चेंगराचेंगरी थांबवून जीव वाचवणारं नवीन संशोधन
-
0:01 - 0:02मी फक्त नऊ वर्षांचा होतो,
-
0:02 - 0:07त्यावेळी आजोबांनी मला सांगितलं, की
आमच्या नाशिक शहरात सहा वर्षांपूर्वी -
0:07 - 0:10चेंगराचेंगरीमुळे ३९ मृत्यू झाले होते.
हा भयंकर प्रसंग -
0:10 - 0:12त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला होता.
-
0:12 - 0:16ही घटना २००३ साली
नाशिकच्या कुंभमेळ्यात घडली. -
0:16 - 0:19कुंभमेळा हा जगातल्या
सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक. -
0:19 - 0:23१५ लाख लोक सामावू शकणाऱ्या
आमच्या शहरात -
0:23 - 0:25दर बारा वर्षांनी
-
0:25 - 0:27सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक उतरतात
-
0:27 - 0:29आणि ४५ दिवस मुक्काम करतात.
-
0:30 - 0:33गोदावरीत स्नान करून
आपली सर्व पापं धुवून टाकणं -
0:33 - 0:35हा त्यांचा उद्देश असतो.
-
0:36 - 0:38ही प्रचंड मोठी गर्दी संथ गतीने
पुढे सरकत असते, -
0:38 - 0:41त्यामुळे चेंगराचेंगरी होणं सहज शक्य असतं.
-
0:42 - 0:46नाशिकप्रमाणेच हा मेळा भारतात
आणखी तीन ठिकाणी -
0:46 - 0:48वेगवेगळ्या वेळी भरतो.
-
0:48 - 0:51२००१ ते २०१४ या काळात या घटनांमध्ये
-
0:51 - 0:56चेंगराचेंगरीमुळे २४०० च्या वर
मृत्यू घडून आले आहेत. -
0:57 - 0:59मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं झालं,
-
0:59 - 1:04की दर कुंभमेळ्याच्या वेळी
असे डझनावारी मृत्यू घडतात -
1:04 - 1:08आणि समाज त्यांना अटळ म्हणून,
शहराचं दुर्दैव मानून, -
1:08 - 1:09केवळ पाहत राहतो.
-
1:09 - 1:11मला वाटलं, हे बदललं पाहिजे.
-
1:11 - 1:14आपण यावर उपाय शोधायचा प्रयत्न का करू नये?
-
1:14 - 1:15कारण मला हे चुकीचं वाटत होतं.
-
1:16 - 1:19लहानपणीच कोडिंग शिकल्यामुळे
आणि अंगी उत्पादकवृत्ती असल्यामुळे -
1:19 - 1:21मला एक भन्नाट कल्पना सुचली.
-
1:21 - 1:22(हशा)
-
1:22 - 1:23[उत्पादक मार्ग काढतातच.]
-
1:23 - 1:27माझी भन्नाट कल्पना होती,
गर्दीच्या लोंढ्यावर नियंत्रण ठेवणारी -
1:27 - 1:29एक यंत्रणा तयार करून
-
1:29 - 1:32ती २०१५ सालच्या कुंभमेळ्यात वापरायची.
-
1:32 - 1:36त्यामुळे चेंगराचेंगरी कमी होऊन,
कमी लोक मृत्युमुखी पडतील. -
1:36 - 1:39हे स्वप्न अशक्य कोटीतलं भासत होतं.
-
1:39 - 1:40एका १५ वर्षांच्या मुलासाठी
-
1:40 - 1:43तर हे फारच मोठं स्वप्न होतं.
-
1:43 - 1:46पण २०१५ मध्ये ते स्वप्न साकार झालं.
-
1:46 - 1:50चेंगराचेंगरीचं प्रमाण आणि तीव्रता
-
1:50 - 1:53कमी करण्यात आम्हांला यश आलं,
-
1:53 - 1:55इतकंच नव्हे, तर २०१५
-
1:55 - 1:59हे नाशिकच्या कुंभमेळ्यातलं
चेंगराचेंगरीशिवायचं पहिलंच वर्ष ठरलं. -
2:00 - 2:05(टाळ्या)
-
2:05 - 2:07एकही मृत्यू न घडता हा मेळा पार पडण्याची
-
2:07 - 2:10ही इतिहासातली पहिलीच वेळ होती.
