मानवजात, प्रसिद्धी आणि प्रेमाबद्दलचे विचार
-
0:04 - 0:05नमस्कार.
-
0:06 - 0:08मी एक चित्रपटातील महानायक आहे,
मी ५१ वर्षांचा आहे, -
0:10 - 0:12तरूण दिसावे यासाठी मी बोटॉक्स वापरत नाही.
-
0:12 - 0:13(हशा)
-
0:13 - 0:15मी निर्मळ आहे, पण तुम्ही पाहिल्याप्रमाणे
-
0:15 - 0:18मी माझ्या चित्रपटातील २१ वर्षीय
मुलासारखा वागतो. -
0:18 - 0:20हो खरंच मी वागतो.
-
0:20 - 0:25मी भारतातील करोडो लोकांना
स्वप्ने विकतो, त्यांना प्रेम वाटतो. -
0:25 - 0:27ते मला जगातला सर्वात उत्तम
प्रियकर मानतात. -
0:27 - 0:29(हशा)
-
0:30 - 0:33कुणाला सांगणार नसाल तर
मी तुम्हाला सांगतो मी तसा नाही -
0:33 - 0:35पण त्यांचा समज मी कायम ठेवू इच्छितो.
-
0:35 - 0:36(हशा)
-
0:36 - 0:37मला सांगितले गेले,
-
0:37 - 0:40इथे तुमच्यापैकी बरेचजण आहेत
ज्यांनी माझं काम -
0:40 - 0:41पाहिलेलं नाही आणि मला
-
0:41 - 0:44त्यांची मी कीव करतो.
-
0:44 - 0:46(टाळ्या)
-
0:49 - 0:52त्यामुळे वस्तुस्थिती नाकारता येत नाही
कि मी पूर्णतः स्वकेंद्रित आहे -
0:52 - 0:53जसं महानायकाने असायला हवं
-
0:53 - 0:55(हशा)
-
0:55 - 0:58त्याचवेळी माझे मित्र क्रिस आणि ज्युलिएट
यांनी मला इथे बोलावलं -
0:58 - 1:00भविष्यातील "तुम्ही" यावर बोलायला
-
1:00 - 1:03स्वाभाविकपणे, त्याचाच अर्थ
मी माझ्या सध्याच्या मी बद्दल बोलणार -
1:03 - 1:05(हशा)
-
1:07 - 1:10कारण मी हे खरंच मानतो कि मानवजात
पुष्कळशी माझ्यासारखी आहे. -
1:10 - 1:11(हशा)
-
1:11 - 1:13खरंच ती आहे.
-
1:13 - 1:14वृद्ध होणाऱ्या चित्रपट
-
1:15 - 1:18नायकासारखी आहे, तिच्याभोवती असणाऱ्या
नवीनतेत चाचपडणारी, -
1:18 - 1:21मूलतः ती बरोबर आहे कि नाही
याचे कुतूहल बाळगत -
1:21 - 1:23आणि तरीही तमा न बाळगता चमकत
-
1:23 - 1:25राहण्याचा मार्ग शोधायचा प्रयत्न करते आहे.
-
1:26 - 1:29भारताची राजधानी, नवी दिल्लीत
एका निर्वासितांच्या वसाहतीत माझा जन्म झाला -
1:30 - 1:32आणि माझे वडील एक स्वातंत्र्यसैनिक होते.
-
1:32 - 1:35माझी आई इतरांच्या आई सारखीच
जीवनसंग्राम करणारी सैनिक होती. -
1:38 - 1:41आणि आपल्या मूळ पूर्वजांप्रमाणेच
-
1:41 - 1:42अस्तित्वासाठी आम्ही झगडलो.
-
1:43 - 1:45जेव्हा मी माझ्या विशीच्या पूर्वार्धात होतो
-
1:45 - 1:47मी माझ्या दोन्ही पालकांना गमावलं,
-
1:47 - 1:50जे मी मान्य केले पाहिजे कि तो आता
माझा निष्काळजीपणा वाटतो, -
1:50 - 1:51पण --
-
1:52 - 1:55(हशा)
-
1:57 - 1:59माझे वडील वारले
ती रात्री मला आठवते -
1:59 - 2:04मला शेजारचा ड्रायव्हर आठवतो
जो आम्हाला हॉस्पिटलला नेत होता. -
2:04 - 2:07"मृत लोक चांगली बक्षिसी देत नाहीत"
असं काहीसं तो पुटपुटला -
2:07 - 2:08आणि अंधारात निघून गेला.
