ज्या मन वर आपण अवलंबून असतो
-
0:55 - 0:59एक आनंदी, समाधानी, भावनिक दृष्टया स्थिरव्यक्ति म्हणून असण्यासाठी
-
0:59 - 1:01आणि त्याचवेळी दयाळू आणि मननशील असण्यासाठी
-
1:01 - 1:05आणि इतरांबरोबरच्या नातेसंबंधाबाबत समंजस असण्यासाठी.
-
1:05 - 1:07हेच ते मन आहे ज्याच्यावर, आपण अवलंबून असतो.
-
1:07 - 1:11प्रत्येक काम केंद्रित होऊन कल्पकतेने, उत्स्फूर्ततेने
-
1:11 - 1:15आणि करत असलेले आपल्या परिने सर्वोत्तम करण्यासाठी
-
1:15 - 1:19आणि असे असूनसुद्धा मनाचे संगोपन करण्यासाठी आपण वेळ काढत नाही.
-
1:19 - 1:22प्रत्यक्षात जास्त वेळ खर्च करतो आपल्या वाहनांची,
-
1:22 - 1:24आपल्या कपडयालत्त्याची आपल्या केसांची निगा राखण्यात
-
1:24 - 1:27-- बर बर, कदाचित केसांची नसेल पण लक्षात घ्या मी कुणीकडे चाललो आहे.
-
1:27 - 1:31परिणीती, अर्थात, आपण तणावग्रस्त होण्यात होते.
-
1:31 - 1:34तुम्हाला माहित आहे की मन हे कपडे धुण्याच्या यंत्रासारखे सतत घुसळत राहते,
-
1:34 - 1:36जागच्या जागी फिरत राहते, खूपशा अवघड, गोंधळलेल्या भावना मनात असतात
-
1:36 - 1:41आणि आपल्याला खरच काही समजत नाही त्याचे काय करायचे
-
1:41 - 1:46आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आपण इतके विचलित असतो
-
1:46 - 1:50की प्रत्यक्ष जगत असलेल्या या जगात आपण रहात नाही.
-
1:50 - 1:54आपल्याला सर्वात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींना आपण मुकतो,
-
1:54 - 1:56आणि गमतीची गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण असे समजतो की,
-
1:56 - 1:59ठीक आहे, यालाच 'जगणे' म्हणतात आणि कशातरी पद्धतीने आपल्याला ते जगले पाहिजे.
-
1:59 - 2:02खर पाहिल तर हे असे असायला नको आहे.
-
2:02 - 2:04तर मी साधारण ११ वर्षांचा असताना मी गेलो
-
2:04 - 2:06माझ्या पहिल्या ध्यान धारणेच्या वर्गाला .
-
2:06 - 2:09विश्वास ठेवा, तुम्ही कल्पना करू शकाल ते सगळे साचेबंदपणाचे नमुने तिथे होते ,
-
2:09 - 2:11- म्हणजे पायांची घडी घालून जमिनीवर बसणे,
-
2:11 - 2:15उदबत्त्यां , औषधी चहा, शाकाहारी व्यक्ती असे सगळे काही ,
-
2:15 - 2:19पण माझी आई जाणार होती आणि कुतूहल वाटून मीसुद्धा तिच्याबरोबर गेलो.
-
2:19 - 2:21मी काही कुंग फू चित्रपटसुद्धा पाहिले होते आणि मनातल्या मनात
-
2:21 - 2:24असा विचार केला होता की उडायचे कसे हे मी शिकू शकेन,
-
2:24 - 2:27पण तेव्हा मी खूपच लहान होतो.
-
2:27 - 2:30आणि आता मी तिथे होतो, माझ्या मते , इतर बऱ्याच लोकांसारखा,
-
2:30 - 2:34हे सगळे म्हणजे मनासाठीची अस्पिरीनची गोळी असल्याचे मी गॄहित धरले.
