आपण एका अविश्वसनीय व्यस्त, धकाधकीच्या जगात जगत आहोत.
बऱ्याच वेळा जीवनाचा वेग पिसाटलेला असतो आणि आपली मने नेहमी व्यस्त असतात
आणि आपण सतत काही ना काही तरी करत असतो
हे लक्षात ठेऊन, "काहीही न करण्यासाठी" तुम्ही शेवटचा वेळ कधी काढला होता?
याचा विचार करण्यासाठी तुम्ही एक क्षण काढलात तर मला ते आवडेल.
फक्त दहा मिनिटे कोणताही अडथळा न येता,
आणि जेव्हा मी "काहीही न करण्यासाठी" असे म्हणतो तेव्हा मला खरच काहीही न करणे असे म्हणायचे आहे.
ई-मेल्स करणे नाही, एसएमएस, इंटरनेट नाही,
टीव्ही बघणे नाही, गप्पा नाहीत , खाणे नाही, वाचन नाही
अगदी भूतकाळातल्या आठवणी काढत बसणे किंवा भविष्यकाळाचे
मनसुबेसुद्धा करत बसणे नाही.
निव्वळ काहीही न करणे.
मला इथे बरेच निर्विकार चेहरे दिसत आहेत. (हशा)
माझ्या मते कदाचित तुम्हाला खूपच मागे जावे लागेल.
आणि ही एक अत्यंत विलक्षण गोष्ट आहे. बरोबर?
आपण आपल्या मनाविषयी बोलत आहोत.
मन आपला सर्वात अमूल्य आणि अनमोल स्त्रोत,
ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण न् क्षण अनुभवतो,
ज्या मन वर आपण अवलंबून असतो
एक आनंदी, समाधानी, भावनिक दृष्टया स्थिरव्यक्ति म्हणून असण्यासाठी
आणि त्याचवेळी दयाळू आणि मननशील असण्यासाठी
आणि इतरांबरोबरच्या नातेसंबंधाबाबत समंजस असण्यासाठी.
हेच ते मन आहे ज्याच्यावर, आपण अवलंबून असतो.
प्रत्येक काम केंद्रित होऊन कल्पकतेने, उत्स्फूर्ततेने
आणि करत असलेले आपल्या परिने सर्वोत्तम करण्यासाठी
आणि असे असूनसुद्धा मनाचे संगोपन करण्यासाठी आपण वेळ काढत नाही.
प्रत्यक्षात जास्त वेळ खर्च करतो आपल्या वाहनांची,
आपल्या कपडयालत्त्याची आपल्या केसांची निगा राखण्यात
-- बर बर, कदाचित केसांची नसेल पण लक्षात घ्या मी कुणीकडे चाललो आहे.
परिणीती, अर्थात, आपण तणावग्रस्त होण्यात होते.
तुम्हाला माहित आहे की मन हे कपडे धुण्याच्या यंत्रासारखे सतत घुसळत राहते,
जागच्या जागी फिरत राहते, खूपशा अवघड, गोंधळलेल्या भावना मनात असतात
आणि आपल्याला खरच काही समजत नाही त्याचे काय करायचे
आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आपण इतके विचलित असतो
की प्रत्यक्ष जगत असलेल्या या जगात आपण रहात नाही.
आपल्याला सर्वात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींना आपण मुकतो,
आणि गमतीची गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण असे समजतो की,
ठीक आहे, यालाच 'जगणे' म्हणतात आणि कशातरी पद्धतीने आपल्याला ते जगले पाहिजे.
खर पाहिल तर हे असे असायला नको आहे.
तर मी साधारण ११ वर्षांचा असताना मी गेलो
माझ्या पहिल्या ध्यान धारणेच्या वर्गाला .
विश्वास ठेवा, तुम्ही कल्पना करू शकाल ते सगळे साचेबंदपणाचे नमुने तिथे होते ,
- म्हणजे पायांची घडी घालून जमिनीवर बसणे,
उदबत्त्यां , औषधी चहा, शाकाहारी व्यक्ती असे सगळे काही ,
पण माझी आई जाणार होती आणि कुतूहल वाटून मीसुद्धा तिच्याबरोबर गेलो.
मी काही कुंग फू चित्रपटसुद्धा पाहिले होते आणि मनातल्या मनात
असा विचार केला होता की उडायचे कसे हे मी शिकू शकेन,
पण तेव्हा मी खूपच लहान होतो.
आणि आता मी तिथे होतो, माझ्या मते , इतर बऱ्याच लोकांसारखा,
हे सगळे म्हणजे मनासाठीची अस्पिरीनची गोळी असल्याचे मी गॄहित धरले.
तुम्हाला तणाव येतो, तुम्ही थोडी ध्यान धारणा करता.
हे प्रतिबंधात्मक प्रकारचे असेल मला वाटले नव्हते,
हे सगळे मी २० वर्षांचा होईपर्यंत, जेव्हा अनेक गोष्टी घडल्या
माझ्या आयुष्यात भराभर,
खरोखरच्या गंभीर, माझ्या जीवनात उलथापालथ करणाऱ्या
आणि विचारांचा महापूरच माझ्या मनात आला, ज्यांच्याशी सामना कसा
करायचा हे मला माहित नसलेल्या अशा अवघड भावनांचा महापूर.