-
2:09 - 2:11आणि त्यावेळी मी फक्त १४ वर्षांचा होतो,
-
2:11 - 2:14आणि मी माझ्या वडिलांचं पार्थिव
गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं -
2:14 - 2:16आणि माझी आई माझ्या बाजूला
-
2:16 - 2:18होती, मी हॉस्पिटलकडून घराकडे गाडी
चालवायला सुरुवात केली -
2:18 - 2:22आणि मूकपणे रडत असताना मधेच माझ्या
आईने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, -
2:22 - 2:24"बाळा, तू गाडी चालवायला कधी शिकलास?"
-
2:26 - 2:29आणि मी त्याबाबत विचार केला आणि मला
जाणवलं आणि मी आईला म्हणालो, -
2:29 - 2:31"आत्ताच गं, आई."
-
2:31 - 2:33(हशा)
-
2:33 - 2:34मग त्या रात्रीनंतर,
-
2:34 - 2:37मानवजातीच्या पौगंडावस्थेप्रमाणे,
-
2:37 - 2:41मी अस्तित्वाची कच्ची साधनं शिकलो.
-
2:41 - 2:45आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर
तेव्हा आयुष्याची चौकट खूप साधी होती. -
2:45 - 2:48म्हणजे, जे मिळेल ते खायचं
-
2:48 - 2:50आणि जे सांगितलं असेल ते करायचं.
-
2:50 - 2:53मला वाटतं सेलियाक एक भाजी होती,
-
2:53 - 2:58आणि व्हेगन, अर्थात, "स्टार ट्रेक" मधील
मिस्टर स्पॉकचा साथीदार होता. -
2:58 - 2:59(हशा)
-
2:59 - 3:02ज्या पहिल्या मुलीसोबत तुम्ही फिरायचा
तिच्याशीच लग्न करायचात . -
3:02 - 3:04तुम्ही एक कुशल तंत्रज्ञ असायचात जर
-
3:04 - 3:07तुम्ही तुमच्या गाडीचे कार्ब्युरेटर
दुरुस्त करू शकलात तर. -
3:07 - 3:11मला वाटायचं गे हा एक सुसंस्कृत
इंग्रजी शब्द आहे आनंदी या अर्थाचा -
3:12 - 3:15लेस्बियन तुमच्या प्रमाणे मला
पोर्तुगालची राजधानी माहित होती. -
3:15 - 3:16(हशा)
-
3:16 - 3:18तर मी कुठे होतो?
-
3:21 - 3:23आधीच्या पिढ्यांनी आपल्या संरक्षणासाठी
-
3:23 - 3:27परिश्रम आणि त्यागातून बनवलेल्या पद्धतींवर
-
3:27 - 3:28आपण विसंबून होतो,
-
3:28 - 3:32तेव्हा आम्हाला वाटे सरकार खरेच
आमच्या भल्यासाठी काम करते. -
3:32 - 3:34शास्त्र हे साधं आणि तर्कशुद्ध होतं,
-
3:34 - 3:36तेव्हा ऍपल हे केवळ एक फळ होतं
-
3:37 - 3:39आधी ईव्ह आणि मग न्यूटनच्या मालकीचं,
-
3:39 - 3:42तोपर्यंत स्टीव्ह जॉब्सचं ते नव्हतं.
-
3:42 - 3:43तुम्ही "युरेका" असं ओरडत
-
3:43 - 3:46रस्त्यांवरून नग्नावस्थेत धावत.
-
3:46 - 3:50कामासाठी आयुष्य जिकडे
नेईल तिकडे तुम्ही जायचात, -
3:50 - 3:52आणि लोक सहसा तुमचं स्वागतच करायचे.
-
3:53 - 3:55तेव्हा स्थलांतर हि संज्ञा फक्त
-
3:55 - 3:57सायबेरियन पक्षांसाठीच होती,
माणसांसाठी नव्हती. -
3:58 - 4:01सर्वांत महचं, तुम्ही जे होतात तेच होतात
-
4:01 - 4:03तुम्ही जो विचार करायचात
तेच बोलायचात. -
4:03 - 4:05मग माझ्या विशीच्या
-
4:05 - 4:08उत्तरार्धात, मी विस्तृत पसरलेल्या
मुंबई महानगरात आलो, -
4:08 - 4:10आणि माझी चौकट,
-
4:10 - 4:13नवीन उद्योगप्रधान महत्वाकांक्षी
मानवजातीप्रमाणे -
4:13 - 4:14बदलायला सुरुवात झाली.
-
4:15 - 4:18नवीन, अधिक सुशोभित अस्तित्वाच्या
शहरी लगबगीत -
4:18 - 4:20गोष्टी जरा वेगळ्या भासायला लागल्या.