-
2:34 - 2:36तुम्हाला तणाव येतो, तुम्ही थोडी ध्यान धारणा करता.
-
2:36 - 2:39हे प्रतिबंधात्मक प्रकारचे असेल मला वाटले नव्हते,
-
2:39 - 2:42हे सगळे मी २० वर्षांचा होईपर्यंत, जेव्हा अनेक गोष्टी घडल्या
-
2:42 - 2:45माझ्या आयुष्यात भराभर,
-
2:45 - 2:49खरोखरच्या गंभीर, माझ्या जीवनात उलथापालथ करणाऱ्या
-
2:49 - 2:52आणि विचारांचा महापूरच माझ्या मनात आला, ज्यांच्याशी सामना कसा
-
2:52 - 2:56करायचा हे मला माहित नसलेल्या अशा अवघड भावनांचा महापूर.
-
2:56 - 2:58प्रत्येक वेळी एक भावना मी दडपल्यासारखी खाली ढकलत होतो,
-
2:58 - 2:59आणि दुसरी उसळी मारल्यासारखी परत वर येत होती.
-
2:59 - 3:02खरोखरच अत्यंत तणावग्रस्त काळ होता तो.
-
3:02 - 3:05मला वाटते आपण सगळेच वेगवेगळ्या तणावांना सामोरे जात असतो.
-
3:05 - 3:08काही माणसे स्वतःला कामाच्या ढिगाऱ्यात गाडून घेतील,
-
3:08 - 3:11विचारांना बगल दिल्याबद्दल धन्यवाद देत.
-
3:11 - 3:14इतर आधारासाठी त्यांच्या मित्रांकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे वळतील.
-
3:14 - 3:18काही जण दारू प्यायला लागतील, औषधोचार घ्यायला सुरूवाtत करतील..
-
3:18 - 3:21या सगळयाशी सामना करायचा माझा स्वतःचा मार्ग साधू बनणे हा होता.
-
3:21 - 3:24म्हणून मी माझा पदवीचा अभ्यास सोडला आणि मी हिमालयाकडे कूच केले.
-
3:24 - 3:28मी साधू बनलो आणि ध्यानधारणेचा अभ्यास सुरु केला.
-
3:28 - 3:32लोक मला नेहमी विचारतात कि त्या काळात मी काय शिकलो.
-
3:32 - 3:35तर स्पष्टच आहे की ध्यानधारणेने गोष्टी बदलल्या.
-
3:35 - 3:37आपण मान्य करुया की ब्रम्हचारी साधू बनण्याने
-
3:37 - 3:39अनेक गोष्टी मध्ये बदल घडणार आहे
-
3:39 - 3:42पण हे त्याहीपेक्षा जास्त होते.
-
3:42 - 3:44त्याने मला शिकवले - त्याने मला अधिक गुणग्राहकता दिली,
-
3:44 - 3:48सध्याच्या क्षणाचा अर्थ समजावला.
-
3:48 - 3:51मला असे म्हणायचे आहे, विचारात हरवून न जाणे,
-
3:51 - 3:54विचलित न होणे,
-
3:54 - 3:57अवघड भावनांनी भारावून न जाणे
-
3:57 - 4:01पण त्या ऐवजी या स्थळी आणि आत्ता असण्याचे शिकायचे,
-
4:01 - 4:04सावध कसे रहायचे, या क्षणी कसे रहायचे.
-
4:04 - 4:08माझ्या मते सध्याचा क्षणाला खूपच कमी महत्व दिले आहे.
-
4:08 - 4:12हे इतके सामान्य वाटते आणि तरीसुद्धा आपण सध्याचा, हा क्षण जगण्यास
-
4:12 - 4:15इतका कमी वेळ देतो की तो सामान्याहून सामान्य ठरतो.