प्रत्येक वेळी एक भावना मी दडपल्यासारखी खाली ढकलत होतो,
आणि दुसरी उसळी मारल्यासारखी परत वर येत होती.
खरोखरच अत्यंत तणावग्रस्त काळ होता तो.
मला वाटते आपण सगळेच वेगवेगळ्या तणावांना सामोरे जात असतो.
काही माणसे स्वतःला कामाच्या ढिगाऱ्यात गाडून घेतील,
विचारांना बगल दिल्याबद्दल धन्यवाद देत.
इतर आधारासाठी त्यांच्या मित्रांकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे वळतील.
काही जण दारू प्यायला लागतील, औषधोचार घ्यायला सुरूवाtत करतील..
या सगळयाशी सामना करायचा माझा स्वतःचा मार्ग साधू बनणे हा होता.
म्हणून मी माझा पदवीचा अभ्यास सोडला आणि मी हिमालयाकडे कूच केले.
मी साधू बनलो आणि ध्यानधारणेचा अभ्यास सुरु केला.
लोक मला नेहमी विचारतात कि त्या काळात मी काय शिकलो.
तर स्पष्टच आहे की ध्यानधारणेने गोष्टी बदलल्या.
आपण मान्य करुया की ब्रम्हचारी साधू बनण्याने
अनेक गोष्टी मध्ये बदल घडणार आहे
पण हे त्याहीपेक्षा जास्त होते.
त्याने मला शिकवले - त्याने मला अधिक गुणग्राहकता दिली,
सध्याच्या क्षणाचा अर्थ समजावला.
मला असे म्हणायचे आहे, विचारात हरवून न जाणे,
विचलित न होणे,
अवघड भावनांनी भारावून न जाणे
पण त्या ऐवजी या स्थळी आणि आत्ता असण्याचे शिकायचे,
सावध कसे रहायचे, या क्षणी कसे रहायचे.
माझ्या मते सध्याचा क्षणाला खूपच कमी महत्व दिले आहे.
हे इतके सामान्य वाटते आणि तरीसुद्धा आपण सध्याचा, हा क्षण जगण्यास
इतका कमी वेळ देतो की तो सामान्याहून सामान्य ठरतो.
हारवर्डमधून एक शोध निबंध प्रसिद्ध झाला होता,
अगदि नुकताच , त्यात म्हंटले होते सरासरी आपली मने
जवळजवळ ४७ टक्के एवढा वेळ विचारात गढून गेलेली असतात.
सत्तेचाळीस टक्के.
त्याच बरोबर, अशा प्रकारचे मनाचे सर्वकाळ भरकटणे
हे दुखाःचे थेट कारण सुद्धा आहे.
आता आपण येथे फार वेळ नाही
पण जवळजवळ आपले अर्धे आयुष्य विचारात वाया घालवण्यासाठी
आणि खूपच दुःखाची शक्यता असलेले,
माहित नाही पण, हे एकप्रकारचे शोकात्म, खरतर,
विशेषकरून आपण त्याबद्दल काहीतरी करू शकतो म्हणून
जेव्हा तिथे सकारात्मक, व्यवहार्य, गाठता येण्यासारखी
शास्त्रीयदृष्टया सिद्ध प्रक्रिया उपलब्ध आहे
जी बनणे शक्य करते.आपले मन अधिक सुदृढ,
अधिक सजग आणि कमी तणावग्रस्त.
आणि याची सुंदरता अशी की जरी
हे दिवसातली फक्त १० मिनीट घेत असले,
तरी हे आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकते.
पण हे कसे करायचे ते आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
आपल्याला एक सराव करावा लागेल. एक चौकट लागणार आहे.
जास्त सजग कसे बनायचे हे शिकण्यासाठी.
आणि हेच करणे म्हणजे ध्यानधारणा.
ध्यानधारणा म्हणजे वर्तमान क्षणाची ओळख करून घेणे.
परंतु त्याच्या जवळ जाण्यासाठी माहित असणे आवश्यक आहे
योग्य रस्ता , उत्तम लाभ मिळविण्यासाठीचा .
तर हे सर्व असे आहे , तुम्ही विचार करत असलात तर ,
कारण कारण बरेच लोक असे धरून चालतात
की ध्यानधारणा म्हणजे मनात येणारे विचार थांबवणे,
भावनांचा त्याग करणे मनावर कसा तरी ताबा मिळविणे,
पण खरतर ध्यानधारणा करणे यापेक्षा खूपच वेगळे आहे.
हे जास्त करून पाऊल मागे घेणे
विचार स्पष्टपणे पाहणे,
त्याचे साक्षीदार बनणे, विचार आणि भावना येताना आणि जाताना
निवाडा न करता, पण मन शिथिल, केंद्रित करून .
म्हणजे उदाहरणार्थ, आत्ता या क्षणी
जर मी या चेंडूंवर अवास्तव लक्ष केंद्रित केले तर शक्य होणार नाही
मला शांत होणे आणि त्याच वेळी तुमच्याशी बोलणे
तसेच जर मी तुमच्याशी शांतपणे खूप बोलत बसलो
तर मी चेंडूंवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. मी ते पाडेन .
