-
अनप्लग्ड ॲक्टीव्हिटीज | क्राऊडसोर्सिंग
-
या धड्याचं नाव आहे क्राऊडसोर्सिंग. या धड्यात आपण
-
पत्ते वापरतो आणि काही गोष्टी एकट्याने करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गटात केल्या तर कशा अधिक सोप्या
-
होतात, हे शिकतो. तर काही मित्रमैत्रिणी गोळा करा आणि काहीतरी छान तयार करा.
-
क्राऊडसोर्सिंग म्हणजे एखादी गोष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी लोकांच्या मोठ्या गटाकडून मदत घेणे.
-
संगणक शास्त्रात, आम्ही नेहमी क्राऊडसोर्सिंग वापरतो.
हजारो हौशी आणि व्यावसायिक लोक त्यांचे कॉम्प्युटर्स
-
एकत्र जोडून लक्षावधी माहितीच्या तुकड्यांमधून शोध घेतात.
-
पुढची मार्सेन मूळ संख्या शोधतात किंवा परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात.
-
सर्व प्रथम तुम्हाला सगळ्यांना वाटतं किती मस्त आणि मग आम्हाला वाटतं की किती मस्त आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं किती मस्त...
-
जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा चित्रपटाच्या प्रत्येक सेकंदात 24 चित्रे असतात, त्याला आपण फ्रेम्स म्हणतो
-
तर यातील प्रत्येक चित्र तयार करावं लागतं आणि रेंडर करावं लागतं आणि मग सगळी चित्रं एकत्र करावी लागतात.
-
माझी टीम आणि मी, आम्ही सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहोत. आम्ही सगळे सॉफ्टवेअरचा एक
-
भाग तयार करतो, जो प्रत्यक्षात एक इमेज तयार करतो आणि एक अंतिम इमेज तयार करतो, जी तुम्हाला
-
स्क्रीनवर दिसते. कलाकार आणि इतर डेव्हलपर्स त्यांच्या टीमवर्कचा आणि प्रक्रियेचा भाग म्हणून हे टूल वापरतात.
-
त्यामुळे त्यांना स्क्रीनवर ज्या इमेजेस पहायच्या आहेत, त्या तयार करता येतात. उदा. फाईंडिंग निमोमध्ये,
-
जेव्हा क्रश आणि स्क्वर्ट आणि त्यांचे सगळे मित्र पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाहातून उडत असतात,
-
तुम्हाला वाहणाऱ्या पाण्याच्या इमेजेस दिसत असतात, तुम्हाला कासवाच्या पाठीवरील रंग दिसत असतात,
-
तुम्हाला माशांच्या बाजू दिसत असतात, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही लिहित असलेल्या गणिती आणि
-
कॉम्प्युटर प्रोग्रॅम्सद्वारे तयार होतात, मग आम्ही ते कलाकाराला देतो आणि ते त्यावरून अंतिम
-
इमेज तयार करतात आणि त्यात बदल करतात आणि तिला सुंदर आणि मजेशीर करतात.