-
4:15 - 4:18हारवर्डमधून एक शोध निबंध प्रसिद्ध झाला होता,
-
4:18 - 4:21अगदि नुकताच , त्यात म्हंटले होते सरासरी आपली मने
-
4:21 - 4:24जवळजवळ ४७ टक्के एवढा वेळ विचारात गढून गेलेली असतात.
-
4:24 - 4:27सत्तेचाळीस टक्के.
-
4:27 - 4:30त्याच बरोबर, अशा प्रकारचे मनाचे सर्वकाळ भरकटणे
-
4:30 - 4:33हे दुखाःचे थेट कारण सुद्धा आहे.
-
4:33 - 4:37आता आपण येथे फार वेळ नाही
-
4:37 - 4:42पण जवळजवळ आपले अर्धे आयुष्य विचारात वाया घालवण्यासाठी
-
4:42 - 4:44आणि खूपच दुःखाची शक्यता असलेले,
-
4:44 - 4:46माहित नाही पण, हे एकप्रकारचे शोकात्म, खरतर,
-
4:46 - 4:50विशेषकरून आपण त्याबद्दल काहीतरी करू शकतो म्हणून
-
4:50 - 4:53जेव्हा तिथे सकारात्मक, व्यवहार्य, गाठता येण्यासारखी
-
4:53 - 4:56शास्त्रीयदृष्टया सिद्ध प्रक्रिया उपलब्ध आहे
-
4:56 - 4:58जी बनणे शक्य करते.आपले मन अधिक सुदृढ,
-
4:58 - 5:03अधिक सजग आणि कमी तणावग्रस्त.
-
5:03 - 5:05आणि याची सुंदरता अशी की जरी
-
5:05 - 5:07हे दिवसातली फक्त १० मिनीट घेत असले,
-
5:07 - 5:11तरी हे आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकते.
-
5:11 - 5:13पण हे कसे करायचे ते आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
-
5:13 - 5:16आपल्याला एक सराव करावा लागेल. एक चौकट लागणार आहे.
-
5:16 - 5:17जास्त सजग कसे बनायचे हे शिकण्यासाठी.
-
5:17 - 5:19आणि हेच करणे म्हणजे ध्यानधारणा.
-
5:19 - 5:21ध्यानधारणा म्हणजे वर्तमान क्षणाची ओळख करून घेणे.
-
5:21 - 5:24परंतु त्याच्या जवळ जाण्यासाठी माहित असणे आवश्यक आहे
-
5:24 - 5:26योग्य रस्ता , उत्तम लाभ मिळविण्यासाठीचा .
-
5:26 - 5:29तर हे सर्व असे आहे , तुम्ही विचार करत असलात तर ,
-
5:29 - 5:32कारण कारण बरेच लोक असे धरून चालतात
-
5:32 - 5:34की ध्यानधारणा म्हणजे मनात येणारे विचार थांबवणे,
-
5:34 - 5:38भावनांचा त्याग करणे मनावर कसा तरी ताबा मिळविणे,
-
5:38 - 5:40पण खरतर ध्यानधारणा करणे यापेक्षा खूपच वेगळे आहे.
-
5:40 - 5:43हे जास्त करून पाऊल मागे घेणे
-
5:43 - 5:45विचार स्पष्टपणे पाहणे,
-
5:45 - 5:48त्याचे साक्षीदार बनणे, विचार आणि भावना येताना आणि जाताना
-
5:48 - 5:53निवाडा न करता, पण मन शिथिल, केंद्रित करून .
-
5:53 - 5:56म्हणजे उदाहरणार्थ, आत्ता या क्षणी
-
5:56 - 5:59जर मी या चेंडूंवर अवास्तव लक्ष केंद्रित केले तर शक्य होणार नाही
-
5:59 - 6:01मला शांत होणे आणि त्याच वेळी तुमच्याशी बोलणे
-
6:01 - 6:03तसेच जर मी तुमच्याशी शांतपणे खूप बोलत बसलो
-
6:03 - 6:06तर मी चेंडूंवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. मी ते पाडेन .