-
2:11 - 2:12आम्ही हे कसं घडवून आणलं?
-
2:13 - 2:16याची सुरुवात २०१४ मध्ये झाली.
त्यावेळी एम आय टी मीडिया लॅब च्या -
2:16 - 2:18नवनिर्माण कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो.
-
2:18 - 2:20कुंभमेळ्याच्या विराट स्वरूपामुळे
-
2:20 - 2:25उभे राहणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने
निर्माण झालेली कुंभथॉन कार्यशाळा. -
2:26 - 2:30आमच्या लक्षात आलं, की
चेंगराचेंगरीचा प्रश्न सोडवण्यासाठी -
2:30 - 2:32तीन गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
-
2:33 - 2:35लोकांची संख्या, ठिकाण,
-
2:35 - 2:39आणि गर्दीच्या चालण्याच्या गतीचा
मिनिटागणिक दर. -
2:39 - 2:43या तीन गोष्टींसाठी कोणतं तंत्रज्ञान
वापरता येईल ते आम्ही शोधू लागलो. -
2:44 - 2:48प्रत्येकाला रेडियो फ्रिक्वेन्सी टोकन देऊन
त्यांचा माग ठेवता येईल का? -
2:48 - 2:52पण ३० दशलक्ष टोकन्स वाटणं
महागडं आणि अव्यवहारी ठरेल -
2:52 - 2:54हे आमच्या लक्षात आलं.
-
2:55 - 2:58प्रतिमा-प्रक्रिया तंत्रज्ञान असणारे
सीसीटीव्ही कॅमेरे वापरता येतील का? -
2:58 - 3:00पुन्हा, तेही प्रचंड संख्येमुळे खर्चिक.
-
3:00 - 3:03तसंच त्यांची ने-आण करणं कठीण.
-
3:03 - 3:06शिवाय बरेचदा कुंभमेळ्याच्या दिवसांत
पाऊस पडतो, -
3:06 - 3:08त्यावेळी ते कुचकामी ठरतील.
-
3:09 - 3:11सेलफोन टॉवर्स चा डेटा वापरता येईल का?
-
3:12 - 3:14हे उत्तर अगदी अचूक वाटलं.
-
3:14 - 3:16पण गंमत अशी, की
-
3:16 - 3:19कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी
-
3:19 - 3:20लोक सेल फोन्स नेत नाहीत.
-
3:21 - 3:25आणि तो डेटा फारसा तपशीलवार नसल्याने
आमच्या उपयोगी पडला नसता. -
3:25 - 3:27तात्काळ आणि सहजपणे
-
3:27 - 3:30डेटा प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देणारं,
स्वस्त, मजबूत, जलरोधक -
3:30 - 3:33असं काहीतरी आम्हाला हवं होतं.
-
3:34 - 3:36म्हणून आम्ही अशियोटो तयार केलं.
-
3:36 - 3:38म्हणजे जपानी भाषेत "पाऊल".
-
3:38 - 3:42यात आहे ने-आण करायला सोपी अशी एक मॅट.
त्या मॅटमध्ये प्रेशर सेन्सर्स असल्याने -
3:42 - 3:45तिच्यावरून चालत जाणाऱ्यांची संख्या
ती मोजते -
3:45 - 3:47आणि तो डेटा पृथक्करणासाठी
आम्ही निर्माण केलेल्या -
3:47 - 3:50एका सॉफ्टवेअरला इंटरनेटद्वारे पाठवते.
-
3:50 - 3:54पावलं मोजण्यात होऊ शकणाऱ्या
चुका टाळण्यासाठी -
3:54 - 3:56मॅटच्या रचनेचा आधार घेतला गेला.
-
3:57 - 4:00मॅटची योग्य रुंदी १८ इंच ठरवण्यात आली.
