WEBVTT 00:00:00.691 --> 00:00:01.969 मी फक्त नऊ वर्षांचा होतो, 00:00:01.993 --> 00:00:06.916 त्यावेळी आजोबांनी मला सांगितलं, की आमच्या नाशिक शहरात सहा वर्षांपूर्वी 00:00:06.940 --> 00:00:09.844 चेंगराचेंगरीमुळे ३९ मृत्यू झाले होते. हा भयंकर प्रसंग 00:00:09.868 --> 00:00:11.884 त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. 00:00:12.461 --> 00:00:15.750 ही घटना २००३ साली नाशिकच्या कुंभमेळ्यात घडली. 00:00:15.774 --> 00:00:18.746 कुंभमेळा हा जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक. 00:00:19.213 --> 00:00:22.943 १५ लाख लोक सामावू शकणाऱ्या आमच्या शहरात 00:00:22.967 --> 00:00:24.546 दर बारा वर्षांनी 00:00:24.570 --> 00:00:27.410 सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक उतरतात 00:00:27.434 --> 00:00:29.077 आणि ४५ दिवस मुक्काम करतात. 00:00:29.601 --> 00:00:32.672 गोदावरीत स्नान करून आपली सर्व पापं धुवून टाकणं 00:00:32.696 --> 00:00:35.021 हा त्यांचा उद्देश असतो. 00:00:35.807 --> 00:00:38.045 ही प्रचंड मोठी गर्दी संथ गतीने पुढे सरकत असते, 00:00:38.069 --> 00:00:41.346 त्यामुळे चेंगराचेंगरी होणं सहज शक्य असतं. 00:00:42.002 --> 00:00:46.311 नाशिकप्रमाणेच हा मेळा भारतात आणखी तीन ठिकाणी 00:00:46.335 --> 00:00:48.054 वेगवेगळ्या वेळी भरतो. 00:00:48.078 --> 00:00:50.847 २००१ ते २०१४ या काळात या घटनांमध्ये 00:00:50.871 --> 00:00:56.369 चेंगराचेंगरीमुळे २४०० च्या वर मृत्यू घडून आले आहेत. 00:00:57.362 --> 00:00:59.219 मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं झालं, 00:00:59.243 --> 00:01:03.758 की दर कुंभमेळ्याच्या वेळी असे डझनावारी मृत्यू घडतात 00:01:03.782 --> 00:01:07.607 आणि समाज त्यांना अटळ म्हणून, शहराचं दुर्दैव मानून, 00:01:07.631 --> 00:01:08.908 केवळ पाहत राहतो. NOTE Paragraph 00:01:09.448 --> 00:01:10.878 मला वाटलं, हे बदललं पाहिजे. 00:01:10.902 --> 00:01:13.877 आपण यावर उपाय शोधायचा प्रयत्न का करू नये? 00:01:13.901 --> 00:01:15.389 कारण मला हे चुकीचं वाटत होतं. 00:01:15.701 --> 00:01:19.153 लहानपणीच कोडिंग शिकल्यामुळे आणि अंगी उत्पादकवृत्ती असल्यामुळे 00:01:19.177 --> 00:01:20.845 मला एक भन्नाट कल्पना सुचली. NOTE Paragraph 00:01:20.869 --> 00:01:22.057 (हशा) NOTE Paragraph 00:01:22.081 --> 00:01:23.466 [उत्पादक मार्ग काढतातच.] NOTE Paragraph 00:01:23.490 --> 00:01:26.555 माझी भन्नाट कल्पना होती, गर्दीच्या लोंढ्यावर नियंत्रण ठेवणारी 00:01:26.579 --> 00:01:29.041 एक यंत्रणा तयार करून 00:01:29.065 --> 00:01:32.054 ती २०१५ सालच्या कुंभमेळ्यात वापरायची. 00:01:32.078 --> 00:01:35.683 त्यामुळे चेंगराचेंगरी कमी होऊन, कमी लोक मृत्युमुखी पडतील. NOTE Paragraph 00:01:36.177 --> 00:01:38.648 हे स्वप्न अशक्य कोटीतलं भासत होतं. 00:01:38.672 --> 00:01:40.440 एका १५ वर्षांच्या मुलासाठी 00:01:40.464 --> 00:01:42.645 तर हे फारच मोठं स्वप्न होतं. 00:01:42.669 --> 00:01:46.208 पण २०१५ मध्ये ते स्वप्न साकार झालं. 