-
4:20 - 4:23जगभरातून आलेल्या लोकांना मी भेटलो,
-
4:24 - 4:27चेहरे, जाती, लिंगं, सावकार.
-
4:27 - 4:30व्याख्या अधिकाधिक तरल झाल्या.
-
4:30 - 4:33आश्चर्यकारक समान पद्धतीने त्यावेळी
-
4:33 - 4:36कामामुळे तुमची ओळख पटू लागली,
-
4:36 - 4:39आणि सगळ्या पद्धती मला
कमी विश्वासार्ह वाटू लागल्या, -
4:39 - 4:42मानवजातीच्या विविधतेला आणि प्रगती
-
4:42 - 4:44आणि वाढीच्या मानवी गरजेला पकडून
-
4:44 - 4:46ठेवण्यासाठी खूपच निबीड अशा पद्धती.
-
4:48 - 4:50कल्पनांचा संचार मुक्तपणे
आणि वेगाने होत होता. -
4:51 - 4:57आणि मानवी कल्पकता आणि सहकार्य
आणि माझी स्वतःची सर्जनशीलता -
4:57 - 4:58यांचा चमत्कार मी अनुभवला,
-
4:58 - 5:03जेव्हा या एकत्रित प्रयत्नांच्या
हिकमतीच्या आधाराने -
5:03 - 5:05मी सुपरस्टार पदावर पोहोचलो.
-
5:05 - 5:08मला वाटायला लागलं कि
मी अवतरलो होतो, -
5:08 - 5:11आणि मी ४० वर्षांचा असताना
मी खरोखरंच उडत होतो. -
5:11 - 5:12मी सर्वव्यापी होतो.
-
5:12 - 5:14तुम्हाला माहित आहे? तोवर
मी ५० चित्रपट -
5:14 - 5:16आणि २०० गाणी केली होती,
-
5:17 - 5:19आणि मला मलेशियन लोकांनी सरदारपद
बहाल केलं होतं. -
5:19 - 5:22फ्रेंच सरकारने अत्युच्च नागरी सन्मान
मला दिला होता, -
5:22 - 5:26माझ्या आयुष्यासाठी दिलेला तो ज्याचं
नाव मी आजतागायत उच्चारू शकत नाही. -
5:26 - 5:27(हशा)
-
5:27 - 5:30फ्रान्स, मला माफ करा
आणि तो दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. -
5:30 - 5:34पण त्याहूनही मोठं म्हणजे,
मला अँजेलिना जोलीला भेटता आलं -- -
5:34 - 5:36(हशा)
-
5:36 - 5:38अडीच सेकंदांसाठी.
-
5:38 - 5:39(हशा)
-
5:39 - 5:42व मला खात्री आहे कि तिच्याही
स्मृतीत ती भेट कुठेतरी असेल -
5:42 - 5:43ठीक आहे, कदाचित नसेल.
-
5:43 - 5:47आणि हॅना मोंटानाच्या शेजारी
मी जेवायला बसलो -
5:47 - 5:49जेव्हा बहुतांशवेळ तिची पाठच
माझ्याकडे होती. -
5:50 - 5:52जसं मी म्हणालो, मी उडत होतो
मिलीकडून जुलीकडे, -
5:53 - 5:56आणि मानवजात माझ्यासोबत
भरारी घेत होती. -
5:56 - 5:59खरंतर आम्ही दोघंही अगदी मुक्तपणे
विहरत होतो. -
5:59 - 6:01आणि मग काय घडलं
हे तुम्हाला ठाऊक आहेच -
6:02 - 6:03इंटरनेट आलं.
-
6:04 - 6:06मी माझ्या चाळीशीच्या उत्तरार्धात होतो,
-
6:06 - 6:08आणि पिंजऱ्यातील कॅनरी पक्ष्याप्रमाणे
मी ट्विट करायला -
6:09 - 6:12लागलो, या समजुतीने कि जे लोक माझ्या
जगात डोकावतील -
6:12 - 6:14ते स्तुती करतील
-
6:14 - 6:16मी मानत असलेल्या चमत्काराची.
-
6:16 - 6:18पण माझ्यासाठी आणि मानवतेसाठी
काही वेगळंच -
6:19 - 6:24प्रतिक्षीत होतं. असं बघा,
जगाच्या सुधारित संधानतेमुळे -
6:24 - 6:26आम्ही कल्पना व स्वप्नांच्या
प्रसराची अपेक्षा केली होती. -
6:27 - 6:34स्वातंत्र्य आणि क्रांती ज्या जागेतून
वाहात होते त्या जागेचा सौदा आम्ही -
6:35 - 6:37विचारांच्या,
-
6:37 - 6:39निकालांच्या, व्याख्यांच्या खेडवळ अशा
-
6:39 - 6:41कुंपणाशी केलेला नव्हता.