जीवनात आणि ध्यानधारणा करताना अशा वेळा येतात
की विचारांवर मन गरजेपेक्षा जास्त केंद्रित होते
आणि जीवन जणू काही असे व्हायला लागते.
आयुष्य जगणे खूपच अस्वथ करणारे, दुःखकारक असते.
जेव्हा तुम्ही एवढे तंग आणि तणावपूर्ण असता
आणि कधी कधी आपणअक्सिलरेटरवरचा पाय जरासा जास्तच सैल करतो
आणि मग आयुष्य जणू काही असे होते
अर्थात ध्यानधारणेमध्ये--- - (घोरतो )---------
आपण झोपी जाणे संपवणार आहोत.
म्हणून आपण शोधत आहोत समतोल , केंद्रित शांतपणा
ज्या स्थितीत आपण विचारांना येऊ जाऊ देतो,
नेहमीसारखे विचारात गुंतत न जाता.
जेव्हा आपण सजग राहण्याचे शिकत असतो तेव्हा सर्वसाधारणपणे काय होते
की एखाद्या विचारामुळे आपले मन विचलित होत असते.
असू समजू या की हा विचार चिंता निर्माण करणारा आहे.
सगळे अगदी सुरळीत चालू असते आणि आपल्याला हा चिंता जनक विचार दिसतो
आणि " अरे ! याची मी काळजी करत होतो हे मला समजलेच नाही." असे होते.
तुम्ही परत त्या विचाराकडे जाता, पुन्हा तो मनात आणता. " अरे ! मी काळजीत आहे"
अरे ! मी खरोखरच चिंताग्रस्त आहे. ओहो, किती चिंता आहेत."
आणि आपल्याला समजण्यापूर्वी, बरोबर?,
चिंताग्रस्त वाटण्याचीच आपण चिंता करायला लागतो.
तुम्हाला माहित आहे कि हे वेडेपणाचे आहे. पण आपण असे हे सतत करत असतो
जगण्याच्या अगदी दररोजच्या पातळीवर.
मला माहित नाही, तुम्ही कधी विचार केलात, या आधी
तुमचा दात हलत होता याचा .
तुम्हाला माहित आहे कि तो हलतो आहे आणि त्याने वेदना होतात.
पण मग तुम्ही दर २०,३० सेकंदांनी काय करता?
(पुटपुटत) “हे खरोखरच वेदनामय आहे”. आणि आपण रडकथा उगाळत बसतो. बरोबर?
आणि आपण आपल्यालाच सांगत बसतो
आणि हे आपण सतत करत राहतो.आणि हे शिकताना
अशा पद्धतीने मनाकडे पहायला शिकल्याने निचरा करण्यास सुरुवात करतो.
या रडकथाचा आणि मनातील आकृतीबंधांचा.
पण तुम्ही स्थिरपणे जेंव्हा मनाकडे या दृष्टीने पाहू लागाल
तेंव्हा तुम्हाला मनाचे अनेक निराळेच आकृतीबंध दिसतील
तुम्हाला दिसेल मन खरोखरच अस्वस्थ असल्याचे आणि
सदासर्वकाळ .
तुमच्या शरिरात थोडी जरी व्याकुळता जाणवल्यास आश्चर्यचकित होऊ नका
तुम्ही जेव्हा काहीही न करण्यासाठी बसता आणि तुमच्या मनाला तसे जाणवते.
तुम्हाला दिसू शकेल एक मन, मंद
आणि कंटाळवाणे, हे सर्व जवळजवळ यांत्रिक असते,
असे वाटते, जणू काही तुम्ही
उठता आहात,कामाला जात आहात, खात आहात, झोपता आहात, उठता आहात, काम करत आहात.
किंवा तो एक लहानसा बोचणारा विचार असू शकेल जो
तुमच्या मनात फिरून फिरून मनात घोळत रहात असेल.
तर ते काही असो, ध्यान धारणा देते
संधी ,मागे जाण्याची .संभाव्यता
एक निराळाच दृष्टीकोन देण्याची
गोष्टी पाहण्याची ज्या नेहमीच दिसतात तशा नसतात.
आपण बदलू शकत नाही
आपल्या आयुष्यात घडणारी अगदी लहान गोष्ट्सुद्धा
पण आपण बदलू शकतो अनुभव येईल तशी.
ध्यानधारणेची हीच सुप्त शक्ति आहे - जागृत राहण्याची.
आपल्याला उदबत्त्या जाळाव्या कागणार नाहीत आणि
तुम्हाला जमिनीवर बसायला तर निश्चितच लागणार नाही.
फक्त १० मिनिटांची फुरसत काढण्याची गरज आहे.
मागे जाउन या वर्तमान क्षणाबरोबर नाते जोडले जाण्यासाठी,
यामुळे तुम्हाला अनुभूती येईल
केंद्रित, शांत आणि स्पष्ट आयुष्याची
खूप धन्यवाद. (टाळया).