00:01:46.232 --> 00:01:49.925 चेंगराचेंगरीचं प्रमाण आणि तीव्रता 00:01:49.949 --> 00:01:52.901 कमी करण्यात आम्हांला यश आलं, 00:01:52.925 --> 00:01:55.102 इतकंच नव्हे, तर २०१५ 00:01:55.126 --> 00:01:59.133 हे नाशिकच्या कुंभमेळ्यातलं चेंगराचेंगरीशिवायचं पहिलंच वर्ष ठरलं. NOTE Paragraph 00:01:59.596 --> 00:02:04.934 (टाळ्या) NOTE Paragraph 00:02:04.958 --> 00:02:07.444 एकही मृत्यू न घडता हा मेळा पार पडण्याची 00:02:07.468 --> 00:02:10.214 ही इतिहासातली पहिलीच वेळ होती. NOTE Paragraph 00:02:10.888 --> 00:02:12.038 आम्ही हे कसं घडवून आणलं? 00:02:12.623 --> 00:02:15.654 याची सुरुवात २०१४ मध्ये झाली. त्यावेळी एम आय टी मीडिया लॅब च्या 00:02:15.678 --> 00:02:18.354 नवनिर्माण कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. 00:02:18.378 --> 00:02:20.347 कुंभमेळ्याच्या विराट स्वरूपामुळे 00:02:20.371 --> 00:02:24.775 उभे राहणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने निर्माण झालेली कुंभथॉन कार्यशाळा. NOTE Paragraph 00:02:25.784 --> 00:02:30.292 आमच्या लक्षात आलं, की चेंगराचेंगरीचा प्रश्न सोडवण्यासाठी 00:02:30.316 --> 00:02:32.480 तीन गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. 00:02:32.504 --> 00:02:35.243 लोकांची संख्या, ठिकाण, 00:02:35.267 --> 00:02:38.726 आणि गर्दीच्या चालण्याच्या गतीचा मिनिटागणिक दर. 00:02:39.241 --> 00:02:43.370 या तीन गोष्टींसाठी कोणतं तंत्रज्ञान वापरता येईल ते आम्ही शोधू लागलो. 00:02:44.091 --> 00:02:48.345 प्रत्येकाला रेडियो फ्रिक्वेन्सी टोकन देऊन त्यांचा माग ठेवता येईल का? 00:02:48.369 --> 00:02:51.782 पण ३० दशलक्ष टोकन्स वाटणं महागडं आणि अव्यवहारी ठरेल 00:02:51.806 --> 00:02:53.742 हे आमच्या लक्षात आलं. 00:02:54.545 --> 00:02:57.926 प्रतिमा-प्रक्रिया तंत्रज्ञान असणारे सीसीटीव्ही कॅमेरे वापरता येतील का? 00:02:57.950 --> 00:02:59.997 पुन्हा, तेही प्रचंड संख्येमुळे खर्चिक. 00:03:00.021 --> 00:03:02.899 तसंच त्यांची ने-आण करणं कठीण. 00:03:02.923 --> 00:03:05.741 शिवाय बरेचदा कुंभमेळ्याच्या दिवसांत पाऊस पडतो, 00:03:05.765 --> 00:03:08.147 त्यावेळी ते कुचकामी ठरतील. 00:03:09.120 --> 00:03:11.445 सेलफोन टॉवर्स चा डेटा वापरता येईल का? 00:03:11.806 --> 00:03:14.273 हे उत्तर अगदी अचूक वाटलं. 00:03:14.297 --> 00:03:16.070 पण गंमत अशी, की 00:03:16.094 --> 00:03:18.839 कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी 00:03:18.863 --> 00:03:20.347 लोक सेल फोन्स नेत नाहीत. 00:03:20.887 --> 00:03:24.601 आणि तो डेटा फारसा तपशीलवार नसल्याने आमच्या उपयोगी पडला नसता. 00:03:24.625 --> 00:03:27.078 तात्काळ आणि सहजपणे 00:03:27.102 --> 00:03:30.419 डेटा प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देणारं, स्वस्त, मजबूत, जलरोधक 00:03:30.443 --> 00:03:32.854 असं काहीतरी आम्हाला हवं होतं. NOTE Paragraph 00:03:33.672 --> 00:03:36.028 म्हणून आम्ही अशियोटो तयार केलं. 00:03:36.052 --> 00:03:38.137 म्हणजे जपानी भाषेत "पाऊल". 00:03:38.161 --> 00:03:42.346 यात आहे ने-आण करायला सोपी अशी एक मॅट. त्या मॅटमध्ये प्रेशर सेन्सर्स असल्याने 00:03:42.370 --> 00:03:44.861 तिच्यावरून चालत जाणाऱ्यांची संख्या ती मोजते 00:03:44.885 --> 00:03:47.317 आणि तो डेटा पृथक्करणासाठी आम्ही निर्माण केलेल्या 00:03:47.341 --> 00:03:49.888 एका सॉफ्टवेअरला इंटरनेटद्वारे पाठवते. 