-
6:43 - 6:45माझ्या प्रत्येक शब्दाचा नवीन अर्थ निघाला.
-
6:45 - 6:47माझी प्रत्येक कृती --चांगली,
-
6:48 - 6:51वाईट, कुरूप -- जगाला भाष्य करण्यासाठी
आणि निवाडा करण्यासाठी होती. -
6:51 - 6:54आणि वास्तवात, मी जे बोललो नाही
वा केले नाही त्याच्याही -
6:55 - 6:56नशीबी तेच होतं.
-
6:57 - 6:58चार वर्षांपूर्वी,
-
6:59 - 7:03माझी प्रेमळ पत्नी गौरी आणि मी
तिसऱ्या अपत्याला जन्म द्यायचा ठरवलं. -
7:04 - 7:06इंटरनेटवर असा दावा करण्यात
-
7:07 - 7:09आला कि ते मूल आमच्या पहिल्या
-
7:09 - 7:10मुलाच्या, जो १५ वर्षांचा होता
-
7:11 - 7:12प्रेमप्रकरणातून झालं
-
7:13 - 7:16असं म्हणे कि, त्याने एका मुलीसोबत
बीजारोपण केलं -
7:16 - 7:18रोमानियात तिची गाडी चालवत असताना.
-
7:19 - 7:21आणि हो, त्यासोबत एक बनावट
व्हिडीओ पण होता. -
7:22 - 7:23एक कुटुंब म्हणून आम्ही खूप
दुखावलो होतो -
7:23 - 7:25माझा मुलगा जो आता १९ वर्षांचा आहे,
-
7:25 - 7:27आतादेखील जेव्हा तुम्ही
-
7:27 - 7:28त्याला "हॅलो" म्हणता,
-
7:28 - 7:31तो म्हणतो, "भाऊ, माझ्याकडे साधं
युरोपीयन ड्रायव्हिंग लायसंस पण नाही." -
7:31 - 7:33(हशा)
-
7:33 - 7:35हो.
-
7:35 - 7:37या जगात,
-
7:37 - 7:40हळूहळू सत्य आभासी झालं
आणि आभास हे वास्तव झालं, -
7:40 - 7:42आणि मला जाणवायला लागलं
-
7:42 - 7:45कि मला जे व्हायचं आहे तास मी होऊ शकत
नाही आणि विचारांप्रमाणे बोलू शकत नाही, -
7:45 - 7:47आणि यावेळी मानवजात
-
7:48 - 7:50अगदी माझ्यासारखी होती.
-
7:50 - 7:53मला वाटतं आम्ही दोघेही
मध्यवयीन समस्येत होतो, -
7:54 - 7:58आणि माझ्यासारखीच मानवजात
अधिक दृश्य होत होती. -
7:58 - 8:00मी सगळं विकायला सुरुवात केली,
-
8:00 - 8:03केसांच्या तेलापासून
ते डिझेल जनित्रांपर्यंत. -
8:03 - 8:05मानवजात सगळंच खरेदी करत होती
-
8:05 - 8:07क्रूड तेलापासून ते अणुभट्ट्यांपर्यंत.
-
8:08 - 8:11असं बघा कि, मी घट्ट वेषातील
महानायकही करून बघितला -
8:12 - 8:14स्वतःचा पुन्हा शोध घेण्यासाठी.
-
8:14 - 8:17मला हे स्वीकारलंच पाहिजे कि
मी प्रचंड अयशस्वी ठरलो. -
8:17 - 8:22आणि एक विषयांतर म्हणून
जगातल्या सगळ्या बॅटमेन, स्पायडरमेन -
8:22 - 8:24आणि सुपरमेनच्या वतीने सांगू इच्छितो,
-
8:24 - 8:26तुम्ही त्यांना मानलं पाहिजे,
-
8:26 - 8:29कारण त्या महानायकाच्या वेषात
जननेंद्रियं खरंच दुखतात. -
8:29 - 8:30(हशा)
-
8:30 - 8:32हो, मी प्रामाणिकपणे सांगतोय.
मला इथे आपल्याला हे -
8:34 - 8:35सांगणं जरुरी आहे. खरंच.
