हाय, माझं माव मॅडीसन मॅक्सी.
माझी लूमिया नावाची कंपनी आहे,
आम्ही स्मार्ट कपड्यांसाठी स्मार्ट कापड तयार करतो आणि स्मार्ट सॉफ्ट चांगली उत्पादनं तयार करतो.
कापडाचा विचार केला तर जग अमर्याद आहे.
माझं नाव डॅनिएल अॅपलस्टोन आहे आणि
मी अदरमशीन कंपनीची सीइओ आहे.
आम्ही डेस्कटॉप मिलिंग मशीन्स बनवतो.
मिलिंग मशीनमध्ये एक फिरणारं कापण्यासाठीचं टूल असतं आणि ते मटेरीयलमधून फिरून 3डी वस्तू तयार करतं.
प्रत्यक्षात, सगळे कॉम्प्युटर्स त्याच चार मूलभूत
गोष्टी करतात.
त्यांच्यात माहिती इनपुट केली जाते,
साठवली जाते आणि ते माहितीवर प्रक्रिया
करतात,
आणि मग, माहिती आऊटपुट करतात.
यातील प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या
भागाद्वारे केली जाते.
बाहेरच्या जगातून इनपुट घेणारी आणि त्याचे बायनरी माहितीत रूपांतर करणारी इनपुट साधनं आहेत.
ही माहिती साठवण्यासाठी मेमरी असते.
सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा सीपीयु असते,
जिथे सगळी कॅलक्युलेशन्स केली जातात.
आणि शेवटी, आऊटपुट साधनं माहिती घेऊन तिचं
प्रत्यक्ष आऊटपुटमध्ये रूपांतर करतात.
आधी इनपुटबद्दल बोलूया.
कॉम्प्युटर्स वेगवेगळ्या प्रकारचं इनपुट घेऊ शकतात. उदा. कॉम्प्युटरचा कीबोर्ड, फोनचं टचपॅड,
कॅमेरा, मायक्रोफोन, किंवा जीपीएस.
एवढंच काय कारवरील सेन्सर्स, थर्मोस्टॅट, किंवा ड्रोन
हीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इनपुट साधनंच आहेत.
आता, इनपुट कॉम्प्युटरमधून कसा
प्रवास करून आऊटपुट बनतं ते पाहूया.
जेव्हा आपण कीबोर्डवरची की दाबतो - उदा. अक्षर "B", तेव्हा कीबोर्ड अक्षराचं रूपांतर संख्येत करतो.
ती संख्या कॉम्प्युटरमध्ये बायनरी म्हणून पाठवली
जाते, एक आणि शून्याच्या रूपात.
या संख्येपासून सुरुवात करून सीपीयु "B" अक्षरासाठी प्रत्येक पिक्सेल कसं दाखवायचं, ते कॅलक्युलेट करतो.
सीपीयु मेमरीला पायरी-पायरीनं सूचना पाठवायची विनंती करतो, आणि मेमरी "B" कसं काढायचं ते सांगते.
सीपीयु या सूचना रन करते आणि त्याचा निकाल
मेमरीमध्ये पिक्सेलच्या रूपात साठवते.
शेवटी, पिक्सेल स्वरूपातली माहिती बायनरी स्वरूपात स्क्रीनकडे पाठवली जाते.
स्क्रीन हे आऊटपुट साधन आहे, ते बायनरी सिग्नल्सचं रूपांतर छोटे दिवे आणि रंगांमध्ये करतं, ते आपल्याला दिसतात.
हे सगळं इतक्या लवकर होतं की क्षणार्धात
झाल्यासारखं वाटतं.
पण प्रत्येक अक्षर दाखवण्यासाठी कॉम्प्युटर
हजारो सूचना रन करतो,
तुमच्या बोटानं की पॉइंटला स्पर्श केल्यापासून.
त्या उदाहरणात, स्क्रीन हे आऊटपुट साधन होतं, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची आऊटपुट साधनं आहेत
ती कॉम्प्युटरकडून बायनरी सिग्नल घेऊन प्रत्यक्ष
जगात काहीतरी करतात.
उदा. स्पीकर ध्वनी ऐकवेल, आणि 3डी प्रिंटर वस्तू प्रिंट
करेल.
आऊटपुट साधनं प्रत्यक्ष हालचालसुद्धा नियंत्रित करू शकतात. उदा. रोबोटिक आर्म, कारची मोटर,
किंवा माझी कंपनी बनवते त्या मिलिंग मशीनचं
कापण्याचं साधन.
नवीन प्रकारची इनपुट आणि आऊटपुट कॉम्प्युटरला जगाशी नवीन प्रकारे संवाद साधू देतात.
मेमरी आणि सीपीयुचा वेग आणि आकार यातील
सुधारणांमुळं हे शक्य झालं आहे.
काम जितकं गुंतागुंतीचं असेल आणि जितकी जास्त माहिती इनपुट आणि आऊटपुट केली जाईल,
तितकी जास्त प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरी
कॉम्प्युटरला आवश्यक असते.
स्क्रीनवर अक्षरं टाईप करणं सोपं असू शकतं पण
गुंतागुंतीचं 3 डी ग्राफिक्स किंवा हाय-डेफीनेशन चित्रपट
करण्यासाठी आधुनिक कॉम्प्युटर्सना सर्व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी अनेक सीपीयु असतात.
आणि ती साठवण्यासाठी अनेक गीगाबाईट्स इतकी
मेमरी असते.
तुम्हाला कॉम्प्युटर वापरून काहीही करायचं असलं
तरीही, त्यातील प्रत्येक कृती म्हणजे:
प्रत्यक्ष जगातील माहिती इनपुट म्हणून घेणं,
साठवणं आणि त्या माहितीवर प्रक्रिया करणं, आणि
ते आऊटपुट पुन्हा प्रत्यक्ष जगात पाठवणं हेच असतं.