04 सीपीयु मेमरी आयओ v8
-
0:11 - 0:13हाय, माझं माव मॅडीसन मॅक्सी.
-
0:13 - 0:16माझी लूमिया नावाची कंपनी आहे,
-
0:16 - 0:21आम्ही स्मार्ट कपड्यांसाठी स्मार्ट कापड तयार करतो आणि स्मार्ट सॉफ्ट चांगली उत्पादनं तयार करतो.
-
0:22 - 0:25कापडाचा विचार केला तर जग अमर्याद आहे.
-
0:25 - 0:29माझं नाव डॅनिएल अॅपलस्टोन आहे आणि
मी अदरमशीन कंपनीची सीइओ आहे. -
0:32 - 0:34आम्ही डेस्कटॉप मिलिंग मशीन्स बनवतो.
-
0:34 - 0:41मिलिंग मशीनमध्ये एक फिरणारं कापण्यासाठीचं टूल असतं आणि ते मटेरीयलमधून फिरून 3डी वस्तू तयार करतं.
-
0:43 - 0:47प्रत्यक्षात, सगळे कॉम्प्युटर्स त्याच चार मूलभूत
गोष्टी करतात. -
0:47 - 0:48त्यांच्यात माहिती इनपुट केली जाते,
-
0:48 - 0:51साठवली जाते आणि ते माहितीवर प्रक्रिया
करतात, -
0:51 - 0:53आणि मग, माहिती आऊटपुट करतात.
-
0:53 - 0:57यातील प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या
भागाद्वारे केली जाते. -
0:57 - 1:05बाहेरच्या जगातून इनपुट घेणारी आणि त्याचे बायनरी माहितीत रूपांतर करणारी इनपुट साधनं आहेत.
-
1:05 - 1:08ही माहिती साठवण्यासाठी मेमरी असते.
-
1:08 - 1:12सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा सीपीयु असते,
-
1:12 - 1:15जिथे सगळी कॅलक्युलेशन्स केली जातात.
-
1:15 - 1:21आणि शेवटी, आऊटपुट साधनं माहिती घेऊन तिचं
प्रत्यक्ष आऊटपुटमध्ये रूपांतर करतात. -
1:22 - 1:24आधी इनपुटबद्दल बोलूया.
-
1:24 - 1:30कॉम्प्युटर्स वेगवेगळ्या प्रकारचं इनपुट घेऊ शकतात. उदा. कॉम्प्युटरचा कीबोर्ड, फोनचं टचपॅड,
-
1:31 - 1:33कॅमेरा, मायक्रोफोन, किंवा जीपीएस.
-
1:34 - 1:39एवढंच काय कारवरील सेन्सर्स, थर्मोस्टॅट, किंवा ड्रोन
हीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इनपुट साधनंच आहेत. -
1:40 - 1:46आता, इनपुट कॉम्प्युटरमधून कसा
प्रवास करून आऊटपुट बनतं ते पाहूया. -
1:47 - 1:53जेव्हा आपण कीबोर्डवरची की दाबतो - उदा. अक्षर "B", तेव्हा कीबोर्ड अक्षराचं रूपांतर संख्येत करतो.
-
1:54 - 1:58ती संख्या कॉम्प्युटरमध्ये बायनरी म्हणून पाठवली
जाते, एक आणि शून्याच्या रूपात. -
2:00 - 2:05या संख्येपासून सुरुवात करून सीपीयु "B" अक्षरासाठी प्रत्येक पिक्सेल कसं दाखवायचं, ते कॅलक्युलेट करतो.
-
2:06 - 2:11सीपीयु मेमरीला पायरी-पायरीनं सूचना पाठवायची विनंती करतो, आणि मेमरी "B" कसं काढायचं ते सांगते.
-
2:12 - 2:17सीपीयु या सूचना रन करते आणि त्याचा निकाल
मेमरीमध्ये पिक्सेलच्या रूपात साठवते. -
2:18 - 2:22शेवटी, पिक्सेल स्वरूपातली माहिती बायनरी स्वरूपात स्क्रीनकडे पाठवली जाते.
-
2:23 - 2:30स्क्रीन हे आऊटपुट साधन आहे, ते बायनरी सिग्नल्सचं रूपांतर छोटे दिवे आणि रंगांमध्ये करतं, ते आपल्याला दिसतात.
-
2:32 - 2:36हे सगळं इतक्या लवकर होतं की क्षणार्धात
झाल्यासारखं वाटतं. -
2:36 - 2:42पण प्रत्येक अक्षर दाखवण्यासाठी कॉम्प्युटर
हजारो सूचना रन करतो, -
2:42 - 2:45तुमच्या बोटानं की पॉइंटला स्पर्श केल्यापासून.
-
2:48 - 2:53त्या उदाहरणात, स्क्रीन हे आऊटपुट साधन होतं, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची आऊटपुट साधनं आहेत
-
2:53 - 2:58ती कॉम्प्युटरकडून बायनरी सिग्नल घेऊन प्रत्यक्ष
जगात काहीतरी करतात. -
2:58 - 3:03उदा. स्पीकर ध्वनी ऐकवेल, आणि 3डी प्रिंटर वस्तू प्रिंट
करेल. -
3:04 - 3:09आऊटपुट साधनं प्रत्यक्ष हालचालसुद्धा नियंत्रित करू शकतात. उदा. रोबोटिक आर्म, कारची मोटर,
-
3:09 - 3:12किंवा माझी कंपनी बनवते त्या मिलिंग मशीनचं
कापण्याचं साधन. -
3:14 - 3:19नवीन प्रकारची इनपुट आणि आऊटपुट कॉम्प्युटरला जगाशी नवीन प्रकारे संवाद साधू देतात.
-
3:19 - 3:25मेमरी आणि सीपीयुचा वेग आणि आकार यातील
सुधारणांमुळं हे शक्य झालं आहे. -
3:25 - 3:29काम जितकं गुंतागुंतीचं असेल आणि जितकी जास्त माहिती इनपुट आणि आऊटपुट केली जाईल,
-
3:29 - 3:33तितकी जास्त प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरी
कॉम्प्युटरला आवश्यक असते. -
3:34 - 3:41स्क्रीनवर अक्षरं टाईप करणं सोपं असू शकतं पण
गुंतागुंतीचं 3 डी ग्राफिक्स किंवा हाय-डेफीनेशन चित्रपट -
3:41 - 3:46करण्यासाठी आधुनिक कॉम्प्युटर्सना सर्व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी अनेक सीपीयु असतात.
-
3:47 - 3:50आणि ती साठवण्यासाठी अनेक गीगाबाईट्स इतकी
मेमरी असते. -
3:51 - 3:57तुम्हाला कॉम्प्युटर वापरून काहीही करायचं असलं
तरीही, त्यातील प्रत्येक कृती म्हणजे: -
3:58 - 4:00प्रत्यक्ष जगातील माहिती इनपुट म्हणून घेणं,
-
4:01 - 4:05साठवणं आणि त्या माहितीवर प्रक्रिया करणं, आणि
-
4:05 - 4:08ते आऊटपुट पुन्हा प्रत्यक्ष जगात पाठवणं हेच असतं.
- Title:
- 04 सीपीयु मेमरी आयओ v8
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Duration:
- 04:17
Tomedes edited Marathi subtitles for 04 CPUMemoryIO v8 |