-
8:35 - 8:39आणि अपघातानेच मी एका नव्या
नृत्याविष्काराचाही शोध लावला -
8:39 - 8:41जे मला जाणवलं नाही,
पण तो खूप गाजला. -
8:41 - 8:42मग जर चालणार असेल तर,
-
8:42 - 8:45आणि तुम्ही मला थोडं पाहिलं असेल तर,
मी तसा निर्लज्ज आहे, मी दाखवतो. -
8:45 - 8:47त्याला लुंगी डान्स म्हणायचे.
-
8:47 - 8:50जर चालणार असेल तर, मी तुम्हाला
दाखवतो तसा मी हुशार आहे. -
8:50 - 8:51(चिअर्स)
-
8:51 - 8:53तो असा काहीसा होता.
-
8:54 - 8:56लुंगी डान्स. लुंगी डान्स.
लुंगी डान्स. लुंगी डान्स. -
8:56 - 8:59लुंगी डान्स. लुंगी डान्स.
लुंगी डान्स. लुंगी डान्स. -
8:59 - 9:01लुंगी डान्स. लुंगी डान्स.
लुंगी डान्स. लुंगी. -
9:01 - 9:03एवढंच. हे खूप गाजलं.
-
9:03 - 9:04(चिअर्स)
-
9:04 - 9:06खरंच गाजलं.
-
9:08 - 9:12तुम्ही दखल घेतल्याप्रमाणे, काय चालू आहे
हे माझ्याखेरीज कोणालाच कळत नव्हतं, -
9:12 - 9:13आणि मीही त्याची पर्वा केली नाही,
-
9:13 - 9:15कारण संपूर्ण जग आणि संपूर्ण मानवजात
-
9:16 - 9:18माझ्याइतकीच गोधळलेली
आणि हरवलेली वाटत होती. -
9:19 - 9:20तेव्हा मी आशा सोडली नाही.
-
9:20 - 9:23इतर प्रत्येकजण जसे करतो तसेच
मीही समाजमाध्यमांतील माझ्या -
9:23 - 9:24ओळखीच्या पुनर्बांधणीचा
-
9:24 - 9:27प्रयत्न केला. मला वाटलं मी जर तत्त्वज्ञान
ट्विट केलं तर -
9:27 - 9:28लोकांना वाटेल मी त्यासोबत आहे,
-
9:28 - 9:31पण त्या ट्विटला आलेली काही उत्तरं खूपच
-
9:31 - 9:34गोंधळात टाकणारे संक्षेप होते जे मला
समजले नाहीत. माहिती आहे? -
9:34 - 9:36आरओएफएल, एलओएल.
-
9:36 - 9:40"आदिदास", विचारप्रवृत्त करणाऱ्या माझ्या
एका ट्विटला उत्तर म्हणून कुणीतरी लिहिले -
9:40 - 9:43आणि मला कुतूहल वाटत होते कि
बुटांचं नाव कुणी का लिहावं -
9:43 - 9:46म्हणजे, तुम्ही मला प्रत्युत्तर म्हणून
बुटांचं नाव लिहाल? -
9:46 - 9:49आणि मी माझ्या १६ वर्षांच्या मुलीला
विचारलं व तिने मला समजावलं -
9:49 - 9:52"Adidas" चा आता अर्थ आहे
"All day I dream about sex." -
9:52 - 9:55(हशा)
-
9:55 - 9:56खरंच.
-
9:56 - 9:57मला माहित नाही तुम्हाला हे
-
9:57 - 10:02तुम्हाला माहिती आहे का. म्हणून मग मी ठळक
अक्षरांत मिस्टर आदिदासला परत लिहीलं, "WTF" -
10:02 - 10:06नकळत आभार मनात कि काही संक्षेप
आणि गोष्टी कधीच बदलणार नाहीत. -
10:07 - 10:08WTF.
-
10:10 - 10:12पण आपण इथे आहोत.
-
10:12 - 10:14मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी
-
10:14 - 10:18५१ वर्षांचा आहे आणि मन बधिर करणाऱ्या
संक्षेपांची तमा न बाळगता -
10:18 - 10:19मी तुम्हाला सांगतो
-
10:19 - 10:22मानवजातीच्या अस्तित्वाचा महत्वाचा काळ
जर कोणता असेल तर -
10:22 - 10:24तो आत्ता आहे,
-
10:24 - 10:26कारण सध्याचे तुम्ही धीट आहात.
-
10:27 - 10:29सध्याचे तुम्ही आशावादी आहात.