-
6:06 - 6:10जीवनात आणि ध्यानधारणा करताना अशा वेळा येतात
-
6:10 - 6:12की विचारांवर मन गरजेपेक्षा जास्त केंद्रित होते
-
6:12 - 6:17आणि जीवन जणू काही असे व्हायला लागते.
-
6:17 - 6:19आयुष्य जगणे खूपच अस्वथ करणारे, दुःखकारक असते.
-
6:19 - 6:21जेव्हा तुम्ही एवढे तंग आणि तणावपूर्ण असता
-
6:21 - 6:24आणि कधी कधी आपणअक्सिलरेटरवरचा पाय जरासा जास्तच सैल करतो
-
6:24 - 6:26आणि मग आयुष्य जणू काही असे होते
-
6:26 - 6:29अर्थात ध्यानधारणेमध्ये--- - (घोरतो )---------
-
6:29 - 6:31आपण झोपी जाणे संपवणार आहोत.
-
6:31 - 6:34म्हणून आपण शोधत आहोत समतोल , केंद्रित शांतपणा
-
6:34 - 6:37ज्या स्थितीत आपण विचारांना येऊ जाऊ देतो,
-
6:37 - 6:40नेहमीसारखे विचारात गुंतत न जाता.
-
6:40 - 6:43जेव्हा आपण सजग राहण्याचे शिकत असतो तेव्हा सर्वसाधारणपणे काय होते
-
6:43 - 6:46की एखाद्या विचारामुळे आपले मन विचलित होत असते.
-
6:46 - 6:48असू समजू या की हा विचार चिंता निर्माण करणारा आहे.
-
6:48 - 6:50सगळे अगदी सुरळीत चालू असते आणि आपल्याला हा चिंता जनक विचार दिसतो
-
6:50 - 6:53आणि " अरे ! याची मी काळजी करत होतो हे मला समजलेच नाही." असे होते.
-
6:53 - 6:55तुम्ही परत त्या विचाराकडे जाता, पुन्हा तो मनात आणता. " अरे ! मी काळजीत आहे"
-
6:55 - 6:58अरे ! मी खरोखरच चिंताग्रस्त आहे. ओहो, किती चिंता आहेत."
-
6:58 - 7:00आणि आपल्याला समजण्यापूर्वी, बरोबर?,
-
7:00 - 7:04चिंताग्रस्त वाटण्याचीच आपण चिंता करायला लागतो.
-
7:04 - 7:07तुम्हाला माहित आहे कि हे वेडेपणाचे आहे. पण आपण असे हे सतत करत असतो
-
7:07 - 7:09जगण्याच्या अगदी दररोजच्या पातळीवर.
-
7:09 - 7:12मला माहित नाही, तुम्ही कधी विचार केलात, या आधी
-
7:12 - 7:14तुमचा दात हलत होता याचा .
-
7:14 - 7:17तुम्हाला माहित आहे कि तो हलतो आहे आणि त्याने वेदना होतात.
-
7:17 - 7:20पण मग तुम्ही दर २०,३० सेकंदांनी काय करता?
-
7:20 - 7:26(पुटपुटत) “हे खरोखरच वेदनामय आहे”. आणि आपण रडकथा उगाळत बसतो. बरोबर?
-
7:26 - 7:28आणि आपण आपल्यालाच सांगत बसतो
-
7:28 - 7:30आणि हे आपण सतत करत राहतो.आणि हे शिकताना
-
7:30 - 7:33अशा पद्धतीने मनाकडे पहायला शिकल्याने निचरा करण्यास सुरुवात करतो.
-
7:33 - 7:36या रडकथाचा आणि मनातील आकृतीबंधांचा.