त्याआधी अनेक वेगळ्या आकारांच्या -
4:00 - 4:03चाचण्या आम्ही घेतल्या होत्या
-
4:03 - 4:05आणि साधारण लोकांच्या चालीचं
निरीक्षण केलं होतं. -
4:06 - 4:09नाहीतर लोक, सेन्सर्सवर पावलं न टाकता
ते ओलांडून गेले असते. -
4:09 - 4:12तीन दिवसांत आम्ही पुठ्ठा आणि
अॅल्युमिनियम फॉईल वापरून -
4:12 - 4:15आमच्या कल्पनेतला नमुना तयार केला.
-
4:15 - 4:16(हशा)
-
4:16 - 4:18आणि खरोखरीच तो यशस्वी ठरला.
-
4:18 - 4:21अॅल्युमिनम कंपाॅझिट पॅनल्स व
पिझोइलेक्ट्रिक प्लेट्सपासून -
4:21 - 4:22आम्ही दुसरा नमुना तयार केला.
-
4:22 - 4:26या प्लेट्सवर दाब पडताच त्यातून
छोटासा विद्युतप्रवाह निर्माण होतो. -
4:27 - 4:30आम्ही रेस्टोरंटस, मॉल, देवळं अशा
-
4:30 - 4:34३० निरनिराळ्या गर्दीच्या ठिकाणी
याची चाचणी घेऊन -
4:34 - 4:36लोकांची प्रतिक्रिया अजमावली.
-
4:37 - 4:39शहरासमोरच्या प्रश्नावर स्थानिक मुलं
-
4:39 - 4:45काम करताना पाहून लोकांनी
उत्साहाने मदत केली. -
4:46 - 4:49माझं वय होतं १५ आणि
माझ्याबरोबरची मुलं विशीत होती. -
4:50 - 4:54आम्ही रंगीत सेन्सर्स केले होते,
-
4:54 - 4:57तेव्हा लोक घाबरून विचारायचे,
-
4:57 - 4:59"याच्यावर पाय ठेवला तर शॉक लागेल का?"
-
4:59 - 5:00(हशा)
-
5:00 - 5:05किंवा जमिनीवर सेन्सर दिसत असेल तर
-
5:05 - 5:06त्याच्यावरुन उडी मारून जायचे.
-
5:06 - 5:07(हशा)
-
5:07 - 5:10जमिनीवर हे काय आहे,
अशी लोकांना भीती वाटू नये म्हणून -
5:10 - 5:14सेन्सरवर आच्छादन घालायचं आम्ही ठरवलं.
-
5:14 - 5:16अशा काही प्रयोगांनंतर आम्ही
-
5:16 - 5:18इंडस्ट्रीयल सेन्सर
-
5:18 - 5:21आणि आच्छादन म्हणून
-
5:21 - 5:23काळं निओप्रीन रबर
-
5:23 - 5:25वापरायचं ठरवलं.
-
5:25 - 5:26हे सेन्सर धोक्याच्या क्षेत्रात वापरले जातात.
-
5:26 - 5:29काळं रबर वापरण्याचा
-
5:29 - 5:33आणखी एक फायदा म्हणजे
-
5:33 - 5:36त्यावर माती साचल्यावर
ते जमिनीसारखंच दिसायचं. -
5:36 - 5:41सेन्सरची जाडी १२ मिमी पेक्षा कमी ठेवण्याची
खबरदारी आम्हांला घ्यावी लागली. -
5:41 - 5:43नाहीतर लोक अडखळून पडले असते, आणि
-
5:43 - 5:45त्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली असती.
-
5:46 - 5:50(हशा)
-
5:50 - 5:51तसं नक्कीच व्हायला नको होतं.
-
5:51 - 5:53(हशा)
-
5:53 - 5:57आम्ही १० मिमी जाडीचा सेन्सर तयार केला.
-
5:57 - 6:00आता डेटा तात्काळ सर्व्हरला पाठवला जातो.
-
6:00 - 6:01आणि एक हीटमॅप काढला जातो.