-
10:29 - 10:32सध्याचे तुम्ही नाविन्यपूर्ण
आणि हिकमती आहात, -
10:32 - 10:35आणि अर्थात, सध्याचे तुम्ही शब्दांत
व्याख्या करण्यास कठीण असे आहात. -
10:36 - 10:38आणि या आकर्षक अशा
-
10:39 - 10:41अस्तित्वाच्या अपूर्ण क्षणात,
-
10:41 - 10:43थोड्या धीटपणाने मी येथे येण्याआधी,
-
10:43 - 10:46मी माझ्या चेहऱ्याकडे नीट
निरखून पाहायचं ठरवलं. -
10:48 - 10:51आणि मला जाणवलं कि
मी अधिकाधिक मादाम तुसॉंमधे -
10:51 - 10:54असलेल्या माझ्या मेणाच्या
पुतळ्यासारखा दिसतो आहे. -
10:54 - 10:56(हशा)
-
10:56 - 10:59हो, आणि त्या परिपूर्तीच्या क्षणात,
-
10:59 - 11:03मी मानवजातीला आणि मला सर्वात
मध्यवर्ती आणि प्रसंगोचित प्रश्न विचारला: -
11:04 - 11:06मी माझा चेहरा नीट करावा का?
-
11:07 - 11:11खरंच, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
मी एक अभिनेता आहे -
11:11 - 11:14मानवी सर्जनशीलतेची आधुनिक अभिव्यक्ती.
-
11:14 - 11:16मी ज्या भूमीतून आलो आहे
-
11:16 - 11:21ती अवर्णनीय पण खूप साध्या
अध्यात्माचा स्रोत आहे. -
11:22 - 11:24त्याच्या अतीव औदार्याने
-
11:24 - 11:27भारताने ठरवले ,
-
11:27 - 11:31एका सर्वस्व गमावलेल्या
स्वातंत्र्यसैनिकाचा मुस्लीम मुलगा -
11:31 - 11:35जो अपघातानेच स्वप्न विकण्याच्या
व्यवसायात पडला, -
11:36 - 11:40प्रणयराधनेचा सम्राट व्हावा,
-
11:41 - 11:43"बॉलीवूडचा बादशाह"
-
11:44 - 11:47देशाने पाहिलेला आजवरचा सर्वात
महान प्रियकर... -
11:48 - 11:49असा चेहरा असलेला.
-
11:49 - 11:50हो.
-
11:50 - 11:52(हशा)
-
11:52 - 11:54ज्याचे नाहीतर कुरूप, अपारंपारिक,
आणि आश्चर्य म्हणजे -
11:55 - 11:57पुरेसा चॉकोलेटी नाही
असे वर्णन केले गेले आहे. -
11:57 - 11:59(हशा)
-
12:02 - 12:04या प्राचीन भूमीच्या लोकांनी मला
-
12:04 - 12:06अमर्याद प्रेमाने कवटाळलं,
-
12:06 - 12:08आणि मी या लोकांकडून शिकलो कि
-
12:09 - 12:11सामर्थ्य किंवा दारिद्र्य यांपैकी काहीच
-
12:12 - 12:14तुमचे आयुष्य अधिक विस्मयकारक
-
12:14 - 12:15वा कमी त्रासदायक बनवत नाही.
-
12:16 - 12:19मी माझ्या देशवासीयांकडून शिकलो कि
-
12:19 - 12:21आयुष्याची, मानवाची, संस्कृतीची, धर्माची,
-
12:21 - 12:24राष्ट्राची प्रतिष्ठा हि त्याच्या
-
12:25 - 12:27अनुग्रह आणि अनुकंपेच्या क्षमतेत
-
12:28 - 12:30वास्तव्य करते.
-
12:31 - 12:33मी शिकलो कि जिच्याने तुम्हाला चालना मिळते,
-
12:33 - 12:36निर्मितीची उभारण्याची तीव्र इच्छा
जिच्याने तुम्हाला होते -
12:36 - 12:38अपयशापासून तुम्हाला जी दूर ठेवते,
-
12:38 - 12:40अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला मदत करते,
-
12:40 - 12:44ती कदाचित सर्वात जुनी आणि साधी मानवजातीला
माहिती असलेली भावना आहे -
12:44 - 12:46आणि ती म्हणजे प्रेम.
-
12:48 - 12:50माझ्या भूमीच्या एका दृष्ट्या कवीने खूप
छान लिहिलं आहे, -
12:50 - 12:52(हिंदी कविता म्हणतात)
-
13:01 - 13:03(कविता संपते)
-
13:03 - 13:05ज्याचे ढोबळ भाषांतर असे आहे कि
जे काही -- -
13:05 - 13:07तुम्हाला हिंदी येत असेल
तर कृपया दाद द्या -
13:07 - 13:09(टाळया)
-
13:09 - 13:10ते लक्षात ठेवायला खूप अवघड आहे.