00:03:50.483 --> 00:03:53.771 पावलं मोजण्यात होऊ शकणाऱ्या चुका टाळण्यासाठी 00:03:53.795 --> 00:03:56.445 मॅटच्या रचनेचा आधार घेतला गेला. 00:03:56.803 --> 00:04:00.329 मॅटची योग्य रुंदी १८ इंच ठरवण्यात आली. त्याआधी अनेक वेगळ्या आकारांच्या 00:04:00.353 --> 00:04:02.592 चाचण्या आम्ही घेतल्या होत्या 00:04:02.616 --> 00:04:05.203 आणि साधारण लोकांच्या चालीचं निरीक्षण केलं होतं. 00:04:06.111 --> 00:04:09.016 नाहीतर लोक, सेन्सर्सवर पावलं न टाकता ते ओलांडून गेले असते. NOTE Paragraph 00:04:09.040 --> 00:04:11.612 तीन दिवसांत आम्ही पुठ्ठा आणि अॅल्युमिनियम फॉईल वापरून 00:04:11.636 --> 00:04:14.510 आमच्या कल्पनेतला नमुना तयार केला. NOTE Paragraph 00:04:14.534 --> 00:04:15.535 (हशा) NOTE Paragraph 00:04:15.559 --> 00:04:17.933 आणि खरोखरीच तो यशस्वी ठरला. 00:04:17.957 --> 00:04:20.647 अॅल्युमिनम कंपाॅझिट पॅनल्स व पिझोइलेक्ट्रिक प्लेट्सपासून 00:04:20.671 --> 00:04:22.309 आम्ही दुसरा नमुना तयार केला. 00:04:22.333 --> 00:04:25.904 या प्लेट्सवर दाब पडताच त्यातून छोटासा विद्युतप्रवाह निर्माण होतो. 00:04:26.959 --> 00:04:30.228 आम्ही रेस्टोरंटस, मॉल, देवळं अशा 00:04:30.252 --> 00:04:33.974 ३० निरनिराळ्या गर्दीच्या ठिकाणी याची चाचणी घेऊन 00:04:33.998 --> 00:04:35.632 लोकांची प्रतिक्रिया अजमावली. 00:04:36.720 --> 00:04:38.743 शहरासमोरच्या प्रश्नावर स्थानिक मुलं 00:04:38.767 --> 00:04:45.243 काम करताना पाहून लोकांनी उत्साहाने मदत केली. 00:04:45.680 --> 00:04:48.799 माझं वय होतं १५ आणि माझ्याबरोबरची मुलं विशीत होती. NOTE Paragraph 00:04:49.736 --> 00:04:54.227 आम्ही रंगीत सेन्सर्स केले होते, 00:04:54.251 --> 00:04:57.092 तेव्हा लोक घाबरून विचारायचे, 00:04:57.116 --> 00:04:59.323 "याच्यावर पाय ठेवला तर शॉक लागेल का?" NOTE Paragraph 00:04:59.347 --> 00:05:00.348 (हशा) NOTE Paragraph 00:05:00.372 --> 00:05:04.744 किंवा जमिनीवर सेन्सर दिसत असेल तर 00:05:04.768 --> 00:05:06.261 त्याच्यावरुन उडी मारून जायचे. NOTE Paragraph 00:05:06.285 --> 00:05:07.361 (हशा) NOTE Paragraph 00:05:07.385 --> 00:05:10.449 जमिनीवर हे काय आहे, अशी लोकांना भीती वाटू नये म्हणून 00:05:10.473 --> 00:05:13.530 सेन्सरवर आच्छादन घालायचं आम्ही ठरवलं. NOTE Paragraph 00:05:13.554 --> 00:05:15.530 अशा काही प्रयोगांनंतर आम्ही 00:05:15.554 --> 00:05:18.364 इंडस्ट्रीयल सेन्सर 00:05:18.388 --> 00:05:21.357 आणि आच्छादन म्हणून 00:05:21.381 --> 00:05:22.532 काळं निओप्रीन रबर 00:05:22.556 --> 00:05:24.637 वापरायचं ठरवलं. 00:05:24.661 --> 00:05:25.903 हे सेन्सर धोक्याच्या क्षेत्रात वापरले जातात. 00:05:26.374 --> 00:05:29.191 काळं रबर वापरण्याचा 00:05:29.215 --> 00:05:32.842 आणखी एक फायदा म्हणजे 00:05:32.866 --> 00:05:35.516 त्यावर माती साचल्यावर ते जमिनीसारखंच दिसायचं. 00:05:35.540 --> 00:05:40.652 सेन्सरची जाडी १२ मिमी पेक्षा कमी ठेवण्याची खबरदारी आम्हांला घ्यावी लागली. 