अनप्लग्ड ॲक्टीव्हिटीज | क्राऊडसोर्सिंग या धड्याचं नाव आहे क्राऊडसोर्सिंग. या धड्यात आपण पत्ते वापरतो आणि काही गोष्टी एकट्याने करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गटात केल्या तर कशा अधिक सोप्या होतात, हे शिकतो. तर काही मित्रमैत्रिणी गोळा करा आणि काहीतरी छान तयार करा. क्राऊडसोर्सिंग म्हणजे एखादी गोष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी लोकांच्या मोठ्या गटाकडून मदत घेणे. संगणक शास्त्रात, आम्ही नेहमी क्राऊडसोर्सिंग वापरतो. हजारो हौशी आणि व्यावसायिक लोक त्यांचे कॉम्प्युटर्स एकत्र जोडून लक्षावधी माहितीच्या तुकड्यांमधून शोध घेतात. पुढची मार्सेन मूळ संख्या शोधतात किंवा परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रथम तुम्हाला सगळ्यांना वाटतं किती मस्त आणि मग आम्हाला वाटतं की किती मस्त आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं किती मस्त... जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा चित्रपटाच्या प्रत्येक सेकंदात 24 चित्रे असतात, त्याला आपण फ्रेम्स म्हणतो तर यातील प्रत्येक चित्र तयार करावं लागतं आणि रेंडर करावं लागतं आणि मग सगळी चित्रं एकत्र करावी लागतात. माझी टीम आणि मी, आम्ही सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहोत. आम्ही सगळे सॉफ्टवेअरचा एक भाग तयार करतो, जो प्रत्यक्षात एक इमेज तयार करतो आणि एक अंतिम इमेज तयार करतो, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते. कलाकार आणि इतर डेव्हलपर्स त्यांच्या टीमवर्कचा आणि प्रक्रियेचा भाग म्हणून हे टूल वापरतात. त्यामुळे त्यांना स्क्रीनवर ज्या इमेजेस पहायच्या आहेत, त्या तयार करता येतात. उदा. फाईंडिंग निमोमध्ये, जेव्हा क्रश आणि स्क्वर्ट आणि त्यांचे सगळे मित्र पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाहातून उडत असतात, तुम्हाला वाहणाऱ्या पाण्याच्या इमेजेस दिसत असतात, तुम्हाला कासवाच्या पाठीवरील रंग दिसत असतात, तुम्हाला माशांच्या बाजू दिसत असतात, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही लिहित असलेल्या गणिती आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅम्सद्वारे तयार होतात, मग आम्ही ते कलाकाराला देतो आणि ते त्यावरून अंतिम इमेज तयार करतात आणि त्यात बदल करतात आणि तिला सुंदर आणि मजेशीर करतात.