-
13:11 - 13:14ज्याचे ढोबळ भाषांतर असे सांगता
येईल कि -
13:14 - 13:16तुम्ही विद्येसाठी कितीही ग्रंथ वाचले
-
13:17 - 13:19आणि नंतर त्या विद्येचं दान केलंत
-
13:19 - 13:23नावीन्य, सर्जनशीलता, तंत्रज्ञान वापरून
-
13:23 - 13:26पण तिच्या भविष्याबाबत मानवजात कधीच
शिकणार नाही जोवर ती विद्या -
13:26 - 13:32प्रेमभावनेने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या
प्रती अनुकंपेने प्रदान केली जाणार नाही. -
13:33 - 13:36अडीच अक्षरं ज्याने "
प्रेम" हा शब्द तयार होतो -
13:36 - 13:38ज्याचा अर्थ "लव्ह,"
-
13:38 - 13:40जर तुम्ही तो समजू शकलात
-
13:40 - 13:41आणि आचरणात आणलात,
-
13:41 - 13:44तर मानवजातीला प्रबुद्ध करण्यासाठी
तेवढेच पुरेसं आहे. -
13:45 - 13:47म्हणून मला खरंच असं वाटतं भविष्यातील
-
13:48 - 13:50"तुम्ही" हे प्रेम करणारे असावेत.
-
13:51 - 13:53नाहीतर मग त्याची भरभराट थांबेल.
-
13:54 - 13:57ते त्याच्या आत्मशोषणाने नाहीसे होईल.
-
13:59 - 14:00म्हणून तुम्ही तुमचे सामर्थ्य
-
14:01 - 14:02वापरू शकता भिंती उभारण्यासाठी
-
14:02 - 14:04आणि लोकांना बाहेर ठेऊ शकता,
-
14:05 - 14:09किंवा तुम्ही ते वापरून अडथळे तोडू शकता
आणि त्यांचे स्वागत करू शकता. -
14:10 - 14:12तुम्ही तुमच्या धर्माचा वापर
-
14:12 - 14:13लोकांना भयभीत आणि हतबल
-
14:14 - 14:16करण्यासाठी करू शकता
-
14:17 - 14:20किंवा तुम्ही त्याचा वापर लोकांना
धैर्य देण्यासाठी -
14:20 - 14:23करू शकता जेणेकरून ते
प्रबुद्धतेची उच्च पातळी गाठतील. -
14:23 - 14:25तुम्ही तुमची ऊर्जा अणुबॉम्ब
-
14:25 - 14:29बनवण्यासाठी वापरू शकता
आणि विनाशाचा अंधःकार पसरवू शकता, -
14:29 - 14:33किंवा तुम्ही तिचा वापर कोट्यावधींना
प्रकाशाचा आनंद देण्यासाठी करू शकता. -
14:34 - 14:38तुम्ही निष्ठुरतेने सागरांत प्रदूषण करू
शकता आणि जंगलं तोडू शकता. -
14:38 - 14:40तुम्ही पर्यावरणाचा नाश करू शकता,
-
14:40 - 14:43किंवा त्याच्याशी प्रेमाने वागू शकता
आणि पाणी व वृक्षांपासून -
14:43 - 14:45जीवनाची पुनर्निर्मिती करू शकता.
-
14:45 - 14:47तुम्ही मंगळावर जाऊ शकता
-
14:47 - 14:49आणि सशस्त्र आश्रय उभारू शकता,
-
14:51 - 14:56किंवा तुम्ही जीवनाचा आणि प्रजातींचा
शोध घेऊन शिकू आणि आदर करू शकता. -
14:56 - 15:00आणि आपण कमावलेल्या सगळ्या
संपत्तीचा वापर तुम्ही करू शकता -
15:00 - 15:02निष्फळ युद्ध लढण्यासाठी
-
15:03 - 15:06आणि लहान मुलांच्या हातात शस्त्र
देऊ शकता -
15:06 - 15:07एकमेकांचा जीव घेण्यासाठी,
-
15:08 - 15:10किंवा तुम्ही तिचा वापर
-
15:10 - 15:12अधिक अन्नाची निर्मिती करून
-
15:12 - 15:14त्यांची पोटं भरण्यासाठी करू शकता.