-
6:01 - 6:05जमिनीवर कार्यरत असणारे
सर्व सेन्सर्स विचारात घेतले जातात. -
6:05 - 6:09गर्दीचा वेग कमी झाला किंवा
गर्दी एका ठराविक प्रमाणाबाहेर वाढली, -
6:09 - 6:12की अधिकाऱ्यांना सूचना दिली जाते.
-
6:13 - 6:18२०१५ च्या कुंभमेळ्यात आम्ही
अशा पाच मॅट्स बसवल्या -
6:18 - 6:20आणि १८ तासांत
-
6:20 - 6:22पाच लाख लोकांची गणना केली.
-
6:22 - 6:27हा डेटा आम्ही अनेक नियंत्रण कक्षांना
तात्काळ उपलब्ध करून दिला -
6:27 - 6:28आणि गर्दीचा प्रवाह सुरक्षित ठेवला.
-
6:28 - 6:32या आणि अशाच काही इतर संशोधनांमुळे
या कुंभमेळ्यात -
6:32 - 6:35चेंगराचेंगरी रोखण्याला मदत झाली.
-
6:36 - 6:38अशियोटो साठी वापरला गेलेला कोड लवकरच
सर्वांच्या वापरासाठी -
6:38 - 6:42खुला करण्यात येणार आहे.
-
6:42 - 6:44हा कोड वापरून कोणी
असेच इतर मोठे मेळावे -
6:44 - 6:46सुरक्षित करू शकलं,
तर मला फार आनंद होईल. -
6:47 - 6:49कुंभमेळ्यातल्या या यशाने
-
6:49 - 6:53मला इतर ठिकाणची चेंगराचेंगरी
थांबवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. -
6:53 - 6:56या प्रणालीची रचना अशी आहे,
-
6:56 - 6:58की ती कोणत्याही नियोजित मेळाव्यासाठी
-
6:58 - 7:01अनुरूप करून वापरता येईल.
-
7:01 - 7:06आता माझं पुढचं स्वप्न आहे, या प्रणालीत
आणखी सुधारणा करून, जास्त अनुकूलन आणून -
7:06 - 7:11गर्दीचा प्रवाह सुरक्षित करून मनुष्यहानी
वाचवण्यासाठी ती जगात सर्वत्र वापरायची. -
7:11 - 7:14कारण, प्रत्येक मानवी जीव हा मौल्यवान आहे.
-
7:14 - 7:16गाण्याच्या मैफिली, खेळांचे सामने,
-
7:16 - 7:18अलाहाबादचा महाकुंभमेळा,
-
7:18 - 7:20मक्केची हज यात्रा,
-
7:20 - 7:22करबालाची शिया यात्रा
-
7:22 - 7:23किंवा व्हॅटिकन सिटी, कुठेही.
-
7:24 - 7:26तुम्हांला काय वाटतं, असं करता येईल?
-
7:26 - 7:27प्रेक्षक: होय!
-
7:27 - 7:28धन्यवाद.
-
7:28 - 7:29(वाहवा)
-
7:29 - 7:32(टाळ्या)
- Title:
- चेंगराचेंगरी थांबवून जीव वाचवणारं नवीन संशोधन
- Speaker:
- निलय कुलकर्णी
- Description:
-
दर तीन वर्षांनी सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक कुंभमेळ्यात आपली पापं धुवून टाकण्यासाठी जमतात. हा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. छोट्या गावांत आणि शहरांत उतरणाऱ्या या प्रचंड मोठ्या जमावामुळे चेंगराचेंगरी होणं अटळ असतं. २००३ साली या मेळाव्यात ३९ माणसं दगावली. २०१४ मध्ये, १५ वर्षांच्या निलय कुलकर्णीने आपलं स्वतःच शिकलेलं प्रोग्रॅमिंगचं कौशल्य वापरून, चेंगराचेंगरी थांबवण्यासाठी एक उपाय शोधायचं ठरवलं. त्याच्या संशोधनाबद्दल जास्त माहिती या भाषणात ऐका. आणि २०१५ चा कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीशिवाय, मनुष्यहानीशिवाय पार पाडण्यात या संशोधनाची कशी मदत झाली, ते पहा.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 07:45
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for A life-saving invention that prevents human stampedes |