00:05:41.206 --> 00:05:43.435 नाहीतर लोक अडखळून पडले असते, आणि 00:05:43.459 --> 00:05:45.364 त्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली असती. NOTE Paragraph 00:05:45.792 --> 00:05:49.579 (हशा) NOTE Paragraph 00:05:49.603 --> 00:05:50.965 तसं नक्कीच व्हायला नको होतं. NOTE Paragraph 00:05:50.989 --> 00:05:52.778 (हशा) NOTE Paragraph 00:05:52.802 --> 00:05:56.881 आम्ही १० मिमी जाडीचा सेन्सर तयार केला. NOTE Paragraph 00:05:57.469 --> 00:05:59.709 आता डेटा तात्काळ सर्व्हरला पाठवला जातो. 00:05:59.733 --> 00:06:01.381 आणि एक हीटमॅप काढला जातो. 00:06:01.405 --> 00:06:04.748 जमिनीवर कार्यरत असणारे सर्व सेन्सर्स विचारात घेतले जातात. 00:06:04.772 --> 00:06:09.057 गर्दीचा वेग कमी झाला किंवा गर्दी एका ठराविक प्रमाणाबाहेर वाढली, 00:06:09.081 --> 00:06:12.216 की अधिकाऱ्यांना सूचना दिली जाते. NOTE Paragraph 00:06:12.992 --> 00:06:17.984 २०१५ च्या कुंभमेळ्यात आम्ही अशा पाच मॅट्स बसवल्या 00:06:18.008 --> 00:06:20.398 आणि १८ तासांत 00:06:20.422 --> 00:06:22.104 पाच लाख लोकांची गणना केली. 00:06:22.128 --> 00:06:26.505 हा डेटा आम्ही अनेक नियंत्रण कक्षांना तात्काळ उपलब्ध करून दिला 00:06:26.529 --> 00:06:28.405 आणि गर्दीचा प्रवाह सुरक्षित ठेवला. NOTE Paragraph 00:06:28.429 --> 00:06:31.874 या आणि अशाच काही इतर संशोधनांमुळे या कुंभमेळ्यात 00:06:31.898 --> 00:06:35.050 चेंगराचेंगरी रोखण्याला मदत झाली. NOTE Paragraph 00:06:35.585 --> 00:06:38.458 अशियोटो साठी वापरला गेलेला कोड लवकरच सर्वांच्या वापरासाठी 00:06:38.482 --> 00:06:41.894 खुला करण्यात येणार आहे. 00:06:41.918 --> 00:06:43.895 हा कोड वापरून कोणी असेच इतर मोठे मेळावे 00:06:43.919 --> 00:06:46.131 सुरक्षित करू शकलं, तर मला फार आनंद होईल. NOTE Paragraph 00:06:46.878 --> 00:06:48.804 कुंभमेळ्यातल्या या यशाने 00:06:48.828 --> 00:06:52.740 मला इतर ठिकाणची चेंगराचेंगरी थांबवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. 00:06:52.764 --> 00:06:55.573 या प्रणालीची रचना अशी आहे, 00:06:55.597 --> 00:06:57.591 की ती कोणत्याही नियोजित मेळाव्यासाठी 00:06:57.615 --> 00:07:01.411 अनुरूप करून वापरता येईल. 00:07:01.435 --> 00:07:05.745 आता माझं पुढचं स्वप्न आहे, या प्रणालीत आणखी सुधारणा करून, जास्त अनुकूलन आणून 00:07:05.769 --> 00:07:11.238 गर्दीचा प्रवाह सुरक्षित करून मनुष्यहानी वाचवण्यासाठी ती जगात सर्वत्र वापरायची. 00:07:11.262 --> 00:07:14.049 कारण, प्रत्येक मानवी जीव हा मौल्यवान आहे. 00:07:14.073 --> 00:07:16.451 गाण्याच्या मैफिली, खेळांचे सामने, 00:07:16.475 --> 00:07:18.362 अलाहाबादचा महाकुंभमेळा, 00:07:18.386 --> 00:07:19.837 मक्केची हज यात्रा, 00:07:19.861 --> 00:07:21.758 करबालाची शिया यात्रा 00:07:21.782 --> 00:07:23.266 किंवा व्हॅटिकन सिटी, कुठेही. NOTE Paragraph 00:07:23.893 --> 00:07:25.770 तुम्हांला काय वाटतं, असं करता येईल? NOTE Paragraph 00:07:25.794 --> 00:07:26.945 प्रेक्षक: होय! NOTE Paragraph 00:07:26.969 --> 00:07:28.120 धन्यवाद. NOTE Paragraph 00:07:28.144 --> 00:07:29.145 (वाहवा) NOTE Paragraph 00:07:29.169 --> 00:07:32.439 (टाळ्या)