-
15:15 - 15:16माझ्या देशाने मला शिकवले आहे
-
15:16 - 15:21मानवाची प्रेम करण्याची क्षमता
हि देवत्वासारखी आहे. -
15:22 - 15:26ती अशा जगात उठून दिसते
-
15:26 - 15:31जिच्यासोबत मला वाटतं संस्कृतीने
बरीच छेडखानी केली आहे. -
15:33 - 15:35गेल्या काही दिवसातील इथली व्याख्यानं
कमालीच्या लोकांनी -
15:35 - 15:37येऊन दाखवलेली त्यांची बुद्धिमत्ता,
-
15:37 - 15:41वैयक्तिक याशांबद्दल त्यांचं बोलणं,
नावीन्य, तंत्रज्ञान, -
15:41 - 15:44शास्त्र, ज्ञान जे आपल्याला या
-
15:44 - 15:47TED व्याख्यानांतून मिळत आहे
आणि तुम्ही सर्वजण -
15:47 - 15:50हि सगळी भविष्यातील "आपण"
साजरे करायला पुरेशी कारणं आहेत. -
15:50 - 15:51पण त्या जल्लोषासोबतच
-
15:52 - 15:56आपल्यातील प्रेम आणि अनुकंपा
वाढवण्याचा शोध -
15:57 - 16:00ठाम असायला हवा,
ठाम असायला हवा -
16:01 - 16:03अगदी तितकाच.
-
16:04 - 16:06म्हणून मला वाटतं कि भविष्यातील "तुम्ही"
-
16:07 - 16:08हे अनंत आहात.
-
16:09 - 16:12भारतात त्याला चक्र म्हणतात,
वर्तुळासारखं. -
16:13 - 16:16स्वतःच्या पूर्णतेसाठी जिथे सुरु होते
तिथेच ते संपते. -
16:17 - 16:21तुम्ही जे काळ आणि अवकाश
वेगवेगळे मानता -
16:21 - 16:22तुमचे अकल्पनीय
-
16:25 - 16:28आणि विलक्षण महत्व
-
16:30 - 16:32आणि विश्वाच्या समोर असलेले तुमचे
-
16:32 - 16:38नगण्यत्व पूर्णपणे जाणता.
-
16:39 - 16:40तुम्ही जे परतत आहात
-
16:41 - 16:43माणुसकीच्या मूळ निरागसतेकडे,
-
16:43 - 16:45जी हृदयाच्या शुद्धतेने प्रेम करते,
-
16:46 - 16:48जी सत्याच्या दृष्टीने बघते,
-
16:49 - 16:55जी निर्मळ मनाच्या स्पष्टतेने स्वप्न बघते.
-
16:56 - 16:58भविष्यातील "तुम्ही" वय
-
16:59 - 17:00वाढणाऱ्या चित्रपट नायकासारखे
-
17:01 - 17:04असायला हवे ज्याला हा विश्वास दिलेला
असतो कि असं जग असू शकतं -
17:04 - 17:07जे पूर्णतः, संपूर्णतः
-
17:07 - 17:10स्वकेंद्रितपणे
-
17:10 - 17:11स्वतःच्याच प्रेमात आहे.
-
17:12 - 17:15एक जग -- खरंच तुम्हीच ते असायला हवं
-
17:15 - 17:17अशा जगाचे निर्माते
-
17:17 - 17:19जे स्वतःचाच उत्तम प्रियकर असेल.
-
17:20 - 17:22आदरणीय श्रोतेहो, ते मला वाटतं
-
17:22 - 17:23भविष्यातील "तुम्ही" असायला हवं.
-
17:23 - 17:25खूप आभारी आहे.
-
17:25 - 17:26शुक्रिया.
-
17:26 - 17:28(टाळ्या)
-
17:28 - 17:30धन्यवाद.
-
17:30 - 17:32(टाळ्या)
-
17:33 - 17:34धन्यवाद.
-
17:34 - 17:36(टाळ्या)
- Title:
- मानवजात, प्रसिद्धी आणि प्रेमाबद्दलचे विचार
- Speaker:
- शाहरुख खान
- Description:
-
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे आघाडीचे नायक असलेले शाहरुख खान म्हणतात, "मी स्वप्ने विकतो आणि कोट्यावधी लोकांच्या घरांत प्रेम वाटतो." या आनंददायक, मजेशीर व्याख्यानात खान त्यांच्या आयुष्याची कमान शोधतात, त्यांच्या प्रसिद्ध अशा काही नृत्याच्या चाली दाखवतात आणि झगमगाटात जगलेल्या आयुष्यातून कष्टाने मिळवलेली बुद्धिमत्ता वाटतात.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 17:49
Abhinav Garule approved Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love | ||
Abhinav Garule rejected Marathi subtitles for Thoughts on humanity, fame and love |