-
7:36 - 7:39पण तुम्ही स्थिरपणे जेंव्हा मनाकडे या दृष्टीने पाहू लागाल
-
7:39 - 7:41तेंव्हा तुम्हाला मनाचे अनेक निराळेच आकृतीबंध दिसतील
-
7:41 - 7:44तुम्हाला दिसेल मन खरोखरच अस्वस्थ असल्याचे आणि
-
7:44 - 7:46सदासर्वकाळ .
-
7:46 - 7:49तुमच्या शरिरात थोडी जरी व्याकुळता जाणवल्यास आश्चर्यचकित होऊ नका
-
7:49 - 7:53तुम्ही जेव्हा काहीही न करण्यासाठी बसता आणि तुमच्या मनाला तसे जाणवते.
-
7:53 - 7:55तुम्हाला दिसू शकेल एक मन, मंद
-
7:55 - 7:57आणि कंटाळवाणे, हे सर्व जवळजवळ यांत्रिक असते,
-
7:57 - 7:59असे वाटते, जणू काही तुम्ही
-
7:59 - 8:03उठता आहात,कामाला जात आहात, खात आहात, झोपता आहात, उठता आहात, काम करत आहात.
-
8:03 - 8:05किंवा तो एक लहानसा बोचणारा विचार असू शकेल जो
-
8:05 - 8:10तुमच्या मनात फिरून फिरून मनात घोळत रहात असेल.
-
8:10 - 8:14तर ते काही असो, ध्यान धारणा देते
-
8:14 - 8:18संधी ,मागे जाण्याची .संभाव्यता
-
8:18 - 8:20एक निराळाच दृष्टीकोन देण्याची
-
8:20 - 8:25गोष्टी पाहण्याची ज्या नेहमीच दिसतात तशा नसतात.
-
8:25 - 8:27आपण बदलू शकत नाही
-
8:27 - 8:31आपल्या आयुष्यात घडणारी अगदी लहान गोष्ट्सुद्धा
-
8:31 - 8:34पण आपण बदलू शकतो अनुभव येईल तशी.
-
8:34 - 8:38ध्यानधारणेची हीच सुप्त शक्ति आहे - जागृत राहण्याची.
-
8:38 - 8:41आपल्याला उदबत्त्या जाळाव्या कागणार नाहीत आणि
-
8:41 - 8:43तुम्हाला जमिनीवर बसायला तर निश्चितच लागणार नाही.
-
8:43 - 8:46फक्त १० मिनिटांची फुरसत काढण्याची गरज आहे.
-
8:46 - 8:50मागे जाउन या वर्तमान क्षणाबरोबर नाते जोडले जाण्यासाठी,
-
8:50 - 8:53यामुळे तुम्हाला अनुभूती येईल
-
8:53 - 8:57केंद्रित, शांत आणि स्पष्ट आयुष्याची
-
8:57 - 9:04खूप धन्यवाद. (टाळया).
- Title:
- एन्डी पुडडीकोम्बे : त्यासाठी फक्त सजग १० मिनिटे लागतात.
- Speaker:
- Andy Puddicombe
- Description:
-
तुम्ही पूर्ण १० मिनिटे 'अजिबात काहीही न करणे' शेवटचे कधी केले होते? एसएमएस करणे नाही?, बोलणे किंवा विचार करणे नाही?.सजगता तज्ञ एन्डी पुडडीकोम्बे करत आहेत. "अजिबात काहीही न करण्यातील" परिवर्तनाच्या शक्तिचे वर्णन: केवळ सजगतेने आत्ताचा क्षण अनुभवुन तुमचे मन दररोज १० मिनिटे ताजेतवाने करणे.(उदबत्तीची किंवा विचित्र अवस्थेत बसण्याची गरज नाही.)
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 09:24
![]() |
Jenny Zurawell edited Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak approved Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak accepted Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak commented on Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak edited Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak edited Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak edited Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes | |
![]() |
Chidanand Pathak edited Marathi subtitles for All it takes is 10 mindful minutes |